Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 22

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 22

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

#21 एक छोटी सी लव स्टोरी

मंदार आणि प्रितीचे नाते वेगळ्या वळणावर आहे..त्यात प्रीती ला ऑफिस कडून लंडन ला पाठवले जाते निनाद आणि प्रीती परत लंडन मध्ये भेटतात. निनाद तिचा हा काही महिन्यांचा काळ अविस्मरणीय बनवायचा आहे. इथे साहिल ला प्रीती आवडत असते पण तिच्या बदल गैरसमज करून घेतला आहे.????????????????????????????????????????????????????

प्रीतीला कंपनी कडून एक लहान अपार्टमेंट मिळते. शुक्रवारी तिला एच आर कडून घराचा चाव्या मिळतात. थोडे ऑफिस पासून दूर असे हे अपार्टमेंट असते. निनाद तिला घर सेट करायला मदत करतो. थोडे किचन चे सामान वैगरे घेऊन तिला घरी सोडतो

चल मी निघतो उद्या शनिवार आहे .तयार राहा ..फिरायला नेतो तुला….काय बघायला आवडेल???

हम तू सांग मला तर सगळेच नवीन आहे. तू टूर गाईड माझा…

दुसऱ्या दिवशी निनाद पिकनिक बास्केट घेऊन प्रीतीला पीक केले…छान हायेड पार्क मध्ये घेऊन आला. छान लांबवर पसरलेली हिरवळ, हलके हलके उबदार उन, मस्त पांढरा पायवाटा आणि ठिकठिकाणी पिकनिक मूड मध्ये असलेली लोक, दोघांनीही दिवस गाप्पा मारल्या, फिरले, बोटिंग केले आणि पिकनिक जेवले आणि बरेच दिवसांनी पकडपकडी खेळले…संध्याकाळी प्रीतीला घरी सोडले पण तिने त्याला थांबवून गरम गरम खिचडी खायला घातली आणि मग घरी पाठवले. ..आजचा दिवस खूप मजेत गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला तयार राहायला सांगतो. थोडे ट्रेंडी कपडे पण स्पोर्ट्स शूज घालून तयार राहा… चालायचं आहे उद्या….

सकाळी सकाळी तिला घेऊन तो Buckingham Palace बघायला नेतो. लंडन वारी ह्या शिवाय अपूर्णच नाही का?? दिवसभराचा पास काढून दोघे पॅलेस फिरत फिरत change of guards ceremony बघायला येतात. दुपारनंतर बाहेरच जेवून लंडन चे रस्ते पालथे घालतात ..शेवटी चालून चालून पाय दुखायला लागतात म्हणून मग निनाद घरी घेऊन येतो…

बस .. चहा करतो.. प्रिन्सेस ..चालून चालून दमलात ना तुम्ही..!!!

मग काय पायाचे तुकडे पडलेत असे वाटते मला..कित्ती मोठा आहे पॅलेस…बाबा रे..चालून चालून वाट लागली माझी…

घे चहा घे…मज्जा आली ना पण …पॅलेस म्हणजे लंडनची जान आहे ..राणी निघते ना तेव्हा बघायचा तिचा थाट…तरी लोक म्हणतात हा काहीच थाट नाही म्हणून..गेले ते दिन गेले…असली लंडन करला दोनच गोष्ट प्रिय …एक म्हणजे राणी आणि दुसरे उन ….दोंघिवर तासनतास गप्पा चालतात…गप्पांच्या ओघात तो तिचे हलकेच पाय मसाज करायला घेतो…

काय करतोयस निनाद…ती जोरात ओरडते… घाबरून तो बाजूला सरकतो….

काय झाले??? का ओरडते?? पाय दुखत होते ना .म्हणून मसाज करत होतो..

त्याची काही गरज नाही निनाद…मी बघून घेईन काय करायचे ते….पुन्हा असा हात लावू नकोस ..मला नाही आवडत…

सॉरी . एक्स्त्रिमली सॉरी..प्रीती पण मला माझ्या मर्यादा कळतात..मला फक्त तुला मदत करायची होती बस…त्याने तिच्याकडे रागाने बघत म्हटले…

पुन्हा प्रीत म्हणून बोलायचे नाही…ओके बाकी काहीही म्हण चालेल…पण प्रीत म्हणायचे नाही….तिनेही चिडून म्हटले….

अरे अशी काय ही.आता तर बरी होती..पायाला हात लावला म्हणून चिडली की प्रीत म्हटले म्हणून चिडली त्याला काही कळेना …

का काय झाले हाक मारली तर..तू नाही निन्या म्हणते…ते चालते???? त्याने ही चिडून विचारले.

हो चालते …कारण मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे हे नाव फक्त मीच दिलंय तुला.मग थोडी शांत होऊन म्हणाली…प्रीत मला मंदार बोलवतो.. ह्या नावाने नको बोलू प्लीज…

ओह सॉरी मला माहिती नव्हते…

दोघे ही मग बराच वेळ शांत बाहेर बघत बसले..शेवटी त्यानेच शांतता संपवत म्हटले…पोट भरले असेल ना माझ्याशी भांडून तर जा परत एकदा चहा करून आण..सगळा थंड झाला तुझ्यामुळे….

आणि दोघे हसायला लागले. .खडूस …आणते परत चहा तुझ्यासाठी.

आतमध्ये प्रीती परत चहा ठेवते आणि विचार करते…का आपण चिडलो निनादवर?? त्याने असा स्पर्श नको होता करायला ..पण त्या स्पर्शात काळजी जास्त होती…वासना नव्हती ..लगेच स्पर्श शी भाषा कळते की मुलींना..मग का चिडचिड झालीं आपली??? ज्या ठिकाणीं मंदार ने असायला पाहिजे तिथे निनाद होता म्हणून कदाचित…माफी मागितली पाहिजे त्याची…उगीच गैरसमज नको आपल्या निखळ मैत्री मध्ये. …..

बाहेर येऊन त्याला गरम गरम चहा देत एक बिस्कीट plate पुढे केली….सॉस ने बिस्कीट वर सॉरी लिहिले होते…

अरे वाह अशी कोणी माफी मागणार असेल ना..तर नवरा खुश होईल तुझा…

झाले तू पण मला परक करायला बस आता….

म्हणजे??? काय बोलायचे आहे तुला??

काही नाही…

हम्म.नक्कीच काहीतरी गडबड आहे….काय लपवत आहे आपल्यापासून….थोड्यावेळाने त्याने विषय काढला…

मंदार कसा आहे?? काय चाललंय सध्या?? कधी परत येतोय?

तसा चांगला आहे, अभ्यास , प्रोजेक्ट्स इतर काही गोष्टी…बिझी असतो..अजून तरी परत यायचं विचार नाही आहे आणि आता तर मुळीच वाटत नाही…

का??काय झाले???

काय सांगू तुला…आई बाबा मागे लागलेत लग्नाच्या..त्यांचा ही बरोबर आहे म्हणा..२५ आली माझी ….घोड नवरी आहे ना मी !!!! आणि ह्याचा बदल घरी काही माहिती नाही..म्हणून नाव नोंदवल आहे..ह्याला विचारले तर विषय टाळतो….काहीच क्लारिटी नाही मला ह्याच्या मनात काय आहे ते. आणि तसे पण ह्याची तयारी असेल तरी घरी कनविन्स करणं खूप कठीण जाणार आहे…मलाच नाही माहिती माझ्या आयुष्यात काय चाललंय ते आणि उद्या काय होणार आहे ते !!!!

त्याचे सोड .पण तुला तरी क्लारिटी आहे का तुला काय हवे आहे ते? विचार केलास कधी? की प्रेम केलंय म्हणून लग्न करायचे आहे तुला???

म्हणजे?? काय बोलतोयस तू???

वेडपट मला असे म्हणायचे आहे ..तुला तरी माहिती आहे का तुला काय हवे आहे ते?

त्याच्या बदल काय माहिती आहे तुला? घरचे तुला सांगितले ते पण ५वर्षांनी हो ना??? त्याचा स्वभाव अजून कळला तुला? रोज चीड चीड करतो , भांडतो तुझ्याशी रोज, वाटेल ते बोलतो तुला, अगदी कोणाबरोबर ही लिंक करतो तुला,विश्वास नाही तुझ्यावर अजून इतक्या वर्षांनी सुद्धा , तुला दुखवायचं एक संधी सोडत नाही, स्वतची स्वप्नं शिवाय त्याला काही दिसत नाही…तुझी स्वप्नं, तुझी नोकरी, तुझे गाणे त्याला काहीच पडलेले नाही तुझे…तुला मित्र मैत्रिणीपासून तोडतो… तुला एकटा पडायला कमी करत नाही…तुला अश्या माणसाशी लग्न करायचे आहे… आयुष्याची होळी करायची आहे तुला मंदारशी लग्न करून???

तुला कसे माहिती मंदार बदल???कोणी सांगितले तुला??? कानात तप्त रस ओततोय कोण तरी असे वाटले प्रीतीला…जे काही बोलत होता ते सत्य आहे पण लोकांना दिसतात ते दोष आपल्याला कधी दिसले नाहीत …इतके आंधळे झालो आपण प्रेमात …!!!!!

तू आजारी होतीस आठवतंय??! मला वाटलेच मंदार ने काहीतरी केले असेल… म्हणून माहिती काढली तेव्हा कळल. वाटलं तू कधी तरी सांगशील पण नाही सांगितलेस मला. म्हणून मी हा विषय नाही काढला कधी…

प्रीती…नको विचार करुस त्याचा …आयुष्भर साथ नाही देणार तो तुला.खूप वेगळा स्वभाव आहे त्याचा. तुलाच त्रास होईल त्याचा आणि आजकाल त्याचे वागणे बघून मला नाही वाटत तो लग्नाला तयार आहे ….may be you two just grew apart ..that's it. …

हम्म्म.ती मात्र आपल्याच विचारात डोळे बंद करून बसते… ती शांतता जिवघेणी असते.. थोड्या वेळाने निनाद तिला हाक मारतो…चल घरी सोडतो तुला..उद्या ऑफिस आहे. विसर मी काय बोललो ते.. तुला तर माहित आहे ना..मी काळजी करतो तुझी म्हणून बोलावावेसे वाटले तुला.. तसे पण तुझ्या पर्सनल गोष्टी पासून लांब राहा सांगितले तरी माझ्यात सुधारणा होत नाही.. सवय झाली आहे मला जिथे तिथे नाक खुपसायची .. नको विचार करू एवढा…

लक्षात आहे तुझ्या अजून? विसरला नाहीस? तिने कान पकडत म्हटले.

नाही. . खूप रागावलो होतो मी आणि हर्ट पण झालो होतो. .. वाईट आहेस तू माहिती आहे तुला !! दुष्ट कुठली. बेस्टीला असं बोलते ते….

दुसऱ्या दिवशी, प्रीती कामात असताना निनादचा मेसेज .. उ ओके ?

वेडा कुठला ..कित्ती काळजी करतो…त्याशी थोडा वेळ चॅट करून प्रीती कामाला लागते… दुपारी शीना तिला जेवायला बोलवायला येते… बोलघेवडी शीनाशी लगेच प्रितीशी मैत्री झाली. बोलता बोलता कळले ती प्रीतीच्या जवळच राहत होती… मग दोघीनी एकत्र जायचे यायचे ठरवले… संध्याकाळी निनादला मेसेज केला. . मी एकटी जाईन नको येऊ घ्यायला …..

काय ग रागावलीस का? लगेच निनाद ने फोन केला. .

नाही रे बाबा. . मला एक मैत्रीण मिळाली ..माझ्या घराजवळच राहते..ट्यूब ने जाते येते.तिच्याबरोबर जाते आहे. नाहीतरी तुला उगीच लांब पडते माझंही ऑफिस ..आपण भेटू नंतर.. चल बाय.

चला म्हणजे आत्ता प्रीती रोज भेटणार नाही. काहीच बहाणा नाही तिला भेटायचा आता. .. त्यानं सुस्कारा सोडला. .बर आहे इंडिपेंडंट होते आहे ते. ..

घरी पोचल्यावर मात्र प्रितीने निनादला फोन केला. . सॉरी रागावली नाही हं तुझ्यावर. कालच्या मुळे तर मुळीच नाही. शीना होती माझ्याबरोबर म्हणून जास्ती बोलता आले नाही. ..निनाद मला पण शिकले पाहिजे ना आता… रोज थोडी असणार तू माझ्याबरोबर !!! तुला पण तर काम असेल ना .. तू मला वीकएंडला भेटत जा ना आपण मस्त फिरायला जात जाऊ….

ठीक आहे .. तुझी मर्जी ..मनात म्हटले तू तयार असशील ना माझ्या शेवट्याच्या श्वासापर्यन्त तुझ्या बरोबर राहायला आवडेल प्रिटी .. पण तू तर लक्ष पण देत नाहीस माझ्याकडे…

मग दोंघांनी गप्पा मारत मारत आपापल्या घरी जेवण बनवले. . चला आता शनिवार शिवाय भेट होणार नाही म्हणजे…कशी ग आहेस तू. . मी कधी म्हटलं तुला मी त्रास होतो तुला सोडायला ते.. तू सांगू नाकॉस पण मी जे काही बोललो ना ते आवडलं नाही तुला माहिती आहे. ..पण ठीक आहे हरकत नाही. . तुला रिऍलिटी चेक होता तो. .. पुन्हा काही बोलणार नाही तुला मंदार वरून. . तू आणि तो काय तो गोंधळ घाला आणि खुश राहा. .. तो विचार करत झोपला.

शनिवार कधी येतोय असे झालं त्याला. . हा दोन चार दिवस फक्त चॅट केला दोघांनी… शनिवार सकाळीच नीनाद ब्रेकफास्ट घेऊन तिच्याकडं पोचला .. उठ आळीशी कुठली.. केव्हयाचा बेल मारतोय…. बाहेर जायचं आहे ना!!! त्याने घाई करत म्हटले..

कशी बशी प्रीती तयार झाली… छान मिडी घालून केसचा बॉ बांधत होती तर नीनाद तिला चोरून बघत होता. .

चल आता .. बसला लॅपटॉप घेऊन. . ..

वाह चोराच्या उलट्या बोंबा आहेत ह्या .. झोपून राहते आणि वर मलाच बोल. .

अरे रात्री उशीर झोपली मी .. डोके दुखत होते. . थोडी कणकण वाटतंय…

बघू ताप तर नाही ना. . मे आय??

ह्हम्म. . ताप तर नाही आहे तुला. . चल प्लॅन कॅन्सल. .. उद्या जाऊ.

नको जाऊ या ना. . प्लीज… एक टॅबलेट घेते .. होईन बरी … चल ना

त्यान गाणं बदलत किशोरी आमोणकरची सी डी लावली. सुंदर रागदारी प्ले होत होती आणि बाहेर हलका हलका पाऊस. .थोड्यवेळां प्रीती हि गुणगुणू लागली .. ते बघून निनाद गालातल्यागालात हसला. . कित्ती वर्षांनी ऐकतो हिला गुणगुणताना .. छान गायची खरे ती , का सोडलं माहिती नाही.. त्यानं हि मग स्टररिंग वर तबल्याचा ठेका धरला. ..

प्रीती .. बाबुल मोरा .. म्हण ना. .किती वर्षात तुझ्या कडून ऐकली नाही. तुझी आवडती ठुमरी होती ….आठवते. .

गाणं सुटले रे निनाद… नाही आठवत आता. सूर ही धड लागत नाहीत आता .. तिने तोंड फिरवत म्हटले…..

म्हण ना प्लीज. .. फक्त एकदा. . त्यानं आर्त आवाजात आग्रह केला. . त्याचा आग्रह प्रीतीला मोडवला नाही आणि तिने taan छेडली…

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए बाबुल मोरा,

नैहर छूटो ही जाए चार कहार मिल,

मोरी डोलिया सजावें - ४

मोरा अपना बेगाना छुटो जाए बाबुल मोरा …

आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश जे बाबुल घर आपना मैं पीया के देश बाबुल मोरा …

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए……

दोघांनीही आपले अश्रू शिताफीने लपवले एकमेकांपासून…सूर नीट लागत नाही तुझा प्रीती .. प्रॅक्टिस का सोडलीस?

माहिती नाही. . पण गाणं सुटले हे खरे…

सुटले गाणे की सोडले की आवड बदलली तुझी? त्याने तिच्यावर रोखत म्हटले. .. तीन मात्र काही न बोलता गप्प बसली. ..

आज बिग बेनला फिरायला आले होते.पाऊस थांबून आता छान ऊन पडले होते. .. दोघांनी बिग बॅन पार्क मध्ये आधी थोडा वेळ भटकले आणि मग लंडन आय ह्या आकाश पाळण्यात फिरून आले. . संपूर्ण लंडनचे नयनमनोहर दृश्य तिथून दिसत होते… दूर दूर पर्यंत पसरलेले लंडन त्यात थेम्स नदीचे नागमोडी वळण घेत असलेले पात्र आणि हवेतला हलके हलके डुलणारे केबिन असे मस्त वातावरण होते… aअशातच कोणी तरी मुलाने एका मुलीला प्रोपोज केले .. हे बघून सगळ्यांनि टाळया वाजवल्या. .. कित्ती रोमँटिक ना.. नीनाद म्हणाला. . ..

ह्हम्म. . तू पण तुझ्या गर्लफ्रेंड ला इथेच प्रोपोज कर मग. .

नाही !!! मी इथे नाही करणार. . तिच्यासाठी सगळेच स्पेसिअल असेल. .. कारण ती पण तर स्पेसिअल असेल ना. ..

अच्छा बचू . म्हणजे कोणी शोधली आहे तर !!! मला कधी भेट घडवणार. ..सांग ना .. ती बराच वेळ मास्का मारत बसली ..पण निनाद ने तिला काही सांगितलं नाही. . शेवटी वैतागून म्हणाला. . डोके दुखायचे थांबले वाटत कि आता माझंही डोके दुखावणार !!!

जा .. खडूस बोलू नकोस. .. तिने हि रागावून म्हटले.

संद्याकाळ होत होती…दोघे घरी परत जायला निघाले. .

प्रीती ने मोबाइल वर मंदार चे ६ मिस्ड कॉल … मोबाईल तर गाडीतच राहिला होता !!!!

तिने मेसेज चेक केले. .मंदारचा मेसेज होता. ..

मला मुंबईला परत गेलं पाहिजे ताबड्तोप .. निनाद. .. प्रीती ने म्हटले. .

काय झाले असेल मंदारला? प्रीती जाईल परत मुंबईला अचानक निघून? निनादचे पुढे काय?

वाचत राहा कॉलेज वाली लव स्टोरी ..तुम्हाला हा भाग कसा वाटलं ते नक्की सांगा. .

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...