एक छोटीसी लव्ह स्टोरी- 21

A story of Love, friendship and Love in Friendship.

इकडे  वेळेच्या आधी निनाद तिला एअरपोर्ट वर घ्यायला पोचला…जवळ जवळ १ वर्षाने आज प्रीती त्याच्या समोर असणार होती …काय करू आणि काय नको असे झाले होते….सारखे सारखे वॉच कडे लक्ष जात होते… शेवटी एकदा फ्लाईट आल्याची घोषणा झाली तसा निनाद अजूनच बेचैन झाला…कधी एकदा ती दिसते असे झाले….????????????????????????????????????????????????????????????????????????????????

हीथरो एअरपोर्ट एवढे अवाढव्य..प्रीती आधी घाबरली…कुठे  जायचे काही कळेना. फोन ही बंद झालेला..शेवटी विचारात विचारात सगळे सामान  घेऊन बाहेर यायला निघते… ..मनात एकच विचार..आपल्याला झेपेल ना हे सगळे???? ट्रॉली ढकलत ढकलत ती बाहेर येत होती….बाहेर निनाद आला असेल ना ??ह्याची चिंता…

तो मात्र बाहेर येरझारा घालत होता…शेवटी एकदाची ती दिसली…छान ब्ल्यू जीन्स वर पांढरा लेस चा टॉप आणि ग्रे कलर चे वुलान जॅकेट आणि केस छान लांब मोकळे सोडलेले गुलाबी लिपस्टिक आणि भेदरलेल्या नजरेने त्याला शोधत होती…तिला बघून हो थोडा वेळ बघतच राहिला..आजूबाजूला  गिटार वाजते आणि कोणी हलके रोमँटिक धून वाजवतंय असे वाटत होते.हळूच त्याने स्वतःला एक टपली मारली….गर्लफ्रेंड नाही मैत्रीण आहे तुझी….जा चांगल्या मित्राची भूमिका पार पाड आत्ता…

त्याने तिला लांबूनच हात केला..आधी तिचे लक्षच  नव्हते पण शेवटी तिचे लक्ष गेले निनादचा हात हलवत होता
तिच्यासाठी ते…त्याला बघून धावतच त्याच्याकडे यायलाला निघाली…

तिला असे धावताना बघून तोही पुढे आले लोकांना ढकलत आणि सरळ आपले दोन्ही हात पसरले.ती ही धावत येऊन त्याला हग केले…????????????????????????????????????????????

निन्या….कसा आहेस तू!!!! ती आनंदाने चित्कारले.????????????????????????????????????????????????????????????????????????

तो मात्र क्षणभर तिला जवळ घेऊन की नको ह्या विचारात शेवटी तिला आपल्या मिठीत सामावून घेतले…बस हे क्षण असाच आपल्या आयुष्यात राहून दे. कित्ती वर्ष हे स्वप्न बघत होतो.आज अवचित ही आपल्या मिठीत आहे..आनंदाने इतक्या दिवसांचा विरह याने त्याच्या डोळ्यात अश्रू आले ..????????????????????????????????????????????????????????????????

मी मस्त तू कशी आहेस?? कसा झाला प्रवास ?? काही त्रास नाही ना झाला?? आवडले का लंडन?? ..त्याने हळूच तिला बाजूला घेत म्हटले..

तू रडतोय निनाद?? काही झाले का?? सगळे ठीक आहे ना??

अरे नाही काहीच नाही…खूप दिवसांनी आपले कोण तरी भेटते आहे ना …म्हणून बस काही नाही…चल निघू या…

हम्म चल.. दोघे गाडीत समान भरतात…प्रीती त्याच्याकडे टक लावून बघत असते…तिला असे बघताना त्याने पकडले ..काय?? नजरेनेच विचारले.

निनाद…तू खूप वेगळा दिसतोय.. चष्मा छान दिसतोय तुला आणि हेअरस्टाईल पण हम्म्म काहीतरी नक्की आहे ..सांग ना ?? गर्लफ्रेंड मिळाली ना तुला…

शहाणी आहेस ..चल आता…कोण नाही भेटली अजून.
इथे ना कोण भाव देत नाही मला…तू तरी दे.

हाहाहा ..मला तर ना काहीतरी वेगळेच वाटतेय.पण ठीक आहे ..मी शोधून काढेनच ..

चल आत्ता..????????????????????

निनाद सफाईदारपणे गाडी चालवत  तिला लंडन दाखवत गप्पा मारत विचारतो..

दमली आहेस का हॉटेल वर सोडू की थोडे फिरायचे आहे??

नाही दमली नाही..मस्त झोप काढून आली आहे …पण आपण कुठे तरी थांबुया ना …भूक लागली आहे…

चल जेवण तयार ठेवले आहे…भुकड कुठली…

निनाद तिला आपल्या घरी घेऊन येतो…छोटे घर पण नीटनेटके लावलेले होते. हॉल आणि ओपन किचन आणि आत दोन बेडरूम एवढे ते घर होते…मला हे घर कंपनी ने दिले आहे…अजून एक जण राहतो पण तो सुट्टीवर गेलाय  दिल्लीला….

तू जाऊन फ्रेश होऊन ये ..मी गरम करतो सगळे…

ती फ्रेश होऊन येते तर लक्ष त्याच्या बेडकडे जाते..सगळ्या  गँगचा एक फोटो आणि आईबाबाचा फोटो फ्रेम मध्ये लावला होता.

गरम गरम पराठा आणि चहा तिच्या हातात ठेवला आणि स्वतः ही जेवायला बसला.

हम्म मस्त टेस्टी आहे…काय रे …कधी बनवायला शिकलास.??तुला तर चहा पण बनवता यायचा नाही…इथे बरा शिकलास…

एकटी राहून बघ…सगळे शिकायला लागते मग..तू का  अशी बारीक झाली आहेस पण…ठीक आहेस ना??

बाबा रे मी प्रियाच्या हातचे जेवते रोज..मग काय होणार!!!!

दोघे हसत सुटतात.बराच वेळ गप्पा मारत बसतात..प्रीती त्याला अनुजा एअरपोर्ट वर भेटल्याचे सांगते…अनुजा ने तिच्याशी मोकळेपणाने बोलली आणि माफ केले हे ऐकुन त्याला खूप बरे वाटते.????????????????????.

बोलता बोलता प्रीती त्याच्या आई ने पाठवलेले सगळे समान त्याला काढून देते..वर आता पुढे काय काय करायचे ..कुठे राहायचे कुठे फिरायचे सगळे निनाद ठरवत असतो तर प्रीती तिथे पेंगत असते…बोलता बोलता तिचा डोळा लागतो…बराच वेळ ती काही बोलत नाही म्हणून निनाद बघतो तर ती छान गाढ झोपली असते…

वेडी कुठली…म्हणे मी छान झोप काढून आली आहे.. जेट लग झालंय हे पण कळेल नाही…..हळूच तिला खांद्याला पकडून तिला सोफ्यावर आडवी करतो आणि एक ब्लँकेट तिच्यावर टाकतो आणि तिला अगदी जवळून बघत असतो..आज पहिल्यांदा तिला एवढ्या जवळून बघत होता…

कित्ती निरागसपणे झोपली आहे ही.. पापण्या कित्ती छान आहेत हिच्या .. हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवायचा मोह त्याला आवरला नाही…लहानपणी तिचे केस कसे ओढायचो मी..कित्ती मार खाल्ला आहे मी हिच्या केस ओढण्यावरून आईचा.. रडू बाई लगेच आईला नाव सांगायची….त्याला हसू आले. आठवत असेल का तिला…!!!

माझी प्रीटी… निनाद ने मनाने साद घातली…ऐकू येईल का तुला माझी साद कधी.?? आज पहिल्यांदा मिठीत घेतले…कसले भारी वाटले…वाटले सगळे इथेच थांबावे…तुला काही जाणवले असेल का …?? आपली जोडी पण मस्त दिसते ना, एकमेकांना एकदम सुट होतो आपण… ..

दुसऱ्याच क्षणी …शीट काय विचार करतोय आपण. ती दुसऱ्याची आहे ..कदाचित १/२वर्षात मंदार आणि हीचे लग्न पण होईल आणि आपण हिला आपल्या मिठीत  घेऊन स्वप्नं बघतोय… दिवसा स्वप्नं बघताय राव..सावरा स्वतला !!!!!

बराच वेळ तिच्याकडे बघत शेवटी तो आपल्या रूम मध्ये लॅपटॉप घेऊन बसला. संध्याकाळ  होत होती…शेवटी त्याने प्रीतीला उठवले. थोड्या वेळाने तिला हॉटेल मध्ये नेऊन सोडले.उद्या पर्यंत झोप आता. सोमवारी येतो तुला ऑफिस ला सोडायला.

तो गेल्यावर ती बराच वेळ पडून राहली..एक हा आहे आणि एक मंदार .मी पोचले की नाही ह्याची सुध्दा चौकशी करावीशी वाटली नाही त्याला…खरे तर आमच्या मध्ये आता १३ तासांचे अंतर नाही फारतर ५ तास पण तरीही एक फोन करावासा वाटला नाही त्याला…!!!!

खरे तर मनातून चिडलीच होती मंदार वर.  शेवटी घरी फोन करून सांगितले पोचल्याचे.निनाद होता हे ऐकुन आईबाबा ना बरे वाटले.

सोमवारी सकाळी निनाद तिला घ्यायला येतो..ती खाली येते तर बघताच बसतो. मस्त ब्लॅक कलर चा पेन्सिल स्किर्त आणि लाईट ब्ल्यू कलर चा फॉर्मल शिर्त आणि त्यावर फॉर्मल जॅकेट आणि ऑफिस मेकप आणि हाय हिल्स…कोणी म्हणणार नाही ही पहिल्यांदा लंडनला आली आहे….

वाव पक्की लंडन वाली दिसतेस..मस्त !!!!

थॅन्क्स…चालेल ना हे ऑफिसला ..पहिलाच दिवस आहे ना…..

अरे धावेल…मस्त दिसतेय …एक सेल्फी तो बनता है!!! बाबा आपके साथ….

निन्या …क्या बात है!!एकदम सुधरलास तू इथे येऊन..

ती पुढे काही बोलणार तेवढ्यात कॉल आला..l.कॉल साहिल सरांचा होता..थोडे बोलून तिने फोन ठेवला.

तिला ऑफिस मध्ये सोडून,कुठे काय काय आहे ते दाखवून तुला संध्याकाळी भेटतो सांगून निनाद तिला डब्बा देतो…घे तुझा लंच आहे..तुला इथले आवडेल ना आवडेल म्हणून दिला…प्रीतीने वाह म्हणत डबा घेतला…

त्यानंतर नवीन ऑफिस मध्ये सगळ्यांची ओळख करत इतर फॉर्मलिटी पूर्ण करण्यात दिवस जातो. दोन तीन दिवसांनी तिला एक छोटे अपार्टमेंट देणार असतात त्यामुळे सध्यातरी हॉटेल वरच राहावे लागणार होते. कामाच्या वेळा , कॅन्टीन आणि इतर लोकांच्या ओळखी झाल्या. संध्याकाळी निनाद तिला  घ्यायला येतो. दिवसभर काय काय घडले ते सांगून शेवटी  एकत्र जेवले , निघताना निनादचा पाय निघत नव्हता.. काही ना काही कारण तिला लंडन चा रस्त्यात फिरवले…आंड मग हॉटेलवर सोडले….मनात काही तरी ठरवले आणि स्वतःला एक प्रॉमिस केले…

प्रीती ..तुझा हा ६/७ महिन्यांचा काळ खास आपल्यासाठी
अविस्मरणीय बनवणार आहे मी. ..माहीत नाही परत तू मला आयुष्यात कधी आणि कुठे भेटशील ते…

काय होईल पुढे???निनाद प्रीतीसाठी काय सरप्राइज ठरवले आहे? मंदार चे पुढे काय होईल??साहिल चे काय होईल पुढे?? वाचत राहा पुढचा भाग….

you can also read my stories now on my wordpress blog - PKs Diary. Dont forget to like and comment 

🎭 Series Post

View all