Dec 07, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 20

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 20

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

#18 एक छोटी सी लव स्टोरी

 

प्रीती आणि मंदारचे नाते एक वेगळ्या वळणावर आहे..नात्यात दुरावा आला आहे.. निनाद २ वर्षासाठी लंडनला गेला आहे. इथे साहिलला प्रीती आवडायला लागली आहे..आता पुढे….

प्रिया आणि अक्षयचे लग्न ठरले होते. त्यांचा साखरपुडा होऊन आता महिने झाला…त्यामुळे लग्न आणि साखरपुडाचा मधला काळ दोघे खूप एन्जॉय करत असत कधी मूवी तर बागेत तर कोफी डेट ..अशयात प्रीती अजुनच एकटी पडत चालली. तसे मंदारशी रोज बोलणे व्हायचे पण त्या नेहमी सारखं त्याचे प्रेम जाणवत नव्हते. उगीच काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलत असे तर कधी उगीच वाद घालत. आपल्यामध्ये आत्ता पूर्वीसारखं काही राहील नाही हे हे प्रीतीला जाणवत होते पण उगीच तो लांब राहतो, आपल्याला सगळ्यासारखं नेहमी भेट नाही म्हणून कदाचित चिडचिड होत असेल हे स्वतःला समजवायची.. त्याला सांभाळून घ्यायची… नेहमी त्याचे 5 - १० मिनटे फोनवर बोललं कि तिचा दिवस छान जात होता..सध्यातरी तेवढेच होत हातात.

ऑफिसचे कामही वाढले होते. प्रोजेक्ट्स मध्ये नवीन नवीन सुधारणा ती सुचवत होती ..ह्या मुळे क्लाएंट मीटिंग मध्ये फक्त प्रीतीचा बोलबाला होता.

साहिलच काय सगळीच वरचे मॅनेजमेंट प्रितीच्या कामाबद्दल खुश होते…

बराचदा प्रीती आणि साहिल कामाबद्दल बोलत बसायची.तिची हुशारी, कॉन्फिडन्स, लॉजिक ह्या न साहील इंप्रेस झालं होता. बोलताना तिच्या होणाऱ्या मोहक हालचाली त्याला खूप आवडाच्या. हळुहळू दोघांमध्ये मैत्री होत होती.ती मात्र आपला टीम लीडर जो आपल्याबद्दल चांगले मत आहे ह्या गोष्टीचे भान ठेवूनच वागायची. साही त आवडायला लागली होती पण आपल्या तिच्या बदलच्या भावना त्याने खुबीने लपावल्या होत्या.. ना जाणो तिला नाही आवडले तर???. कामाबद्दल बोलताना प्रीती एकदम कॉन्फिडन्स ने बोलायची पण पर्सनल काही बोलायला गेले की गप्प गप्प असायची ..ही काहीतरी लपवत आहे किवा दुखावली आहे ..हे तिच्याकडे बघून कळायचे…कधी कधी तिच्या नजरेत हरवलेले भाव असायचे तर कधी एकटेपणा…पण ह्या सगळ्याचा उट्टे ती स्वतःला कामात झोकून देऊन काढायची….हा सुद्धा साहिलच्या लक्षात आले होते. तो ही मग तिच्या बरोबर उशिरापर्यन्त ऑफीसा मध्ये थांबायचा ….

ह्या सगळ्यामध्ये मंदारशी रोज सकाळी बोलणे व्हायचे..फार बोलत नसले तरी आजकाल संवाद पेक्षा विसवांद जास्ती असायचे..प्रीती मग आपला मुद्दा फार पुढे रेटायची नाही. असाच एक दिवास प्रीतील महत्वाची मीटिंग होती.. आधल्या रात्र हा सगळया टीम ने उशिरा पर्यंत काम केलं होते. आज सकाळी लवकर जाऊन प्रेसेंटेशन थोडेफार साहिल सरांशी बोलून बदल करायचे होते.. म्हणून लवकर लवकर आवरत होती. त्यातच मंदारचा फोन आला. आज त्याचे काहीतरी बिनसले होते…त्याचा राग तो प्रीतीवर काढत होता.. थोड्यावे वाद घालून शेवटी तिने फोन आदळला. घाईघाईत तयार झाली आणि धावत बस स्टॉप कडे निघाली..ती बस स्टोपवर पोचत होती कि बस समोरून जाताना दिसली. .. शीट आता का करू !!!!..नेमकी आजच बस चुकली !!! ती रिक्षा बघायला लागलं पण एक रिक्षा तिच्या ऑफीसला जायला तयार होत नव्हती. दुसऱ्या बस ची वाट बघत बसणे हा एकच उपाय होता.. तेवढ्यात तिच्या समोर एक गाडी येऊन थांबली… चल बस…साहिल ने तिला रिक्षा शोधताना बघितलं होते…

थॅन्कस सर. .. आज माझी बस चुकली .. आणि रिक्षा पण मिळत नव्हती….

इटस ओके .. मी रोजच हया रस्त्याने जातो … तूला हवे तर मला जॉईन करू शकते… मला ही कंपनी मिळेल एका सुंदर आणि हुशार मुलीची.,,,

ती फक्त त्याच्याकडं बघून हसली. …..

ओके. .. मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे. ..तुला तर माहीतच आहे .. आज क्लायंट मीटिंग आहे… तुला join व्हायला लागेल ..तुला है प्रोजेक्टच्या सगळ्या खाचाखोचा माहित आहेत..आणि कदाचित तुला क्लायंट च्य हेडऑफिस ल जावं लागेल ५- ६ मोहिनी साथ रोल पू करायला तेव्हा तू विचार करून ठेव. .. म्हणजे मी तुला हे आधी सांगायला नाही पाहिजे पण क्लायंट ने स्वतः तु यावेस असं म्हटलं आहे… बघ आता मॅनॅजमेण्ट काय म्हणते ते … पण तुझ्या साठी ही एक उत्तम संधी आहे ..काही पर्सनल कारण असती ता थोड्यावेळासाठी पुढं ढकल पण ही संधी सोडू नकोस असे मला वाटते …बाकी तुझा निर्णय तु घे. ….

त्या दिवशी, साहिल सरं ने सांगितल्याप्रमाणे मीटिंग सुरु झाली. क्लायंटसाईड ने बडेबडे मॅनेजर्स आणि टेकनिकल लीडर्स आले होते. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून साहिल सर होते तर प्रीती सपोर्ट ग्रुप मध्ये . बारीक चर्च चालली होती त्या साहील आणि प्रीतीचा चांगलाच कस लागला होता. पुढे पुढे तर एक हाती प्रीतीनेच सगळ्यांना आपलया प्रोजेक्ट बदलच्या खाचाखोचा, बारकावे, लूपहोल्स आणि शंकानिरसन केलं. क्लाएंट ह्या मुळे खूपच इम्प्रेस झालं होते वा तिचे खूप कौतुक देखील केले.  तिला आपल्या हेडऑफिस मध्ये सगळं सेट करण्यासाठी विनंती केली. …..

त्यानंतर क्लाएंट बरोबर डिनर पार्टी झाली.. सगळयांनीच प्रोजेक्ट सॅक्सेस झाला म्हणून जंगी पार्टी केली…त्या रात्री बराच उशीर झाल्यामुळे मग प्रीतीला साहिल सोडायला निघाला….कार मध्ये प्रीतीने आपल्या मनातले बरेचसे प्रश्न विचारून घेतले आणि आपल्या मनातले  सांगितले…उद्या पर्यंत माझा निर्णय सांगते सर..घरी आईबाबाशी बोलून बघते….मला वाटतं नाही आईबाबा नाही म्हणतील पण तरी पण मला बोलायचे आहे घरी…पहिल्यांदा परदेशी जाणार आहे .. भीती आहे उत्सुकता आहे…आणि मनात बरेच प्रश्न सुध्दा आहेत…

प्रीतीने रात्री आई ला फोन लावला…घरीची ख्यालीखुषाली विचारली. ..आणि मग विषयाला हात घातला….आपल्या प्रोजेक्ट संदर्भात सांगितले आणि सगळ्यांनी कासे कौतुक केले ..आणि आपल्याला काही महिन्या साठी परदेशात बोलावले आहे हे सांगितले..आईला ऐकून खूप आनंद झाला…पण आता लग्नाचे बघायला हावे होते ..आताच ती परदेशात जाऊन बसली तर कोण मुलगा मिळेल ही शंका आईच्या मनात आली……मोघम बोलून उद्या बोलते बाबांशी बोलावे लागेल ..म्हणत आईने फोन ठेवला….

बराच उशीरा…प्रितीच्या बाबाने फोन केला…त्यांना खूप आनंद झाला होता पोरी ने नाव काढले.. पण त्याबरोबर आता लग्नाचे बघायचे आहे ..मोठी झाली आहेस…आता बघू तर १/१.५ वर्षात लग्न ठरेल…मी ही आता रिटायर होतोय त्या आधी तुझ्या लग्नाची जबादारीपासून मुक्त व्हायचे आहे….हे तिला पटवून दिले…तिला मात्र मंदारला हे सांगू हे कळेना.!!!

दुसऱ्या दिवशी तिने मंदारला आपल्याला प्रोजेक्ट् मीटिंग बदल सांगितले आणि तिला क्लाएंट ने हेड ऑफिस ला बोलावले आहे सगळं सेटअप करण्यासाठी हे सांगितले. तो ही ऐकून खूप.खुश झाला..वॉश म्हणजे तू आता खूप मोठी झाली प्रीत…बराच दिवसांनी त्याने प्रेमाने प्रीत शी बोलत होता भरभरून कौतुक करत होता…तिला ही खूप हुरूप आला..बोलण्याच्या ओघात तिने आपल्या बाबंचाही झालेले बोलणे पण सांगितले….ते ऐकल्याबरोबर  त्याचा लगेच मुड बदलला……थोडीफार टाळा टाळ केली आणि फोन ठेवला…

असा काय हा !!!इतका वेळ चांगला बोलला आणि लग्नाचा विषय काढला म्हणून नाराज झाला…नक्की ह्याच्या मनात लग्नाचा विचार होता ना, की टाइमपास होता..की मी लग्न लादाते आहे काही कळत नाही…

काय होईल पुढे?? प्रीती ला परदेशी जाता येईल? मंदार पुढे काय करेल?? निनाद आणि साहिल चे काय होईल पुढे???

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...