Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 19

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 19

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

एका आठवड्या नंतर मंदारने तिला एकदोनदा फोन करायचा प्रयत्न केला तर प्रीती ने त्याचा फोन घेतला नाही....मग त्याने ही नाद सोडला....होईल राग शांत आणि करेल फोन....जाते कुठे !!!

रोज संध्याकाळी तो न चुकता तिला गुड मोर्निंग मेसेज नक्की करायचा....त्याला ही प्रीती उत्तर देत नव्हती...आपल्याबद्दल असे बोलताना मंदार ला काहीच कसे वाटले नाही ह्याचा विचार तिच्या मनात सारखा येत होता .. एवढेच ओळखले का त्याने आपल्याला? आपलया स्त्री असण्याचा तो असा अर्थ काढतो म्हणजे काय?

तर इथे प्रिया आणि अक्षयचे लग्न ठरले...२ महिन्याने साखरपुडा आणि डिसेंबर मध्ये लग्न असे ठरले .. प्रिया आणि अक्षय दोघे पुण्यात सेट्टल होणार म्हणून घर बघत होते..

प्रीती अजून एकटी पडत चालली होती...प्रीती आत्ता ऑफिस मध्येच जास्ती वेळ काढू लागली होती..कारण प्रिया ची जोरदार खरेदी चालू होती..त्यात अक्षय आणि प्रिया पुण्याला सेट्टले होणार होते मग घरचा शोध मोहीम सुरू होती म्हणून प्रिय रोजच उशिरा यायची...प्रीती एकटी घरी बोर व्हायची म्हणून ऑफिस मध्येच उशिरा पर्यंत काम करत बसायची...प्रीती आणि मंदार परत एकमेकांच्या संपर्कात आले.

नेहमी प्रमाणे प्रीती थोडी चिडली,अबोला धरला, त्यानं माफी मागितले, कां पकडले आणि झाले प्रीती ने त्याला माफ केले. पण अजूनही बोलण्यात मोकळेपणा नव्हता. काचेच्या भांड्याला जसा तडा जातो तसे काहीसे दोघांमध्ये झाले होते...

होता होता प्रिया अक्षयचा साखरपुडयाचा दिवस येऊन ठेपला. प्रियाला ने छान गर्द निळ्या रंगाची साडी आणि सुंदरसा मेकप करवला.प्रियाला विश्र्वासच बसेना आपण इतक्या सुंदर दिसू शकतो !!!!

सगळ्या मुलींनी ठरवले होते लेहेंगा चोली घालायची म्हणून प्रीती ने स्वतःसाठी छानसा गुलाबी आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा घेतला होता. त्यावर कुंदनचा सेट लखलखत होता.उंच गोरी प्रीती त्या लेहेंगा चोली आणि मेकप मध्ये अप्सरा लाजेल इतकी सुंदर दिसत होती.निनाद चे राहून राहून तिच्याकडे सारखे लक्ष जात होते....काश तुम मेरे होते...त्याचे हृदय म्हणत होते...

मुली प्रियाच्या बाजूने तर मुले सगळं आपसूक अक्षयच्या बाजूने.आपल्या ग्रुप मधल्या पहिले मित्र मैत्रिणीचा साखर पुडा सगळेच एन्जॉय करत होते...प्रियाच्या चुलतभावंडं ने छोटासा नाच /गाणी कार्यक्रम केला..त्या नंतर प्रितीचे एक छान भाव गीत झाले... टाळ्यांचा कडकडाट झाला आणि

तेवढ्यात ज्योती स्टेज वर आली...

नमस्कार...मी आशा व्यक्त करते की तुम्ही जशी प्रीतीचा भावगीतला भरभरून प्रतिसाद दिलात तसाच प्रतिसाद आमच्या पुढच्या पेशकशला पण द्याल...आम्ही ११ जण प्रिया आणि अक्षय ह्याचे अगदी नर्सरी पासूनचे मित्रमैत्रिणी. . नर्सरी पासून ते १२ पर्यन्त आम्ही एकमेकांचे घट्ट मैत्री आहे आणि १२ नंतर सगळेच वेगवेगळया दिशांना पांगलो. .. पण आमची मैत्री अबाधित आहे अजून टच वूड !!..

म्हणूनच आम्ही आमच्या ग्रुप मधलया लव्ह बर्डससाठी एक सरप्राईज प्लॅन केले आहे. ..आम्ही १० मिळून पोलखोल करणार आहोत प्रिया आणि अक्षय च्या लव्ह स्टोरीची..... काय मग आहेत तयार .. है दोन लव्ह बर्डस ची कहाणी ऐकायला. .. ?????朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗

आणि हो. . सगळ्या मिळू प्रॅक्टिस करायला आम्हाला जमलं नाही. .म्हणून skype व प्रॅक्टिस केलं आहे. . चुकभुल माफ करावी मोठ्या मनाने ...

असं म्हणत ज्योती स्टॅज वरून खाली आली. ..

स्टेज वर अंधार झाला आणि सगळ्यानी आपलाआपल्या जाग पकडल्या. हिंदी मराठी मिक्स गाण्याचा तालावर सगळ्यांनी मस्त ठेका ठरला आणि प्रिया आणि अक्षयची लव स्टोरी सादर केली.... त्यांच्या छोटीय छोट्या गमती, प्रियाचे केस ओढणे, तिला अक्षयने मराठीच्या पुस्तकातून प्रेम पत्र देणे , घरी प्रिया बदल कळणे, आईचा अबोला,अभ्यास आणि प्रेम दोन्ही सांभाळणे, दोघांची कॉलज मधले प्रेम, lecture चुकवणे आणि अक्षयला डेन्टिस्टरीसाठी पुण्याला जाणे मग जुदाई आणि शेवटी अक्षयचे प्रियाला लग्नसाठी प्रोपोज करणे.. आणि मग खरंखुरा साखरपुडा..

नाचता नाचता प्रीतीचा लेहेंगा तिच्या हिल मध्ये अडकला...आणि ती पडणार हे लक्षात येताच निनाद ने तिला कमरेत हात घालून सावरले....दोघांची नजरेला नजर मिळाली निनाद तिच्याकडे बघतच राहिला. ....
लोकांना वाटले हा त्यांचं परफॉर्मन्सचा एक भाग आहे. . फोटोग्राफर ने अलगद तो क्षण टिपला. ..

प्रीती त्याला थँक्स म्हणत बाजूला झाली. ..निनादला गालातल्यागालात हसून लाजला. ....

आयुष्यला सगळ्यात मौल्यवान क्षण होता तो त्याच्यासाठी.. रोज स्वप्न बघायचा, प्रीती कधीतरी आपली मिठीत असेल ते थोडेफार का होईना पूर्ण झालं होते...... माहिती होते हे सगळे निवळ योगायोग होत पण मन .. ते स्वप्नरंजन करण्यात गुंतले होते...

प्रीती विचार करत होती. नशीब सगळ्यांसमोर पडली नाही.... कित्ता वाईट वाटलं असत ते,.....असा रोमँटिक क्षण आणि मंदार हा कुठेच नाही....
हल्ली जास्ती बोलणे पण होत नाही त्याच्याशी...जणू नात्याला तडा गेला होता जो संधता येणार नव्हता... औपचारिक नाते राहिले असे वाटते होते...त्यातला ओलवा, प्रेम हळू हळू संपत चालेले होते....हे दोघांना ही कळत होते पण बोलत मात्र नव्हते......

कार्यक्रम झाल्यावर सगळे पांगले..पण ते १२ जण बाहेर फिरायला गेले नेहमीच्या ठिकाणी..असेच टाईमपास करत बसले होते....सगळ्यांनी अक्षय आणि प्रियाला खूप चिडविले मग गाडी प्रीती कडे वळली...प्रीतीने उडवाउडवीची उत्तरं देत विषय बदलला....सगळ्यांच्याच ते लक्षात आले पण कोणी काही बोलले नाही....

त्या रात्री निनाद तिला सोडायला म्हणून निघाला...

सो..सगळे ठीक आहे प्रीत??? तू उडवाउडवीची उतर दिलीस म्हणून विचारले ...काय झालंय???
परत भांडलात का???

नाही तसे नाही..पण काय सांगू सगळ्यांना...माहिती नाही. ..तों तिकडे जाऊन बसला आहे..अधून मधून फोन करतो मेसेज करतो फॉर्मामलिटी म्हणून ..त्यात काहीतरी मिसिंग आहे रे ..काय ते कळत नाही...अक्षय प्रिया सारखे आमच्यात काहीच नाही रे.....मला त्यांच्या कडे बघुन खूप हेवा वाटतो रे...मी खूप वाईट आहे का रे ???...तिच्या डोळ्यात पाणी आले...स्वतःची लाज वाटत होती...

ए ..कशी काय करते प्रीती तू. .. कोणालाही हेवा वाटेल असेच प्रेम आहे दोघांमध्ये आणि तू आणि मंदार की कमी प्रेमात होतात कॉलज मध्ये ?? आता च्या मंदारचे बोलत असशील तर. . मी काय बोलू. . मागच्यावेळेला काय झाले.. ते सगळ्यांना माहित आहे. . तरी पण तू त्याला सतत पाठीशी घालते .. थोड्यावेळ चिडतेस आणि परत सगळे ये रे माझ्या मागल्या . . तू त्याला सहन करत बसते. अत्ती समजूतदारपणा हा तुझा विकनेस झाला आहे त्याचा गैरफायदा तो उठवतो.. हे अजून तुला कळत नाही त्याला कोण काय करणार?? बाकी परत यायचे बोलतो का तो कधी ? विचारते कि नाही त्याला ?

येणार म्हणतो अजून १ वर्षाने. ...बघू नक्की नाही. . आताच घर पण बदलणार म्हणतोय. . काय चाललंय काही नीट सांगेल तर ना ...!!!

ह्ह. ... सोड त्याचा विचार .. मला तुला एक सीक्रेट सांगायचं आहे. ..बहुतेक कंपनी मला प्रोजेक्टसाठी यु के ला पाठवते आहे साध्यातरी १ वर्ष साठी ..पण हा प्रोजेक्ट लांबेल. . अजून तरी काही नक्की नाहीय. पण बोलणी सुरु आहेत. . घरी सांगितले नाही अजून. .नक्की झाले तर सांगेन. .

वाह.. माझा हुशार मित्र तो... तू पाहिला असशील ना परदेशवारी करणारा आपली ग्रुप मध्ये... है ना... कधी जाणार आहेस??

बघू हा १- २ आठवड्यात कळेल. ..

म्हणजे तू पण जाणार? प्रिया आणि तू दोघं हि मला सोडून जाणार. मी एकटी पडेन ना आता ...प्रीती थोडी हिरमुसली. ..

तुसह्या कंपनीला सांग ना मग.. जबाबदारी मागून तर बघ .आता आपरेसल असेल ना. बोल टी एल ला. .. अशी संधी मागू घयावी लागते. .असाच बसून थोडीना मिळते मॅडम ....

शहाणा आहे. . पण संधी मिळाली तर नक्की मी घेणार...

निनाद तिला घरी सोडतो... बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसतो. . राहून राहून त्याला आजच्या संध्याकाळचा तो क्षण आठवत राहतो. . खरच कित्ती मस्त क्षण होता तो. जणू वेळेने तिथेच थांबून राहावे असे वाटत होते पण काय फायदा तुला कधीच कळणार नाही माझ्या मनात काय आहे ते... कधी त कळणार माझे कित्ती जीवापाड प्रेम आहे तुझयावर ते...आता तु आणि मंदार करणार आहेत ते देवालाच माहित... !!! या म्हणत उसासे टाकत निघून जातो..

रात्री घरी बाबा आणि आई निनादची वाट बघत असतात. आईबाबांना जागे बघून जरा त्याला आश्यर्य वाटत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. . शेवटी आई ने विषयाला कोंडी फोडली. .. निनाद आत्ता तुझं हि लग्नाचे बघितले पाहिजे, तुमच्या बरोबरच्या मुलांचे लग्न ठरतात आहेत. . कोणी तुला पसंत असेल तर सांग... तुझी चॉईस मान्य असेल आम्हाला. ..

नाही आई .. तस काही नाही आहे. .पण इतक्यात लग्न नाही करायचे आहे. . अजून १- २ वर्ष तरी.... काही असेल तर नक्की सांगेन तुम्हाला. ..

बर ठीक आहे. . तुझी मर्जी. .. आम्हाला वाटले की घरात गाणारी सुन आली तर बरेच आहे. ..नाहीतरी पाडण्यापासुन सावरलेस .. आयुष्यातही सावरून घेशील. . आई ने गुगली टाकली. . तशी निनादची विकेट गेली. .. काय बोलावे काही कळेना. ..

तस्से काही नाही आहे... आई ! अजून तरी... त्यानं लाजत म्हटले,.. ती फक्त मैत्रीण आहे. !!!! असं म्हणत तिथुं आता पळाला.....

त्यांनतर सगळे परत रुटीन ला लागले. निनाद ला प्रोजेक्ट्स साठी ऑफ शोर जाण्याची संधी मिळाली....सगळ्यांनी जंगी पार्टी वसूल केली निनाद कडून आणि निनाद यू के ला 2 वर्ष साठी रवाना झाला..प्रीतीला मात्र आपल जवळचे माणूस जात असल्याचे सारखे वाटत होते...प्रीती त्याला सी ऑफ करायला म्हणून खास मुंबईला आली होती. जाताना निनाद ने तिला मंदार वर डोळस प्रेम कर ... काही लागले तर नक्की फोने कर...हे बजावून गेला...

काय होईल पुढे? निनाद आणि प्रीती एकत्र येतील? कि प्रीती आणि मंदार एक होतील? प्रेम जिंकेल कि मैत्रीतील प्रेम?

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...