Dec 07, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 18

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 18

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

दुसऱ्यादिवशी प्रीती ने लवकर उठून छानसा चहा केला दोघी साठी..संध्याकाळ साठी तयारी करून ठेवली..बराच दिवसांनी ती किचन मध्ये येत होती..मागचे २ महिने प्रियाच सगळे बघत होती ती ही कुरकुर न करता. ..

शी कसले वागलो आपण..पुन्हा असे होता कामा नये...दुसरे कोणी असते तर नक्कीच बोलले असते ह्यावरून नशीब आपलीच बालपणीची मैत्रीण आहे आपली रूम मेट म्हणून....बरे आहे..निदान समजून घेते आपल्याला.


दोघी तय्यार होऊन ऑफिस ला निघाल्या.आज ती छान तयार झाली होती. छानशी गुलाबी कुर्ती आणि हलका मेकप...सगळ्यात सुंदर दिसत होते ते तिचे मनापासून स्मितहास्य....कोणी बघेल तर बघतच राहील तिच्याकडे ...तर कधी नव्हे ते आज प्रीतीला जग सुंदर वाटत होते..

पावसामुळे सगळी कडे छान थंड वातावरण झाले होते, हिरवाई पसरलेली होती. आज नव्याने ने प्रीती सगळे बघत होते. खरंच मन आनंदी असेल तर जग किती सुंदर दिसते नाही....

आज ऑफिस मध्ये ही एक दोन जणी ने विचारले...आज वाढदिवस आहे का ??? ऑफिसच्या सगळ्या मुलांनी तिला आज अजून एकदा निरखून बघितले..वाह क्या बात है !!!!

टीम लीडर साहिल ने ही आज तिला चांगले काम केले म्हणून  ऍप्रेशियट केले...दिवस कित्ती छान चांगला चांगला गेला.... संध्याकाळी मंदारला मेल करून मगच ती घरी आली...❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

त्यानंतर प्रीती खूप बदलली...आधी छान दिसायचीच पण हल्ली खूप छान राहायला शिकली होती. टापटीप राहायची नवनवीन फॅशन चे कपडे घालायला शिकली, कामात पण खूप मान लावून करायला लागली. . प्रोजेक्ट समजून त्यातला खाचाखोचा ही तिला माहिती झाल्या होत्या..अनेकदा उशिरापर्यंत प्रोग्राम मधले बग काढत बसायची...प्रोजेक्ट ला जणू वाहून घेतलें होते...मीटिंग मध्ये आपले म्हणणे , लॉजिक पटवून देत होती...अश्यातच एक क्लाएंट मीटिंग मध्ये तिने खूपच छान प्रेझेंटेशन दिले की सगळ्या टीम ने टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले.

साहिल सरांनी ने  तिच्यातला हा बदल अचूकपणे टिपला होता...तिच्या कामाची पद्धत, सगळे लॉजिक समजावून घेणे, अनेकदा प्रोजेक्ट मध्यला अडसर सोंडवणे, क्लाएंट मीटिंग मधली हुशारी आणी तिच्या स्वभावातला बदल...सगळे त्याने नोटीस केले होते ...
त्याच्या मनात नेहमी यायचे...आली तेव्हा कशी होती उदास...निरुत्साही ..कामात लक्ष नसलेली ...आता हीच ती का ???? एेवढं बदल झाला आहे हिच्यात...जणू सुरवंटा चे फुलपाखरू झाले होते.... अर्थात हा बदल सगळ्यांनीच नोटिस केला होता...

प्रीती ची सकाळ व्हायची ते मंदार च्या कॉल ने...शेवटी त्याला १ आठवड्यांत मोबाईल मिळाला होता. थोड्या दूर त्याने एक रूम घेतली होती. कॅम्पस पासून लांब होती पण परवडणारी होती. जायला यायला एक जुनी कार घेतली होती.   त्याचे कॉलेज संपले की तो प्रीतीला फोन करायचा...त्याची संध्याकाळ आणि प्रितीची सकाळ.

सकाळ सकाळ दोघे एकमेकांशी बराच वेळ बोलायचे..कधी व्हिडिओ कॉल तर कधी फोन ते पण प्रीतीला दिवसभराची ऊर्जा द्यायची.  ...दिवस असेच हसत खेळत जात होते...अधून मधून प्रितीची आई मंदार ची चौकशी करायची.....पण सांगण्यासारखे असे फार काही नसायचे..

अशातच एक दिवस,प्रीतीला ऑफिस मध्ये खूप उशीर झाला.तिने फोन करून प्रियाला सांगितले की उशीर होणार आहे...

ऑफिस खाली रिक्षाची वाट बघत उभी होती पण बराच वेळ तिला रिक्षा मिळत नव्हती. मग थोडी चालत पुढे निघाली....तर एक कार येऊन थांबली तिच्याजवळ...ती जरा  घाबरलीच...शी उगीच थांबलो आपण..आता काय करायचे!!!!!!

तेवढ्यात गाडीची काच खाली झाली तर आत साहिल सर होते .त्यांना बघून तिला हायसे वाटले....त्याला मात्र तिला असे घाबरलेले बघून हसूच आले.....

सॉरी..घाबरावयाचे नव्हते तुला...मला तू रस्त्यात चालताना दिसली म्हणून म्हटले तुला सोडतो घरी...बस..खूप उशीर झाला आहे...इथे रिक्षा/बस नाही मिळणार तुला.

ती ही पटकन गाडीत बसली. सॉरी मला वाटले की. आणि हसायला लागली....तिला असे हसताना बघून तो ही रिलॅक्स झाला...

थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आज कधी नव्हे तर त्याने तिची चौकशी केली. घरच्या बदल, शिक्षण, पुढचे प्लॅन्स.त्यातून त्याला कळेल ती पुण्याला एकटीच राहते मैत्रिणीबरोबर. मग त्याने विचारले...

भूक लागली असेल ना?? चल काहीतरी खाऊ या ...मला तर जाम भूक लागली आहे. तसे पण घरी जाऊन जेवण बनवायचा खूप कंटाळा आला आहे मला...

तुम्ही एकटे राहता का?? घरी कोणी नाही का??

म्हणजे!!! ओह तुला म्हणायचे आहे.घरी बायको नाही का असेना.नाही....घरी कोणी नाही. आईबाबा नगरला असतात आणि मी इथे एकटा...त्याने हसत म्हटले....

त्याला असे हसताना बघून ती ही थोडी लाजली..काय बावळट आहोत आपण   ..असे डायरेक्ट विचारले ..मूर्ख कुठली!!!!!.

चल बाहेर जाऊ जेवायला...मला पण कंटाळा आलंय घरी जाऊन काही बनवायला..बॉस म्हणून ऑर्डर समज हवी तर..

असे म्हणत त्याने तिला एका छोट्या रस्तुरांत मध्ये नेले आणि दोघा साठी जेवण मागवले....

जेवताना त्याचे लक्ष प्रीती कडे होते...तिच्या हालचाली मोहक आणि नाजूक वाटतं होत्या, नाक असे तरतरीत, मस्त गोरे गोरे गाल आणि नाजूक ओठ.त्यात लायनर लावलेले डोळे आणि सुंदर हास्य....हम्म्म उगीच नाही आजकाल टीम मध्ये मुलांच्या फेऱ्या वाढल्यात डेस्कवर हिच्या...

चला चांगले मोटिवेशन आहे की ऑफिसला यायचे...朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗朗

एवढी सुंदर हुशार मुलगी डेडली कॉम्बिनेशन!!! सिंगल असले का ?? ऑफिस मध्येतर सगळ्यांशी हसून खेळून असते.सतत फोन वर पण दिसत नाही.कोणी स्पेशल आहे असे वाटत तर नाही ....विचारावे का..???? आवडले नाही तर..जाऊंनदे आपल्याला काय??काम करते आहे ना नीट मग बस!!!!!

प्रीती मात्र मुकाट्याने मान खाली घालून जेवत होती... विचारलेला प्रश्नना फक्त उत्तर देत होती..

साहिलशी कामा शिवाय ती आज पर्यंत काही बोलली नव्हती.. एक तर बॉस त्यात एक दोनदा खूप बोलणी खाल्ली होती कामावरून, त्यांच्याबद्दल लोकांकडून खूप काही कळेले होते म्हणून जरा घाबरून असायची...कामाच्या बाबतीत हयगय मुळीच खपायची नाही, अतिशय हुशार आणि सखोल ज्ञान असलेले साहिल सरांनी अनेक प्रोजेक्ट्स लीलया सांभाळलेले होते आणि कंपनीला फायदा करून दिला होता...म्हणूनच आदरयुक्त भीती होती त्याच्या बदल सगळ्यांना....

जेवून दोघे घरी निघाले ...गप्पा मारत तिच्या बिल्डिंग जवळ सोडले आणि निघून गेला....

प्रीतीला आश्चर्य वाटले एरवी हा माणूस कामा व्यतिरिक्त काही बोलत नाही आणि आज लिफ्ट दिली, जेवायला घातले, अवांतर गप्पा मारल्या...कमाल आहे!!!! साहिल सर चे नवे रूप बघत होती..ऑफिस मध्ये ही गोष्ट सांगता कामा नाही हे मनोमन ठरवले...उगीच कशाला चर्चा !!!!!.

दुसऱ्या दिवशी तिने रात्री काय घडले ते मंदारला सांगितले...तर तो तिच्यावर खूप भडकला ...

तुला अक्कल नाही का रोज कसा उशीर होतो तुला...एवढे काय काम करत बसते?? आणि त्याने लिफ्ट दिली तर लगेच कशाला बसायला जायचे वर जेवायला का गेलीस त्याच्याबरोबर ??? तुला काही कळत की नाही !!!! तुम्ही मुली ना ... पुढे जायचे असेल तर बरोबर हा मार्ग मिळतो तुम्हाला नाही का???पर्सनल रेलेशनशिप डेव्हलप करायचे पुढे मग उपयोगी येते  नाही का..आम्ही बसतो इथे कचरा साफ करत...असे म्हणत कुत्सित हसला....

प्रीती पण खूप भडकली त्याच्यावर..मग नेहमी प्रमाणे दोघे भांडले आणि तिने रागाने फोन आपटला.

असे कसे बोलतो हा...एक मी स्वतः काही केले नाही..त्याने लिफ्ट दिली..उद्या मला काही झाले असते तर रात्रीची वेळ रिक्षा पण मिळत नाही इथे..वाटेल ते बायला लागला आहे... आजपर्यंत दुसऱ्या कोणाचा ही विचार
सुद्धा मनात आला नाही आणि आज हा आपल्याबद्दल.इतके वाईट बोलला!!! खालच्या थराला जाऊन....इतकं मीे काय वाईट केलंय????? मंदार चा बोलण्याने ती खूप दुखावली गेली नक्कीच!!! बाकी सगळे सहन करेन रे...पण हे असले आरोप नाही सहन करणार...हे नक्कीच.

तिचे हे सगळे बोलणे प्रियाने ही ऐकले .....तिला आश्चर्य वाटले ..मंदार असे वागतो प्रितीशी आणि ही सहन करते हे सगळे ...एवढे काय आहे त्याच्यात जे माज दाखवतो तिच्यावर...नेहेमी तिला मानसिक त्रास देत असतो...घेतली ऑफिस कलीग कडून लिफ्ट एवढे काय बोलायचे....तिला आठवले कॉलेज मध्ये असताना, प्रीती निनादशी बोलली तरी मंदार तिला हसत टोमणे मारायचा सगळ्यांसमोर...ती तेव्हा ही हसत दुर्लक्ष करायची...शेवटी निनादने लांब  राहणे पसंत केले ह्या दोघापासून....साधी वतलेंकी निनाद शी मैत्री खटकत असेल त्याला पण नाही आज सरळ सरळ वाटेल ते आरोप करतो हा!!! बोलुयाच प्रीतीशी ह्या विषयावर ....

दोघी आपले आवरून निघाल्या...प्रियांने मुदाम विषय काढला नाही...

संध्याकाळी बाहेर जाऊ या जेवायला...घरचं खाऊन कंटाळा आलंय...आणि निनाद ला पण बोलावू या...ओल्ड टाइम्स सेक...कित्ती दिवस झाले ना ...आपण भेटलो नाही ..एकाच शहरात असून.... प्रिया ने हट्ट केला.

हम्म्म चालेल... मी तुला ऑफिस मधून निघाली की फोन करेन .भेटू आपण...निनाद फोन करते दुपारी ...असे म्हणत दोघी आपल्या वाटेला लागल्या....

संध्याकाळी उशिराच तिघाही भेटले..एका छान शांत हॉटेलात.भरपूर गप्पा मारायच्या होत्या..सांगायचे होते.आपल्या ऑफिस चा गमतीजमती सांगायच्या होत्या...थोड्यावेळाने तिथे अक्षय पण आला...

मी बोलावले त्याला...आम्हाला काही बोलायचे आहे आणि सांगायचे सुद्धा आहे तुम्हाला दोघांना...तिने ने लाजत सागितले..

काँग्रतुलेशन्स!!!!!!!!

प्रीती आणि निनाद दोघा ही जोरात ओरडले....वाह वाह ग्रुप मध्ये पाहिले लग्न.....ग्रेट...

आरे थांबा...अजून तसे काही नाही आहे.....माझ्या घरी तर सगळे माहीत आहे तुम्हाला माहिती आहेच आणि प्रिया चा घरी आम्ही शनिवारी जाणार आहोत..मागणी घालायला...होप तिचे आईबाबा हो म्हणतील...बस इतकाच...सांगायचे होते ...अक्षय म्हणाला....

अरे वा पण इतक्या लवकर लग्न म्हणजे घरचे तयार होतील??प्रीतीने विचारले...

वेडपट लहान नाही आहोत आपण आता...चांगले २४ वर्षा चे आहोत...शिक्षण झाले , नोकरी लागली अजून काय पाहिजे...आणि तसे पण आईबाबा १/२ वर्षात लग्न लावणार आपले...नाही का ...प्रियाने विचारले..

हो ते तर आहेच...प्रीतीने विचार करत म्हटले ..

तुझे आणि मंदारचे काय ???त्याने काहीतरी सांगितले असेल ना तुला ??काही बोललात का ह्या विषयावर....प्रियांने मुदाम विषय काढला ठरल्याप्रमाणे...

नाही इतक्यात कुठे ...अजून तर तो शिकतो आहे ...आणि ...असे बोलता बोलता प्रीती गप्प बसली....

आणि काय?? काय झाले?? हे सगळे बोलता ना तुम्ही!!!!! आता हे नको सांगू की तुम्ही पुढचा विचार केला नाही केला
.. म्हणजे तुमचे तर सीरियस प्रेमप्रकरण वाटते...लग्न करायचे आहे ना तुम्हाला की नाही???.अक्षय ने तिला विचारले...

तशी प्रीती गडबडली..मग बराच वेळ ते तिघे तिला मंदारबदल विचारात बसले...सकाळचा प्रसंग प्रियाने सगळ्यांना सांगितले ...हे ऐकुन सगळेच अशाऱ्याचाकित झाले.मंदार असे वागतो ह्यावर विश्वास बसेना..

प्रीती हे सगळं काय आहे..????? तू का सहन करते त्याला ??? ना राहून निनाद ने विचारले...तो वैतागले होता...आधीचे प्रकरण आठवले किती डिप्रेस्ड होती प्रीती आणि त्यात परत हे असे वागणे....

ह्या ला शुद्ध इंग्लिश मध्ये अब्युज म्हणतात हे माहीत आहे ना तुला!!! आता पासून हे असे वागणे...नाही प्रीती सोड त्याला नाही तर पस्तवशिल आयुष्भर..सोड त्याचा नाद..
निनाद ने कळकळीने म्हटले.प्रिया आणि अक्षय ने त्याला दुजरा दिला...

अरे नाही खरंच असे काही नाही...तो चिडला की बोलतो बस अन त्याच्या मनात असे काही नसते...तुम्ही नका टेन्शन घेऊ...

प्रीतीने समजुतीने म्हटले.पण मनात कुठे तरी ते जे बोलत होते ते तिला ही पटत होते.आजवर चे त्याचे वागणे, सतत चिडचिड, कंट्रोल करणे, वाटेल ते बोलणे, आज तर आरोप करणे, तिच्या हुषारीला कमी लेखणे कुठे तरी तिला ही त्याचा त्रास  होत होता...फक्त मनाला पटत नव्हते इतकेच....

सगळे जेवल्यावर निघाले ..अक्षय निनाद ने दोघींना घरी सोडले आणि मग आपल्या घरी गेले...

निनाद प्रितीकडे लक्ष दे जरा...साधी आहे ती..आज जे काही बोलली न..त्यावरून तो प्रितीबदल सीरियस आहे असेल नाही वाटत आणि नसेल तरच बर आहे...ह्या सगळ्याचा त्रास हिला होणार आहे हे नक्की...तिला मंदार योग्य नाही आहे. तूच सावरायला पाहिजे तिला...हो ना???

निनाद ने चमकुन अक्षय कडे बघितले....ह्याला माहिती आहे का आपले प्रेम आहे प्रितीवर ते..?? ह्या प्रियानेच सांगितले असणार अजून  कोण !!!! ...निनाद चा मनात आले ...

चुकतोय तू..मला प्रियाने काही सांगितले नाही....जे जाणवले ते फक्त खात्री करून घेतली तिच्याकडून.. बस...अक्षय ने गूढ हसत म्हटले..

बाय दा वे.. गूड चॉइस.पण तू खूप उशीर केलास...आता सोडावं तिला त्याच्या कचाट्यातून.बाकी पुढे काय करायचे ते तुला माहिती आहे .मी आणि प्रिया तुझ्या सोबत आहोत.
असे म्हणत अक्षय निघून गेला....

काय होईल पुढे??मंदार आणि प्रीती एक होतील?? निनाद चे काय होईल पुढे??? प्रेम की मैत्री ??? काय निर्णय घेईल प्रीती???? वाचत राहा ..पुढच्या भागात....
कृपया कथा कशी वाटली ते नक्की सांगा...लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा...आपल्याला नवीन ट्विस्ट कसा वाटला ते नक्की सांगा..

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...