Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 17

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 17

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

#15 एक छोटीसी लव स्टोरी

शनिवारी तिने मंदार ला फोन केला...तर फोन नॉट रीचेबल.. बराच वेळा त्याला फोन लावत होती...कुठे गेला असेल हा....बंगलोर गेला असेल का ?? कोणाला माहिती असेल..निनाद ला माहिती असणार नक्की...तिने निनाद कडे चौकशी केली तर त्याला काय बाकी कोणाच्या ही कॉन्टॅक्ट मध्ये तो नव्हता...मग तिने घरी फोन लावला...घरी ही कोणी फोन उचलत नव्हते...२/३ दिवस असेच गेले..मग त्याच्या बंगलोर कंपनी मध्ये फोन लावला....तिथे ही त्याने माहिती द्यायची नाकारली....मग प्रीतीला कळेचना कुठे शोधू त्याला..सगळ्या मित्रांना फोन केले पण कोणालाच काहीच माहीत नव्हते....त्याच्या फेसबुक वर मेसेज केले तर काहीच उत्तर नाही....

कुठे गेला असेल हा??? काही वेडेवाकडे तर केले नसेल ना??चिडून मोबाईल फेकला असेल का??मग घरी कोणी फोन का नाही उचलत आहे???बंगलोरला गेला की अमेरीकेला गेला असेल?? USA ला गेला असेल तर जाताना सांगावेसे पण वाटले नसेल का त्याला???कुठे आणि कसे शोधू त्याला आता..!!! काय करावे काही सुचत नाही....
आत्ता तर कामात पण लक्ष लागत नव्हते...एक दोनदा TL कडून बोलणी खाल्ली....

कुठलाच मार्ग दिसत नव्हता त्याचा कॉन्टॅक्ट होत नव्हता...आता तिला चिंता वाटू लागली होती कुठे गेला असेल हा...कोणालाच माहिती नाही असे कसे शक्य आहे....शेवटचा मार्ग म्हणून त्याला ईमेल केला...विचार करून करून तिने एक दोन महिन्यात काय काय घडले, आपले विचार आणि मुख्य म्हणजे आपला निर्णय लिहिला....शेवटी लिहिले...

मी तुला खूप मिस करते आहे मंदार ...प्लीज जिथे कुठे असशील मला फोन कर...मी वाट बघते आहे....प्लीज...फोरेवर यूर्स प्रीती..... आणि सेंड केले....देवा त्याच्या पर्यंत हा ईमेल पोचू दे फक्त एकदा  एकदा त्याचा फोन येऊ दे......

त्यानंतर दोन तीन दिवस ती रोज वाट बघत होती त्याच्या कॉल ची . मंदार ने ईमेल वाचला असेल का ..? वाचला असेल तर त्याने फोन का नाही केला..त्याला वाटत नसेल का आपल्याबद्दल काही??संपले का सगळे आपल्यामध्ये?? प्रेम  नाही उरले??? आठवडा संपायला आला तसा तिचा ही धीर सुटू लागला होता...आपण खूपच ताणले का?? का चुकले आपले?? प्रेम मोठे की समाजमान्यता ??
आपल्यात का नव्हती हिम्मत त्याला आहे तसा स्विकारण्याची ..नाही जाऊ शकलो आपण आई बाबा , समाज ह्यांच्या विरोधात...कसे सांगू त्याला...कसे समजावू त्याला हे सगळे...खूप कमी जण असतात प्रवाह विरूद्ध पोहणारे....मी तर एक सामान्य मुलगी...कुठून एवढी हिम्मत आणू.......मन अगदी उदास उदास होऊन जायची.....प्रेमभंग म्हणजे नक्की काय असते ज्याचा अनुभव घेत होती....जुने फोटो, आठवणींना उजाळा देत होती....अश्यातच शनिवारी संध्याकाळी एकटीच घरी होती....कातरवेळ आणि त्यात एकांत..मन मंदार कडे धावत होते. आणि त्यात फोन आलेला...आज फोन उचले उचले पर्यंत कट झाला ....तिने बघितले अनोळखी नंबर ..जाऊन दे असेल गरज तर परत फोन येईल....म्हणत आत गेली.....

परत थोड्यावेळाने त्याच नंबर वरून फोन...आता मात्र तिने फोन घेतला..

हाय प्रीत कशी आहेस ????

तू??कुठे आहेस तू?? कित्ती शोधले तुला ...कुठे गायब झाला आहेस कोणालाच माहिती नाही कुठे आहेस तू ते??? तिने रडत रडत म्हटले...शेवटी त्याने फोन केला...हेच खूप होते तिच्यासाठी......

अरे हो..रडू नकोस ना प्लीज ..सांगतो सगळे सांगतो...वेळा आहे ना तुला....

हम्म आहे बोल..कित्ती वात बघायला लावलीस ....

हम्म..मी न्यू यॉर्क ला आहे...प्रीती .मला एम स ला एडमिशन  मिळाली इथे...२ आठवड्या पूर्वी आलो इथे...तुला फोन करून सांगायचे खूप मनात होते पण तुझा निर्णय होत नव्हता आणि तू ही मेसेज केलस की कॉन्टॅक्ट करू नकोस..इतक्या दिवसात तुझा फोन आला नाही मला वाटले की ...

.जाऊन दे. ...तुझा ईमेल त्याच दिवशी मिळाला... खूप आठवण आली प्रीत....पण म्हटले हिने काहीतरी भावनिक होऊन निर्णय नाही ना घेतला...तशी तू समजदार मुलगी आहेस पण आश्चर्य वाटले म्हणून थांबलो तुला कॉल करायला....म्हटले एक दोन दिवसात तुझ्या निर्णयाचा पशताप व्हायचा म्हणून एक आठवड्यानंतर फोन केला...

तसे पण माझ्याकडे अजून रूम मिळाली नाही ...कॉलेज मधून कॉल करावा लागतो...मोबाईल नंबर मिळेल आता तो देतो नंतर तुला....तू  कशी आहेस?? काय करतेस? कुठे आहेस ??..त्याला कित्ती बोलू आणि किती नको असे झाले होते. ....प्रेमाचे माणूस लांब गेले की त्याची किंमत कळते हे खरे..
इथे प्रितीचे ही तेच  हाल...कित्ती बोलू आणि कित्ती नाही......कित्ती दिवसांनी दोघे एकमेकांशी बोलत होते....

शेवटी मंदार ने आठवण करून दिली...प्रीत..इंटरनॅशनल कॉल आहे...नंतर बोलू या...ईमेल करशील तो पर्यंत...माझा मोबाईल आला की नंबर देतो तुला...चालेल??? प्रीत ..मी खूप मिस केले तुला.... आयुष्यात ले सगळ्यात वाईट दिवसांनी पैकी हे काही दिवस होते....प्रीत.... आय लव यू सो मच.....प्रीती मात्र खुदकन हसली त्यावर...कित्ती दिवसांनी आज मनापासून हसली होती ...मंदार जवळ आता ना...तर त्याला गच्च मिठीच मारली असती तिने .....

खूप दिवसांनी आज प्रीती खूप खुश होती...फोन ठेवल्यावर पटकन एक उडी मारून घेतली...छान पैकी गिरकी मारली ....आज अचानक सगळे जग बदलले होते ...छान वाटत होते...जणू मनावर आलेले मळभ निघून लख्ख प्रकाश पडला होता.... छानपैकी फ्रेश होऊन ती छान पैकी खायला बाहेर पडली....येताना प्रिया साठी पार्सल घेऊन आली...घर ही आवरले....

प्रिया हे बघून खुश झाली..कित्ती तरी दिवसांनी प्रीती नॉर्मल दिसत होती..नाहीतर गेले काही महिने सारखी उदास. हरवलेली असायची..मग प्रीती ने खुश असण्याचे कारण सांगितले...प्रिया त्यावर काहीच बोलली नाही....तिच्या मनात निनाद चा विचार आला.... बिचारा..त्याच्या नशिबात प्रेम नाहीच बहुतेक.....

काय होईल पुढे??? निनादला आपले प्रेम मिळेल की फक्त मैत्री??? मंदार आणि प्रीतीचे काय होईल पुढे??  वाचत राहा पुढं काय भागात...

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...