Dec 07, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव्ह स्टोरी- 15

Read Later
एक छोटीसी लव्ह स्टोरी- 15

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

सकाळीच लवकर आवरून निनाद घरी आला.प्रितीच्या आई ला थोडे हायसे वाटले.सोबत निनाडच्या आईंने नाष्टा पाठवला होता ..थोड्यावेळाने डॉक्टर आले...बी पी अजून  लो होते...म्हणून मग त्याने प्रीतीला अडमिट करायला सांगितले...निनाद चा मदितीने आईंने प्रीतीला जवळच्या हॉस्पीटल मध्ये ठेवले...अती थकवा आणि टेन्शन ह्या मुळे प्रितीच्या आईला ही खूप थकवा आला होता...त्यात सगळ्यांचे फोन येत होते...शेवटी त्यानं आई ला घरी जायला सुचवले.....

मी थांबेन काकी प्रीती जवळ ...तुम्ही काळजी नका करू....नाहीतर तुम्ही आजारी पडलात तर कसे होईल....असे म्हणत त्याने आई ला घरी पाठवले.....

निनाद तिच्या रूम जाऊन बसला ..एकटक तिच्याकडे बघत होता..त्याला आठवत होती त्यांचे बालपणीचे दिवस....प्रीती गाणे शिकायला यायची आणि तिच्या मुळे आपण पण गाण्यासाठी बसायला लागलो....बैठकीला बसलो तबला घेऊन...ती गायची आणि आपण तबल्या ने साथ द्यायची हे समीकरण असायचे शाळेत .....लहानपणी कित्ती चिडवायचे सगळे आपल्या दोघांना.. आई तर म्हणायची मोठी झालीस  की सून करून घेईन तुला ....आठवत असेल का तिला हे सगळे......

तेवढ्यात प्रीतीला जाग आली...त्याला तिथे बघून हसली आणि विचारले आईला पाठवली घरी ...हो ना...

हम्म.... कशी आहेस???बरी आहेस आहे तू??? काही हवे आहे तुला?? बरे वाटते का.??

हम  ठीक आहे ...डोकं दुखत आहे अजून...खूप थकवा आलंय निनाद....

हम्म्म आराम कर...हे घे लिंबूपाणी आहे ...पिऊन टाक बरे वाटेल तुला...

तिला आधार देत बसवले त्याने आणि हातात ग्लास दिला ....

काय झाले सांगशील प्लीज...कित्ती घाबरले सगळे माहिती आहे ...काय झाले तुला सांग ना ...

नको विचारू निनाद मला नाही सांगता येणार..प्लीज नको ना तो विषय...मला नाही बोलायचे आहे त्यावर ...

Did he try to.....??? Ninad ने तिच्या खांद्याला पकडत म्हटले...त्याची मजबूत पकड खांद्यावर जाणवत होती. डोळ्यात राग दिसत होता ...

No...Never...तू समजतो तसे काही झाले नाही निनाद .. रेलक्स....

मग सांग ना काय झाले ते...का जीव टांगणीला लावला सगळ्यांचा..माहिती आहे कित्ती टेन्शन आले आईला .मला . सगळ्यांना .. कळत की नाही तुला काही...त्याने चिडून म्हटले...

सॉरी निनाद ...सांगितले ना ..पर्सनल आहे..नाही सांगू शकत ...आपण दुसरे काही तरी बोलू...प्लीज हा विषय नको ना...

I guess then I should stay in my limits then...if it's so personal...I am invading your personal space I guess.... sorry'..पुन्हा नाही विचारणार....

थोडा वेळ शांतता झाली. दोघांना ही काय बोलायचे ते कळत नव्हते. आपली चिडचिड का होतंय हे निनाद ला कळत नव्हते तर प्रीती ला हे सगळे कसे सांगू कोणाला ह्याची चिंता होती....एवढ्यात प्रीती चा फोन रिंग झाला...

मंदार कॉलिंग .....

घे ..बोल त्याच्याशी...मी बाहेर आहे ..निनाद तिला फोन हातात देत बोलतो...

थांब ना..नाही बोलायाचे आहे मला त्याच्याशी...वाजून देत फोन ..कट नको करु.. ..सायलेंट वर टाक...

त्याने चमकुन बघितले तिच्या कडे..ब्रेकअप केले काय ह्या दोघांनी??? त्याच्या मनात आले. ती मात्र डोळे मिटून पडली होती....

थोड्यावेळाने प्रिय ही आली.तिने इषारा केला काही सांगितले  का तुला?? काहीच नाही खांदे उडवत निनाद ने प्रतिसाद दिला...मग दोघांनी ही विषय वाढवला नाही....

बाई गा लवकर बरी हो...आपल्याला पुण्या ला जायचे आहे...घर बघायचे आहे अजून.कंपनी राहायला फक्त एक आठवडा देणार आहे फुकट बाकी आपल्यालाच बघायचे आहे....आपण एकत्र राहू या... ...चालेल ना तुला ???

मॅडम ते पुणे आहे ...न्यू यॉर्क नाही...मी आणि तुम्ही दोघी एकत्र राहायला...निनाद ने म्हटले...फिल्मी नुसती...ते फ्रेंडस बघून आलीस ना....

हाहाहाहा...कित्ती मज्जा येईल ना...असे काही झाले तर
..म्हणूनच तुला सांगतो आहे ..पुढे च्या आठवड्यात जाऊन घर बघून येऊ...तू गाडी काढ निनाद ..आम्ही दोघी पण येतो तुझ्याबरोबर....काय प्रीती चालेल ना...???

मला चालेल...त्याला चालेल का ते विचार..
मी अक्षय ला घेऊन येणार ...ट्रीप ली ट्रीप आणि पुणा पण बघून होईल...

दोघा बराच वेळ टाईमपास करत बसले..प्रीती आम्ही घरी सांगितले की तुला शेवट चा पेपर खूप कठीण गेला ..म्हणून टेन्शन आले होते आणि त्यात डोके पण दुखत होते...तू पण असेच सांग घरी काही विचारले तर.....
प्रितीची आई सगळ्यांसाठी डब्बा घेऊन आली...प्रीती ला जरा बरे वाटत होते बघून हायसे वाटले..

दोन दिवसांनी प्रीतीला घरी सोडले.ह्या दोन दिवसात मंदार ने तिला दोन तीन वेळा फोन केला .पण तिने एकदा ही फोन उचलला नाही....

तो का फोन करतो आहे हे तिला कळत होते पण तिचा अजून निर्णय होत नव्हता...आपण फसवले गेलो ही भावना खूप प्रबळ होत होती तिच्या मनात पण तरी आपण त्याच्यावर प्रेम केलंय मनापासून हे ही विसरता येत नव्हते .....विचार करायला वेळ आणि शांतता हवी होती आणि तीच मिळत नव्हती....विचारांच्या खोल गर्तेत सापडली होती..काय करावे सुचत नव्हते...

अश्यातच जोईनिंगची तारीख मिळाली.१०दिवसांनी नवीन कंपनीत जॉईन व्हायचं होते. ..मग गडबड सुरू झाली. सगळे मिळून पुण्याला जाऊन आले. २/३फ्लॅट बघून ठेवले...प्रिया आणि प्रीती चे ऑफिस दोन विरुद्ध टोकाला म्हणून मग मध्यवर्ती ठिकाणी फ्लॅट बघतीले होते तर निनाद आणि प्रिया एकाच ऑफिस मध्ये पण निनाद ला एका पी जी मध्ये सोय होत होती......१० दिवस असेच उडून गेले...तिला शांतपणे विचार करायला वेळच मिळाला नाही....ह्या दरम्यान मंदार ने तिला अनेक फोन आणि मेसेज केलें पण प्रीती ने त्याला उत्तर दिले नाही....

आज नवीन कंपनीत सगळ्यांचा पहिला दिवस होता. सगळा दिवस इंडक्शन , माहिती घेण्यात प्रोजेक्ट समजण्यात गेला...संध्याकाळी सगळे सुटले तेव्हा मनाने आणि शरीराने थकले होते...त्या रात्री ही मंदार ने तिला फोन केला आणि मेसेज केले..

शेवटी तिनेच " मला थोडा वेळ दे...प्लीज..मी करेन तुला फोन माझा निर्णय झाला की ..माझ्यासाठी हे सगळे खूप अवघड आहे...प्लीज समजून घे" एवढा मेसेज केला....
 

 

 

*******************************

काय होईल पुढे?? प्रीती माफ करेल त्याला?? तिचा विश्वास बसेल परत त्याच्यावर??? निनाद चे काय होईल पुढे?? मैत्री की प्रेम जिंकेल??? काय वाटते तुम्हाला???

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...