एक छोटीसी लव्ह स्टोरी- 12

A Story of Love Friendship and Love in friendship.

बाहेर जाऊ कुठेतरी आज येथील आता?? कॉलेजचा शेवटचा दिवस आहे...उगीच  कसेतरी वाटते आहे...बाहेर जाऊ कुठेतरी मंदार ने प्रीतीला विचारले.

हम्म घरी फोन करून सांगते...उगीच काळजी करत बसेल आई. इकडे तिकडे फोन करत बसेल. पण जास्ती वेळ नाही थांबणार चालेल?? प्रीतीने त्याला समजावून सांगितलं.

घरी फोन करून उशिरा येते आहे असे कळवले...आई ने ही परवानगी दिली...

बोल प्रीत कुठे चालणार....आता तर कॉलज मध्ये ही आपल्याला जाता येणार नाही....

कुठे ही ने...तुझ्यावर आहे. पण आधी काहीतरी खाऊ..भूक लागलीय आता... मग पुढे जाऊ या...

दोघे एका कॉफिशोप मध्ये जाऊन बसतात. शांत असे ठिकाण.सगळीकडे परीक्षा चा सीझन म्हणून कॅफे ही रिकामेच होते. मस्त कोपरा पकडून दोघं कॉफी घेत बसतात...

लहानपण संपले असे वाटते नाही मंदार. उगीच मोठे झालो असे वाटते आहे....अजून एक दोन महिन्यात नोकरीला जॉईन व्हावे लागेल आपल्याला हो ना...!!!

हम्म्म...तू कधी जाते पुण्याला ??कुठे राहणार आहेस ? झेपेल ना तुला??

बघू रिझल्ट लागला की लगेच जोईनिंग डेट मिळेल मग काय लगेच पुणे...तुझे काय...डायरेक्ट बंगलोर. असा कसा निर्णय घेतलास  रे तू?? कोणाला काहीच विचारले नाहीस!! घरचे तयार आहेत तुला बंगलोर ला पाठवण्यासाठी??? ...

ह्यावर मंदार ने तोंड फिरवले.जणू खूप काही तरी महत्वाचं बोलायचे आहे पण बोलता येत नाही असे काहीतरी त्याचा चेहरा सांगत होता...

प्रीती ..मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे... महत्त्वाचे आहे. माझ्याबद्दल एक गोष्ट मी तुला कधी सांगितली नाही...वेळ आली आहे तुला सांगण्याची...असे म्हणत त्याने तिचा हात हातात घटट घेतला ....

प्रीती , माझ्या आई बाबाचा डिव्होर्स झाला आहे. आई बाबांचे पटायचे नाही कधी कांते मला पण नाही माहित. बाबा ला खूप श्रीमंत व्हायचे होते तर आई आहे त्यात समाधानी वृत्तीची. खूप फरक होता दोघांच्या विचारानं मध्ये त्यातच बाबाच्या बॉसची मुलगी बाबाच्या मागे लागली. बाबा आहेच हँडसम एकदम हीरो.मी बाबा वर गेलंय प्रीती.बरेचदा आईबाबा मध्ये भांडणे होत तिला घेऊन. बाबा हि खूप वैतागायचा मग,भांडायचा, दारू पिऊन यायचा, कधी कधी आईला  मारायचा ही.आई बाबांचा डिव्होर्स होण्यासाठी बॉसने खूप प्रयत्न केला, खूप पैसे देऊ केले, धमक्या दिल्या शेवटी आई कशीतरी तयार झाली.

माझा सगळा खर्च उचलण्याची जबाबदारी बाबा आणि त्या आंटी ने घेतली.आई ने डिव्होर्स पेपर वर सही केली...आईला माहेरी परत आली तर मामा मामी ने राहूनच दिले नाही जास्त....रोजची भांडण ठरलेली. त्यांना भार होत होता तिचा आणि माझा..मग आई ने शाळेत नोकरी धरली आणि छोटे घर घेतले डोंबिवली ला. म्हणूनच शाळा झाल्यावर तुमच्या कॉलेजला आलो.माझा हा इतिहास सगळ्यांना माहीत होता म्हणून मुंबईच्या कॉलजला एडमिशन नाही घेतली. लांबचे कॉलज घेतले.लोक सगळ्या बाजूने बोलायचे, मनाला खूप यातना व्हायच्या मग, नकोसे वाटायचे त्या नजरा, त्या खाणाखुणा..सगळ्यांना वाटते की मला वडील हयात नाहीत.कोणाला काही कळून दिले नाही मी पण कधी...


प्रीत.. बाबाला वाटते की मी अमेरिकाला शिकायला जावे. एम एस करावे. मी गेली काही महिने GRE ची तयारी करतोय. परीक्षा दिली आहे..स्कोअर मिळाला तर नक्की जाईन अमेरिकेला.. शेवटी पैसा मोठा नाही का ..ज्याच्यासाठी बाबा आईला सोडून गेला. माझ्या आईचे हाल हाल झाले. पाहिले काही वर्ष खूप खराब गेली आमच्यासाठी..
मला खूप मोठे व्हायचे आहे,श्रीमंत व्हायचे आहे..आईला खूप सुखात ठेवायचे आहे.त्यासाठी मला खूप शिकले पाहिजे काहीतरी वेगळे केले पाहिजे...बंगलोरची ऑफर म्हणूनच घेतली आहे. बॅकअप म्हणून मी नाही जॉईन होणार तिथं....मला माफ कर प्रीती..ह्या सगळ्यात तुह्या प्रेमात कसा कधी पडलो मलाच नाही कळेले.तू खरच खूप चांगली आहेस....रणरणत्या उन्हात जशी शीतल झुळूक जशी माझ्या त्रासलेल्या मनाला तुझा खूप विसावा होता प्रीत..तुझ्या गुंतत गेलो..रोज वाटायचे तुला सगळे सांगावे...पण हिम्मत नाही झाली कधी...

सॉरी प्रीत....मला तुला त्रास नाही द्यायचा नव्हता..म्हणून असा वागत होतो..मला नाही खरंच माहित नाही आता पुढे काय ते...मी करू काय  ते तुच सांग मला. तुझ्या काय कोणाच्या हि घरी माझे हे असले बॅकग्राऊंड चालणार नाही ह्या बदल मला कल्पना आहे....तुझ्या नाझरेटले प्रश्नांना मला समजतात प्रीती पण माझ्या कडे उत्तर नाही आहे तुझ्या प्रश्नाचे..... म्हणत मंदार ने आपला हात सोडवला....

प्रीती साठी हा सगळ्यात मोठा शॉक होता..एकतर  त्याच्या घरच्याबदल कधी तो फारसे काही बोलायचं नाही...स्वतःहून तर कधीच नाही. त्यात ती खूप सध्या सुध्या घरात्तून आलेली...डिव्होर्स वगैरे तर फक्त टीव्ही किवा फिल्म्स मध्ये बघितलेले..मंदारचे फॅमिली बॅकग्राऊंड  अशी काही असेल ह्याची तिला पुसटशी कल्पना सुद्धा तिला एवढ्या वर्षात आली नव्हती. त्याचा अमेरिकेचे प्लॅन्स, श्रीमंत होण्याची धडपड, सतत चिडचिड ह्याची आता कुठे तिला संगत लागत होती....खरंच आपण ओळखतो हा ह्याला असा प्रश्न आता तिला पडू लागला.... सुन्नच झाली ती हे सगळे ऐकून....

हातात ली कॉफी थंड झालीं होती. ..तिला असे बघून तो ही थोडा भांबावला... थोड्यावेळाने म्हणाला

चल निघू या ..तुझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे ...शांतपणे विचार कर प्रीती पुढे काय ते. घाई करू नकोस ..तुझा निर्णय मला मान्य असेल.....तुला वाटले तर आपण पुढे जाऊ नाहीतर इथेच थांबू आपण......


काय निर्णय घेईल प्रीती..काय विचार करेल आता ती?? नक्की वाचा पुढं च्या भागात....कथा कशी वाटली ते नक्की सांगा....लाईक करा, फॉलो करा , शेअर करा..आणि तुमच्या कमेंट्स नक्की पाठवा.... धन्यवाद..

Youc an also read my blogs at 

https://littlesecretmusings.wordpress.com/

🎭 Series Post

View all