#28 एक छोटी सी लव स्टोरी
दुसऱ्या दिवशी जणू काही झालेच नाही असे वागत, निनाद तिला सकाळी घ्यायला आला…त्याला असे बघून तिला खूप आश्चर्य वाटले…
तिच्याकडे बघत तो म्हणाला आय अम् बीन रेस्पोंसिबल बॉयफ्रेंड बस चल गाडीत…सोडतो तुला… असे म्हणत त्याने एक गोड स्माईल दिले… बोलायचय तुझ्याशी महत्वाच….????????????????
सॉरी मला असं बोलायला नको होतं…. तुझा सगळा मूड गेला असेल ना काल….?????????
ह्म््म इट्स ओके…????????
त्याने गाडी पुढे काढली आणि एका कॅफे मध्ये घेऊन गेला सॉरी सकाळी उठायला उशीर झालेला होता चहा पण नाही घेतला… मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तिथे असे म्हणत तिच्यावर नजर रोखून धरली.
मला घरी आपल्याबद्दल सांगायचं आहे अर्थात तुझी इच्छा असेल तरच मी घरी बोलणार आहे. आपल्याबद्दल तू तुझ्या घरी कधी बोलणार आहेस..?
असे फोनवर कसे सांगणार निनाद बरोबर नाही वाटत ते..म्हणजे मला नाही पटत आहे…फक्त आपल्या दोंघांची गोष्ट नाही ना ही..दोंघी परिवार असतील ना त्यात…मग त्यांची मर्जी नको का विचारत घ्यायला..? आई बाबा ना नक्कीच वाईट वाटेल असे सांगितले तर…!! इतके ही मोठे नाही ना झालो अजून की परस्पर निर्णय घेऊ …तिने समजावत म्हंटले…
हम्म ठीक आहे… नाही बोलत आहे घरी ठीक आहे..!!!!
मला काल अक्षय चा फोन आला होता..बराच वेळ बोलत होता..लग्न ची तारीख आहे २६ डिसेंबर ..आपण जाऊ या..तसे पण १५डिसेंबर नंतर इथे कोणी नसते..सगळे ऑफिस नावापुरता चालू … दोघे एकत्र घरी जाऊया प्रिय अक्षय चा लग्नाला?
खरंच जाऊया ना आपण खूप दिवस झाले घरी जाऊन आठवण येते आता घरच्यांची….
????????????????????????????????
काही दिवसानंतर,दोघे असाच शॉपिंग करण्यात गुंग असतात..घरी जायचे म्हणून सगळ्यांसाठी गिफ्ट बघत असतात..निनाद आज पहिल्यांदा तिचा हात हात घेऊन रस्त्यात चालत असतो..गर्लफ्रेंडचा हा तसा हातात घेऊन रस्त्यात फिरायला किती मजा येते याचा तो आज पहिल्यांदा अनुभव घेत होता…
अशातच तिला तो दिसतो तिच चाल , तेच केस तसाच काहीसा रंग पण पाठमोरा, अचानक निनादचा हात सोडवला आणि त्याच्या मागे पळायला लागते .त्याला क्षणभर काही कळतच नाही काय झाले ते. तोही तिच्या मागे धावायला लागतो पण ती ज्या व्यक्ती मागे पळत आहे ती व्यक्ती एका टॅक्सी मध्ये बसून घेऊन जाते आणि ती तिथेच उभी राहून मंदार मंदार हाक मारत राहते.
भर थंडीत तिला अचानक तिच्या सर्वांगाला दरदरून घाम सुटतो श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागतो. ती थरथर कापायला लागते.. तिची अशी हालत बघून शेवटी आजूबाजू वाले पारा मेडिकलला फोन करतात. निनाद प्रीती ला सांभाळन्याचा प्रयत्न करत राहतो.
थोड्याच वेळात सायरन वाजवत एक ॲम्ब्युलन्स जवळ येऊन उभी राहते.तिला एका ऍम्ब्युलन्समध्ये ठेवून कृत्रिम ऑक्सिजन देतात… डॉक्टरचे निदान होते की तिला बहुतेक पॅनिक अटॅक आला आहे..
तिला तिथे थोडावेळ ठेवून नंतर घरी सोडतात.तिला असे बघून तोही हादरतो… असे अचानक तिला नक्की झाले काय हे त्यालाही कळले नाही फक्त जाणवले एवढेच की तिला मंदार सारखी कोणत्याही व्यक्ती दिसली म्हणून मागे धावली आणि ती व्यक्ती निघून गेली होती तोपर्यंत…
तिला घेऊन तो घरी येतो. दोन दिवस तिच्या घरी थांबून तो चांगली सुश्रुषा करतो…तोपर्यंत त्याने गुगल वरून ह्या आजाराची, त्याची सगळी लक्षणे, औषध याची माहिती करून ठेवली होती. अचानक मंदार सदृश्य कोणत्याही दिसल्यामुळे तिला उत्सुकता किंवा स्ट्रेस आला असावा आणि म्हणूनच तिला पनिक अटॅक आला असे त्याने निदान केले…
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
तिसऱ्या दिवशी प्रीतीला ला जरा ठीक वाटत होते दोन दिवस निनाद आपल्याच घरी आहे आणि आपली सेवा करतोय याची तिला भयंकर लाज वाटली. तिने अनेकदा त्याची माफी मागितली.आणि पुन्हा असे होणार नाही याची मी काळजी घेईन असे वचन हि दिले… पण निनाद ला खात्री होती ज्यावेळी मंदारचे नाव निघेल त्या त्या वेळी तिला हा त्रास होणार आहे. अशावेळी आपण काय करावे हे त्याला काही सुचले नाही…..
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
थोड्याच दिवसात निनाद आणि प्रीती मुंबईला प्रिया आणि अक्षयच्या लग्नासाठी निघाले. जाताना-येताना दोघेही एकत्र जाणार आणि येणार होते पण जाताना प्रियकर प्रेयसी म्हणून चालले होते येताना माहिती नाही कदाचित लग्न ठरलेले किंवा कायमचे मित्र म्हणून परत येणार होते….
सबंध फ्लाईटमध्ये निनाद ने तिचा हात घट्ट धरुन ठेवला होता.. जणू तिला आपल्यापासून कोणतरी तिला दूर घेऊन जाईल अशी त्याला सारखी भीती वाटत होती…. बाहेर पडताना देखील त्यांनी तिचा हात घट्ट धरुन ठेवला. त्याला जाणवले प्रीती चा हात थंड पडला आहे. त्याने तिला बराच वेळ समजावले. दुसऱ्या दिवशी घरी बोलायची विनंती केली…
दोघा बाहेर पडताना एक साथ चालत होते..निनाद चांगला ५.११ उंच …गव्हाळ वर्णाचा त्यात छान सिल्की केस आणि बारीक फ्रेम चा चष्मा आणि स्वतःला मेन्टेन ठेवलेले तर प्रीती पण उंच चांगली ५.७ गोरी देखणी, तरतरीत नाक आणि लांब केस मोकळे सोडलेले त्यात स्टायलिश राहणी…दोघा एकत्र चालताना आपसूक लोक त्यांच्या कडे बघत होते..त्यांची जोडी खूपच छान दिसायची अगदी पहिल्यापासून ….त्यांना असे बाहेर येताना बघून दोघांच्या आईचा मनात काही विचार आला आणि त्यांची नेत्रपल्लवी झाली….
रात्री बराच उशिरा पर्यंत प्रीती जागी होती काही केल्या झोप येईना. तिची ही अस्वस्थता आईने बघितली. छान गरम दूध घेऊन आई शेवटी प्रीतीचा रूममध्ये आली आणि दोघी गप्पा मारायला लागल्या….बोलता बोलता आई ने मंदार विषयी विचारले…शेवटी प्रीतीने सगळे खरे खरे सांगायचे ठरवले…आपल्याच तोंडाने आपला आणि मंदारचा ब्रेकअप झाला आहे, आपण फसवले गेलो आणि चुकीच्या माणसावर प्रेम केले हे सांगायला तिला खूप लाज वाटली आणि वाईट ही…आईचा कुशीत मनसोक्त रडून घेतले ..आई तिच्या डोक्यावरून बराच वेळ हात फिरवत बसली…
रक्तपेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात….शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर पडते पण अश्रू बाहेर पडायला मनाला जखमी व्हावे लागते….हे खरे.
आई बराच वेळ तिला समजावत बसली.शेवटी प्रीती ने मनाचा हिय्या करून आईला सांगून टाकले निनाद ने मला लग्नसाठी विचारले आहे…मी काय करावे कळत नाही.त्याला सगळे माहिती आहे तरीही. मन सारखे मंदार कडे धावते, भूतकाळात रमते अजूनही वाट बघत की तो परत येईल……
निनादला मित्र पेक्षा जास्ती जागा देऊन सगळा काही सुरळीत होईल असे बुध्दी म्हणते पण मन कुठे मागेच रेंगाळत बसत.माझ्याच मनाची तयारी होत नाही आहे.निनाद ची तयारी आहे घरी सांगायची आणि लग्नाची ही.तुम्ही दोंघी घरानी ठरवा. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही…तुम्हाला निनाद योग्य वाटत असेल तर माझी काही हरकत नाही आहे लग्नाला….????????????
????????????????
काय होईल पुढे?? प्रितीचे आईबाबा, तिच्या लग्नाला तयार होतील? निनाद accept करू शकेल प्रितीच मंदार मध्ये गुंतून राहणे?
वाचत रहा, लाईक करत रहा आणि फॉलो करायला विसरू नका…PK.
You can now read the complete story on my wordpress blog...Don't forget to like and comment.
https://littlesecretmusings.wordpress.comhttps://littlesecretmusings.wordpress.com
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा