निनाद आणि प्रीती परत लंडनला आले. शहरातही थंडीची लाट आली होती आणि नेमके निनादच्या ऑफिस चे काम वाढले होते. पण तरीही तो वेळात वेळ काढून प्रीतीला रोज ऑफिसला सोडायला जायचा…तेवढंच त्याला तिला भेटायला निमित्त मिळायचे.. कधी फुल तर कधी चॉकलेट्स तर कधी छोटी छोटी सरप्राइज गिफ्टस ह्याने प्रीतीला खुश ठेवायचं प्रयत्न करत होता.
आधी आधी प्रीतीला विचित्र वाटायचं..असे असे कधी मंदार ही वागला नाही तिच्याशी…उगीच त्याला टाळायचा प्रयत्न करायची, निनाद ला ही ते कळायचे…मग अजूनच तिला आपल्या प्रेमात पडायचं निर्धार करायचा…पण आता आता प्रीतीला ही सवय झालेली त्याच्या वागणयची हळू हळू आवडायला लागले होते त्याचे वागणे..आज काय बरं नवीन असेल ?ह्याचा विचार करायची…..
थोड्याच दिवसात निनादचा वाढदिवस येतो आहे ..आपणही त्याच्या साठी काहीतरी खास करावे असे तिच्या मनाने घेतले होते..काय बरं करावे …सगळे गिफ्ट शोप शोधून झाले, ऑनलाईन बघून झाले पण काहीच पसंत पडेना…मग अचानक एक दिवशी तिला आयडिया सुचली…
निनादचा वाढदिवस होता दुसऱ्या दिवशी..तो नेहमी प्रमाणे तिला उशिरा ऑफिस मधून घेऊन बाहेर जेवायला घेऊन जातो.. उद्या काय करायचे ठरवले आहेस.???तुझा वाढदिवस आहे ना..काय स्पेशल प्लॅन्स आहेत की तुझे रोजचे ऑफिस..आहे तिने हळूच विचारले…
हम्म काही खास प्लॅन नाही आहे…मीटिंग आहे उद्या…उशीर होईल …प्रोजेक्ट ने पार वाट लावून ठेवली आहे..प्रीती…..
ठीक आहे..मग उद्या जेवायला ये माझ्याकडे…तुझ्या आवडीचे काहीतरी बनवते…उशीर झाला तरी चालेल…येशील??? प्लीज. ..नाही म्हणू नकोस ना!!!!
ठीक आहे..येऊन मी ..पण उशीर होईल.. आधीच सांगतो..ओके..
रात्री बरोबर १२वाजता त्याला विश करायचा मेसेज पाठवते…आणि सोबत एक छान शी कविता…
\"संगीत काही से जुनं आहे….
सूर नव्याने जुळत आहे…
मन ही काहीसे जुनं…
तरी नवीन तार छेडत आहेत….
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…निनाद..
मेसेज वाचून निनाद छान हसला..चला मनाने नव्याने तार तरी छेडली हे काय कमी आहे …!!!
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती ऑफिस मधून लवकर आली. भरभर सगळी तयारी करून ठेवली..त्याच्या आवडीचे खास महाराष्ट्रीयन जेवण बनवलं होते…घरामध्ये छान फुले आणि मंद संगीत लावून ठेवले आणि सगळ्यांची वाट बघू लागली. ..शीना, अमान आणि दोघांची आई बाबा ह्यांना तिने जेवायला बोलावले होते…रात्री ८३० नंतर सगळे जमले आणि निनाद ला फोन केला तो ऑफिस मधून निघताच होता…तसे तिने पुढची तयारी केली ….
तो येतच तिने छान पैकी त्याचे हसून स्वागत केले आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला आणि त्याला आत घेतले. सगळे त्याची वाट बघत होते..तो आत येताच शीना अमन ह्याने त्याला हॅपी बर्थदे म्हणत मिठी मारली…दोन्ही आई बाबा ने त्याला आशीर्वाद दिले…. प्रीतीने त्याची औक्षण करायची सगळी तयारी केली होती. शीना आईला आणि अमन आईला त्याचे औक्षण करायला लावते.
त्या आठवले घरी आई ही वाढदिवसाच्या दिवशी औक्षण न विसरत करायची. . मागच्या वर्षी एकटेच होतो .. केक कापून बर्थडे केला सगळयांनी पण मनात रुखरुख कायम राहिली. .. थँक्स प्रीती .. कसे तुला एवढे सगळे जमते आणि समजते .. त्याच्या मनात आले.
त्यानंतर त्याचा आवडता ब्लूबेरी केक घेऊन बाहेर आली. सगळ्यांनी हसत खेळत केक कापला.आधीच खूप उशीर झाला त्यामुळे प्रीती ने सगळ्यांना जेवायला बसवले..आणि नेवेद्याचे ताट निनादला दिले. गरम गरम वरण भात आणि त्याचे सगळे आवडते पदार्थ बघून निनाद खूपच खुश झाला…..एवढे सगळं पदर केलेले बघून तो चाट पडला. .
खूप दिवसांनी त्याला असे मनापासून जेवताना बघून तिला ही खूप बरे वाटले… पाहुण्या मंडळी ना पण जेवण आवडले…काहीतरी वेगळे नेहमी चा पंजाबी डिशेस पेक्षा म्हणून खुश झाले. …थोडावेळ बसुन मग अमन ने सगळ्यांना बाहेर काढले.आता निनाद आणि प्रीती एकटे राहिले होते..तिने सगळे आवरायला घेतलं…
त्याने तिचा हात धरून थांबवले….थांब ना…प्लीज..
ती छान पैकी हसली आणि नजरेनेच विचारले..काय?
एवढे सगळं करायची काय गरज होती? बाहेर गेलो असतो ना !!
एवढे पण काही वाईट नव्हते बनवलं मी जेवण. ..रे !!!
अरे यार. . मला तसे नव्हते म्हणायचे. . मस्तच होता जेवण, हाताला चव आहेच तुझ्या आधीपासून, पण औक्षण वैगरे मस्तच वाटलं मला. . घरची आठवण आली एक्दम …थँक्स प्रीती. .. परदेशात राहून तू एवढा चांगला सेलेब्रेट केलास माझा वाढदिवस. . मनापासून थँक्स !!!
तू डान्स करशील माझ्या बरोबर ??? प्लीज…
तिने पटकन रिमोट ने गाणी लावली. मंद रोमँटिक गाणं सुरु झाल आणि त्याने तिला जवळ ओढले..ती छान पैकी लाजत होती..
थोड्यावेळाने त्यानं विचारले. .. प्रीती घरी कधी सांगायचे? सांगू या ना आता ..
हहम्म्म.. पण घरी काय रिऍक्टिशन असेल माहिती नाही.. भीती वाटतेय आहे मला . सगळे हसतील ना …. प्रेम एकवार आणि लग्न दुसऱ्याबरोबर तुला फसवले असे म्हणतील निनाद. तिने हळूच म्हटले. .
कोणी काहीही बोलणार नाही !!!. .. माझयावर विश्वास ठेव. . घरी तुझ्याबद्दल आन मंदार बदल माहिती नाही आहे. . आणि मित्रमंडळी बोलशील तर तर खरे मित्र असतील तर कोणीच काही बोलणार तुला आणि मला ही .. उलट सगळ्यांना आनंदच होईल. .. प्रीती इतका विचार नको ना करुस !!! तसे पण माझ्या घरच्यांना तू खूप पसंत आहेस आई तर सोड बाबाना पण. तसे त्यांनी bबरयाच वेळेला सुचवले हि आहे .. मग घरांची इच्छा पूर्ण नको का करायला? त्याने तिच्या डोळ्यात खोल बघत म्हटले….
तिने मात्र नजर चोरली त्याच्यापासून. .विषय बदलायला म्हणाली थांब तुझ गिफ्ट राहिले आहे द्यायचे. .
तिने एक इन्व्हलोप दिले हात. . उघडून बघ तुला आवडेल असेच आहे…..
त्यानं उत्सुकतेने पाकीट उघडले आणि त्याचे डोळे विस्फारले !!! तू वेडी आहेस का ? इतका महागडं गिफ्ट कसे मिळवले तू? वर्ल्ड कप च्या सेमीफायनल चे तिकीट होते त्यात…
बाप रे एवढे पैसे कुठून आणलेस? आणि काय गरज आहे एवढं सगळं करायची ?
अरे बाबा !! लॉर्ड्सला आहे…आपण इकडे आहोत..आणि मला माहित आहे तुझंही स्वप्न आहे एकदा तरी मॅच बघ्याची .. म्हणून सेल मध्ये एन्रॉल केलेले आणि मिळाले. .. पण एक प्रॉब्लेम आहे. इंडीया सेमी फायनल मध्ये जाईल कि नाही माहिती नाही. . .!!!
त्यावर तो मनापासून हसला. . थँक्स प्रीती हा बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी. .. . . असं म्हणत त्याने तिला जवळ ओढले आणि अलगद तिच्या कपाळावर आपलं ओठ टेकवले….तसे ती शहारली…
लेट्स बी रेस्पॉन्सिबल प्लीज निनाद .. तिने अलगद बाजूला होत म्हटले. .
सॉरी.,,, मी निघतो आता .. असं म्हणत तो निघून गेला…
तो निघून गेल्यावर ती बराच वेळ विचार करत उभी होती. .. . नीनाद कडून पाहिलं किस… ते हि अलगद हळुवार. . असे म्हणतात कि तुमच्या ओठावर किस करणारे भरपूर भेटतात पण आयुष्यात तुमच्या कपाळावर किस करून तुम्हाला खरे प्रेम करणारे फक्त एक च असतो. . काय नव्हता त्या किस मध्ये. . फक्त प्रेम आणि आदर. . मीच मूर्ख.!!! काहीतरी वेड्यासारखी त्याला बोलून बसले. . आता हर्ट झाला असणार नक्की. .. त्याचा राग घालवू कसा ह्याचा ती विचार करायला लागली..
क्रमशः..आजचा भाग कसा वाटला ऐकायला नक्की आवडेल...इरा ब्लॉग वर भरपूर लोक वाचत असताना कमेंट मात्र करत नाहीत...असे का...?? वेलात्वेल काढून लेखक लिहीत आहे ...त्याचे थोडेसे कौतुक केले तर बिघडणार नाही ..नाही का ???
You can now also read the complete story on my blog PKs Diary on WordPress...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा