Dec 01, 2021
कथामालिका

एक छोटीसी लव स्टोरी ३३

Read Later
एक छोटीसी लव स्टोरी ३३

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


#32 एक छोटी सी लव स्टोरी
घरभर फिरून काही राहिले नाहीना बघितले पण सारखे वाटत होते …आज वेळ इथेच थांबावे आणि प्रीतीने इथून जाऊ नये..

ती कॉफी घेऊन बाहेर आली. तो आपल्याच विचारात होता.. चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती. निनाद .जास्ती विचार करू नकोस ना….भेटणार आहोत आपण लवकरच .फक्त ५महिने ….

प्रीती .तुला नाही माहित हे काही महिने माझ्यासाठी किती स्पेशल आहेत ते..कसे कोण जाणे पण लंडन माझे आयुष्य बदलून टाकेल असे मला कोणी सांगितले असते ना..तर मे वेड्यात काढले असते त्याला….खरंच..

मी पण..अचानक मला लंडन ला पाठवले कंपनी ने ..साहिल सिरांची कृपा दुसरे काय, त्यात माझा आणि मंदार चा ब्रेकअप, तुझ मला प्रोपज करणे, लग्न ठरणे, त्यात साहिल ने लग्नासाठी विचारणे..बाप रे कित्ती ती उलथापालथ .अख्या छोट्या आयुष्या त..माझा पहिला परदेश प्रवास म्हणून आई बाबाची काळजी, त्यात लग्न साठी मुलगा बघणे..तू इथे होतास म्हणून ठीक आहे….अॅक्च्युअली आई बाबा ने मला तू इथे आहेस ना म्हणूनच पाठवले मला….डाव असेल कर त्यांचा .????

चल वेडी काहीही बोलते…सगळे काही सहज घडले…असे म्हणत तिचा मांडीवर डोके ठेवले…..आज त्याला विरोध करावा वाटला नाही ..त्याच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवत राहिली..

निघू या…??

थांब ना…जाऊ नको ना….त्याने हळूच आपले अश्रू लपवत म्हटले….हे फक्त मंद हसली…नको रे येवढे प्रेम करू…त्रास होतो त्याचा…मी तुला असे प्रेम कधी करून शकेन का…हा विचार तिच्या मनात आला.

नाईलाजाने शेवटीं उठावे लागले…फ्लाईट ची वेळ होत होती…त्याने सगळे सामान खाली उतरायला घेतले…आपली ही एक बॅग प्रीती घेऊन जाणार होती…शेवट चे एकदा बघून घेऊ म्हणून परत फेरी मारायला गेला…प्रीती खिडकीजवळ उभी राहिली होती…

प्रिन्सेस….काय बघते आहेस…??

काही नाही…असाच..निघायचे ना.. चल

पण निनाद ने तिला सरळ जवळ खेचले आपल्या मिठीत आणि घट्ट धरून ठेवले…आज त्याला थांबवले तरी तो थांबणार नव्हता …ती मात्र स्तब्ध झाली त्याचा आवेश बघून…त्याने हलके आपली मिठी सैल केली आणि तिच्या कडे बघत तिची हनुवटी वर केली आणि आपले ओठ तिच्या ओठंवर ठेवले…….अलगद एक एक गुलाबाच्या पाकळ्या गळून पडव्यात तसे तिला वाटत होते…इथे निनाद ची हलत काही वेगळी नव्हती..आयुष्यातले पाहिले किस..ती ही तिचे जी स्वप्नं गेली कित्येक वर्ष उराशी बाळगले….आणि विरहाच्या आधी!!!!त्याने तिला अजून आपल्या जवळ घट्ट धरून ठेवले..त्याचा शर्ट आधी पकडलेल्या प्रीतीने त्याला कधी मिठीत घेतले ते तिला ही कळेले नाही….

थोड्यावेळाने तो अलगद बाजूला झाला…आणि तिच्या कानात घोग्र्या आवजात म्हणाला…

I am not sorry for this..Princess..

 क्रमशः

 

 

 

आजचा भाग कसा वाटला...नक्की कमेंट करा...आणि हो आताझे ब्लॉग आणी संपूर्ण कथा तुम्ही वर्डप्रेस वर वाचू शकता.. लिंक खाली आहे  किंवा Google वर PKs Diary म्हणून ब्लॉग आहे....नक्की एकदा बघा....

 

 

 

https://littlesecretmusings.wordpress.com/

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PK

Service

an aspiring blogger...amature writer...