Oct 18, 2021
कथामालिका

एक चिमणी भाग ५वा (अंतीम)

Read Later
एक चिमणी भाग ५वा (अंतीम)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
एक चिमणी भाग ५वा (अंतीम भाग )

सहा महिन्यांनंतर …

केतकीच्या शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी औषधं आणि योग्य आहार यामुळे आणि जोडीला असणा-या आजीच्या गोष्टींमुळे लवकरच भरून निघाली.

आजारी असतानाच केतकीनी बोर्डाची परीक्षा दिली होती. तरीही शाळेतून पहिली आणि जिल्ह्यातून तिसरी आली होती. महेंद्र आणि अर्पिता या निकालामुळे खूप खूष होते. केतकी नुसती पास जरी झाली असती तरी त्यांना चालणार होतं कारण तिची तब्येतच खराब असल्याने त्यांनी मेरीटची अपेक्षा केली नव्हती. बोर्डाची परीक्षा म्हणजे पुढल्या करीयरच्या दृष्टीनी एक टर्निंग पाॅईंट असतो.म्हणून ही परीक्षा महत्वाची होती.

बोर्डाचा निकाल आल्यावर शाळेनी केतकीचा सत्कार करायचं ठरवलं. केतकीच्या सत्काराच्या दिवशी महेंद्र अर्पिता आजी रोहन सगळे शाळेत गेले होते.
शाळेचा सगळा हाॅल तुडूंब भरला होता.केतकीचा सत्कार झाल्यावर बाईंनी केतकीला सांगीतलं तू काहीतरी बोल.

केतकी बोलायला उभी झाली." आमच्या मुख्याध्यापिका कामत बाई, शिक्षकवृंद, माझ्या मैत्रीणी आणि माझे आई-बाबा आजी आणि माझा भाऊ रोहन सगळ्यांना नमस्कार. बाई म्हणाल्या मला काहीतरी बोल म्हणून मी तुमच्यासमोर उभी आहे.

बोर्डाच्या परीक्षेच्या आधी मी आजारी पडले होते. मला खूप मोठा आजार झाला का असा मला वाटायचं. जेव्हा मला खूप थकल्यासारखं होत होतं तेव्हा घरातल्या सगळ्यांना हा प्रश्न पडला की नेमकं काय झालंय मला.

मी नेहमीसारखी दंगामस्ती करत नव्हते ,हसत नव्हते, अभ्यासही करावासा वाटत नव्हता. यामुळे माझ्या आई- बाबांना ताण आला. माझं हे वर्ष दहावीचं आहे आणि मला काय झालंय हे मलापण कळत नव्हतं.

रक्ताच्या सगळ्या चाचण्या केल्या त्यातून माझ्या शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाजवीपेक्षा कमी झाल्याने मला हा त्रास होत होता. हे कळलं. औषधं आणि योग्य आहार यामुळे मी लवकर यातुन बरी झाले.

.आपलं शरीर चांगलं सुद्रुढ राहण्यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे.आपल्या शरीराच्या हालचालीत जराही बदल झाला तर त्याकडे आपण लगेच लक्ष दिलं पाहिजे.

मित्र मैत्रिणींनो माझा अनुभव लक्षात घेऊन तुम्ही स्वतःची काळजी घ्या.नेहमी स्वतःला आवडतं ते खाण्यापेक्षा आपल्या शरीराला योग्य काय आहे ते रोज खावं आणि एखाद्या दिवशी मनासारखं खावं. म्हणजे आपली तब्येत सांभाळली जाते तसंच मनासारखं खाल्ल्या वर मनही आनंदी होतं. हे मला माझ्या आहारतज्ञांनी सांगीतलं होतं ते मला पूर्ण पटलं होतं. त्यांनी सांगीतल्याप्रमाणेच मी आहार घेतला. त्यामुळे मी बोर्डाची परीक्षा देऊ शकले.

मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता आपलं सगळ्यांचच करीयर सुरू होणार आहे.आपलं करीयर उत्तम करायचं असेल तर सगळ्यांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्या. एखाद्या आहारतज्ञाची भेट घ्या. मी वयानी लहान आहे. तुमच्याच एवढी आहे. मी तुम्हाला उपदेश करणार नाही पण माझ्या अनुभवामुळे तुम्हाला सावध करतेय.धन्यवाद."

केतकीचं बोलणं सगळ्यांनाच पटलं महेंद्र आणि अर्पिता ला फारच आनंद झाला तिचं बोलणं ऐकून.


या प्रसंगानंतर ही बरीच वर्ष गेली.केतकी आता प्रशासकीय परीक्षांची तयारी करत होती.मध्येच आहारतज्ञांना भेटत असे.
रोहन ही बारावी झाला. आजी केतकीच्या आजारपणापासून त्यांच्याकडेच रहात होती.

कर्वे कुटुंबात पुन्हा पहिल्यासारख्या चर्चा रंगायला लागल्या, हास्यफवारे फुटू लागले. एकंदरीत केतकीच्या आजाराने कर्वेंच्या घरात जे दु:खाचं मळभ साचलं होतं ते आता दूर झालं होतं.


माणसाच्या शरीराला जसं हिमोग्लोबीन आवश्यक असतं. तसच घरालाही आवश्यक असतं. सगळ्यांच्या तब्येती उत्तम असणं हे घरासाठी असलेलं हिमोग्लोबीन आहे. ते कमी होऊ नये याची दक्षता आपणच घ्यायला हवी. घरातलं वातावरण जर थकलेलं कंटाळवाणा व्हायला लागलं तर घराचं हिमोग्लोबीन म्हणजे घरात राहणा-या सदस्यांची स्वास्थ्य चांगलं ठेवण्याची धडपड करायला पाहिजे.

कर्वे कुटूंबानी वेळीच केतकीच्या आजारांवर उपचार केले त्यामुळे आज त्यांचं घर आनंदी आहे. केतकी सुद्धा प्रशासकीय परीक्षांचा अभ्यास करतेय. ज्या खूप कठीण असतात.
------------------------------------------------------------
समाप्त
लेखिका….मीनाक्षी वैद्य.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now