एक बेट मंतरलेलं (भाग -४२ अंतिम) #मराठी_कादंबरी

Horror dalls island story. Horror Marathi kadambari. College friends story. Ira blogging horror stories. Ira free stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -४२ अंतिम)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
आता जे काही करायचं आहे ते सैतान तिथे येण्याआधी! म्हणून टीम नक्की कश्या हालचाली करायच्या, अमन, श्वेता आपल्या बाजूने येतील का याचा विचार करत होती. त्यांचं काहीतरी बोलणं झालं आणि सगळ्यांनी त्या पडक्या घरात जाण्याचा निर्णय घेतला.

"आपण त्या घरात जाणार आहोत! कोणी घाबरत नाहीये ना?" शॉन ने मुलांना विचारलं.

सगळे मानेने नाही म्हणत होते पण, त्यांच्या डोळ्यात भीती दिसत होती. उगाच मुलं आत घाबरली आणि त्यांच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव झाला तर ऐनवेळी काय करा म्हणून मग शॉन ने प्लॅन बदलला.

"ओके! डोन्ट वरी... तुम्ही कोणी येऊ नका.. इथे तुमच्या सोबत Raymond थांबेल... बाहेर काही activity झाल्या तर just call us.." शॉन म्हणाला.

"सर! ते सगळं ठीक आहे पण, आता संध्याकाळ होत आली आहे... त्या वाईट शक्ती वाढल्या आणि तुमच्या पैकी कोणाला काही झालं तर? एकतर ते अमन, श्वेता पण कुठे गेले माहीत नाही..." प्रवीण म्हणाला.

"लूक..." शॉन त्याच्या हातात थर्मल कॅमेरा देत म्हणाला.

प्रवीण ने गोंधळून कॅमेरा घेतला आणि त्यातून तो बघू लागला...

"सर! तिथे...." तो म्हणाला.

"येस! That only I was telling..." शॉन म्हणाला.

"नक्की काय झालं आहे? प्लीज कळेल असं बोला ना.." समृध्दी म्हणाली.

"अगं तिथे ते झाड दिसतंय का? अमन, श्वेता तिथे आहेत... पण, त्यांच्यात काहीही ताकद नाहीये.... आपल्या समोर यायची पण ताकद उरली नाहीये त्यांच्यात.." प्रवीण ने सांगितलं.

"अच्छा! म्हणजे आपलं अर्ध काम झालं का?" समृध्दी ने विचारलं.

"नो! सोल ची पॉवर कधी increase होईल सांगता येत नाही..." डीन म्हणाला.

"But, you don't worry! Just wait here.. " शॉन ने सगळ्यांना समजावलं.

Raymond मुलांसोबत बाहेरच थांबला तर, बाकी सगळी टीम आत जाऊ लागली. त्यांनी आधी अंदाज घेतला आणि ते त्या पडक्या घरात गेले. साधारण अर्धा तास होऊन गेला तरी काहीही खबरबात लागत नव्हती. इथे बाहेर मात्र आता कोणाचंच लक्ष लागत नव्हतं!

"सर! आपण पण आत जाऊया... प्लीज...." नम्रता म्हणाली.

आता सगळेच असं म्हणायला लागले आणि कोणाचा आवाज सुद्धा आला नाहीये म्हणून सगळे आत गेले. तिथे टीम च सेशन चालूच होतं! या सगळ्यांना ती पूर्ण मूर्तीच दिसत होती तर दीपा ला ती अर्ध मूर्ती आहे हे कळत होतं!

"अर्ध मूर्ती..." दीपा म्हणाली.

त्याबरोबर त्या रक्त पिशाच्या च्या मूर्ती जवळून काहीतरी दीपा च्या दिशेने आलं हे सगळ्यांना जाणवलं! नम्रता ने तिला ओढून बाजूला घेतलं म्हणून ती वाचली. इतका वेळ तिथे activity आहेत हे समजत होतं पण, काहीही रिस्पॉन्स येत नव्हता जो, हे सगळे आत आल्यावर येऊ लागला.

"दीपा! तू ठीक आहेस ना?" नम्रता ने तिला उचलून घेतलं आणि विचारलं.

"हो.." ती म्हणाली.

बाकी टीम आता त्या मूर्ती जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली.... पण, काही केल्या कोणाला त्या मूर्ती जवळ जाता येत नव्हतं! साधारण अर्ध्या फुटाच्या अंतरावरून अचानक झटका लागल्या सारखे सगळे मागे होत होते. हे असंच चालू राहिलं तर मूर्ती तोडणं अशक्य होईल म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. सगळे त्यांच्या त्यांच्या परीने काम करत होतेच! अशात कधी रात्र झाली समजलं सुद्धा नाही. वातावरणात एक गंभीरता पसरली होती. जणू, या वाईट शक्ती वाटच बघत होत्या कधी एकदा रात्र होते!

"सर! गुरुजींनी दिलेला बॉक्स! त्यात नक्कीच काहीतरी असेल ज्याची आपल्याला मदत होईल..." नम्रता ला एकदम त्या बॉक्स बद्दल आठवलं आणि ती म्हणाली.

"Ohh yes!" Meldon म्हणाला.

लगेच सगळे प्रवीण जवळ आले. त्याच्याकडे ते बॉक्स होतं. लगेचच त्याने बॉक्स उघडलं.

"सर! मी श्लोक म्हणते तुम्ही या काठीने ती मूर्ती तोडण्याचा प्रयत्न करा... त्याआधी सगळ्यांनी अंगारा लावून घ्या.." नम्रता म्हणाली.

तिने सांगितल्या प्रमाणे लगेच सगळ्यांनी अंगारा लावला. त्यात असलेलं पुस्तक घेऊन नम्रता ने श्लोक म्हणायला सुरुवात केली आणि शॉन काठी घेऊन पुढे सरसावला. ती काठी त्या मूर्ती पर्यंत जात होती पण कोणती तरी शक्ती त्या मूर्तीवर वार होऊ देत नव्हती.

"असं होणं शक्य नाही.... आपण बाप्पाचं नाव घेतोय म्हणजे वाईट शक्तींना त्रास होणार.. पण, हे नक्की काय घडतंय?" नम्रता गोंधळून म्हणाली.

"अमन, श्वेता...." दीपा म्हणाली.

रात्र झाली होती आणि पौर्णिमा जवळ येत होती तशी दोघांमध्ये शक्ती यायला लागली होती. ते दोघे मिळून रक्त पिशाच्याच्या मूर्तीला भंग करण्यापासून वाचवत होते.

"We have to change our plan.." शॉन म्हणाला.

सगळे त्या पडीक घराच्या बाहेर आले.

"आम्ही अंधाऱ्या राज्याशी, सैतानी शक्तींशी एकनिष्ठ आहोत म्हणून हे केलं... नाहीतर तुम्ही जे काही कारस्थान केलं आहे ते आमच्या लक्षात आलं आहे...." श्वेता रक्त पिशाच्याला म्हणाली.

"कारस्थान? कसलं कारस्थान? तुम्हाला दोघांना कोणीतरी फसवलं आहे.... माझ्या सुटके बरोबर तुम्ही दोघं सर्वशक्तीमान व्हाल... काही तासात सैतान इथे येईल... आणि बळी दिले की आपलं काम झालं...." त्या अर्ध मुर्तीतून आवाज आला.

"ठीक आहे..." अमन फक्त एवढंच म्हणाला आणि पुन्हा दोघं त्या मूर्तीचं रक्षण करत तिथेच थांबले.
***********************
इथे बाहेर आता नक्की काय करायचं म्हणजे अमन, श्वेता कमजोर होऊन मूर्ती भंग करायला मिळेल याची योजना तयार करणं चालू होतं.

"त्या दोघांच्या पॉवर कमी आहेत.. त्यांना अजून पॉवर ची need आहे... So, तिथे आपण पॉवर increasing device ठेवलं तर ते दोघं त्यात attract होतील and then we can catch them..." डीन ने बोलता बोलता एक मशीन तयार केलं आणि त्याची माहिती सांगितली.

"ओके.. एकदा ते दोघं यात आले की आपल्याला मूर्ती तोडायला सोपी जाईल का?" प्रवीण ने विचारलं.

"Hope so..." डीन म्हणाला.

"No.. no... Dean! Something is going wrong" Meldon म्हणाला.

"काय झालं?" मयुर ने विचारलं.

"ती डॉल जी या बॉक्स मध्ये आहे ती प्रवीण ने ऑर्डर केली होती राईट? For whom? नम्रता! राईट?" त्याने विचारलं.

"हो... पण त्याचा काय संबंध?" नम्रता ने गोंधळून विचारलं.

"तू आणि प्रवीण ने मिळूनच ती आयडॉल distroy करायची... तरच हे मिशन successful होईल." त्याने स्पष्ट सांगितलं.

दोघांनी एमेकांकडे बघितलं... दोघांच्याही डोळ्यात एकमेकांविषयी काळजी दिसत होती. आपल्याला काही झालं तरी हरकत नाही पण, ज्याच्यावर आपण प्रेम केलं त्याला काहीही होऊ नये म्हणून ही जास्त काळजी होती.

"नका काळजी करू दोघं... अरे टीम आहे ना आपल्या सोबत.... बाप्पा पण आहे ना?" मयुर ने दोघांना समजावलं.

"Yes... तुमच्या दोघांच्या आता मेन रोल आहे या मिशन मध्ये... We can help you... कोणाला काही होणार नाही... Don't worry..." शॉन ने सुद्धा दोघांना समजावलं.

"First I'll check.. exactly what happening inside..." Raymond म्हणाला.

लगेचच तो पुढे गेला आणि थर्मल कॅमेऱ्याच्या मदतीने आत डोकावून बघू लागला. थर्मल कॅमेऱ्यात दीपा ने सांगितल्या प्रमाणे ती मूर्ती अर्ध मूर्ती स्वरूपात दिसत होती. त्या अर्ध मूर्तीच्या आणि अमन, श्वेता च्या होणाऱ्या हालचाली त्यात दिसत होत्या. आधी कॅमेऱ्यात असं काही दिसलं नव्हतं! पण आता जशी रात्र वाढत होती, अंधार वाढत होता आणि पौर्णिमा जवळ येत होती तशी या वाईट शक्तींमध्ये होणारी वाढ दिसत होती. बाकीच्या सैनिक बाहुल्या त्या घरात आडोसे घेऊन लपलेल्या होत्या. रक्त पिशाच्च आणि अमन, श्वेता ने त्यांच्या शक्ती आधीच कमी करून टाकल्यामुळे नम्रता ने जेव्हा श्लोक पठणाला सुरुवात केली होती तेव्हाच त्यांना त्रास व्हायला लागला होता. त्या पूर्णपणे शक्तिहीन झाल्या आहेत हे Raymond ने बघितलं आणि त्यांच्या पासून काहीही धोका नाहीये म्हणून तो रिलॅक्स होता.  Raymond ने सगळं नीट पाहिलं आणि तो पुन्हा जिथे सगळे थांबले होते तिथे आला.

"We have to take some fast step. Evil power increase होतायत..." त्याने सांगितलं.

काहीवेळ शांततेत गेला आणि त्याने जे काही बघितलं ते सगळं नीट बाकीच्यांना सांगितलं.

"निघेल काहीतरी मार्ग! आपला हेतू शुद्ध आहे आणि बाप्पा आहे ना सोबत..." नम्रता दीर्घ श्वास घेऊन म्हणाली.

"हो... पण, आता पुढे नक्की करायचं काय? तुला आणि प्रवीण ला मिळून ही लढाई लढाईची आहे पण, नक्की काय करणार?" समृध्दी ने काळजीने विचारलं.

पुन्हा काही वेळ विचार करण्यात गेला.

"अरे! आपल्याला हरीश काकांनी पण काहीतरी दिलं आहे ना.. थांब बघते त्यात काय आहे.." नम्रता ला एकदम आठवलं आणि ती म्हणाली.

तिने तिच्या बॅगेतून ते पाकीट काढलं आणि उघडून बघितलं तर त्यात एक घंटा, जास्वंदीची फुले, दुर्वा आणि चंदन होतं.

"नमु! आता याचा काय उपयोग होईल?" प्रवीण ने विचारलं.

"अरे का नाही! घंटा नाद अशुभाचे बळ क्षीण करतो... आता बघच आपला विजय कसा होतो... बाप्पा आहे... चला सगळ्यांनी..." नम्रता उत्साहात म्हणाली.

सगळे आत गेले. डीन ने त्याने बनवलेलं मशीन सेट केलं. त्यातून निघणाऱ्या electric energy अमन, श्वेता ला त्याच्याकडे खेचत होते पण दोघांनी कसाबसा स्वतःवर ताबा मिळवला होता. प्रवीण आणि नम्रता त्या दोघांना चिडवून त्या मशीन जवळ नेण्यासाठी प्रयत्न करत होते. नम्रता चा मोठ्याने जप चालूच होता. या सगळ्यात पहाट होत आली होती... झोप नसल्याने सगळे दमले सुद्धा होते. पण, हे काही तास महत्वाचे म्हणून सगळे जीवाची ओढाताण करून त्या शक्तींना कैद करण्याच्या मागे लागले होते. Meldon कडे असणाऱ्या बॉक्स मधुन पण आता जोरजोरात आवाज येत होते... कधीही ती वाईट बाहुली बाहेर येईल अशी अवस्था होती.

"सैतान पुढच्या काही मिनिटात येईल... लवकर काहीतरी करा..." दीपा म्हणाली.

त्याबरोबर लगेचच नम्रता ने घंटा नाद करायला सुरुवात केली. त्या नादाने अमन, श्वेता पूर्णपणे घाबरले, वेड्या सारखे इकडे तिकडे भरकटू लागले. पूर्ण शक्ती एकवटून दोघं नम्रता आणि प्रवीण वर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. दोन निष्पाप जीव त्या वाईट शक्तिंसोबत एकमेकांना साथ देत लढत होते. एक पॉईंट असा आला की Meldon कडे असलेल्या बॉक्स मधून बाहुली बाहेर आलीच! तिच्या शक्ती आता अमन, श्वेता ला मिळत होत्या... ती तिच्या सगळ्या शक्ती त्या दोघांमध्ये टाकत होती... त्या दोघांचं टार्गेट नम्रता आणि प्रवीण होते... त्या दोघांना एकदा संपवलं की अर्ध काम होण्यात जमा होतं.... आता दोघं चवताळून नम्रता, प्रवीण वर चालून आले. टीम त्यांना कुठून वार होईल, कुठून त्या शक्ती येतील याबद्दल सांगून मदत करत होती पण, या सगळ्या धावपळीत दोघं पार दमले होते. कधी वरून, कधी डाव्या बाजूने तर कधी उजव्या बाजूने कुठूनही दोघं वार करायला येत होते... त्यांचा वार म्हणजे या दोघांच्या शरीरात प्रवेश मिळवून त्यांच्या मनावर ताबा मिळवायचा! नम्रता किंवा प्रवीण एकाच्या जरी शरीरात प्रवेश मिळाला तरी दुसऱ्यावर ताबा मिळवणे सोपं काम होतं! तोच वार चुकवताना दोघांची दमछाक होत होती. टीम थर्मल कॅमेरा, थर्मामीटर आणि बाकी सेंसर मशीन वापरून ते कुठून येत आहेत याचा अंदाज दोघांना देत होते. संपूर्ण कोपऱ्यात टीम ने लेझर चे सेंसर लावले होते आणि त्यामुळे तिथून काहीही पास झालं तरी त्यांना कळत होतं. यामुळे नम्रता आणि प्रवीण ला खूप मदत मिळत होती.  अमन, श्वेता चा बंदोबस्त होत नाही तोवर त्या मूर्तीचा अंत सुद्धा होणार नाही म्हणून दोघं कसेबसे स्वतःला सावरत होते. प्रवीण आत्ता आत्ता आजारातून बरा झाला होता त्यामुळे त्याला अजूनच अशक्तपणा वाटत होता... खूप घामाघूम होऊन तो तिथल्या एका दगडावर बसला. नम्रता ला सुध्दा आता त्याची हालत बघवत नव्हती... अमन, श्वेता कोणत्याही दिशेने येऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते.... प्रवीण ला त्रास कमी व्हावा म्हणून नम्रता ने मुद्दाम दुसऱ्या दिशेला जाऊन जोरात घंटा नाद करायला सुरुवात केली. त्यामुळे ते दोघं तिच्या दिशेने जाऊ लागले... तिच्यात सुद्धा आता फार कमी ताकद उरली आहे हे जाणून प्रवीण ने अचानक उठून ती वाईट बाहुली डीन ने बनवलेल्या मशीन मध्ये टाकली. त्याबरोबर नम्रता वर वार होणार असतानाच ते दोघं आपोआप डीन ने बनवलेल्या मशीन कडे ओढले जाऊ लागले. दोघं त्या मशीन जवळ जाताच त्या मशीन ने त्यांची पूर्ण शक्ती खेचून घेतली आणि दोघं तिथेच अडकले. घंटा नादाने त्या मूर्तीच्या शक्ती सुद्धा कमी होत होत्या... नम्रता ने घंटा नाद करता करता तिथेच गुरुजींनी पाठवलेली बाप्पाची मूर्ती प्रस्थापित केली. ही सगळी धावपळ बाकीचे बघत होते पण, त्यांच्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता.

"नम्रता! सैतान येतोय...." दीपा पुन्हा म्हणाली.

सैतान त्या पडीक घरात येण्याआधी त्या मूर्तीचा अंत करणं गरजेचं होतं नाहीतर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरल असतं!

"प्रवीण! या धाग्याने आतून कडी बांध... काही क्षण मिळतील आपल्याला..." नम्रता त्याच्याकडे धागा देत म्हणाली.

त्याने पळत जाऊन दार बांधल आणि सैतान आता दाराबाहेर पोहोचला. नम्रता ने पटकन बाप्पाच्या मूर्तीला नमस्कार केला आणि ती काठी घेऊन मूर्तीच्या दिशेने धावली.... ती त्या मूर्तीवर वार करणार एवढ्यात ती जोरात मागे ढकलली गेली आणि मागच्या भिंतीवर आपटली जाणार तर प्रवीण ने येऊन तिला सावरलं... ती सुद्धा आता फार अशक्त झाली होती... पण, सगळ्यांच्या आश्वासक नजरा बघून तिने पुन्हा तिची शक्ती एकवटून हल्ला करण्याची तयारी केली. यावेळी सुद्धा तसंच काहीतरी झालं... पण, यावेळी तिथे तिला जास्त उष्णता जाणवली.

"मयुर! चंदन उगाळून दे.... लवकर...." ती म्हणाली.

मयुर ने पटकन चंदन उगाळून तिला दिलं आणि लगेच तिने ते काठीला लावलं... बाहेर सैतान दार तोडण्याच्या स्थितीतच होता..

"सैतान आत येईल.... लवकर....." दीपा म्हणाली.

तिच्या आवाजाने सगळे सावध झाले... पॅरा नॉर्मल टीम दाराजवळ गेली... धागा तर दाराला बांधला होता पण सगळे दाराला टेकून उभे राहिले आणि बाकीच्यांनी बाकीच्या घरा भोवती धाग्याचं वलय घातलं. नम्रता मध्ये आता वार करायला जास्त ताकद उरली नाही पाहून प्रवीण ने तिचा हात धरला आणि दोघांनी मिळून मूर्तीवर पहिला वार केला. यावेळी मात्र दोघांच्या शक्तीमुळे पहिला वार तरी बसला.

"नमु! प्रवीण! अजून वार करा... लवकर.." समृध्दी म्हणाली.

"फास्ट.... We can't hold door for more time...." डीन सुद्धा तिथून म्हणाला.

नम्रता आणि प्रवीण ने मिळून अजून तीन, चार वार केले तेव्हा ती मूर्ती भंगली आणि त्यातून तीव्र प्रकाश निघाला. त्या सैतानाने सुद्धा जवळजवळ दार तोडलं होतंच पण मूर्ती तुटल्यामुळे तो सुद्धा गायब झाला. अचानक बेटावर जे वातावरण भयानक वाटत होतं ते नॉर्मल वाटायला लागलं... उभी असलेली दीपा आडवी पडली आणि सूर्याची किरणं आत डोकावून एक प्रसन्नता निर्माण करत होती. नम्रता ने बाप्पाची मूर्ती प्रस्थापित केली होती त्यावरच बरोबर सूर्य किरणं येत होती.

"मिशन successful." शॉन म्हणाला.

सगळेच खूप दमले होते.. नम्रता आणि प्रवीण तर जास्तच! तरीही नम्रता ने पळत जाऊन दीपा ला उचललं....

"दीपा! तुझी इच्छा पूर्ण झाली... पण आम्ही सगळे तुला खूप मिस करू...." नम्रता तिला उराशी कटाळून म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं! दीपा ला मुक्ती मिळाली हे चांगलं झालं पण, तिच्या बरोबर घालवलेले सगळे क्षण तिला आठवून वाईट वाटत होतं.

प्रवीण ने मागून येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. सगळेच आता सावरले...

"या मशीन मध्ये अमन, श्वेता चा सोल कॅच झाला असेल तर आपण त्यांच्याशी communicate करून सोडू... त्या प्रवीण ने purchase केलेल्या डॉल चा सोल पण यात असेल.. आता ते वाईट सोल नाही राहणार..." डीन ते मशीन उचलून म्हणाला.

"ओके... Now let's go..." शॉन म्हणाला.

सगळे त्या बेटा वरून घरी यायला निघाले. नम्रता ने आठवण म्हणून दीपा ज्या बाहुली मध्ये कैद होती ती बाहुली सोबत घेत होती. पण, पॅरा नॉर्मल टीम ने तिला अडवलं आणि तिथे असणाऱ्या सगळ्या बाहुल्या, दीपा आणि त्या मशीन मध्ये फेकलेली बाहुली सगळ्या एक खड्डा करून तिथेच पुरल्या आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. आत्ता पहाटेची वेळ होती म्हणून छान गारवा, हिरवळ आणि एकदम प्रसन्नता तिथे पसरली होती. कोणाचाही विश्वास बसणार नाही इथे असं वाईट काही घडत होतं एवढी छान जागा ती भासत होती. नम्रता, प्रवीण दमले होते म्हणून थोडावेळ तिथे आराम करायचा सगळ्यांनी ठरवलं.

"नम्रता, प्रवीण! हे घ्या पाणी... आणि थोडं खाऊन पण घ्या...." मयुर दोघांच्या हातात पाण्याची बाटली देऊन बॅगेतून खाऊ काढत म्हणाला.

दोघांनी पाणी घेतलं आणि सगळेच खाऊ खाऊ लागले. तिथेच बसून डीन ने त्याच्या लॅपटॉप ला ते मशीन connect करून Faraday cage मध्ये टाकून communicate करण्याचा प्रयत्न करू लागला. त्या केज मधून काहीही रिस्पॉन्स येत नव्हता. सगळ्या टेस्ट करून समजलं त्यात काहीही नाहीये...

"I think त्यांना आयडॉल ब्रेक केल्यावर मुक्ती मिळाली असणार... ते त्यांच्या वाटेने गेले... आपलं काम झालं..." डीन म्हणाला.

"सर! जर असं काही नसेल आणि त्यांनी पुन्हा कोणाला त्रास दिला तर?" नम्रता ने विचारलं.

"नाही... Mostly अश्या केस मध्ये जेव्हा सोल ला गिल्टी फिल होतं तो स्वतः हुन निघून जातो.. अमन, श्वेता ला त्यांनी जे केलं ते wrong आहे हे समजलं असणार...." Meldon ने तिला समजावलं.

"चला म्हणजे पुन्हा चांगल्याचा वाईटावर विजय झाला." मयुर म्हणाला.

एवढ्यात त्या cage मधून काहीतरी सिग्नल आले. त्यात अमन चा आत्मा होता! तो जे काही बोलत होता ते डीन च्या लॅपटॉप वर लिहून येत होतं आणि त्याने लावलेल्या  हेडफोन्स मधून त्याला ऐकू सुद्धा येत होतं.

"आम्ही दोघं युध्दात मारले गेलो होतो.. सख्खे भाऊ, बहिण आम्ही! आयुष्याची खूप स्वप्न रंगवली होती.... सगळं छान होईल या आशेवर जगत होतो... रोज काही ना काही वाईट होत होतं पण, चांगलं होईल आशा होती! खूप वाईट काळ बघितला... जिवंत असताना चांगलं राहून सुद्धा असं मरण आलं म्हणून आम्ही अतृप्त राहिलो आणि नंतर वाईट मार्ग स्वीकारला पण आता आम्हाला त्याचा पश्चातप आहे!"

एवढं बोलून त्यातून आवाज येणं बंद झालं आणि तिथून काहीतरी निघून गेल्या सारखं जाणवलं. त्या बाहुलीचा पण आत्मा अमन, श्वेता बरोबर गेला. सगळ्यांना आपण दुसऱ्या कोणाला होणाऱ्या त्रासातून वाचवलं आणि आपण सुद्धा यातून सुटलो म्हणून आनंद झाला होता.

"Finally आपण यातून सुटलो.." समृध्दी म्हणाली.

"हो! नम्रता, प्रवीण रिअली ग्रेट जॉब! आणि  Thanks सर" मयुर म्हणाला.

"Thats our part of work... तुम्ही सगळ्यांनी खूप छान support केला.. हे मिशन तर नम्रता, प्रवीण ने कंप्लीट केलं... असं करेज सगळ्यांकडे नसतं..." शॉन म्हणाला.

दोघांनी फक्त एकमेकांकडे बघितलं आणि डोळ्यांनीच एकमेकांच कौतुक केलं...

"स्पेशली दीपा, हरीश काका आणि गुरुजी! त्यांच्यामुळे आज आपण सुखरूप आहोत.. आपल्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही." प्रवीण म्हणाला.

"हो! आपण घरी गेल्यावर आधी देवळात जाऊ.. आणि मी घरी कळवते आपण निघालो आहोत.. म्हणजे सगळ्यांना किनारी बोलवून घेऊ.. हरीश काकांचे आभार मानून जाऊया.." नम्रता म्हणाली. लगेचच तिने फोन करून किनारी यायला सांगितलं.

सगळे छान बेटावर फिरून समुद्र किनारी आले. हरीश काकांनी त्यांच्यासाठी बोट तिथेच ठेवली होती. पालकांना बघून लगेच सगळी मुलं त्यांना  बिलगली आणि जे काही घडलं ते सगळं सांगितलं. त्यांच्या बोलण्यातून किती मोठ्या संकटातून सगळे बाहेर आले हे ऐकुन पालकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते...

"आता आम्ही सगळे आहोत ना सुखरूप.. नका काळजी करू... चला हरीश काकांना thanks म्हणायचं आहे म्हणून तुम्हाला इथे बोलावलं आहे." नम्रता म्हणाली.

आधी मुलं हरीश काकांच्या घरी येऊन गेल्याने त्यांना घर माहीत होतं... सगळे मुलांच्या मागे चालत होते...

"अरे! इथेच तर होतं हरीश काकांचं घर..." मयुर आजू बाजूला बघत गोंधळून म्हणाला.

तिथे कोणतंही घर नव्हतं! फक्त मोठच्या मोठं जास्वंदाचं झाड होतं. आजू बाजूला असलेली घरं सुद्धा तिथे दिसत नव्हती.

"अरे... विसरला असाल तुम्ही..  थांबा आपण कोणालातरी विचारू..." त्याचे बाबा म्हणाले.

बाजूने एक माणूस जात होता त्याला याबद्दल त्यांनी विचारलं.

"नाही... इथं हरीश म्हणून कुणी राहत नाही.. इथं फक्त हे झाडच आहे... आणि या वस्तीत सुद्धा असं कोणी नाही..." त्याने सांगितलं आणि तो निघून गेला.

"हे कसं शक्य आहे?" समृध्दी गोंधळून म्हणाली.

सगळ्यांनी अजून चौकशी केली पण काहीही हाती लागलं नाही म्हणून सगळे गुरुजींना याबद्दल विचारू असं ठरवून देवळात आले. देवळात जोशी गुरुजी नव्हतेच! दुसरेच गुरुजी होते.

"गुरुजी! आम्हाला जोशी गुरुजींना भेटायचं आहे... कुठे आहेत ते?" नम्रता च्या आईने विचारलं.

"ते दोन महिने झाले गावाला गेले आहेत... पुढच्या महिन्यात येतील..." ते म्हणाले.

आता सगळ्यांना अजूनच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून गुरुजींनी याबद्दल विचारलं. प्रवीण च्या बाबांनी जे काही घडलं ते त्यांना सांगितलं.

"ही त्या बाप्पाची कृपा! त्यानेच तुमची प्रत्यक्ष मदत केली आहे..." ते म्हणाले.

त्यांच्या या वाक्याने सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते, अंगावर काटा उभा राहिला होता आणि आपोआप हात जोडले गेले होते.

समाप्त.

🎭 Series Post

View all