एक बेट मंतरलेलं (भाग -४०) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror dalls island story. Horror Marathi kadambari. Ira blogging horror stories. Ira blogging free stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -४०) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
आता अचानक यावेळी कोण आलं या विचारातच प्रवीण च्या आईने दार उघडलं. समोर कोणीही नव्हतं! 

"काय ग? कोण आहे?" त्याच्या बाबांनी विचारलं. 

"कोणीच नाही.... पण...." त्याची आई बोलत होती. 

एवढ्यात त्याचे बाबाच दारापाशी आले तर त्यांच्या दारात एक बॉक्स होतं. 

"हे कोणी ठेवलं असेल?" त्यांनी गोंधळून विचारलं. 

या बॉक्स ला हात लावावा की नाही याच विचारत ते दोघं तिथे उभे होते! काहीतरी नक्कीच गंभीर आहे म्हणून सगळेच तिथे गेले. Meldon ने ते बॉक्स उचललं. त्यावर गुरुजींचं नाव लिहिलेलं होतं. 

"जोशी गुरुजी! त्यांनी असं बॉक्स का बरं पाठवलं असेल?" प्रवीण ची आई ते नाव वाचून म्हणाली. 

"Open it..." शॉन म्हणाला. 

सगळे ते बॉक्स घेऊन आत आले आणि प्रवीण च्या बाबांनी ते बॉक्स उघडलं. त्यात लहान बाप्पाची मूर्ती, एक स्तोत्रांचं पुस्तक, काठी  आणि चिठ्ठी होती. प्रवीण च्या बाबांनी चिठ्ठी घेऊन वाचायला सुरुवात केली; 

"नमस्कार! मी स्वतः तुम्हाला भेटायला न येता हे असं बॉक्स पाठवलं म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल... पण, मला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं म्हणून मी येऊ शकलो नाही. दीपा ला मुक्ती मिळण्यासाठी तिने आता नक्कीच काहीतरी मार्ग सांगितला असेल आणि कदाचित तुम्हा सगळ्यांना पुन्हा बेटावर जावं लागेल म्हणून हे पाठवत आहे... बेटावर जाताना हे अवश्य घेऊन जा... यातली प्रत्येक गोष्ट तुमच्या उपयोगी पडेल." 

"देवच पावला! आता काळजी जरा कमी वाटतेय..." समृध्दी ची आई म्हणाली. 

सगळ्यांनी मिळून investigator टीम ला सुद्धा याबद्दल सांगितलं आणि त्या सर्व वस्तू पुन्हा त्याच बॉक्स मध्ये ठेवल्या. 

"Today itself we are going to that island... Now it's 11 o'clock! Within one hour again we will meet near गार्डन! जे काही तिथे घेऊन जायचं असेल पॅकिंग करून या..." शॉन म्हणाला. 

"यावेळी फक्त तुम्ही नाही जायचं... आम्ही सगळे पण येणार..." समृध्दी ची आई म्हणाली. 

"डोन्ट वरी... कोणाला काही नाही होणार... We have less time... आता मुलं एकटी नाहीत.. आम्ही आहोत.... त्यांना काही नाही होऊ देणार... ट्रस्ट us..." शॉन म्हणाला. 

"हो आई! नको काळजी करुस.... गुरुजींनी पण हे सगळं पाठवलं आहे ना... आम्ही घेऊ आता काळजी..." समृध्दी म्हणाली. 

पालकांच्या मनात त्या बेटावर मुलं जाणार म्हणून जरा विवंचना होतीच! पण, टीम ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत होती आणि मुलं पण सगळं धीराने घेत होती त्यामुळे पालक त्यांना जाऊ द्यायला तयार झाले! आता तासाभरात निघायचं म्हणजे सगळी व्यवस्थित तयारी करायला हवी म्हणून सगळेच आपापल्या घरी गेले. Investigator टीम सुद्धा काहीतरी ठरवून त्यांची तयारी करायला गेले. पाण्याच्या बाटल्या, खाऊ आणि बेसिक सामान पॅक करण्यात कधी तास होऊन गेला हे समजलं सुद्धा नाही. 

"दीपा! तुला मुक्ती मिळण्याची वेळ जवळ आली आहे.... आपण पुन्हा बेटावर जातोय..." नम्रता ने दीपा ला हातात घेतलं आणि ती तिच्याशी बोलली. 

"नमु! चल... सगळे आले असतील..." तिची आई म्हणाली. 

तिने मानेने होकार दिला आणि बाप्पाला नमस्कार करून आई बाबांना सुद्धा नमस्कार केला आणि सगळे निघाले. सगळे ठरलेल्या ठिकाणी जमा झाले... अजून investigator टीम यायची होती. 

"मुलांनो! Investigators च सगळं ऐका... घाबरु नका आणि काळजी घ्या...." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

"हो! आम्ही सगळे काळजी घेऊ... तुम्ही कोणीच टेंशन घेऊ नका.... तुम्ही सगळे असं टेंशन घेऊन बसलात तर आमचा पाय इथून निघणार नाही..." प्रवीण म्हणाला. 

"ते बघा... Investigators ची टीम आली." समृध्दी म्हणाली. 

यावेळी येताना टीम ने बरंच सामान सोबत आणलं होतं! 

"All set? काही राहिलं नाही ना?" डीन ने मुलांना विचारलं. 

"नाही... सगळं बेसिक सामान घेतलं आहे, दीपा ला घेतलं आहे, गुरुजींनी पाठवलेलं बॉक्स पण घेतलं आहे." नम्रता म्हणाली. 

"ओके then... Let's go..." शॉन म्हणाला. 

सगळ्या मुलांनी पालकांना बाय केला.. गेल्या वेळी उत्साहात गेलेली मुलं आज खूप मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी चालली होती म्हणून सगळ्यांच्याच काळजाचं पाणी होत होतं! पण, दुसरा काही मार्ग सुद्धा नव्हता... मुलं पार नजरेआड होईपर्यंत त्यांना बघत होते. 

"चला आता आपण देवळात जाऊन बसुया... मुलांना मानसिक बळ मिळावं म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू..." नम्रता ची आई म्हणाली. 

सगळेच सहमती दर्शवून देवळात गेले. 
**************************
इथे मुलं थोड्याच वेळात समुद्र किनारी पोहोचले होते. आता त्यांना बेटा पर्यंत जाण्यासाठी एका बोटीची आवश्यकता होती. भाड्याने बोट मिळतेय का हे Meldon आणि Raymond बघत होते. तर शॉन आणि डीन ला मुलं exact कोणत्या जागेवर काय काय घडलं हे सांगत होते.... एवढ्यात तिथून हरीश आला.

"काय मुलांनो? पुन्हा इथं? समदं ठीक ना?" त्याने विचारलं. 

"हो काका! दीपा ला मुक्ती द्यायची आहे तर पुन्हा त्या बेटावर जावं लागेल... म्हणून आलो आहोत." मयुर म्हणाला. 

"असं व्हय! आर पर पोरांनो आता पौर्णिमा येईल... अश्या वेळी वाईट शक्ती जरा जास्त असतात..." तो म्हणाला. 

"हो काका! पण, यावेळी आम्ही एकटे नाही... ही पॅरा नॉर्मल investigators म्हणजे जे चांगल्या आत्म्यांना वाईट आत्म्यांपासून सोडवतात ते! ही टीम आहे आमच्या बरोबर.... शिवाय बाप्पाचा आशीर्वाद पण आहे... आम्ही सगळे काळजी घेऊ..." नम्रता म्हणाली. 

"बरं बरं... पण, नीट जा अन् नीट या... जे काय करायचं असल ते आज उद्या मंदी करा! परवाच्याला लय तरास होईल..." हरीश म्हणाला. 

"Don't worry! आम्ही full plan केला आहे.. उद्या आम्ही तिथून निघू..." शॉन म्हणाला. 

"मग ठीक हाय... बरं! नम्रता हे ठेव.... तिथं कामी येईल..." हरीश तिच्या हातात कागदात बांधलेलं एक पुडकं देत म्हणाला. 

"ओके! थँक्यू काका!" नम्रता ते तिच्या बॅगेत ठेवत म्हणाली. 

"तुम्ही समदे तिथं जाणार कसं हाय?" हरीश ने विचारलं. 

"आम्ही तेच भाड्याने बोट मिळतेय का शोधतोय..." प्रवीण म्हणाला. 

"मग माझी बोट हाय की! चला मी बी येतो तुमच्या संग.... जोवर तुमचं तिथलं काम व्हत नाय मी तिथंच थांबेन.." हरीश म्हणाला आणि त्यांचं काहीही न ऐकता बोटीपाशी जाऊ लागला. 

सगळे त्याच्या मागून गेले. त्याने मोठी मोटार बोट काढली आणि त्यात चढला... शॉन ने Meldon आणि Raymond ला सुद्धा बोलवून घेतलं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. 

"काका! तुम्ही आम्हाला सोडून पुन्हा माघारी या.. तिथे किती धोका असेल... उगाच तुमच्या जीवाला काही..." प्रवीण म्हणाला. 

"आर पोरा! कशापायी काळजी करतोस... म्या तिथं बाहेर थांबून राहीन..." हरीश म्हणाला. 

"नको... तुम्ही माघारी या.... तिथे नको प्लीज.." नम्रता म्हणाली. 

"मग तुम्हाला पुन्हा येताना बोट कुठली?" हरीश ने विचारलं. 

"एखादी दिसली तर ठीक.. नाहीतर राफ्ट बनवून येऊ..." मयुर म्हणाला. 

"नको... मी माझी बोट तिथंच ठेवतो.. एखादी दिसली दुसरी बोट तर येईन माघारी.. नाहीतर थांबतो तिथंच.... आता बाप्पाच्या मनात जे असल ते होईल..." हरीश म्हणाला. 

त्यांनतर थोडा वेळ जरा शांततेत गेला. सगळं वातावरण गंभीर झालं होतं. पहिल्यांदा सगळ्यांना एवढं दडपण वाटत होतं! एरवी नेहमी मस्ती करणारा मयुर सुद्धा एकदम सिरियस चेहरा करून बसला होता... काहीही झालं तरी सगळ्यांना जरा विषयापासून दूर नेलं पाहिजे असं नम्रता ला वाटत होतं! 

"शॉन सर! मला एक विचारायचं होतं... विचारू का?" नम्रता म्हणाली. 

"येस..." तो म्हणाला. 

"तुम्ही एवढे फॉरेनर आहात तरी व्यवस्थित मराठी उच्चार कसे जमतात तुम्हाला?" तिने विचारलं. 

"आमचं कामच तसं आहे... मराठी अशी लँग्वेज आहे जिथे pronounces चुकले तर meaning चेंज होतो.... so...." त्याने सांगितलं. 

"अच्छा... तुमच्या या कामात खूप अनुभव आले असतील ना... दरवेळी आत्मा वाईट असेलच असं नाही ना! मग त्यावेळी काय केलं आहे तुम्ही?" तिने विचारलं. 

शॉन आणि बाकी टीम सुद्धा आता या गप्पा मारण्यामुळे या बच्चे कंपनी सोबत छान मिक्स अप झाले होते.... सगळे गप्पा मारता मारता त्यांचे अनुभव मुलांना सांगत होते.... नम्रता ने सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे जाऊन सकारात्मक विचार मनात यावे म्हणून ही शक्कल लढवली होती ती सार्थकी लागली होती आणि म्हणूनच प्रवीण खूप कुतूहलाने तिच्याकडे एकटक बघत होता.... सगळे हसत होते, गप्पा मारत होते पण याचं लक्ष मात्र फक्त नम्रता कडे होतं! तिचं हसणं, काही सिरियस विषय निघालाच तर चातुर्याने पुन्हा तो बदलणं हे सगळं तो कौतुकाने बघत होता... थोड्या वेळात हे नम्रता च्या लक्षात आलं आणि त्यामुळे ती थोडी लाजली... हे समृध्दी, मयुर ने सुद्धा बघितलं आणि त्यांची इशाऱ्या इशाऱ्या मध्ये तर टोमणे मारत मारत चिडवा चिडवी सुद्धा सुरू झाली... मगाच पासून जे भकास वातावरण वाटत होतं ते अगदी प्रसन्न झालं होतं.... सगळे कधी बेटावर पोहोचले हे त्यांना सुद्धा लक्षात आलं नाही. 

"यशस्वी व्हा.. काळजी घ्या पोरांनो..." हरीश सगळ्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. 

"थँक्यू काका! तुम्ही नक्की माघारी जा... इथे आम्हाला किती वेळ लागेल आणि काय पुढे मांडून ठेवलेलं असेल काहीच माहीत नाहीये..." नम्रता म्हणाली. 

"हो ग पोरी! नग काळजी करुस..." हरीश म्हणाला. 

सगळे आत जाऊ लागले... यावेळी मात्र कोणाच्याच मनात भीती नव्हती. सगळी मुलं मिळून तिथे बेटावर जेव्हा ते पहिल्यांदा आले होते तेव्हा कुठून गेले, काय काय बघितलं होतं आणि कोणत्या जागी अस्वस्थ वाटतं हे सगळं टीम ला सांगत होते. बेटावर उतरल्या उतरल्या टीम ने त्यांच्याकडे असणारे डिव्हाईस काढले होते... अजून तरी त्यांना काहीही रीडिंग मिळाले नव्हते. 

"सर! आता इथून पुढे आपला कोणीतरी पाठलाग करतंय असं वाटायला सुरुवात होईल..." नम्रता साधारण दहा मिनिटं चालून झाल्यावर म्हणाली. 

तिला अजूनही तिथला प्रत्येक मिनिट, सेकंद एकदम पक्का लक्षात होता... सुरुवातीला तिलाच हे सगळं जाणवत होतं म्हणून तिचंच याकडे लक्ष होतं. तिने सांगितल्या प्रमाणे खरंच थोडं पुढे गेल्यावर सगळ्यांनाच अस्वस्थ वाटू लागलं आणि टीम कडे असलेले k2 मीटर सुद्धा रीडिंग देऊ लागले होते... 

"आता आपण अलर्ट झालं पाहिजे! आपलं मिशन चालू होतंय..." शॉन म्हणाला. 

सगळे एकमेकांचा हात धरून सगळीकडे बघत बघत चालत होते.... आता थोडं पुढे गेलं की सर्वत्र बाहुल्या दिसणार होत्या!

"आता इथून थोडं चाललं की सगळी कडे बाहुल्या दिसतील... तिथे सगळ्या बाहुल्या माणसांसारख्या चालतात, बोलतात... तिथे गेल्यावर दीपा सुद्धा बोलू लागली तर आपलं काम सुद्धा अजून सोपं होईल.." समृध्दी म्हणाली. 

सगळे आता नक्कीच दीपा बोलू लागली तर बरं होईल, तिची आपल्याला मदत होईल या विचारात पुढे चालले होते. मध्ये मध्ये नम्रता दीपा सोबत सुद्धा बोलत होती. पुढचे काही तास सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे होते. 

क्रमशः.....
***************************
आता तिथे नक्की काय घडेल? दीपा बाहुल्यांच्या प्रांतात पोहोचल्यावर आधी सारखी बोलू शकेल का? हरीश ने नम्रता कडे काय दिलं असेल? रक्त पिशाच्च आणि सैतानाला हे कळेल तेव्हा काय होईल? पौर्णिमेच्या आधी सगळे पुन्हा येऊ शकतील का? अमन, श्वेता ला तांत्रिक बाबा ने जे सांगितलं आहे त्याचा काय परिणाम झाला असेल? पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all