एक बेट मंतरलेलं (भाग -३७) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends. Horror dalls island story.

एक बेट मंतरलेलं (भाग -३७) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
आता बरीच माहिती सुद्धा टीम कडे गोळा झाली होती. सगळे आता फक्त डीन आणि शॉन परत कधी येतायत याची वाट बघत होते. थोड्यावेळात ते दोघं आले. 

"We bring all material..." डीन ने आल्या आल्या सांगितलं. 

लगेचच सगळे कामाला लागले. त्यांची टीम मिळून काहीतरी डिव्हाईस बनवण्यात व्यस्त होती. नम्रता मात्र बाप्पाच नामस्मरण करत दीपा ला घेऊन टीम काय करतेय हे बघत होती. थोड्याच वेळात त्यांनी काही तारा, बॅटरी, ट्रिगर आणि एक बॉक्स वापरून चौकोनी तीन बाजूने ओपन असलेलं एक मशीन बनवलं. ते नीट काम करतंय ना हे चेक करण्यासाठी त्यांनी तारा छेडून बघितल्या होत्या! त्यातून थोडे स्पार्क निघाले आणि ते बघून नम्रता ला कसंतरी झालं. 

"Plz... दीपा ला यामुळे काही त्रास होणार असेल तर दुसरं मशीन बनवा ना.." ती म्हणाली. 

"डोन्ट वरी... याने hurt होणार नाही... Because आपण तिला आपल्या हाताने आत ठेवणार... तिला या बॅटरी मधून energy supply होईल... So, she will be able to communicate with us." डीन ने नीट समजावून सांगितलं. 

"ओके... पण, plz दीपा ला काही त्रास होणार नाही हे बघा..." नम्रता पुन्हा म्हणाली. 

"येस येस... डोन्ट वरी.." शॉन म्हणाला. 

ते सगळे पुन्हा एकदा चेकिंग आणि राहिलेलं काम करू लागले. दीपा ला शक्ती मिळून ती बोललेलं डी कोड करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कडे असलेले communicators सुद्धा त्याला जोडले! त्या मशीन ला बाहेरून K 2 मीटर आणि थर्मामीटर जोडले होते तर दीपा च्या डोक्याला जो भाग जोडणार होते त्याला communicator जोडला होता. बारीक बारीक हालचाली टिपण्यासाठी थर्मल कॅमेरा होताच! सगळं सेटअप झालं तशी त्यांनी आपापसात चर्चा केली. 

"नम्रता! दीपा ला त्या बॉक्स मध्ये ठेव.." शॉन ने सांगितलं. 

नम्रता ने दीपा ला त्या बॉक्स च्या मधोमध ठेवलं आणि ती पुन्हा तिच्या जागेवर जाऊन उभी राहिली. सगळ्यांसाठीच हे नवीन होतं! दीपा ला काही त्रास होणार नाही ना याची काळजी त्यांना वाटत होतीच! पण, आता दीपा बोलेल आणि तिला मुक्ती मिळेल म्हणून सगळे सुखावले सुद्धा होते. नम्रता ने दीपा ला तिथे ठेवल्या बरोबर डीन ने मशीन च स्वीच ऑन केलं. त्याला जोडलेला K 2 मीटर लगेच रीडिंग द्यायला लागला. दीपा च्या डोक्याला जे मशीन लावलं होतं ते तिला शक्ती देऊ लागलं आणि Meldon लॅपटॉप समोर बसला होता त्याला काहीतरी जाणवू लागलं. 

"प्लॅन is working!" त्याने उत्साहात सांगितलं. 

लगेचच टीम ने त्यांचं काम सुरू केलं. 

"दीपा! सांग... तू या डॉल मध्ये कशी अडकली?" शॉन ने बोलायला सुरुवात केली. 

तिला आता शक्ती मिळत होती पण ती कमी पडत होती! ती काहीतरी बोलली पण स्पष्ट ऐकू आलं नाही... एकदम हळू आवाज आला होता.  सगळं रेकॉर्डिंग सुरू होतंच! 

"She is telling something.... Meldon enhance audio..." शॉन ने त्याला सांगितलं. 

त्याला जसा दीपा चा आवाज आला होता तसाच बाकीच्यांना पण काहीतरी वेगळा आवाज आल्यासारखं वाटलं होतं. Meldon ने लगेच रेकॉर्डर मधून व्हॉईस घेऊन त्याचा आवाज थोडा क्लिअर करून मोठा करायचा प्रयत्न केला. त्यांच्या टीम ने कानाला हेडफोन्स लावले आणि ते ऐकू लागले. 

"रक्त पिशाच्च!" दीपा म्हणाली होती. 

आता मात्र टीम ने पूर्ण स्पष्टपणे हे ऐकलं होतं आणि शॉन ने पुढच्या सेशन ला सुरुवात केली. 

"दीपा! रक्त पिशाच्च? त्याने तुला डॉल मध्ये टाकलं का?" शॉन ने पुढे विचारलं. 

"हो..." ती म्हणाली. 

"आम्ही तुझी काय हेल्प करू? तुला आझाद कसं करू?" डीन ने विचारलं. 

"बेट..." ती म्हणाली. 

"त्या island वरती तुला आझाद करता येणार का?" Raymond ने विचारलं. 

"नाही.." ती म्हणाली. 

"Then? आम्ही काय करू?" शॉन ने विचारलं. 

यावेळी मात्र दीपा काहीही बोलली नाही... एवढा वेळ ती व्यवस्थित सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती आणि बोलत होती पण अचानक असं काय झालं म्हणून ती गप्प बसली हे टीम ला कळेना! त्यांनी पुन्हा काहीतरी आपापसात चर्चा केली आणि त्यांच्या बॅगेतून अजून काहीतरी एक मशीन काढलं. 

"ओके दीपा! Just या मशिन्स ना touch करून तू answer दे..." शॉन म्हणाला. 

त्या बरोबर लगेचच त्याच्या उजव्या हातात जे मशीन होतं ते वाजायला लागलं. 

"Good! आता तुझं answer हो असेल तर माझ्या right hand मधलं मशीन ला टच करायचं.. नो असेल तर लेफ्ट hand..." शॉन ने सांगितलं. 

काहीही reaction आली नाही म्हणून त्यांनी लगेच दीपा चा आत्मा दुसरीकडे गेला नाही ना किंवा तिथे अजून कोणता आत्मा आला नाही ना हे पडताळून पाहिलं आणि पुढच्या कामाला सुरुवात केली. 

"दीपा! आत्ता इथे तुला कोण आमच्याशी communicate करून देत नाहीये का? कोणती शक्ती आहे का जी तुला स्टॉप करतेय?" शॉन ने विचारलं. 

त्याच्या या प्रश्नाने थोडावेळ तरी काहीच हालचाली झाल्या नाहीत पण दोन मिनिटातच त्याच्या उजव्या हातातलं मशीन वाजू लागलं. 

"Ohh... Means दीपा ला रक्त पिशाच्च communicate करून देत नाहीये?" डीन म्हणाला. 

"I also think that... Let's hope Deepa will talk with us about that.." शॉन म्हणाला. 

"ओके दीपा! जर तुला कोणी hurt करत असेल तर हे मशीन चालू कर..." शॉन ने पुढे सांगितलं. 

यावेळी मात्र तिने डाव्या हातातलं मशीन टच केलं.. बहुदा जी कोणती शक्ती तिला अडवत होती तिने दीपा चा काबू सोडला आहे असं त्यांना वाटलं. 

"ओके.. means आता तू communicate करू शकते..." शॉन ने विचारलं. 

"हो..." ती म्हणाली. 

यावेळी तिचा आवाज सुद्धा जरा मोठा होता. बाकीच्यांनी सुद्धा हा आवाज ऐकला आणि नम्रता ला तो आवाज ऐकुन राहवलं नाही. 

"दीपा! दीपा.... सांग तुला आम्ही मुक्ती कशी देऊ? तू कशी अडकलीस यात?" तिने विचारलं. 

"मूर्ती... बेट..." दीपा अडखळत एवढंच म्हणाली. 

नम्रता ने अंदाज बांधला आणि तिला काय म्हणायचं आहे याचा विचार करून ती म्हणाली; "म्हणजे बेटावर कोणती मूर्ती आहे का? त्या मुर्तीमुळे तू कैद झालीस?" 

"हो.." दीपा म्हणाली. 

"ओके... Means we have to investigate that island? आम्ही ते island चेक करायचं का?" Raymond ने विचारलं. 

"सैतान... रक्त पिशाच्च..." दीपा पुन्हा म्हणाली. 

"दीपा! तुला असं म्हणायचं आहे का, की तिथे सैतान आणि रक्त पिशाच्च राज्य करतात.. त्यांनी सगळ्यांना कैद केलं आहे?" प्रवीण ने काहीतरी विचार केला आणि तिला याबद्दल विचारलं. 

"हो..." ती म्हणाली. 

"ओके... आम्ही investigate करू... तिथे ज्या डॉल आहेत त्या सर्व तशाच आल्या आहेत का?" डीन ने विचारलं. 

"हो..." दीपा म्हणाली. 

तिचं एवढं बोलणं झालं आणि इतका वेळ सरळ ठेवलेली ती बाहुली अचानक खाली आडवी पडली. तिच्या डोक्याला जे मशीन लावलं होतं ते सुद्धा निघालं! 

"Ohh god! Deepa lose her all energy.." शॉन म्हणाला. 

ते ऐकून नम्रता ला एकदम कसंतरी झालं आणि तिने दीपा ला स्वतः जवळ घेऊन घट्ट मिठीत घेतलं. 

"डोन्ट वरी नम्रता! I guess आपण island वर जी bad energy आहे ती कॅच करू तेव्हा दीपा फ्री होईल..." Meldon ने तिला समजावलं. 

त्याच्या या वाक्याने तिथे ठेवलेल्या थर्मामीटर मध्ये तापमानाची घट होताना दिसली आणि दीपा ने जणू त्यांना क्लू दिला की, हो हेच करायचं आहे! 

"ओके... दीपा तू आराम कर... आता आम्हाला समजलं आहे काय करायचं... तू तुझी पूर्ण शक्ती पणाला लावून सगळं सांगितलं आहेस तर नक्कीच आम्ही ते वाया जाऊ देणार नाही.." नम्रता म्हणाली. 

तिने लगेचच दीपा ला स्वतःच्या रूम मध्ये नेऊन ठेवलं. एव्हाना या सगळ्या सेशन मध्ये संध्याकाळ चे पाच वाजून गेले होते. एवढं सेशन करून सगळेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दमले होते. 

"तुम्ही सगळे बसा... मी मस्त कॉफी आणते.." नम्रता ची आई म्हणाली. 

टीम ने त्यांची आवराआवरी करायला घेतली आणि आत्ता पर्यंत जी माहिती मिळाली आहे त्याबद्दल बोलत पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग करत ते बसले. तोवर नम्रता ची आई सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आली. कडक कॉफी आणि बिस्कीट खाऊन जरा सगळ्यांना तरतरी आली. 

"Thank you so much.. really coffee break ची गरज होती..." डीन म्हणाला. 

"त्यात थँक्यू काय? तुम्ही एवढं आमच्या साठी करताय तर तुमच्या टीम ची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे..." नम्रता ची आई म्हणाली. 

"ते आमचं daily work आहे.. ओके... Let's go... Now pravin's home" शॉन म्हणाला. 

"ओके सर! पण, आता संध्याकाळ होऊन गेली आहे... तुम्ही दमला असाल तर आपण उद्या करू सेशन चालेल..." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

"नो! नो! आत्ता तुमच्या होम मध्ये जी डॉल आहे तिच्या कडे जास्त पॉवर असेल.. so, communicate करायला इझी होईल.." डीन म्हणाला. 

"ठीक आहे! चला मग..." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

सगळ्यांची स्वारी आता प्रवीण च्या घराकडे वळली. थोड्याच वेळात सगळे त्याच्या दारापाशी पोहोचले. 

"इथे आल्यावर uneasy feeling होतंय.." Meldon म्हणाला. 

"Ya! Hope we get something information... But be careful...." शॉन म्हणाला. 

प्रवीण च्या बाबांनी दार उघडलं! सगळे आत गेले. ती बाहुली गुरुजींनी तिथल्या शो केस वर बंधनात ठेवली होती तरी सुद्धा घरात पाऊल ठेवल्यावर तिचं अस्तित्व जाणवत होतं! 

"This doll has too much energy..." Dean म्हणाला. 

"Let's pray first..." शॉन म्हणाला. 

त्यांनी लगेचच त्यांच्या बॅग तिथे ठेवल्या आणि गोल करून उभे राहिले. 

"डीन आजची प्रेयर तू घे.." शॉन ने त्याला सांगितलं.

"हे प्रभू! आम्हाला ताकद द्या.. आम्हाला माहितेय तुम्ही आमच्या सोबत आहेत. वाईट सोल पासून आम्हाला protect करा. सगळ्या सोल ना शांती मिळू दे हीच आमची प्रेयर आहे." डीन ने प्रार्थना केली.  

नम्रता सुद्धा बाप्पा कडे प्रार्थना करत होती; "बाप्पा! तू कायम सोबत आहेस याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे... गुरुजींनी या बाहुली ला बंधनात ठेवले आहे त्यामुळे टीम च काम सोपं व्हायला मदत होईल... तू सुद्धा आहेसच! बाप्पा! कोणालाही काही इजा होऊ देऊ नकोस.. सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे..." हात जोडून ती मनात म्हणत होती. 

तिच्या चेहऱ्यावर या investigation मध्ये काही वाईट होणार नाही ना विशेषतः प्रवीण ला काही त्रास होणार नाही ना याची काळजी दिसत होती. डोळ्याच्या कोपऱ्यातून ती प्रवीण ठीक आहे ना हे सतत बघत होती. प्रवीण ने हे बघितलं होतं आणि डोळ्यांनीच तिला "रिलॅक्स! काही नाही होणार" म्हणून खूण केली. 

"ओके.. let's start the work.." शॉन म्हणाला. 

त्याच्या बोलण्याने दोघं भानावर आले आणि आजूबाजूला आपल्याला कोणी बघितलं नाही ना हे बघून पुन्हा नीट उभे राहिले. 

क्रमशः..... 
*************************
नम्रता च्या घरी टीम ने तपासणी केली तेव्हा दीपा कडून बरीच माहिती समोर आली आहे. तिला वाईट शक्ती अडवत होत्या तरी सुद्धा तिने तिच्या परीने सगळ्यांना क्लू दिले आहेत... तिच्या म्हणण्या नुसार मूर्ती आणि सैतान हे बेटावर आहेत! मग आता या सगळ्यांना पुन्हा बेटावर जावं लागेल की, प्रवीण च्या घरी जी बाहुली आहे तिचा अंत केला तरी सगळं ठीक होईल? प्रवीण च्या घरी सगळे आले आहेत पण, तिथे वाईट शक्ती खूप आहेत तर टीम त्यांचं काम नीट करू शकेल का? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all