एक बेट मंतरलेलं (भाग -३५) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Horror dalls island story. Ira blogging horror stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -३५) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
मयुर च्या बाबांनी पॅरा नॉर्मल investigators ना बसायला सांगितलं. त्याच्या आईने लगेच त्यांना कॉफी आणि स्नॅक्स आणून दिले. ते सगळे दिल्ली वरून आले आहेत तर आधी त्यांना थोडी विश्रांती घ्यायला सांगून मग आपण विषयाला हात घालू असं त्याच्या बाबांनी ठरवलं. त्यांचा नाश्ता झाला आणि त्यांनीच बोलायला सुरुवात केली. 

"हॅलो! I'm shawn! The founder of ghost hunting &co." शॉन ने हात पुढे करून त्याची ओळख करून दिली. 

मयुर च्या बाबांनी सुद्धा त्यांना हस्तांदोलन केले. ते काही बोलणार तर शॉन च बोलू लागला; "you are Mr. Inamdar right? Senior marketing executive of Jacky joy co." 

"Yes..." ते म्हणाले. 

"आमची whole team नक्की तुमची हेल्प करणार. Just told us the case." शॉन म्हणाला. 

"तुम्हाला मराठी येतं?" नम्रता चे बाबा आश्चर्याने म्हणाले. 

"Yes.. आम्ही बरेच देश फिरत असतो.. so, थोड्या थोड्या भाषा जमतात." शॉन म्हणाला. 

"बरं! मी ओळख करून देतो." मयुर चे बाबा म्हणाले आणि त्यांनी सगळ्यांची ओळख करून दिली. 

"Nice to meet you all! By the way this is our team. He is Dean! The engineer of our team! He is Raymond! Historian.. and he is Meldon the co-founder." शॉन ने त्याच्या सगळ्या टीम ची ओळख करून दिली. 

सगळ्यांनी त्यांना अभिवादन केलं आणि थोडा वेळ शांततेत गेला. 

"मला शॉर्ट मध्ये केस माहितेय.. but now tell us all things that you feel suspicious." Meldon म्हणाला. 

"मी सांगते!" समृध्दी म्हणाली आणि ती बोलू लागली; "आम्ही सगळ्यांनी सुट्टीत कुठेतरी वेगळ्या ठिकाणी फिरायला जायचं असं ठरवलं. त्या नुसार आम्ही समुद्रात एका बेटावर गेलो. म्हणजे आम्ही इंटरनेट वर बघितलं होतं तिथे पॅरा नॉर्मल activity होत असतात पण यावर आमचा कोणाचाच विश्वास नव्हता. घरून आधी नकार होता तिथे जायला. पण, आम्ही सगळे आमच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो तेव्हा अमन दादा आणि श्वेता ताई आली. त्या दोघांनी मिळूनच आमच्या घरच्यांना permission द्यायला भाग पाडलं. पण, बेटावर आम्ही पोहोचलो तेव्हा समजलं अमन दादा आणि श्वेता ताई हे माणूस नाहीत तर पिशाच्च आहेत! त्या बेटावर सगळीकडे बाहुल्या आहेत त्यांच्यात सुद्धा आत्मे आहेत. तिथल्या बाहुल्या अमन, श्वेता च्या गुलाम आहेत. त्यातलीच एक बाहुली प्रवीण च्या घरी आहे... तर एक बाहुली नम्रता च्या घरी! नम्रता च्या घरी जी बाहुली आहे तिने आमची खूप मदत केली आहे... त्या बदल्यात आम्हाला तिला मुक्ती मिळवून द्यायची आहे... आम्ही सगळ्यांनी मिळून तिचं दीपा नाव ठेवलं आहे... तर प्रवीण च्या घरी जी बाहुली आहे तिने आम्हाला त्रास दिला आहे. त्या बाहुली मुळे मयुर ला सगळ्यात आधी त्रास झाला होता नंतर प्रवीण ला झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती बाहुली प्रवीण ने नम्रता साठी आणली होती. तिला गिफ्ट दिली होती ती." समृध्दी ने सगळं थोडक्यात पण सविस्तर सांगितलं. 

"Ohh.. प्रवीण! तू कोणत्या shop मधून ती doll purchase केली होती?" Raymond ने विचारलं. 

"No.. मी ऑनलाईन साईट वरून मागवली होती." प्रवीण म्हणाला. 

"Show the site..." Dean म्हणाला. 

प्रवीण ने लगेच त्याचा मोबाईल काढला आणि ज्या साईट वरून त्याने बाहुली खरेदी केली होती ती साईट ओपन करून डीन ला दिली. त्याने सगळी साईट चेक केली. त्या साईट वर फक्त बाहुल्या विकण्यासाठी ठेवल्या होत्या. तो सगळे डिटेल्स नीट बघत होता. त्याच्या मोबाईल मध्ये बघून झाल्यावर त्याने लगेच स्वतःचा लॅपटॉप काढला आणि काहीतरी करु लागला. 

"Oh no! This is fake site..." तो म्हणाला. 

त्याने त्याच्या टीम सोबत काहीतरी बोलणं केलं आणि काही तपास करून त्यांची खात्री पटली की ती साईट फेक असून त्यावर ज्या बाहुल्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत त्या सगळ्या झपाटलेल्या आहेत. त्यांनी लगेच याबद्दल बाकीच्यांना सांगितलं. 

"काहीही काय? भुताला एवढी technology वापरता येत असेल का?" प्रवीण चे बाबा म्हणाले. 

"Ghost ना येत नसेल तर ते human ला यासाठी वापरू शकतात ना.." शॉन म्हणाला. 

आता सगळे फक्त एकमेकांकडे बघत होते. कोणाला नक्की हे काय सुरू आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता. जगावेगळं संकट आणि त्यात घडणाऱ्या घटना सुद्धा जगावेगळ्या! त्यामुळे डोकं फिरायची वेळ आली होती. 

"तुम्ही जास्त think करू नका. प्रवीण! Plz show us that doll" Meldon म्हणाला. 

"नाही.. ती बाहुली आपण इथे आणू शकत नाही..." त्याची आई जवळ जवळ ओरडली. 

"Relax!" तो म्हणाला. 

प्रवीण च्या आईला त्या बाहुलीच्या नावानेच घाम फुटला होता. मयुर च्या आईने पटकन तिला पाणी दिलं आणि सगळ्यांनी तिला सावरलं. 

"Actually sir, गुरुजींनी तिला बंधनात अडकवलं आहे. त्यामुळे तिला तिथून सोडवणं आपल्या साठी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं.. त्यापेक्षा आपणच घरी येऊन पाहणी करा." त्याचे बाबा म्हणाले. 

"ओके.. आम्ही सगळ्यांच्या घरी investigation करणार आहोतच!" Dean म्हणाला. 

आता गुरुजींनी आधीच बाहुलीला बंधनात ठेवल्यामुळे या investigators च काम सोपं होणार होतं. त्यांनी सगळा विचार करून टीम सोबत चर्चा सुरू केली होती. त्यांच्या भाषेत जार्गन (टेक्निकल शब्द) जास्त येत असल्यामुळे या बाकीच्यांना एवढं काही कळत नव्हतं. पण, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यांना अंदाज येत होता. 

"आम्ही सगळं प्लॅनिंग केलं आहे... सगळ्यात पहिले आम्ही तुमचंच घर बघतो... इथे काही activity आहेत का समजेल." शॉन म्हणाला. 

"ओके.. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा." मयुर चे बाबा म्हणाले. 

Investigator टीम ने लगेच त्यांचे सगळे सामान काढले आणि एक सेटअप तिथे लावला. सगळ्यांनाच हे नवीन होतं. हे काय चालू आहे ते सगळे बघत होते. जे आपण टीव्ही मध्ये एखाद्या इंग्लिश सिनेमात बघितलं असेल ते खरं असेल आणि असं आता आपल्या समोर घडतंय याचाच सगळे विचार करत होते. टीम चा सेटअप लावून झाला... त्यांच्याकडे काही मशिन्स, लॅपटॉप असं बरंच सामान होतं. एक एक मशीन बाहेर काढून ते त्यांच्या कामात व्यस्त होते. बाकी सगळे तिथेच एका कोपऱ्यात उभे राहून सगळं बघत होते. 

"हॅलो! कोणी आहे का इथे? असेल तर या k2 मीटर ला टच करून अस्तित्व दाखवून द्या.." शॉन म्हणाला. 

त्याच्या हातात एक अँटीना असलेलं रिमोट सारखं डिव्हाईस होतं! त्यावर रीडिंग साठी एक काटा होता आणि हिरवा ते लाल असा रंग होता. 

शॉन तो मीटर सगळीकडे फिरवून तपासात होता पण काहीही activity मिळत नव्हती. सगळं काही नॉर्मल होतं. त्यांच्याकडे असणाऱ्या temperature मशीन सुद्धा नॉर्मल तापमान दाखवत होत्या. पुन्हा त्या सगळ्यांची चर्चा टीम सोबत झाली आणि इथे काहीही नाहीये हा निष्कर्ष सध्यातरी त्यांनी काढला. 

"सर! इथे काहीही पॅरा नॉर्मल activity नाहीयेत. Let's go to another place." शॉन म्हणाला. 

निदान मयुर च्या घरी तरी कसलाच धोका नाहीये म्हणून सगळ्यांना जरा हायसं वाटलं. या सगळ्यात दुपार झाली होती आणि जेवणाची सुद्धा वेळ झाली होती. म्हणून आता सगळ्यांना आपल्याच घरी जेवू घालावं असं मयुर च्या आईला वाटलं आणि तिने सगळ्यांना थांबवून घेतलं. सगळ्यांच्या आई तिच्या मदतीसाठी गेल्या. मोठी माणसं तिथे हॉल मध्ये बोलत बसले होते म्हणून सगळी मुलं मयुर च्या रूम मध्ये बसली होती. 

"चला आपलं एक टेंशन कमी झालं.. मयुर च्या घरात कोणतीही वाईट शक्ती नाहीये..." नम्रता म्हणाली. 

"हो... पण, प्रवीण मला एक सांग तुला दुकानं सोडून ती साईट काय मिळाली रे बाहुली घ्यायला? आपण त्या बेटावर गेलो नसतो तरी त्या बाहुली ने आपल्याला नेलं असतं..." मयुर म्हणाला. 

"अरे काय माहित कुठून दुर्बुद्धी सुचली! मला नम्रता साठी एकदम साधी पण खूप गोंडस बाहुली घ्यायची होती अगदी तिच्या सारखी... सगळ्या दुकानात फिरलो पण कुठेच मिळाली नाही. असंच एकदा बाहुली ऑनलाईन शोधताना ती साईट समोर आली. सगळी साईट चेक केली तर त्यावर एक सो एक बाहुल्या होत्या... शिवाय feedbacks पण छान होते म्हणून विचार केला घेऊया.. म्हणून घेतली. सॉरी यार! खरंतर आपल्या मागे हे चक्र लागलं त्याला कारणीभूत मीच आहे..." प्रवीण उदास होऊन म्हणाला. 

"गप रे! Sorry काय.... त्यापेक्षा आता असा विचार कर ना आपण दीपा ला मुक्ती देतोय... तिला कितीतरी वर्ष मुक्ती हवीच असेल ना? पण, आता आपण त्याला निमित्त ठरतोय, हे सगळे investigators या प्रकरणाच्या मुळाशी जातील तेव्हा आपसूक श्वेता, अमन ला आळा बसेल... अजून कोणी या जाळ्यात अडकणार नाही... कदाचित बाप्पाने आपल्याला या कामासाठी निवडलं आहे... जर आपल्याला काही होणार असतं किंवा हे काम आपल्या हातून घडणार नसतं ना तर केव्हाच आपण हरलो असतो... बाप्पावर विश्वास ठेव... त्याने हे घडवून आणलं असेल.. त्याशिवाय का आपल्याला वेळोवेळी मदत मिळत गेली. तुम्ही सगळे विचार करा.. त्या भयाण बेटावर आपल्याला वेळे आधीच श्वेता, अमन च खरं रूप समजणं, दीपा च मदतीला धावून येणं, अचानक समुद्रात हरीश काकांची बोट दिसणं, प्रवीण ला पुन्हा त्यांनीच वाचवणं आणि नंतर परत त्याचा accident होऊन तो बेटावर जाण्यापासून वाचणं! हे सगळं फक्त तोच करू शकतो... बाप्पा आहे... तुम्ही सगळे आता बाकी कसलाच विचार करू नका." नम्रता ने सगळ्यांना शांत करून समजावलं. 

"ते तर आहेच... आणि मेन तू सांगायचं विसरलीस..." समृध्दी म्हणाली. 

"काय?" नम्रता ने गोंधळून विचारलं. 

"मॅडम! आपण बेटावर गेलो तेव्हाच तर तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं ना? आ.. आ.... तिथून आल्यावर जरा जास्तच काळजी पण घेतली जातेय कोणाची तरी... शिवाय आता काय बाबा घरून पण परवानगी मिळाली आहे तर कसली लपवा छपवी पण नाही... आ.. आ..." ती नम्रता आणि प्रवीण ला चिडवायला लागली. 

"काय ग? तुमची काळजी मी करत नाही का? प्रवीण च्या बाबतीत काय घडले हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे... तो अक्षरशः मरणाच्या दाढेतून परत आला आहे म्हणून मला त्याची जास्त काळजी वाटते." ती प्रवीण कडे बघत आवंढा गिळत काळजीने म्हणाली. प्रवीण ने तिच्या हातावर हात ठेवून तिला धीर दिला. 

"ते तर आहेच... खरंच यार प्रवीण खूप मोठ्या संकटातून बाहेर आला आहे." समृध्दी म्हणाली. 

या बोलण्याने जरा वातावरण गंभीर झालं होतं ते पुन्हा हसतं खेळतं करण्यासाठी प्रवीण बोलू लागला; "ए खबरदार माझ्या नमु ला चिडवाल तर... ती आधी पण घ्यायची ना काळजी... आता जरा जास्त घेते पण घायची ना?" तो तिच्याकडे बघत तिला चिडवत डोळे मिचकावून मुद्दाम म्हणाला. 

"तू पण ना आता..." नम्रता त्याच्या हातावर एक फटका मारत म्हणाली. 

त्या चौघांची अशीच मस्ती सुरू होती. खूप दिवसांनी ते असे एवढे मनसोक्त एन्जॉय करत होते. त्यांचा आवाज बाहेर पर्यंत येत होता आणि त्यांच्या पालकांना सुद्धा त्यांचा हा किलबिलाट हवाहवासा वाटत होता. आधी एवढा आवाज केला की ओरडणारे पालक आज डोळे बंद करून त्यांच्या कानात तो आवाज साठवत होते. "आता काय लहान आहात का एवढी मस्ती करायला" असं म्हणणारे ते त्यात सुख बघत होते. 

"आज खूप दिवसांनी पोरं एवढी खुश आहेत ना? किती दिवस झाले त्यांचा हा गोंगाट ऐकलाच नव्हता." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

"हो... आज जरा सगळे खुश आहेत.... आधी आपणच त्यांना आता बास म्हणून ओरडायचो पण, आता त्यातच समाधान मिळतंय..." समृध्दी चे बाबा सुद्धा त्यांना सहमती दर्शवत म्हणाले. 

"ते सगळं ठीक आहे.. पण, याने काही पोट भरणार आहे का? थांबा आता मीच मुलांना बोलवून आणते.. त्यांच्या गोंधळात काही माझा आवाज जाणार नाही त्यांना..." मयुर ची आई टेबल वर ताटं ठेवत म्हणाली. 

क्रमशः.....
****************************
पॅरा नॉर्मल investigators आता कोणाच्या घरी जातील? प्रवीण च्या घरी त्या बाहुली कडून काही समजेल की नाही? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all