एक बेट मंतरलेलं (भाग -२१)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
मुलं सगळं टेंशन विसरून तिथे मजा करत होती. पण, त्यांना जराही कल्पना नव्हती आत्ता जो काही आनंद आहे तो तसाच राहणार नाहीये.... कारण, तिथे प्रवीण च्या घरी मात्र श्वेता ने जी बाहुली त्यांच्या राफ्ट वर फेकली होती तिच्यात जीव आला होता! आमावस्या जशी जशी जवळ येत होती आणि तिकडे त्यांचे कुमंत्र जसे वाढत होते तशी या बाहुली ला सुद्धा शक्ती मिळत होती. इतका वेळ त्याच्या सामानात लपून बसलेली ती बाहुली उठून बाहेर आली! ही तीच बाहुली होती जी त्याने नम्रता ला गिफ्ट केली होती! लाल लाल भडक चमकणारे डोळे, अर्धे नसलेले केस, अर्धी जळालेली, हात पाय मोडलेली आणि एकदम भयंकर अशी ती बाहुली कुत्सित हसत स्वतःला आरश्यात बघत उभी होती.
"आता कोण वाचवेल तुला?... ही.. ही..ही... एकदा तू माझ्या स्वप्नांच्या जाळ्यात अडकलास की तुझं काही खरं नाही... ही.. ही.. ही.." ती बाहुली नाजूक पण भयंकर आवाजात आरश्यातुन दिसणाऱ्या प्रवीण च्या फोटोकडे बघून म्हणाली.
त्यानंतर त्या बाहुली ने आजूबाजूला सगळं बघून घेतलं आणि चांगलं रूप करून तिला कुठे लपता येईल यासाठी जागा शोधू लागली. पूर्ण घरभर फिरून तिने शेवटी प्रवीण च्या खोलीत एका शोकेस च्या वरच्या बाजूला सहज कोणाचं लक्ष जाणार नाही अशी जाऊन बसली. तिच्या डोक्यात प्रवीण च्या मेंदूशी कसं खेळायचं आहे हे ठरलं होतं! या सगळ्या संकटापासून अनभिज्ञ सगळे तिथे बागेत मस्त मजा करत होते. सगळ्यांचे छान छान फोटो काढून आणि खेळून झालं होतं. छान पैकी गोल करून गवतात सगळे भेळ आणि शेवपुरी चा आस्वाद घेत गप्पा मारत बसले होते.
"थँक्यू आई - बाबा! आज खूपच मजा आली... कितीतरी दिवसांनी असा आपण एकत्र वेळ घालवला ना?" मयुर म्हणाला.
"हो ना! कामाच्या गडबडीत खूप काळ झाला असेल असे आपण एकत्र सगळे जमलो असू त्याला! अधून मधून अशी पार्टी केली पाहिजे आता!" ते सुद्धा त्याला सहमती दर्शवून म्हणाले.
"हो.. हो.. ते सगळं नंतरच नंतर बघू... आत्ता आत्ताचा क्षण जगूया! आत्ताची मजा मनसोक्त एन्जॉय करून घेऊ.... उद्याच्या प्लॅनिंग मध्ये आजची मजा का कमी करा..." नम्रता म्हणाली.
सगळ्यांनाच तिचं पटलं! उद्याचा विचार करता नेहमीच माणूस आजचा क्षण जगायला विसरतो! पुढच्या क्षणाची काही खात्री नसताना का उगाच आत्ताचा क्षण खराब करा म्हणून सगळे पुन्हा हसत खेळत गप्पा मारायला लागले.
"ए! आपण सगळे truth अँड डेयर खेळूया!" एकदम समृध्दी चे बाबा म्हणाले.
"ओ! काहीही काय? हे सगळं मुलं खेळतील.. आपण कुठे?" तिची आई म्हणाली.
"अरे त्याला काय होतंय... आपल्या पण कॉलेज चे दिवस पुन्हा जगायला मिळतील ना! चला चला खेळू आपण... मी तयार आहे..." प्रवीण ची आई म्हणाली.
"हो आई! खेळू ना सगळे... आणि तूच म्हणत असतेस ना आता आम्ही दोघं तुझे फ्रेंड्स आहोत मग खेळूया ना..." समृध्दी सुद्धा आई ला समजावत म्हणाली.
सगळ्यांच्या आग्रहाखातर अखेर सगळेच पालक खेळायला तयार झाले. सगळ्यांच्या मधोमध पाण्याची बाटली फिरवून खेळ सुरू झाला! प्रवीण ने बाटली फिरवली.... थोड्याच वेळात बाटली थांबली आणि त्या बाटली च तोंड मयुर कडे आणि बुड प्रवीण च्या आई कडे आलं होतं!
"सांगा truth की डेयर?" मयुर ने विचारलं.
"Truth" प्रवीण ची आई म्हणाली.
"ए मयुर! एकदम सोपा प्रश्न विचारू नकोस... जरा हटके काहीतरी विचार..." समृध्दी त्याला हळूच खुणावत डोळा मारून म्हणाली.
प्रवीण आणि नम्रता ला हा काय विचारणार याचा अंदाज थोडा फार आला होता! त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि मयुर कडे बघून श्वास रोखून डोळ्याने नाही म्हणून खुणावत होते पण, त्याचं याकडे अजिबात लक्ष नव्हतं. सगळ्यांचं लक्ष आता मयुर प्रवीण च्या आईला काय विचारतो याकडे होतं तर प्रवीण आणि नम्रता टेंशन मधे होते.
"काकू! तुम्ही फक्त हो की नाही एवढं बोलून उत्तर द्या हा... मी प्रश्न विचारतो." मयुर म्हणाला.
त्याचं हे वाक्य ऐकून प्रवीण आणि नम्रता ला कळून चुकलं होतं आता काही आपलं खरं नाही! हा मस्करी करता करता वाट लावणार आहे. सगळे आता हा काय विचारतोय हे ऐकायला उत्साहात बसला होते तर हे दोघं टेंशन मधे!
"तर काकू! समजा हा समजा... कोणीही गैरसमज करून घेऊ नका... समजा, प्रवीण ने तुम्हाला सांगितलं की...." तो एवढं बोलला आणि थोडा पॉज घेतला.
"झालं! हा काय पचकणार आहे ते समजलं आहे.... देवा! जरा बुध्दी दे रे याला..." प्रवीण मनात म्हणाला.
त्याच्या या बोलण्याने सगळ्यांचे कान टवकारले गेले होते. सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून तो अंदाज बांधत होता आणि नम्रता, प्रवीण चा रंग उडललेला चेहरा पाहून त्याला खूप मजा येत होती. तो दोघांकडे बघून गालातल्या गालात हसला आणि पुढे बोलू लागला; "तर! मी म्हणत होतो की, प्रवीण समजा तुम्हाला उद्या म्हणाला की, मला.... मला...... पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे आणि तिकडेच सेटल व्हायचं आहे तर तुम्ही हो म्हणाल?"
त्याचा हा प्रश्न ऐकुन नम्रता आणि प्रवीण रिलॅक्स झाले आणि मयुर किती मस्ती करू शकतो याचा त्यांना अंदाज आला. चौघे एकमेकांकडे बघून हसत होते. प्रवीण च्या आई ने काय उत्तर द्यायचं हे ठरवलं आणि बोलू लागली; "शिक्षणासाठी हो! आणि तिकडे सेटल होण्यासाठी नाही." प्रवीण ची आई म्हणाली.
"अहो काकू! तुम्हाला फक्त हो की नाही सांगायचं होतं. पण, असुदे.. मग आता हे ५०% हो आणि ५०% नाही असं का? ते सांगून टाका." तो म्हणाला.
"कारण, त्याला ज्या क्षेत्रात शिकायचं असेल, जिथे कुठे शिकायचं असेल त्याला ना नाही.. पण, ज्या देशात आपण जन्मलो, ज्या समाजात मोठे झालो त्यासाठी त्याने काम करावं एवढंच वाटतं मला! आणि मला खात्री आहे प्रवीण च सुद्धा हेच मत असेल..." त्याची आई त्याच्याकडे बघून विश्वासाने म्हणाली.
तो सुद्धा नजरेने हो म्हणाला. देशाप्रती असणारं प्रेम, समाजाची ओढ आणि आपल्याच मातृभूमीसाठी सदैव काम करायची बीजे त्याच्या मनात लहानपणा पासूनच पेरली होती. सगळ्यांना त्याच्या आईचे आणि त्याचे विचार आवडले आणि पुढच्या खेळाला सुरुवात झाली. मयुर ने बाटली फिरवली! प्रवीण चे आणि समृध्दी चे बाबा सिलेक्ट झाले. पालकांचे कॉलेज मधले किस्से सांगणे, अनोख्या स्टाईल मध्ये प्रपोज वैगरे वैगरे मजा सुरू होती. एक एक जोडी सिलेक्ट होत त्यांचा खेळ सुरू होता... सगळ्यांचं खेळून झालं आणि शेवटी नम्रता आणि समृध्दी राहिल्या. बाटलीचं तोंड समृद्धीकडे होतं.
"नमु! Truth or डेयर?" समृध्दी ने विचारलं.
"काहीही घेतलं तरी तू खेचणार आहेसच..." नम्रता तोंडातल्या तोंडत पुटपुटली.
"काय? ऐकू नाही आलं..." समृध्दी म्हणाली.
"ए नमु! डेयर घे ग..." तिचे बाबा म्हणाले.
तिने सुद्धा हसून हो म्हणलं आणि डेयर घेतलं.
"एक मिनिट थांब हा... मी आलेच..." समृध्दी म्हणाली आणि तिथून उठून गेली.
"आता ही आणि कुठे गेली?" नम्रता तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाली.
ती एका झाडापाशी आली. तिथे खाली पडलेल्या फुलांपैकी दोन वेगळ्या रंगाची फुलं उचलली आणि पुन्हा जागेवर आली.
"आधीच मी सांगते हा, हा खेळ आहे तर कुणी मनावर घेऊ नका...." ती म्हणाली.
"हो ग बाई! सांग आता लवकर..." नम्रता ची आई म्हणाली.
"मी दोन रंगाची फुलं आणली आहेत, एक लाल आहे आणि एक पिवळं आहे... मी दोन्ही हातामध्ये ती शफल करणार... लाल रंग म्हणजे प्रवीण च नाव, आणि पिवळा रंग म्हणजे मयुर च नाव! नम्रता जे कोणतं फुल निवडेल त्याला तिने प्रपोज करून दाखवायचं!" समृध्दी ने सांगितलं.
"ओय! काहीही काय ग?" नम्रता डोळे मोठे करून म्हणाली.
"गप ग नमु! अगं खेळ आहे... त्याला काय होतंय... तुम्ही सगळे एवढे छान मित्र आहात.. त्यात काय..." तिची आई तिला समजावत म्हणाली.
"हो ना! आणि नम्रता सारखी सून कोणाला नाही आवडणार..." प्रवीण ची आई सुद्धा तिला साथ देत म्हणाली.
तिचं हे वाक्य ऐकून मयुर तर एकदा नम्रता कडे आणि एकदा प्रवीण कडे बघत होता आणि हळूच हसत होता.
"चला हे बघा मी दोन्ही फुलं मुठीत ठेवली आहेत... आता ती शफल करते मग नम्रता सिलेक्ट कर...." समृध्दी म्हणाली आणि तिने दोन्ही हात मागे नेले.
लगेचच तिने ते समोर केले आणि नम्रता समोर धरले. नम्रता कोणती मुठ सिलेक्ट करू म्हणून गोंधळली होती.
"अगं निवड कोणतीही..." मयुर ची आई म्हणाली.
"हो ना! खेळ आहे हा... काय ग तू पण.." नम्रता ची आई म्हणाली.
"हा! पण खेळ असला तरी नंतर विचार करायला काही हरकत नाही नाही का?" प्रवीण ची आई नम्रता च्या आईकडे बघून आणि प्रवीण कडे हळूच बघून म्हणाली.
इथे नम्रता खाली मान घालून बसली होती. तिचे गाल गुलाबी झाले होते आणि ती हळूच प्रवीण कडे बघत होती. हे मयुर आणि समृध्दी ने बघितलं होतं.
"ए निवड ना पटकन..." समृध्दी तिला धक्का देत म्हणाली.
त्यामुळे ती भानावर आली पटकन उजव्या हातावर बोट ठेवलं. समृध्दी ने थोडा सस्पेन्स निर्माण करून मुठ उघडली तर त्यात लाल रंगाचं फुल होतं.
"चला मॅडम! प्रवीण ला प्रपोज करून दाखवा.." ती तिला चिडवत म्हणाली.
सगळ्यांचे पालक सुद्धा मजा बघत होते. यात त्यांना काही गैर वाटत नव्हतं! उलट आपली मुलं एकमेकांचे एवढे चांगले मित्र आहेत की आपल्या समोर त्यांना एवढा मोकळेपणा वाटतो म्हणून त्यांना आनंद झाला होता.
नम्रता आणि प्रवीण उठले. नम्रता त्याच्या समोर गेली अजूनही तिची नजर खालीच होती. इथून सगळे शिट्ट्या वाजवत होते. दोघांच्या हृदयाची धडधड वाढली होती.
"प्रवीण! You are my bestiee! I love you." ती म्हणाली.
हे ऐकुन सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तिने तिचा खेळ सुद्धा पूर्ण केला होता आणि कोणाच्या भावना न कळत सुद्धा दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली होती.
"वा! क्या बात है!" मयुर टाळ्या वाजवत म्हणाला.
"ए बास ना आता.. चला आता गोळा खाऊया.." नम्रता म्हणाली.
सगळे गोळा खायला जाण्यासाठी उठले... सगळे पालक पुढे चालत होते आणि मुलं मागून! ते चालत असताना समृध्दी जिथे बसली होती तिथे नम्रता च लक्ष गेलं! तिने हात मागे नेले होते तेव्हा चलाखीने पिवळ फुल खाली टाकून दुसरं सुद्धा लाल फुल हातात घेतलं होतं.
"समु! मुद्दाम केलंस ना?" तिने समृध्दी ला थांबवून विचारलं.
"हो! माझा आणि मयुर चा प्लॅन होता... म्हणलं तू काही बिचाऱ्या प्रवीण ला प्रपोज करायला जाणार नाहीस... आपणच काहीतरी घडवून आणलं पाहिजे!" ती तिला डोळा मारून म्हणाली.
"अरे! काय चाललंय तुमचं? या लवकर...." समृध्दी ची आई त्यांना तिथेच थांबलेलं बघून म्हणाली.
सगळे "हो.. हो.." करत त्यांच्या मागे जाऊ लागले... समृध्दी आणि मयुर पुढे गेले. मागे आता फक्त नम्रता आणि प्रवीण होते.
"फायनली आज मला जे ऐकायचं होतं ते ऐकायला मिळालं! खेळा खेळात का असेना पण तू बोललीस... आय लव्ह यू टू!.." तो त्याच्या केसात हात फिरवून नजर खाली करून म्हणाला.
नम्रता सुद्धा खाली मान घालून हळूच त्याच्याकडे चोरून बघत हसली आणि सगळ्यांसोबत पुढे जायला निघाली. प्रवीण ने तिचा हात धरला आणि तिला थांबवलं.
"अरे चल ना... सगळे पुढे गेले आहेत..." नम्रता स्वतःचा हात सोडवत म्हणाली.
"जाऊया.. पण एक मिनिट थांब!" प्रवीण म्हणाला आणि त्याने समृध्दी ने जे लाल फुल आणलं होतं ते तिच्या केसात घातलं. हे पुढून समृध्दी आणि मयुर ने बघितलं होतं आणि पालकांच्या न कळत मागे पळत येऊन दोघं खोकले. आता या दोघांचं परत चिडवणं नको म्हणून ते दोघं पटापट पुढे गेले.
क्रमशः....
**************************
मुलं तर अजून मस्ती मूड आहेत! त्यांना अजून जराही कल्पना नाहीये प्रवीण च्या घरी एक संकट त्यांची वाट बघतंय! जेव्हा सगळे घरी जातील आणि या बाबतीत त्यांना काही सुगावा लागेल तोपर्यंत वेळ गेलेली नसेल ना? मयुर ला जसा त्रास झाला तसा प्रवीण ला होईल का? की, नम्रता ला हे आधीच जाणवेल? सगळे दीपा च्या मुक्तीसाठी काय करतील? पाहूया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा