Login

एक आगळेवेगळे लग्न भाग ६५

Maithili's Father Is Going In Coma

मागील भागाचा सारांश: मैथिलीच्या बाबांच्या मेंदूला मार लागल्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत असतात. मैथिलीची आई शुद्धीत आल्यावर ती मैथिलीला बाबांबद्दल व राधिका बद्दल प्रश्न विचारते तेव्हा मैथिली आईला खोटं सांगून वेळ मारुन नेते. मैथिलीच्या आईसाठी बुटीक मधील सुरेखा काकू जेवणाचा डबा घेऊन येतात व त्या मैथिलीला सांगतात की आईच्या डब्याची व्यवस्था आम्ही सगळ्या बुटीक मधील बायका मिळून करणार आहोत. हॉस्पिटलमध्ये मैथिली व राधिकाची नजरानजर होते पण दोघीही एकमेकीं सोबत बोलू शकत नसल्याची खंत दोघींना जाणवते.

आता बघूया पुढे....

राधिका ताई सोबत आपण काहीच बोलू शकलो नाही याची खंत तिच्या मनाला लागली होती, साधी तिच्या तब्येतीची चौकशी सुद्धा करता आली नाही हा विचार करुन मैथिलीला वाईट वाटत होते. पुजा मॅडम कडे जाऊन राधिका ताईच्या तब्येतीची चौकशी करावी म्हणून मैथिली पुजा मॅडमच्या केबिनमध्ये गेली पण पुजा मॅडम केबिनमध्ये नव्हत्या, त्या जनरल वॉर्डमध्ये राऊंड मारण्यासाठी गेल्या होत्या, मैथिली पुजा मॅडमची वाट पाहत त्यांच्या केबिनमध्ये बसली होती. काही वेळाने डॉ पुजा केबिनमध्ये आल्या तर त्यांनी बघितले की मैथिली आपल्या केबिनमध्ये बसलेली आहे म्हणून त्या म्हणाल्या," मैथिली तु इथे का बसली आहेस? काय झालं? Is everything alright?"

मैथिली म्हणाली," Nothing is alright मॅडम, सगळंच चुकीचं घडत आहे. आता हेच बघा ना, माझ्या सख्ख्या बहिणीच्या तब्येतीची विचारपूस मला तुमच्याकडे येऊन करावी लागत आहे."

डॉ पुजा म्हणाली," मैथिली राधिका ताई ठीक आहे, तिला थोडा विकनेस आहे, its normal पण मला एक गोष्ट जाणवली त्याबद्दल मला सांग, अति मानसिक ताण घेण्याची सवय तुमच्या पूर्ण फॅमिलीला आहे का?"

मैथिली म्हणाली," नाही असं तर काही नाहीये कारण माझे आई बाबा मला कधीच मानसिक तणावाखाली आढळले नाही, कदाचित असंही होऊ शकतं की ते आमच्या समोर त्यांचा मानसिक तणाव दाखवत नसतील."

डॉ पुजा म्हणाली," एवढा सिरिअस विचार करु नकोस, राधिका ताई बरी आहे पण कुठे ना कुठे ती तुझा, सौरभचा विचार करतच आहे. शेखर जिजू सोबत असल्याने राधिका ताई तस काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात मला काळजी वाटली. राधिका ताईची काळजी घ्यायला शेखर जिजू सक्षम आहेत, तु तिची काळजी करु नकोस आणि जर समजा काळजी करण्यासारखं काही असलं तर मी तुला सांगेलच. आई कशी आहे?"

मैथिली म्हणाली," आई शुद्धीत आली आहे पण ती सतत बाबांची व राधिका ताईची चौकशी करत आहे, मी काहीतरी खोटी कारणं सांगून आईच समाधान केलं आहे पण अस किती दिवस मी तिच्या सोबत खोटं बोलणार काय माहीत?"

"आईच्या जेवणाची काही व्यवस्था केली आहेस का? की मी घरुन डबा मागवून घेऊ" डॉ पुजाने विचारले

मैथिली म्हणाली," बुटीक मधील आई सोबत काम करणाऱ्या बायकांनी ठरवलं आहे की दररोज त्या आळीपाळीने आई साठी डबा घेऊन येणार आहेत."

डॉ पुजा म्हणाली," सौरभची काही चौकशी केलीस का?"

"हो त्याचे डॉक्टर म्हणत आहेत की त्याला नाशिकला घेऊन जा म्हणून, इथे एका व्यसनमुक्ती केंद्रात केतनने चौकशी करुन ठेवली आहे तिथेच सौरभला शिफ्ट करावे लागेल." मैथिलीने उत्तर दिले

डॉ पुजा म्हणाली," हे बघ मैथिली मी जरा straight forward बोलते, कदाचित तुला माझ्या बोलण्याचा रागही येईल, पण तु माझी एक जवळची मैत्रीण आहेस आणि शिवाय मला तुझी काळजी वाटत आहे म्हणून मी हे बोलणार आहे. आता राधिका ताईचं बाळ गेलं, शेखर जिजूंनी या साठी तुम्हाला जबाबदार धरलं, त्यामुळे तु राधिका ताई सोबत बोलू शकत नाहीये. सौरभला ड्रग्सच्या व्यसनापायी व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावं लागणार आहे. आई बाबांचा अपघात, बाबांच्या मेंदूला मार लागणे, ठरलेल्या वेळी तुझं लग्न न होणं ही सर्व संकटे तुझ्यावर एकाच वेळी आली आहेत त्यामुळे तु मानसिक रित्या ढासळलेली असू शकते हे मला मान्य आहे पण या सगळ्याचा अति विचार करुन मानसिक ताण वाढवून घेणे हे कितपत योग्य आहे. तुझी परिस्थिती मला समजते आहे पण आपण जे आहे ते बदलू शकत नाहीये. आलेल्या संकटांना धीराने तोंड दिल्या शिवाय दुसरा पर्याय तुझ्या पुढे नाहीये. आता या परिस्थितीत तु पॉजिटीव्ह बाजू बघ ना, डॉ केतन सारखा समजदार व्यक्ती तुझ्या सोबत आहे, आईच्या डब्याची व्यवस्था त्या परक्या बायकांनी केली आहे, राधिका ताईच्या तब्येतीची काळजी घ्यायला तिच्या घरची मंडळी आहेत. केतनने हॉस्पिटल टाकल्याने तुला पैश्यांची जुळवाजुळव करावी लागत नाहीये, आमच्या सारखे तुझ्या सोबत आहेत. अजून काय पाहिजे, तु सतत डोळयात पाणी घेऊन फिरतेस ते मला पटत नाहीये. संकट आहेत, टेन्शन आहे मान्य पण अशी उदास राहू नकोस. सगळं काही ठीक होईल."

मैथिली म्हणाली," हम्मम तुम्ही म्हणत आहात तेही बरोबर आहे. मी आईला बघून येते."

डॉ पुजा म्हणाली," एक मिनिटं मैथिली, मला भूक लागली आहे चल आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊया तसही तु काही खाल्लं नसशील याची मला गॅरंटी आहे."

मैथिली नाही म्हणत असताना सुद्धा डॉ पुजा बळजबरी तिला आपल्या सोबत घेऊन जाते. 

चोवीस तास उलटून जातात तरी मैथिलीचे बाबा शुद्धीत येत नाहीत. शेवटी डॉक्टर ते कोमात गेले असल्याचं सांगतात. आता मैथिलीचे बाबा शुद्धीत कधी येतील हे कोणीच सांगू शकत नाही. मैथिली आईसोबत जवळपास चोवीस तास हॉस्पिटलमध्येच राहत असे. डॉ पुजा मैथिली साठी जेवणाचा डबा घेऊन येत असे. सौरभला नाशिकच्या एका व्यसनमुक्ती केंद्रात भरती करण्यात आले होते, तेथील डॉक्टरांचे म्हणणे होते की सौरभला बरं होण्यासाठी कमीत कमी एक वर्ष लागू शकतं कारण तो व्यसनाच्या अति आहारी गेला होता. सौरभची अवस्था मैथिली व केतनला बघवत नव्हती. दिवसामागून दिवस जात होते पण मैथिलीच्या बाबांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती. मैथिली दररोज देवाला प्रार्थना करत असायची. आई बाबा केतनच्या हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांच्या ट्रिटमेंटच्या खर्चाचं मैथिलीला टेन्शन नव्हतं पण सौरभच्या ट्रिटमेंट साठी तिला पैसे भरावे लागणार होते, तिच्या कडे जेवढे काही पैसे होते तेवढे तिने सौरभच्या ट्रिटमेंट करीता भरले होते, मैथिलीला अजून पैश्यांची व्यवस्था करावी लागणार होती, ती त्याच टेन्शनमध्ये होती कारण केतनकडे पैश्यांची मागणी करणं तिला बरं वाटत नव्हतं. मैथिलीच्या लग्नासाठी काही पैसे तिच्या बाबांनी बाजूला ठेवले होते पण ते त्यांच्या सही शिवाय काढता येत नव्हते. मैथिली तोच विचार करत आईच्या बाजूला बसली होती. आईला मैथिलीच्या चेहऱ्यावरुन ती काळजीत असल्या सारखी दिसली होती म्हणून आई तिला म्हणाली," मैथिली बाळा काय झालं? तु कसल्या टेन्शनमध्ये आहेस?"

मैथिली म्हणाली," काही नाही आई"

आई चिडून म्हणाली," मैथिली मी काही बोलत नाहीये म्हणजे मला काही कळत नाहीये असा तुझा समज असेल तर तो चुकीचा आहे. मला तुम्ही कोणीच खरं सांगत नाहीयेत. राधिकाचा फोन आला नाहीये की शेखर राव मला भेटायला आले नाहीयेत, तुझे बाबा कसे आहेत? त्यांना काय झालंय? हेही मला कोणी सांगत नाहीये. सौरभच्या ट्रिटमेंटचं काय केलं? त्यासाठी पैसे कुठून आणलेस हेही मला तु सांगत नाहीयेस, मैथिली बाळा मला खरं सांग ना ग नक्की काय झालं आहे? तुझ्या एकटीची किती धावपळ होत आहे, तुझ्या चेहऱ्यावर सतत टेन्शन दिसत आहे, तुझ्या डोळ्यात पाणी आलं की तु बाजूला निघून जाते हे माझ्या लक्षात येतं. किती दिवस अस सर्व मनात साचवून ठेवणार आहेस, प्लिज मला सर्व खरं सांगून तुझं मन मोकळं कर."

आईचं बोलणं ऐकून मैथिलीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मैथिली कसंबसं स्वतःला शांत करत म्हणाली," आई मी तुला सर्व खरं सांगते पण त्याचा परिणाम तु तुझ्या तब्येतीवर करुन घेऊ नकोस.आई तुझ्या पासून हे सगळं लपवण माझ्या साठी कठीण होऊन बसले आहे. आई सौरभला नाशिकच्या व्यसनमुक्ती केंद्रात शिफ्ट केलं आहे,माझ्याकडे जेवढे पैसे होते ते मी तिथे भरले पण काही दिवसांनी अजून पैसे भरावे लागणार आहेत त्याची व्यवस्था कुठून करु हेच मला कळत नाहीये. सौरभला पूर्णपणे बरं व्हायला कमीत कमी एक वर्ष तरी लागण्याची शक्यता आहे. आई बाबांच्या मेंदूला मार लागला असल्याने ते कोमात गेले आहेत, बाबांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाहीये, ते शुद्धीत कधी येतील हे देवालाच माहीत. आता राहिला प्रश्न राधिका ताईचा तर तुम्ही दोघे पुण्याला गेल्यावर राधिका ताई चक्कर येऊन पडली होती, मी केतनच्या मदतीने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये आणले होते पण राधिका ताईचे बाळ वाचले नाही आणि या सर्वासाठी शेखर जिजू आपल्या सगळयांना जबाबदार धरत आहेत, त्यांनी मला राधिका ताईसोबत बोलू सुद्धा दिले नाही. माहीला ते आपल्या सोबत घरी घेऊन गेले. तुम्हा दोघांना इथे ऍडमिट केलं तेव्हा ते दोघेही ह्याच हॉस्पिटलमध्ये होते तरी जिजूंनी तुमच्या तब्येतीची चौकशी केली नाही की मला धीर सुद्धा दिला नाही. राधिका ताईला तुमच्या अपघाता बद्दल काहीच माहिती नाहीये. हे सर्व अस आहे."

या सगळ्यावर मैथिलीच्या आईची प्रतिक्रिया काय असेल? हे बघूया पुढील भागात....

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all