Jan 19, 2022
कथामालिका

एक अधुरी कहाणी अंतिम भाग 5

Read Later
एक अधुरी कहाणी अंतिम भाग 5
##एक अधूरी कहानी…
अंतिम भाग -5
©पूनम पिंगळे
ती खुप वैतागली होती..हे काय आहे सगळ? नाहि मी नाही चेंज करणार ड्रेस..नो नेवर…
परत कॉल आला: मैडम ड्रेस चेंज करा बसु नका नुसत्या… ती अजुबाजुला पाहू लागली.. इथे कैमरा आहे की काय याला काय माहीत?…मग ती बाथरूम मध्ये गेली ड्रेस चेंज करायला ..कारण तिला भीती होती ड्रेस बदलताना तो कॅमेरा मध्ये बघेल तर?
ड्रेस खुप सुन्दर होता..अगदी राजकुमारी सारखा ..खुप घेरदार अणि पिंक कलर.. त्यासोबत एक डायमंड नेकलेस सेट ,छानस bracelet होत...तिला ड्रेस बरोबर बसला आणि त्यासोबत पेंन्सिलहिल चे बूट एकदम परफेक्ट…ती इतकी सुंदर दिसत होती……. तिने आरश्यात पहिल स्वतःला ...तिला वाटच होत हे स्वप्नच आहे…
आज तिचा वाढदिवस होता..छान सेलिब्रेशन करायच होत तिला.. पण हे तर भलतच चालू होत..
जर प्रकाशला आठवल आणि तो लवकर घरी आला तर? मी घरी नसेल तर…खुप काही काही विचार तिच्या डोक्यात येत होते. ससुबाई नावहत्याच् घरी त्या यात्रेला गेल्या होत्या…
मग काहितरी विचार करुन तिने प्रकाशला कॉल केला प्राजक्ता: कुठे आहात? आज कधी येणार घरी?
प्रकाश : उशीर होईल.. काही काम होत का? तिला खुप राग आला होता .. याला आजुनपण आठवत नहिये??
प्राजक्ता: मी फ्रेंड्स सोबत बाहेर आलीये.. मला यायला उशीर होईल .
प्रकाश : अग मी खुप बिझी आहे.. करतो नंतर कॉल बाय……..लवयू स्वीटहार्ट…
प्राजक्ता : (मनातच) इथे माझा वाढदिवस लक्षात नाहीं आणि म्हणे स्वीटहार्ट!! त्यांला तर नंतर बघुया ..पण हा कोण आहे? ज्याने मला इथे बोलवालाय?ड्रेस काय, रूम काय!! हवय तरि काय याला मझ्याकडून? आणि सर्र्कन काटा आला तिच्या अंगावर.. काय मी जो विचार करतीये..याला ते हव आहे की काय माझ्याकडुन्? नाही असल काही मी नाही करणार…कोण आहे हा समोर का येत नाही…समोर ये रे तुला धुवूनच काढ़ते…
इतक्यात रूम चा लैच खोलुन् कोणीतरी आत आल …हे काय छे बाबा याने तर मास्क लावला होता…तो जवळ आला तिच्या आणि विचारल काय ग ओळखलस का??? कोण आहे मी? तुला तोंड नाहिन दाखु शकत, सो हा मास्क… ओळखल काय तू मला?….बोल ..आग बोल की लवकर..
नकळतपने तिच्या तोंडातून निघाल: अविनाष तू ?? तूच आहेस ना ?? नाहि नाही शक्य नाहीं…कस काय तू? आणि ती चक्कर येऊन ख़ाली पडली…..
तिच्या घाबरुण पडल्यामुळे तो मास्कवाला गोंधळाला…त्याने तिला उचलून बेडवर ठेवल थोड़ पाणी मारल तिच्या तोंडावर;
ती हळूहळू शुद्धिवर येऊ लागली तर तिला समोर प्रकाश दिसला त्याच कपड्यांमधे जे त्या मास्क वाल्याने घातले होते….अस कस तीला समाजतच नव्हतं..हे सगळ काय चलालय? तो जो होता तो कुठे गेला?…इथे प्रकाश कसा?? तो जेव्हा बोलला तुला मी तोंड नहीं न दखवु शकत..तिला अविनाश आहे असच वाटल होत..मग अता प्रकाश कसा?
झालेल सगळ बाजूला ठेऊन प्रकाशने तिला घट्ट मिठीत घेतल आणि अलगदपणे तिच्या ओठांवर ओठ टेकवले…आणि गाऊ लागला ,”HAPPY BIRTHDAY TO YOU ….HAPPY BIRTHDAY TO MY SWEETHEART HAPPY BIRTHDAY TO YOU”. प्राजक्ताला काहीच समजत नव्हत.
तिला जवळ घेऊन तिचा हात हातात घेऊन तो बोलला: अग माझी राणी!! तूझा वाढदिवस मी कधीतरी विसरेन का? ….अग या सागळ्यासाठी मी महीना झाला तयारी करत होतो..तुझा जूना ड्रेस जुने शूज घेऊन गेलो होतो मी मापासाठी त्यामुळे ड्रेस च काम perfect झाल..आणि मला माहित होत तुला कार हवी आहे.. ज्या कार मध्ये तू आलिस ती कार आणि तो ड्राईवर दोन्ही तुझ्यासाठी गिफ्ट आहे ग…आणि आज आपण या हॉटेल मध्ये तुझा वाढदिवस साजरा करणार आहोत…
ती तर पूर्ण चक्रावुन गेली होती…आणि तितकीच् खुश पण इतकं छान सरप्राइज!! खुप खुप मस्त वाटल तिला …
थोड्याच् वेळात तो पण सूट घालून तैयार झाला.. काय रुबाबदर दिसत होता तो..एकदम राजकुमार आणि प्रिन्सेस…अस्सल माराठीमधे बोलयच तर राम सीतेचा किवा लक्ष्मीनारायणाचा जोडाच्…
ते जेवायला गेले.. तिथे मस्त हार्ट शेपचा रेड वेलवेट केक होता आणि त्यावर तिचा लाजुन हसतानाचा अतिशय सुन्दर फ़ोटो..जो साहेबांनीच एका नाजुक प्रसंगी मोबाइल मध्ये क्लिक केला होता..तो पाहून तिला तो क्षण आठवला आणि ती पुन्हा अगदी तशीच लाजली….छान संगीत चालू होत.. जेवण झाल आणि दोघे आपल्या रूम वर गेले…
आणि पटकन प्रकाश बोलला हा अविनाश कोण ??? इतकावेळ त्याच्या डोक्यात ते होतच.. पण त्याला आधी तीच सरप्राइज नीट द्यायच होत..त्यामुळे मनात उफळणारा लावा त्याने तसाच धरून ठेवला होता…पण आता तो आजुन शांत राहु शकत नव्हता….
तिला एकदम धक्का बसला…इतकावेळ इतकं छान वागल्यामुळे तिला वाटल त्याने ऐकलच नव्हतं अविनाशच नाव तिने घेतलेल..पण आत्ता तिला उत्तर द्यावच लागणार होत...
प्राजक्ता : माझं लहाणपणापासून खुप प्रेम होत अविनाशवर...आणि मग त्याने माझा अपमान केला..तो कसा केला ते ही सांगितले…आणि त्याच वेळी उन्हात असणाऱ्या सावली सारखे तुम्ही माझ्या आयुष्यात आलात…मला परत त्याची कधीच आठवण आली नाहीं.. पण आज जेव्हा तुम्ही मास्क घालून बोलले, तुला तोंड नाहीना दखावु शकत..३त्यामुळे मला अस वाटल तोच आहे ….
आधीच तुमच्या या सरप्राइज मुळे मी खुप टेंशन मधे होते आणि मग बोलता बोलताच ती रडू लागली …..प्रकाशने तिला घट्ट आणि आश्वासक मिठीत घेतलं..
प्रकाश: मग मी जेव्हा तुला विचारल होत आपल्या पहिल्या रात्री तेव्हा का नाहीं सांगितलस हे?……बर असो आता आपल्यात परत हा अविनाश येऊ द्यायचा नाहीं ओके…
त्यानंतर ती रात्र अगदी यादगार झाली त्यांची..त्यानंतर एका आठवड्यातच गोड बातमी मिळाली त्यांना….घरी छोटा पहुणा येणार अशी….
सगळे खुप आनंदात होते …अगदी व्यवस्थितपणे नऊ महीने पार पडले आणि छोट्याश्या प्रसादचा जन्म झाला…. तिचा पूर्ण वेळ मग त्यातच जाऊ लागला
प्रकाशची आई म्हणजे बाळाची आजी तर इतकी खुश होती की तिला काय करू आणि काय नको अस झाल होत… त्यांना विरंगुळाच मिळाला होता प्रसादच्या रुपात….पण त्या जास्त काळ हे सुख नाही घेऊ शकल्या एक दिवस झोपेतच् देवाघरी गेल्या त्या….
सगळ्या घराची जबाबदारी प्राजक्तावर येऊन पडली..त्यातच तिचा वेळ जात होता खुप व्यस्त असायची ती..प्रसादचा खाऊ, प्रसादचा अभ्यास,त्याच् आजारपण…आणि खुपसार प्रकाशच प्रेम.
अशातच प्रसाद पूर्ण दिवस शाळेत जाऊ लागला आणि हिला घरात कारमेना झाले..तिने पुन्हा कॉलेज चालू केले एक्सटर्नल...तिच सेकंड इयर ला असताना लग्न झाल होत….मग ग्रेजुएशन पूर्ण केल तिने आपल्या सगळ्या जबबदाऱ्या संभाळत...आता तिला जॉब करावा अस वाटल तिने प्रकाशला संगीतल
प्रकाश : अग काय कमी आहे आपल्याला? कशाला हवाय जॉब तुला? नको ग अशीच मस्त रहा ना तू.. एन्जॉय कर लाइफ...तेव्हा ती शांत बसली पण तिच मन काही तिला शांत बसु देईना…मग तिने प्रकाशला विचारल मी स्टेनो डिप्लोमा करू का माझा वेळ तरी जाईल? त्याने अगदी हसत परवानगी दिली तिला..दुसऱ्याच् दिवशी प्रकाशने चांगल्या कॉलेजचा फॉर्म आणून दिला तिला…..
झाल प्राजक्ताचा डिप्लोमा चालू झाला तो 1 इयर चाच होता..आता प्रसाद 8वि ला होता पुढचे दोन वर्ष त्यांच्यासाठी खुप महत्वाचे होते..
डिप्लोमा पूर्ण होईपर्यंत त्याची 9वि चालू झाली मग मात्र तिने बाकि सगळीकडे लक्ष देण बंद केल..अणि पूर्ण वेळ प्रसादला देऊ लागली. त्याची आवड़ त्यांच्यासाठी काय पौष्टिक आहे…त्याने वेळेवर झोपाव …कसा अभ्यास करावा याच टाईमटेबल करुन ती त्याला त्याच लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत करत होती…
तिने घेतलेल्या कष्टाचे आणि प्रसादने केलेल्या मेहनतीचे खुप छान फळ मिळाले तो बोर्डात प्रथम् आला.. त्याना आता आभाळ ठेंगण वाटू लागल होत….प्रसाद योग्य दिशेने पुढे जात होता आजुन काय हव असत हो पालकांना??? नाहीका??
सगळच् छान छान चालू होत….अशातच एक खुप छान जॉब opportunity चालून आली प्रजाक्ताकडे आणि ती स्विकारावी अशी खुप इच्छा होति प्रजाक्ताची…यावेळी प्रसादने त्याच्या पप्पाना पटवल..
प्रसाद: अहो पप्पा आपण मम्मीला का अस घरात बसवायच हों? खुप हुशार अहेनाहो ती ..तीच नॉलेज का वाया घलवायच..आपण दोघे आपापल्या जगात् आणि ती बिचारी काय कारणार दिवसभर?…किती कंटाळा येत असेल तिला ??? करुद्यना हो जॉब तिला, प्लीज …..
आणि प्राजक्ता जॉब करू लागली….सगळ मस्त मस्त चालू होत तीच आणि त्यात आज अविनाश भेटला ज्या भावनांना तिने आत दाबून टाकल होत त्या सर्व भावना अविनाशला पाहून उचंबळून आल्या होत्या.. आणि त्यांना शांत करणे तिला अशक्य वाटू लागले होते…
हे सगळे आठवत असताना अविनाश कधीतरी येऊन तिच्या समोरच्या सीट वर येऊन बसला याचा तिला पण तपास लागला नाही….तो फ़क्त तिच्याकडे बघत बसला होता त्याला हे तर समजत होत की ही कोणत्यातरी गहण विचारात आहे..ती एकदम सावध झाली आणि तिला समोर तो दिसला…
ती- सर नाहीत आज ऑफिस मध्ये
तो-मला माहित आहे
ती-मग काय काम आहे तुमच?
तो-मला तुझ्याशि बोलायच आहे
ती-पण मला नाही बोलयच
तो —ohh ख़रच तुला नाही बोलयच?? पण तुझे डोळे, तुझ बोलण सगळ काहीतरी वेगळच् बोलतय..आणि हे मला काल पासून जाणवत आहे..तुलापण माझ्याशी बोलयच आहे …मी खुप मोठी चूक केली माझ्या आयुष्यातली..तुला मी कधीच समजू शकलो नाही..तुझी मस्करी करत राहिलो …आणि नशिबाने बघ ना माझ्या आयुष्याचीच मस्करी करुन ठेवलिये …
मी दिल्ली ला गेलो.. तुझ्यासमोर नव्हतं यायच मला.. मी खुप त्रास दिला होता तुला..मलापण तू खुप आवडत होतीस.. मलापण वाटत होत, तूच माझी अर्धांगिनी व्हावीस पण ती योग्य वेळ नव्हती तुझ्याशी यावर बोलायची... तरीही मी हिम्मत करुण आलो होतो..तुझ्याशी बोलून तुझी माफ़ी मगायला.. पण तू खुपच चिडलेली होतीस.. मला नाही सहन झाल तुझ चिडण…
प्रेम होत ग माझपण तुझ्यावर..फ़क्त मला ते तुझ्यासारख दखवता येत नव्हतं..मग मी ठरवल आता छान शिकुन कोणीतरी मोठा बनून तुला भेटायच…पण त्याच्या आधीच तू लग्न केलेस.. मला थोडा उशीरा निरोप मिळाला कारण त्यावेळी मी भारतात नव्हतोग ..आज मी खुप प्रसिद्ध वकील आहे...समाजात खूप मान आहे मला …पण मी अजुनपन संसार करू शकलो नाही …..तुझी जागा ईतर कोणाला नाहिग् देऊ शकलो मी …तु येना परत माझ्याकडे प्लीज् …..भिक मागतो ग तुझ्याकडे विचार कर माझा.. अगदी राणी सारखी ठेवेन तुला….
प्राजक्ताला हे सगळ स्वप्न वाटत होत.. स्वतःलाच जोरात चिमटा काढुन बघितला तिने…बराच वेळ कोणीच काहीच बोलत नव्हतं…एकदम शांतता होती …तिने ऑफिस बॉय ला 2 कॉफ़ी आणायला सांगितले..कॉफ़ी घेताना ती खुप काही विचार करत होती...मला आता हा खरच आवडतो का? अणि तेव्हा तरी आवडत होता का? आज हा स्वतः हुन आला आहे मझ्याजवळ, मी काय करू? माझ मन मला खेचत आहे त्याच्याकडे काय करू मी? पण आता माझ लग्न झालय एक सोन्यासारखा मुलगा आहे माझा… जीवापाड प्रेम करणारा नवरा आहे माझा …नाहीं ..नाहिग् बाई मी असा वेडा विचार करू पण नाही शकत…
आणि एकदम जोरात बोलली नाही ..नाही हे शक्य नाही …मी माझ्या संसारात खुप सुखी आहे ..तू मला खूप आवडायचास.. पण ते माझं तरूणपनातल आकर्षण असाव कदाचित …अल्लड होते तेव्हा मी..स्वप्न पण खरी वटायची तेव्हा मला..हो जर तेव्हा आपण जवळ आलो असतो तर कदाचित खुप सुखी असतो..
पण मी आता तो विचारपण नाही करू शकत..खुप छान आहेरे परिवार माझा नको मोडू असा ..प्लीज असा परत नको भेटुस मला…छान मुलगी शोध एखादी अणि लग्न कर असा एकटा नको राहुस…चल मी निघते आता माझं घर वाट बघतय माझी …
तिचे डोळे खरतर पाण्याने भरून आले होते.. हेच तर हव होत तिला आणि आज ते समोर असून तिला ते झिड़काराव लागल होत…
ती घरी येताना ठरवून आली होती आपण फ़क्त एक गोष्ट हारलो ..ते म्हणजे अविनाशच प्रेम.. पण बाकी सगळीकडे यशस्वी झालो…हा तर बिचारा फ़क्त पैसा कमवण्यातच यशस्वी झाला..आज ती पूर्णपणे शुद्धिवर होती अगदी हसत खेळत…प्रकाशपण आज खुश झाला ..हिला नॉर्मल पाहून…तो खरच खुप छान पति होता, त्याने तिला कधीच विचारल नाही की बाई तुला काय झाल होत 2 दिवस वैगरे वैगरे….त्याला त्याची बायको पूर्ववत झाली हेच खुप होत…
सगळी काम आटोपूण झाल्यावर ती मनाशीच बोलत होती- अविनाश या जन्मात तर माझ बुकिंग अणि डेस्टिनेशन फ़क्त माझा प्रकाशच असेल बघ ..आता ही या जन्मातली अधूरी कहाणी आपण पुढच्या जन्मातच पूर्ण करू…आणि एकटीच हसली…
समाप्त..

तळ् टिप –आज माझी कथा संपली आणि अस खुपदा घडत आपल् जून प्रेम समोर येऊन ठाकत आणि मूली अविचाराने वाकड पाऊल उचलतात.त्याचे वाईट परिणाम विनाकारण सगळ्यांना भोगावे लागतात..तेव्हा आता आपल्याकडे जे आहे तेच आपल आणि बाकीच एक स्वप्न होत अस मानाव..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now