एक अधुरी कहाणी भाग 4

And He Is Back
#एक अधूरी कहानी…भाग -4
कॉलेज चालू झाला.. दोघे अगदी एकाच कॉलेज मधे आर्ट्स शाखेला तीच एडमिशन होत आणि तो कॉमर्स शाखेला ..10विला नापास झाल्यामुळे एक वर्ष सीनियर होता तो तिला ती .. ती रोज शोधायची त्याला आणि दिसला की बघत बसायची . कॉलेज मधे नीता नावाची नवीन मैत्रीण झाली होती.. तिची तिच्या लक्षात आल होत हिच त्याला चोरून चोरून पहाण, त्याच्या नकळतपणें त्याच्या मागे मागे जान.. नाहीं दिसला तर कावरेबावरे होण...
तिने एक दिवस विचारलच प्रजक्ताला: काय ग बाई काय् भानगड़ आहे?…खर खर सांग बर तुला आवडतोना तो …तर हिने अगदी खाली लाजुन मान घातली आणि पायाचा अंगठा जमिनीवर घासत उभी राहिली…तशी निशा बोलली आग लाजतेस काय बोल की…??? आम्ही नाही जाsss..अस बोलून बाईसाहेब पळूनच गेल्या की….पण मग नीताला काय् संमजायच ते समजल्…आणि इथेच गड़बड़ झाली नाहो..
अविनाश चा खास मित्र विशाल निताचा बॉयफ्रेंड तिने ही गोष्ट त्याला सांगितली आणि त्याने अविनाशला…. अविनाशला खुप घमेंड होती..
त्या घमेंडीतच तो बोलला: ”शी…ती?…no never ….अरे तुम्हा लोकांना सुन्दर वाटत असेल ती may be.. आवडत पण असेल तुम्हाला.. पण छे she is not my type.. आणि परत प्लीज़ कोणी हा विषय काढू नका राव…”..
हे विशाल ने नीताल अणि नीताने प्राजक्ताला सांगितल ..तिला हे सहनच झाल नाही..आजारीच् पडली बिचारी...
हे समजल्यावर अविनाश तिला भेटायला आला तिचे डोळे खुप रडल्यामुळे सुजले होते आणि खुप खोल गेले होते… इतक सुन्दर गुलाबाच फूल पार कोमेजुन गेल होत…
तो तिच्या खोलीत गेला तेव्हा ती झोपली होती ..आणि साहेब तिच्याकडे एकटक बघत होते..खरच खुप सुन्दर आहे ही..पण हिला स्वतःला सांगायला काय झाल होत; मला पण आवडते ही..ती मला चोरून बघते माझ्या मागे मागे येते,मला शोधत राहते हे मला चांगलाच माहित आहे .. पण मला हे तिच्या तोडून ऐकायच होत ...तर असा मैत्रिणीच्या बॉयफ्रैंडसोबत निरोप पाठवला हिने…खुप वाईट वाटल मला आणि त्या रागातच काहीपण बोललो मी…सॉरी ग प्राजक्ता really so sorry dear please get well soon dear..अस मनातच बोलून तो जायला वळाला आणि तिला जाग आली..
ती: तू…तू का आला आहेस इथे…कोणी सांगितल तुला? ..जा आधी इथून आणि परत मला तुझ तोंड पण दाखवू नकोस….आणि तिने तोंड फिरवल.
.तो काही न बोलता निघून गेला आणि त्यानंतर परत कधीच भेटला नाहि तिला…तो दूर गेला तिच्यापासून खुप दूर दिल्ली ला त्याने तिकडे admission घेतल..आणि परत कधीच गावी आला नाही. पण त्याच्या मित्राकडून नेहमी तिची विचारपुस करत असे…
तिच शिक्षण पूर्ण झाल आणि दादांनी स्थळ पाहायला सुरुवात केली..त्यातल सगळ्यात पहिलच स्थळ प्रकाशच होत आणि तेच पकक झाल….खुप स्मार्ट होता प्रकाश गवर्नमेंट मध्ये सीनियर पोस्टवर होता. एकुलता एक मुलगा न बहिण ना भाऊ..वडील काही वर्षाणपूर्वीच् देवाघरी गेले होते...आई इतकी छान होती स्वभावणे आणि रूपाने पण ..
प्रकाश तर प्राजक्ताला बघताच् तिच्या प्रेमात पडला आणि लगेच आईला सांगीतल आई मला पसंत आहे ग मुलगी तू पुढची बोलणी करुण घे…मग काय झाली की हो बोलणी अणि 2 महिन्यातच लग्न…
लग्न झाल आणि तिने अविनाशचा विषय डोक्यातून काढून टाकला…ती पण प्रकाशच्या प्रेमातच पडली.खुप जीव लावत होता तो तिला खुप प्रेम मिळत होत त्यांच्याकडून ..तिची सासुपण खुप जीव लावायची तिला…लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा प्राजक्ता घाबरुण पलंगावर बसली होती तेव्हा प्रकाश तिथे आला आणि अचानक गाउ लागला,”बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है मेरा मेहबूब आया हे”
तिला इतकं हसु आल..कारण त्याचा आवाज!! हाहाहा खुपच बेसुरा होता तो…
तिला हसताना पाहून तो लाजला आणि तिच्या जवळ जाऊन हळूच बोलला: आमचे प्रयत्न कामाला आले तर!! हेच तुझ हसु पहायच होत ग मला.. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मी तुझा फ़क्त नवरा नाही तर मित्र आहे ..तू माझ्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकतेस ..आणि काहीही घडल तरी ते इतरांकड़ूंन न समजता मला तुझ्याकडून समंजण जास्त आवडेल...काय ग तुझ कोणावर प्रेम वैगर होत का? मला खरखर सांग बरका ..आधी जो होता तो होता..तेव्हा मी नव्हतो न ते ठिक आहे पण आता इथून पुढे फ़क्त आपण दोघेच....
तिला अस कधी वाटल पण नव्हतं की आपल्यावर इतकं प्रेम करणारा नवरा मिळेल…खुप प्रेम,खुप सुख उपभोगत होती ती..जे तिला कधी तिच्या महेरीपण मिळाल नव्हतं..ते सगळ...
दोघे नेहमी फिरायला जायचे ..मूवी ला जायचे अगदी लहान मुलांसारखे भांडायचे पण...मस्त मस्त गेम्स खेळायचे..
जी स्वप्न तिने अविनाशच्या सोबतीसाठी पहिली होती ती सर्व प्रकाश पूर्ण करत होता किंबहुना त्यापेक्षा जास्तच काही छान करत होता ..तिला नेहमी ते गाण म्हणावस वाटायच.”माझ्या संसाराल दृष्ट लागू नए…..
आज तिचा पहिला वाढदिवस होता लग्नानंतराचा मस्त सरप्राइज पार्टी arrange केली होती प्रकाश ने . पण तिला हे काहीच माहित नव्हतं.बिचारी सकाळ पासून वाट पाहत होती हा कधी विश करणार ..पण नाही हों त्याने नाहीं न विश केल तिला..तिने खुप आठवण करुण द्यायचा प्रयत्न केला पण अहं नाहीच…मग काय बसल्या मैडम बैडरूम मधे रडत…
संध्याकाळी तिला कॉल आला एका निनावि माणसाचा..,"काय ग खुप सुख आहे नशिबात तुझ्या!! पण तूझ पूर्व आयुष्य माहित आहे मला.. जर ते प्रकाशला समजू नये अस वाटत असेल.. तर मला ताज हॉटेल ला येऊन भेट ..आणि हो एकटी ये..यातल कोणालाही काही सांगू नकोस.. मी वाट पाहतो" …तस घाबरण्यासारख काही नव्हतच.
जेव्हा की मी अस काही केलच नाही. हो आता मला अविनाश आवडत होता.. पण माझ पाऊल कुठेही घसरल नहिये..जाउदेत कोण आहे हा? काय करणारे? मी तर नाहि जाणार…
तिने घरतली काम आटोपलि आणि टीवी बघत बसली पण तो कॉल काही डोक्यातून जात नव्हता..4.30ला एक प्राइवेट कार आली दारात...आणि हिला निरोप मिळाला ताज मध्ये जाण्यासाठी कार आलिये..हिला तर घामच् फुटला ,अंग थरथर कापू लागले तिचे..बापरे आता तर जावाच् लागणार..याला माझ सर्वकाही माहित आहे ...घर, नवरा.. मग हा माझ घर काहीही सांगून उध्वस्त करू शकतो ..तिने पटकन आवरल आणि बसली गाडीत..
गाड़ी ताजच्या गेट मधे आली एकाणे अदबिने दरवाजा उघडला: वेलकम मैडम एन्जॉय योर स्टे अस बोलला….
ही तर चक्रवलीच काय स्टे? आता हे काय् नविन ?? कदाचित चुकून बोलला असेल हा…
ड्राईवर ने गाडीतून काही बैग्स काढल्या आणि चला मैडम अस बोलला….रिसेप्शन काउंटर वरुण चावी घेतली एक बेलबॉय आला त्याने त्या बैग्स घेतल्या.. आणि चला मैडम बोलला...ती पण यंत्रिकपने गेली त्याच्यामागे.
रूम एकदम मस्त होता ..2 मिनिट ती सगळी सिचुएशन विसरली..आपण इथे का अलोय वैगरे.. रूम चे वाशरूम ,बेड स्वछता पाहत राहिली..कोणता तरी मंद मंद सुगंध येत होता, तो तिला काही वेगळेच फीलिंग्स देत होता…..आणि अचानक मैडम भानावर आल्या अरे बापरे मी का अलिये इथे? छी मी अस स्टे न ऑल नाहि अशक्य..
तिने तिची बैग घेतली आणि बाहेर पडणार इतक्यात कॉल आला: त्या बैग्स मधे जे कपडे आहेत ते घालून तैयार व्हा मी आलोच मग बोलू आपण..
क्रमशः

🎭 Series Post

View all