Jan 28, 2022
प्रेम

एक अधुरी कहाणी भाग 3

Read Later
एक अधुरी कहाणी भाग 3


एक अधूरी कहानी…
भाग -3
©पूनम पिंगळे
हे सगळ आठवतच ती कधी घरी पोहोचली तिलापण समजल् नाही...उशीर पण खुप झाला होता 9 वाजले होते…घरात गेली तर दोघे तिची वाटच् पाहत होते…
प्रकाश : ”काय झालाय बाई तुला ?तुझी तब्येत ठीक नहिये का ? आज इतका उशीर झाला, तुझा साधा एक कॉल पण नाही ??आजपर्यंत इतकी बेजाबबदार तू कधीच न्हवतीस ….बर मी जवळ जवळ 50 कॉल केले असतील तुला ते पण तू answer केले नाहीस…काय आहे हे सगळ ????प्राजक्ताssss बोल मी तुझ्याशी बोलतोय’’…..
खरच ती चुकली तर होती आता काय् सांगणार होती ती? तिच्या मनातल वादळ तर सांगू शकत नव्हती न ती!! तशीच काहीही न बोलता कपडे बदलले अणि गेली किचन मधे …तिची जबाबदारी पूर्ण करायला. छान पैकी बेसन भाकरी, फोडणीच वरण अणि भात असा सुटसुटीत बेत केला तिने..
10.30ला सगळे जेवायला बसले...कोणीच काहीच बोलत नव्हतं….बोलायच खुप काही होत पण उगाच जेवताना कटकट नको म्हणून सगळे शांत होते... तितक्यात प्रसाद ने टीवी लावून त्या शान्ततेचा शेवट केला.
जेवण झाली सगळी आवरा आवर झाली..सागळ्यांनी थोड़ावेळ टीवी पहिला आणि झोपायला गेले. रोज सतत बडबड करणारी...अगबाई आता थोड़ी तरी शांत बस ग अस बोलून पण शांत न बसणारी ही प्राजक्ता काय झालय हिला? मी नकळत पणे दुखावल तर नाही ना हिला?
घरातल्या हस्याच्या राणीला,या सतत खळखळ वहणाऱ्या या माझ्या बायकोला झालय तरी काय? खुप खुप जीव होता त्याचा तिच्यावर आणि तितकाच तिचा त्याच्यावर..दोघे असेच न बोलता झोपूण गेले.
सकाळी नेहमीप्रमाणे ती उठली..पण स्वतःशीच् खुप काही बोलत होती...मनातल्या मनात.. अणि तिचे हात तिच्या सरावाची रोजची काम प्रामाणिकपणे पार पाडत होते...सगळ पटापट आवरूण ती ऑफिस ला गेली...आज सर येणार नाही असा कॉल आला..ही त्यांची personal assistant होती..आता सर येणार नाहित तर थोडावेळ शांत बसाव आणि मनातल्या या वादळाला थोपटाव असा विचार तिने केला.
अगदी कालपरवा घडल्यासारख सगळ तिला अठवू लागल...दोघे एकाच शाळेत होते शिकायला.अविनाश आधीपासूनच खुप हुशार होता...तो प्रत्येक गोष्टीला तितकच महत्व द्यायचा खेळ ,अभ्यास, आपल्या कला सर्वकाही करायचा तो …थोडक्यात काय खरी आयुष्याची मजा घेत होता…
प्रजक्ताच्या घरी अगदी टिपिकल मराठी वातावरण..मुलींनी काय करायचय शिकुण.. पुढे जाऊन रान्धा वाढ उष्टि काढ़ा हेच करायचय... मग काय शाळेत जाऊन आल की आईला मदत करायची... तिला न या अविनाशचा खुप राग यायचा काय् सुख उपभोगत होता तो…बोलतात न पाचो उंगलिया घी मै! अगदी तस...पण तिला तो मनापासून आवडायच त्याला शोधत राहायची ती. आणि तो त्याच्याच नादात…
10वीला दोघे एकाच वर्गात होते.. तीच कमी लक्ष् अभ्यासात अणि बाकि सगळ त्याच्याकडे.. मग काय उडाली ना दांडी तिची..नको तिथे नको तितक लक्ष दिल की अपघात तर होणारच ना ..
दादांनी सांगून टाकल आता शिक्षण पुरे.. लग्नाच पाहू…खुप विनवणी केली तिने.. एक चान्स दया दादा मी नक्की पास होइन …पण ऐकल तर ते वडील कसले..मग काय आखरी रास्ता आईच.. तिच्यापुढे जाउन घळाघळा रडली आई तूच सांगना ग दादांना…प्लीज़ ग..
मातोश्री का जादू चल गया आणि प्राजक्ता ला एक चान्स मिळाला. तिने ठरवल आता मी नीट अभ्यास कारणार आणि पास होणारच..केला अभ्यास पोरीनी आणि छान मार्क्स घेऊन पास झाली. मग आता कॉलेजला एडमिशन घ्यायच पण दादा… मग काय पुन्हा मिशन दादा विथ सपोर्ट ऑफ़ मातोश्री… आणि मिशन successful……


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now