Jan 28, 2022
प्रेम

एक अधुरी कहाणी भाग 2

Read Later
एक अधुरी कहाणी भाग 2
#एक अधूरी कहानी…
भाग -2
©पूनम पिंगळे
तो आजही तसाच स्मार्ट दिसत होता..फ़क्त काही काही केस पांढरे झाले होते आणि डोळ्याला एकदम स्टायलिश चश्मा होता..तसा तो होताच स्टायलिश..ती तर फॅनच होती त्याची...चोरून चोरून बघत बसायची त्याला..बाकी सगळे हिला बघायचे अणि ही मैडम त्याला..ज्याची त्याला खबर पण नव्हती..तिला नेहमी वटायच, हा बघेल माझ्याकडे पण छे हो पाठ्याच् लक्षच नसायच तिच्याकडे…...बर असो तर काय सांगत होते मी…
ती ऑफिस मधून निघणार इतक्यात स्वारी तिच्या समोर हजर अगदी अनपेक्षित पणे ...चेहऱ्यावर तेच लोभस हास्य घेऊन .
तो: काय मैडम ओळख आहे काय? सॉरी हा उगाच डिस्टर्ब केल तुम्हाला एक्चुअली तुम्ही इथे जॉब करता माहित नव्हतं, नाहीतर नक्कीच तुम्हाला हा चेहरा दाखवला नसता मी…. पुनः एकदा सॉरी..बर उमेश आहे का ऑफिस मधे ? भेंटायच होत त्याला..
ती: (अचानक भानावर येत) appointment आहे का ? सर भेटत नाहीत कोणाला without appointment आणि त्यात खुप उशिर पण झालाय..उद्या कॉल करून या…मी निरोप् देते तुम्ही येऊन गेलात..ती हे सगळ त्याच्याकडे न बघताच् बोलत होती..अणि तो मात्र तिच्या चेहऱ्यावरचा एकूण एक हावभाव टिपत होता अगदी प्रेमाने पहात होता तिच्याकडे.

तो: नाही हो appointment तर नहीं घेतली पण तो माझीच वाट बघतोय.. सॉरी तुम्हाला उशीर होत असेल तर जा तुम्ही, मी मोबाइल वर कॉल करतो त्याला …

तसपन तिला त्याला सोडून जावस् वाटत नव्हतं
..मग काय बसा बोलली अणि कॉल केला साहेबांना तर त्यांचा फोन बिजी..तिने ऑफिसबॉय ला आवाज दिला चहा पाणी द्यायला संगीतल आणि स्वताः फ्रेश होण्यासाठी वॉशरूम कड़े गेली….10मिनिटांनी आली पहाते तर काय हा गायब ऑफ़िसबॉयला विचारल तर तो बोलला साहेब बाहेर आले होते त्यानी पहिल अणि केबिन मधे घेऊन गेले. परत स्वताल शिव्या घालत बसली बिचारी..आजपण चान्स गेला नाहीच बोलता आल काही..आता खुप वेळ लागेल सरांना.. थांबून उपयोग नाही चल मेरी राणी.. अब घर चल तेरा कुछ नहीं होनेवाला ...निघा आता..अस स्वताशीच बोलत निघाली.. हे सगळ काय चालु आहे? कालपण दिसला आज पण भेटला..छे मी तर नंबर पण नाही घेतला त्याचा.. इतक्यात ऑफिसबॉय ने आवाज़ दिला मैडम त्या साहेबानी हे कार्ड दिलाय तुमच्यासाठी ….काय आनंद झाला तिला जसकी सगळ जगच जिंकल तिने. विजिटिंग कार्ड होंत ते त्याच….. अविनाष सहस्त्रबुद्धे…खरच होत्या त्याला सहस्त्र बुद्धया म्हणूनच अस डोक चालायच त्याच. खुप काही एकसाथ करायचा तो...प्रचंड एक्टिव.खुप खुप हुशार आणि तितकाच श्रीमंत अणि त्याहुन जास्त अखडु……..त्याची चूक नसावी ती कदाचित की तो अखडु होता ते प्रस्थच् तस होत..आमच्या गावतल्या सर्वात श्रीमंत घरात जन्म झाला होता साहेबांचा..माज तर असणारच ना...तोंडात चांदीचा चमचा घेउनच जन्म झाला होता या बाळाचा; त्यात तात्यांच्या अणि काकुंच्या लग्नाला जवळ जवळ 10 वर्ष झाल्यानंतर जगात आले महाशय… खुप नवस ,डॉक्टर्स ,हाकिम झाले आणि मग हे आले….त्यामुळे घरातील प्रत्येकाचा लड़का…
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now