एक अबोली भाग 5

हातात आलेला गुन्हेगार निसटून गेला.पण एक अबोली मात्र स्मिताच्या रूपाने वाचली.

राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
कथा मालिका फेरी
एक अबोली भाग 5

मागील भागात आपण पाहिले त्रिशाच्या वडिलांना धमकावून गप्प केले जात होते.त्यांना गुन्हेगार माहीत असूनही कुटुंबाच्या काळजीने ते गप्प होते.दुसरीकडे निता तिच्या मुलीला शोधत इथवर पोहोचली होती.सुनीता आणि त्रिशा यांचे आयुष्य संपले.स्मिता तरी जिवंत असेल का?ह्या तिन्ही बाबतीत गुन्हेगार एकच असेल का? पाहूया आजच्या भागात.


त्रिशाचा नंबर चालू करून त्यावर काही मॅसेज येतोय का?हे पहायचे अनिता आणि निशाने ठरवले होते.त्याप्रमाणे अनिताने नंबर चालू केला.त्याबरोबर पेंडींग मॅसेज येऊ लागले.त्यातील एक मॅसेज त्याच नंबर वरून होता.अनिताने मॅसेज उघडला.त्यात लिहिले होते जर आम्ही सांगतो तसे वागली नाहीस तर तुझ्या बहिणीचे तुझ्यासारखे हाल करू.

त्रिशा गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी केलेला मॅसेज होता.त्यानंतर मात्र मॅसेज नव्हते.

अनिताने त्या नंबरवर रिप्लाय दिला,"मी त्रिशाची मैत्रीण आहे.तू कोण आहेस मला माहित आहे."


त्यानंतर अनिताने आवरले आणि पोलीस स्टेशन वर गेली.तिला निशाने निता आणि स्मिताबद्दल सर्व माहिती पाठवली होती.


निशा म्हणाली,"मावशी,आपण स्मिताला काहीही झाले तरी शोधून काढू.आधी ती ज्या पत्त्यावर जाणार होती तिकडे जाऊ."


निता आणि निशा बाहेर पडल्या.हॉटेल ओशन ब्लू.ह्याच ठिकाणी स्मिता ऑडिशन करीता येणार होती.निशाने समीरला मदतीला बोलावले. समीर कॅमेरा घेऊन आला होता.नीताला एका टेबलवर बसवून निशा आणि समीर कॅमेरा घेऊन फिरत होते.


इतक्यात एक वेटर निशाकडे आला,"मॅडम तुम्ही पिक्चर वाले आहे का?"


निशा हळूच त्याच्याजवळ गेली,"हो,आम्ही कलाकार शोधत आहोत."


तो पुढे जाताना निशाकडे परत आला,"पण ते नेहमीचे साहेब नाही आले?"

समीर पुढे झाला,"त्यांनीच पाठवल आहे.ते येतील नंतर."


समीर असे म्हणाला त्याबरोबर तो वेटर पुढे झाला,"चला मग,नेहमीची खोली दाखवतो."


निशा आणि समीर काहीही न बोलता त्याच्या मागून चालत होते.वेटर तिथे खोली दाखवून थोडा वेळ घुटमळत राहिला.तेव्हा समीरने पटकन पाचशे रुपये काढून त्याच्या हातात दिले.


तसे तो खुश होत म्हणाला,"सर,आता येणाऱ्या पोर आणि पोरींना सरळ इथे घेऊन येतो.कोणाला पत्ता लागणार नाही."



समीरने खोलीची चावी घेतली. निशाकडे वळून म्हणाला त्याचा फोटो अनिताला पाठवला आहे तिला फोन करून सांग ह्याला उचल.


दोघेही घाईने आत शिरले.समीर व्यवस्थित निरीक्षण करत होता.तो हसला,"निशा,इकडे बघ इथे सगळीकडे कॅमेरे बसविण्यात आले आहेत."


निशा म्हणाली,"याचा अर्थ इथे नियोजन करून हे काम केले जात आहे."


इकडे अनिताने सकाळी त्रिशाच्या नंबर वरून केलेला मॅसेज पाहिला गेला.तिकडे मॅसेज पाहणारा सावध झाला.


त्याने लगेच त्याच्या बॉसला फोन लावला,"भाई,त्या पोरीचा मोबाईल कोणीतरी वापरत हाय.तीनी कोणाला तरी सांगितलं आसल."


पलीकडून एक शिवी हासडून उत्तर आले,"कोण हाय ते शोधा आणि गेम वाजवा. असल्या बारक्या चिरकुट कामाला फोन करू नको."


इकडे फोन ठेवल्यावर त्याने लगेच फोन लावला,"अय इंजिनियर त्या मागच्या आठवड्यात गचकली त्या पोरीच्या फोनवरून मॅसेज आलाय.तो कुठ हाय शोध.झालच तर त्ये पकडलेल पाखरू ईकुन टाकू आता."



फोन ठेवताच अस्मित ओरडला,"आयला ह्या कमी डोक्याच्या लोकांना काय कळत नाही.नुसता आपला रुबाब झाडतात.ही पोरगी इथ विकून चालणार नाही."त्


याने हळूवार इंजेक्शन भरले आणि खोलीचे दार उघडले.



इकडे अनिताला व्हॉट्स ॲप वर त्या वेटरचा फोटो आणि माहिती मिळाली.अनिताने लगेच कदम आणि साळुंके यांना बोलावले,"हॉटेल ओशन ब्लू बाहेरून ह्याला उचला आजच.लगेच इकडे हजर करा."


कदम आणि साळुंके निघाले.संध्याकाळी तो वेटर बाहेर पडला.त्याच्यापासून अंतरावर राहून कदम आणि साळुंके चालत होते.त्याने बस पकडली.नेहमीच्या थांब्यावर उतरून तो घराकडे निघालाय आणि त्याला कॉन्स्टेबल कदमने पकडला.त्याला थेट उचलून अनिता समोर हजर केला.


अनिताने सांगितले कदम ह्याच्या मोबाईलवरून हॉटेल मॅनेजरला मॅसेज करा की आई आजारी असल्याने गावाला जात आहे आणि मोबाईल बंद करा.


त्यानंतर अनिता त्याच्याकडे वळली,"नाव काय तुझ?"


तो जरा गुर्मीत म्हणाला,"हरी नाव हाय माझे."


त्याबरोबर अनिताने एक सणकन कानाखाली वाजवली,"जास्त शहाणपणा करू नको.हॉटेल मध्ये पोरींना बोलवून त्यांना विकता हे माहीत झाले आहे आम्हाला.लवकर सगळ खरखर सांगून टाक.नाहीतर तुला गायब करून टाकू."


ही धमकी ऐकल्यावर हरी घाबरला.त्याने सरळ शरणागती पत्करली,"म्हणाला एक साहेब यायचे अस्मीत म्हणून.मी फक्त आलेल्या मुलींना कोणाच्या नजरेत न येता खोलीवर पोहोचवायचो.बदल्यात भरपूर पैसे मिळत."



अनिताने पुढचा प्रश्न विचारला,"तो तुला संपर्क कसा करत असे?"


हरी म्हणाला,"दर वेळी वेगळा नंबर असतो.पण साधारण एखाद महिन्याने फोन येतो बघा."


अनिताने हरीला सोडले.फक्त त्याच्यावर पाळत ठेवली.इकडे अस्मित भडकला होता.पण नाईलाजाने नवीन पोरगी शोधायला लागणार.त्याने फेसबुक लॉगिन केले.नवीन आयडी आणि प्रोफाईल बनवून.


इकडे सकाळी पक्याने सांगितलेले काम आठवले.त्याने मॅसेज आलेल्या नंबरचे लोकेशन शोधले.लोकेशन सापडत नव्हते.इतक्यात फेसबुक वर एक रिक्वेस्ट आली.त्याने प्रोफाईल पाहिले आणि हसला.शिकार सापडली होती.आता पक्याचे काम करायला हवे.



अनिताने त्रिशाचा फोन पाहिला.मॅसेज पोहोचला होता.अनिता पटकन निघाली.एका ठिकाणी जाऊन तिने लोकेशन सेटिंग बदलली.


इकडे आस्मित शोध घेत होताच.लोकेशन सापडले.पण लोकेशन पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता,"कसे शक्य आहे. सुनीताच्या घरी आता कोणीही रहात नाही.तिथले लोकेशन कसे आले?शोधायला हवे."



सेंट्रल जेल मधून आज देवा बाहेर पडत होता.गेले चौदा वर्ष तुरुंगात त्याला स्वतःची कृत्य आठवत होती.त्याचबरोबर निता आणि त्याच्या मुलीला काही झाले नसेल ना?हा प्रश्न काळीज पोखरून टाकत होता.



हरीच्या फोनवर मॅसेज आला,"खोली तयार ठेव.पाखरू पकडायचे आहे."


हरिने लगेच तो संदेश अनिताला पाठवला.अनिताने निशाला फोन केला,"निशा,त्या हॉटेल मधून कोण रॅकेट चालवत आहे.ह्याचा शोध लागेल आता."


निशा म्हणाली,"तसे झाले तर स्मिताबाबत माहिती मिळू शकेल."


इकडे स्मिताला बाहेर देशात विकायची संधी अस्मित शोधत होता.त्याने तिचे काही फोटो पाठवले होते.देवा तुरुंगात असला तरी त्याचे जिगरी मित्र अजून ह्या धंद्यात होते.स्मिताचे फोटो पाहून त्यातला एकजण सरळ देवाला भेटायला तुरुंगात आला.त्याने फोटो दाखवले.तो म्हणाला,"भाई,निता वहिनी सारखी दिसती ही पोरगी.पण कस काय?"


देवा म्हणाला,"ही पोरगी बाहेर नाय गेली पायजे.त्या डीलरला ऑफर दे.मी उद्या भायेर येणार. मंग बघू."


अस्मित तयारीला लागला.नवी शिकार येणार होती.एवढ्यात स्मिताला एक आफ्रिकन खरेदी करतोय असा मॅसेज आला.पैसे रग्गड होते.


आधी हरीला भेटले पाहिजे.हरी वाट पहात होता.नेहमीच्या जागेवर अस्मित आला.कॉन्स्टेबल साळुंके सावध होते.त्यांनी पाठलाग सुरू केला.गावाबाहेर एका गलिच्छ वस्तीत तो रहात होता.साळुंके त्याचा फोटो मिळवण्यात यशस्वी झाले.अनिता वाट पहात होतीच.


साळुंके आत आले.त्यांनी फोटो देताच ती ओरडली,"कसे शक्य आहे? हा तर ताईच्या पुढच्या वर्गात होता.तेव्हाही त्याची घाणेरडी नजर आवडत नसे मला."

अचानक अनिताला क्लिक झाले,"यानेच तर ताईला काही केले नसेल ना तेव्हा?"


देवा बाहेर आला.त्याने आपली माणसे पेरली.अनिता आणि निशा सापळा रचून तयार होते.दुसऱ्या दिवशी एक सुंदर मुलगी बस स्टँडवर उतरली.तिच्यासमोर एक रिक्षा येऊन थांबली.ती बसताच रिक्षा सुरू झाली.


अनिता आणि तिची टीम मागावर होतीच.इकडे पक्या आणि गँग स्मितावर पहारा देत होते. ती मुलगी हॉटेलवर पोहोचली.ती आत आल्याची खात्री अस्मित करत असताना त्याला अचानक पाठीमागे एक रिक्षा दिसली त्याने ओळखले आपला पाठलाग होतोय.तो परत फिरला.


अनिता ओरडली,"कदम गाडी फिरवा.पाठलाग सुरू करा."


अस्मितने पक्याला फोन लावला,"पाखरू बाहेर काढा,माझ्यामागे पोलीस लागलेत."



पक्या पोरांना ओरडला,"उचला रे तिला.लवकर निघा."



निशाला कळेना काय करावे.इतक्यात पक्यावर पिस्तूल रोखून देवा उभा राहिला.तुंबळ मारामारी सुरू झाली त्याचा फायदा घेत निशा आणि समीर आत घुसले.त्यांनी स्मिताला सोडवले आणि बाहेर काढत होते.


इतक्यात पक्या ओरडला,"ये,थांब.नायतर गोळी घालतो."



त्याने ट्रिगर ओढला पण मध्ये देवा.आडवा आला.देवाने पक्यावर आख्खे पिस्तूल रिकामे केले आणि वळून म्हणाला,"माझ्या पोरीला घेऊन जा."



अनिता पाठलाग करत होती.काहीही करून हा सापडला पाहिजे.तरच ताईचे गुन्हेगार सापडतील. अस्मित वेगाने विचार करत होता.बाईक वाऱ्याच्या वेगाने पळत होती.अचानक तो बाईकवर उभा राहिला. समोर रेल्वे रूळ होता.अनिताला काही कळेना.बाईक वेगाने येणाऱ्या रेल्वेवर आदळली आणि अस्मित उडी मारून वर पोहोचला.एक्स्प्रेस वेगाने निघून जात होती.


अनिताला ए. सी.पी.सरांचा फोन आला,"शहरात गँगवॉर झालेय.तुम्ही पोहोचा."


अनिता हताश होऊन मागे फिरली.एक गोष्ट मात्र चांगली घडली होती.निदान एक अबोली स्मिताच्या आणि दुसरी त्या मुलीच्या रूपाने वाचली होती.भावनेला मागे ठेउन अनिता कर्तव्य पूर्ण करायला पुढे निघाली.



कोण असेल अस्मित?सुनीता आणि त्याचा काय संबंध असेल? त्याचा बिग बॉस कोण असेल? त्रिशाच्या मृत्युला कोण जबाबदार असेल?अनिता तिच्या बहिणीला न्याय मिळवून देईल का?

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन लवकरच भेटू.
एक अबोली पर्व 2 मध्ये.

🎭 Series Post

View all