Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ३२

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ३२

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश:केतनचे व मैथिलीचे एकांतात सविस्तर बोलणे झाल्यावर मैथिली केतनकडे विचार करायला वेळ मागते, केतन तिला सांगतो की तुला हवा तितका वेळ घे आणि निवांत विचार करून निर्णय घे. केतन व त्याची आई मैथिलीच्या घरून गेल्यावर राधिका ताईने मैथिलीला केतन तिच्यासाठी कसा योग्य आहे हे सांगितल्यावर थोडा वेळ विचार करून मैथिलीने केतनसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला व घरच्यांना तिने आपला निर्णय ऐकवला. लागलीच मैथिलीच्या बाबांनी निलिमा ताईंना फोन करून मैथिलीचा होकार कळविला.

आता बघूया पुढे...

केतनचा मॅसेज वाचल्यावर मैथिलीच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आले. मैथिली मॅसेजला रिप्लाय देणार इतक्यात केतनचा अजून एक मॅसेज आला,'मैथिली तु खूप छान लाजतेस' 

मैथिली मॅसेज करते,' तुला कसं कळालं की मी लाजत आहे'

'मला नाही तर आणखी कोणाला कळणार' केतनचा लगेच रिप्लाय आला.

अशा रीतीने केतन व मैथिलीचे बराच मॅसेजेस चालू होते. केतनसोबत बोलता बोलता मैथिलीला आठवले की आपलं लग्न जमल्याची बातमी गौरी व पुजा मॅडमला सांगायला हवी. गौरीला तर फोन करून सांगेल पण पुजा मॅडमला भेटूनच गुड न्युज सांगेल. मैथिलीने लागलीच पुजा मॅडमला मॅसेज केला,'हाय, उद्या फ्री असल्यावर पिझ्झा शॉपमध्ये भेटूया, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.'

पुजा मॅडमचा नेहमीप्रमाणे रिप्लाय आला, 'ओके'

पुजा मॅडमचा रिप्लाय बघून मैथिली मनातल्या मनात म्हणाली," या पुजा मॅडमना रिप्लाय देतानाही कंजूष पणा करतात, समोरच्याच्या मूडचा सत्यानाश करतात.जाऊदेत आता पहिले गौरीला फोन करते."

मैथिलीने गौरीला फोन केला, ती बिजी असल्याने तिने फोन काही उचलला नाही. मैथिली तिच्या कामाला लागली. काही वेळाने गौरीचा मैथिलीला फोन आला,

"हॅलो काय म्हणतेस? अरे मी ड्युटीला होते."

मैथिलीला गौरीचा आवाज लो वाटला म्हणून तिने विचारले," गौरी तुला बरं नाहीये का? आवाज खूपच लो येत आहे."

"मी बरी आहे, तुझ्या फेवरेट देसाई मॅडमने आमची वाट लावलीय, इथे काम करून करून जीव जायची वेळ आली आहे,दयामाया नावाची गोष्टच नाहीये, अस वाटतंय की थोड्या दिवस सुट्टी घेऊन कुठेतरी लांब फिरायला जावे, चल येतेस का? मी प्लॅन करते.तेचतेच शेड्युल बोअर झालंय ग, I need some change." गौरीने तिचे रडगाणे सांगितले.

यावर मैथिली म्हणाली," गौरी तुझा प्रॉब्लेम काय आहे सांगू, तुला कुठल्याच परिस्थितीत ऍडजस्ट होता येत नाही, कितीही चांगलं असलं तरी त्यात छोटीसी तरी चूक तु शोधतेसच, म्हणजे समजा तुझ्या समोर अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास असेल ना तरी तो अर्धा रिकामाच का आहे? किंवा तो अर्धा भरलेलाच का आहे? असे तुला प्रश्न पडतात. परिस्थिती प्रमाणे आपण थोडाफार बदलायला हवं."

मैथिलीचं अर्धवट वाक्य तोडत गौरी म्हणाली, "तत्वज्ञानी मॅडम मी सध्या आपले तत्वज्ञान ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये, माझं राहूदेत तु फोन कशाला केला होतास?"

"अरे हो मूळ विषय बाजूलाच राहिला आणि तुझ्यावरच बोलणं सुरू झालं,मी तुला आता एक अशी बातमी सांगणार आहे की ती ऐकून तुझ्या मूडची ऐशी की तैशी होऊन जाईल." मैथिली बोलली.

गौरी म्हणाली," आपण कुठे फिरायला जाणार आहे का? आता फक्त ही एकच बातमी ऐकून मी खुश होईल."

" हे बघ गौरी आता इथून पुढे फिरण्यासाठी तु दुसरा कोणीतरी शोधून घे कारण मी तर शोधला आहे."मैथिली अगदी सहजच बोलून गेली.

मैथिलीच्या बोलण्यामागचा मतीत अर्थ न कळाल्याने गौरी म्हणाली," माझ्या मैत्रीचे हेच मोल जाणले आहेस का? नवीन कोणीतरी भेटल्यावर मला विसरून जाणार आहेस का? हीच तुझी मैत्री का?"

मैथिली म्हणाली," मंद गप्प बस, मी काय बोलले हे नीट ऐकले असते ना तर त्यामागचा अर्थही तुला कळाला असता."

"अरे यार मैथिली सरळसरळ सांग ना, तुला काय बोलायचे आहे?" गौरी वैतागून म्हणाली

मैथिली हसून म्हणाली," तुला तुझ्याच भाषेत सांगावं लागेल,मुझे मेरे सपनो का राजकुमार मिल गया है"

यावर गौरी म्हणाली," खरंच, कुठे? आणि कधी भेटला?"

सर्व काही ऐकण्यासाठी गौरी खूपच उत्साहीत झाली होती. गौरीला असलेली उत्सुकता जास्त न ताणता मैथिली म्हणाली," एक तर तु त्याला ओळखतेस आणि दुसरं म्हणजे तु त्याच्याशी बोलली सुद्धा आहेस."

गौरी आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "तुझ्या ओळखीतल्यांपैकी मी फक्त डॉ केतनसोबतच बोलले आहे, म्हणजे डॉ केतन तुझ्या स्वप्नाचा राजकुमार आहे का?"

मैथिली शांततेत म्हणाली," हो अगदी योग्य ओळखलस."

मैथिलीने गौरीला इतंभूत कथा सांगितली.

दुसऱ्या दिवसाची मैथिलीची सकाळ केतनच्या गुड मॉर्निंगच्या मॅसेजने झाली. पुजा मॅडमला भेटायला जायचे असल्याने गौरी पटकन झोपेतून उठली व आपल्या कामाला लागली, स्वतःचे आवरून झाल्यावर मैथिली आईला कामात मदत करायला गेली, ती आईला म्हणाली," आई एवढ्या सकाळी सकाळी सौरभ आणि बाबा कुठे गेलेत?"

"अग सौरभ आज सकाळीच कॉलेज असल्याने तो पहाटेच उठून गेला, बाबांनी त्याला बसस्टँडवर सोडले आणि तेही कंपनीत गेलेत." आई उत्तरली

यावर मैथिली म्हणाली," सौरभ मला भेटून सुद्धा गेला नाही, यावेळी तो माझ्याशी फारसा काही बोलला पण नाही."

आई म्हणाली," अग तो अभ्यासाच्या टेन्शन मध्ये असेल, कॉलेजमध्ये सध्या सबमिशनची गडबड सुरू आहे असं काहीतरी तो म्हणत होता, संध्याकाळी फोन करून बोल म्हणजे तुझ्या मनातील रुखरुख बंद होईल."

"हो आई तसंच करते" मैथिली बोलली.

थोड्या वेळाने आई मैथिलीला म्हणाली, "मैथिली तुझे बाबा म्हणत होते की साखरपुडा पुढील आठवड्यात उरकून घेऊ,पुढे मग सौरभची परीक्षा पण आहे, तुला काय वाटतंय." 

"आई तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा पण शॉपिंगलाही वेळ मिळाला पाहिजे हे लक्षात घेऊन ठरवा" मैथिली बोलली

आई म्हणाली,"आज मी निलिमा ताईंसोबत या विषयावर बोलून घेते, शेवटी त्यांचेही मत विचारात घ्यावे लागेल ना."

दुपारच्या वेळी मैथिली पुजा मॅडमला भेटायला पिझ्झा शॉपमध्ये गेली, तिथे मैथिली जाऊन मॅडमची वाट बघत बसली, काही वेळात पुजा मॅडम तिथे आल्या, त्या म्हणाल्या," सॉरी मैथिली खूप वाट बघायला लागली का? अग पेशन्ट्स संपायचे नावच घेत नव्हते."

मैथिली हलकीसी स्माईल देत म्हणाली, "इट्स ओके मॅडम, I can understand."

पिझ्झाची ऑर्डर दिल्यावर पुजा मॅडम म्हणाल्या," काय झालंय ग? काय महत्त्वाचं बोलायचं होतं? Anything serious?"

मैथिली म्हणाली," तुमच्याकडून मला काही टिप्स लागणार आहे?"

"टिप्स आणि माझ्याकडून? कशाच्या बाबतीत?" पुजा मॅडमने प्रश्न विचारला

मैथिली हसून म्हणाली," आता लग्न झाल्यावर तुमच्याकडून टिप्स घ्याव्याच लागतील ना?"

"लग्न झाल्यावर म्हणजे? मला समजलं नाही"

पुजा मॅडम बोलली.

मैथिली वैतागून म्हणाली,"देवा मला मैत्रिणी कश्या दिल्या आहेत, एकीलाही मला काय म्हणायचंय ते कळत नाहीये."

या वाक्यावर पुजा मॅडम हसून म्हणाल्या, "मैथिली मला नाटक करता येत, तुझ्या होणाऱ्या सासूबाई आणि माझ्या सासूबाई मैत्रिणी आहेत म्हटलं, निलिमा काकूंनी कालच आईंना तुझं आणि डॉ केतनचं लग्न जमल्याच सांगितलं होतं. तुझी excitement कमी होऊ नये म्हणून मी न कळल्यासारखं वागत होते. Anyways heartiest congratulations, I'm so happy for you. Dr ketan is perfect for you."

पिझ्झा खात खात मैथिली व डॉ पुजा मध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या.

©®Dr Supriya Dighe

 

 

 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now