एक आगळेवेगळे लग्न भाग ११

Maithili is going to meet nilima tai, who is owner of boutique where maithili's mother works

मागील भागाचा सारांश: मैथिली नवीन हॉस्पिटलमध्ये हळूहळू रुळू लागते. मैथिलीची मैत्री डॉ पुजासोबत होते, डॉ पुजा व मैथिलीचा स्वभाव विरुद्ध असल्याने त्यांच्यात इतकी चांगली मैत्री कशी झाली? हा प्रश्न हॉस्पिटल मधील उत्तर स्टाफ सोबत केतनलाही पडला. केतनने हा प्रश्न डायरेक्ट मैथिलीला विचारला. मैथिली व केतन मध्ये मैत्री ह्या विषयावर बरीच चर्चा झाली, चर्चेच्या शेवट केतन म्हणाला की नाशिकमध्ये त्याचे कोणी जवळचे मित्र नाहीयेत यावर मैथिली त्याला म्हणाली की मी जरी तुमची मैत्रीण नसले तरी तुम्हाला माझ्याशी काही शेअर करावे वाटले तर करू शकता.

आता बघूया पुढे....

केतनसोबत बोलणे झाल्यावर मैथिलीच्या डोक्यात विचार आला की आपण उगाच केतन सरांना म्हणालो की तुम्ही माझ्यासोबत तुमच्या मनातील गोष्टी शेअर करू शकता, आपण उगाच आगाऊपणा केल्यासारखा वाटतोय. हॉस्पिटल मधून घरी जातानाही मैथिली त्याच विचारात होती, ती विचारात असलेली पाहून पुजाने तिला विचारले," मैथिली कसल्या गहन विचारात आहेस? काय झालंय?"

"जे झालंय ते तुमच्यामुळेच" मैथिली रागात म्हणाली.

पुजा म्हणाली," माझ्यामुळे! आता मी काय केलंय? मला खूप भूक लागली आहे. आपण पिझ्झा खाऊयात. खाता खाता मला सांग माझं काय चुकलंय म्हणून"

मैथिली आश्चर्याने पुजाकडे बघत म्हणाली, "तुम्ही कशा आहात ना, इथं मी कसल्या विचारात आहे आणि तुम्हाला खायचं पडलंय"

पुजाने मैथिलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी साईडला घेतली व म्हणाली, "मॅडम उतरा खाली, इथे खूप छान पिझ्झा भेटतो. पोटात दोन घास गेले की माझ्याबद्दलचा जो राग असेल तो शांत होईल"

दोघीही गाडीतून उतरून पिझ्झा शॉपच्या इथे जातात. पुजा पिझ्झाची ऑर्डर देते व मैथिलीला विचारते," बोल काय चुकलं आहे माझं?"

मैथिली म्हणाली," तुम्ही इतर लोकांशी रूढ वागतात, पूर्ण हॉस्पिटलला प्रश्न पडला आहे की आपल्यात इतक्या कमी वेळात एवढी चांगली मैत्री कशी होऊ शकते?"

पुजा हसून म्हणाली, " म्हणजे तुझ्याशी मैत्री केली ही माझी चुक आहे का?"

मैथिली म्हणाली, " तस नाहीये, केतन सरांनी मला हाच प्रश्न विचारला होता आणि त्याचे उत्तर देताना माझ्या व त्यांच्यात मैत्री या विषयावर चर्चा झाली, चर्चेचा शेवट असा झाला की आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करायला एक तरी मित्र आपल्या जवळ असायला पाहिजे आणि मी त्यांना बोलता बोलता बोलून गेले की तुम्हाला जर काही शेअर करावं वाटलं तर माझ्याशी बोलू शकता"

पुजा म्हणाली," मग यात काय झालं? तशीही तु डॉ केतनला आधीपासून ओळखतच होतीस ना"

मैथिली वैतागून म्हणाली,"हो पण आमच्यात इतकीही ओळख नव्हती की मी डायरेक्ट असं बोलू शकेल"

पुजा पुढे म्हणाली," मैथिली इट्स ओके, एवढं रिऍक्ट व्हायला काही झालं नाहीये आणि तसही डॉ केतन समजदार आहेत, ते तुझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेणार नाही, ते जाऊदेत पण डॉ केतनसोबत बोलली तु आणि या सगळयात माझी काय चुक?"

मैथिली म्हणाली," सॉरी तुमची काहीच चुक नाहीये, मी अशीच बोलले. एनिवेज पिझ्झा यम्मी होता."

पुजा मैथिलीला चिडवण्यासाठी म्हणाली, "डॉ केतनसोबत तु मैत्री करूच शकते, तसा त्यांचा स्वभाव छान आहे, तुमच्या दोघांची चांगली गट्टी जमू शकते आणि हो एक महत्त्वाची गोष्ट डॉ केतन अविवाहित आहेत आणि लग्नासाठी मुलींची शोध मोहीम चालू आहे"

मैथिलीने भुवया उंचावून पुजाकडे बघितले, "पुजा मॅडम तुमच्या बोलण्याचा ओघ मला समजतो आहे. तुम्हाला डॉ केतन बद्दल एवढी माहिती कशी?"

पुजा म्हणाली," अग ते रहायला आमच्याच एरियात आहेत आणि माझ्या सासूबाई व त्यांच्या आई मैत्रिणी आहेत सो त्यांच्याकडून कळलं, त्या मला म्हणाल्या की केतनसाठी तुझ्या नजरेत एखादी चांगली मुलगी असेल तर सुचव, मी मनात म्हणाले माझ्या नजरेत एक मुलगी आहे पण ती चांगली आहे की नाही माहीत नाही"

मैथिली रागाने पुजाकडे कटाक्ष टाकला व म्हणाली," आपण आता निघायला हवंय."

पुजा म्हणाली," हो ना , माझ्या सासूबाई म्हणताय मैथिली सोबत मैत्री झाल्यापासून हल्ली तुला खूप उशीर होत आहे"

घरी पोहोचल्यावर मैथिली फ्रेश होत असते तेव्हा तिची आई तिला आवाज देते.

"आई येते ग दोन मिनिटं थांब" मैथिलीने आईच्या आवाजाला उत्तर दिले.

"काय ग आई काय म्हणत होतीस?" मैथिलीने आईकडे येतायेता विचारले.

आई म्हणाली," मला निलिमा ताईंच्या घरी जायचे आहे, तु माझ्यासोबत येते का?"

मैथिली म्हणाली," पण तुला यावेळी त्यांच्या घरी का जायचे आहे?"

आई म्हणाली," अग ताईंना आज बुटीकमध्ये चक्कर आली होती, त्यांची तब्येत बरी नाहीये, त्यांना माझ्या हातची शेवयाची खीर खूप आवडते. म्हटलं अनिशा खीर केलीच आहे तर त्यांना थोडीफार नेऊन द्यावी तेवढीच त्यांच्या तोंडाला चव येईल"

मैथिली म्हणाली," आई मी तिकडे येऊन काय करू? तुम्ही गप्पा मारत बसाल आणि मला एकटीला तिकडे बोअर होईल "

आई म्हणाली," अजिबात नाही होणार, तु निलिमा ताईंना भेटली नाहीये ना म्हणून अस बोलत आहेस."

मैथिली म्हणाली," बरं ठीक आहे येते मी, तसही तुझ्या तोंडून त्यांच्या बद्दल खूप काही ऐकलं आहे, कधीपासून भेटायची इच्छा होतीच."

मैथिली व आई निलिमा ताईंच्या घरी जातात. निलिमा ताई मैथिलीला व तिच्या आईला बघून आश्चर्य व्यक्त करून म्हणतात, " अग भारती तु इकडे या वेळेला कशी?"

मैथिलीची आई हातातला खिरीचा डबा त्यांच्याकडे देत म्हणाली," तुमच्या आवडीची शेवयाची खीर आणली आहे"

निलिमा ताई म्हणाल्या," अरे वा माझ्या आवडीची खीर आणली आहेस"

मैथिलीची आई म्हणाली," ताई तुम्हाला बरं वाटतंय का? तुमची तब्येत कशी आहे?"

निलिमा ताई म्हणाल्या," मला काय झालंय? मी ठणठणीत बरी आहे, ऍसिडिटी मुळे चक्कर आली असेल आणि हो केतन आल्यावर त्याला मला चक्कर आल्याबद्दल सांगू नकोस, तुम्ही उभ्या का बसा ना"

मैथिली व तिची आई सोप्यावर बसल्या. निलिमा ताईंनी दोघींना पाणी दिले. मैथिलीकडे बघून त्या म्हणाल्या," ही मैथिली आहे ना?"

मैथिलीची आई हसून म्हणाली," हो अगदी बरोबर ओळखलंस, तुमची व मैथिलीची भेट झालेली नव्हती तर म्हटलं चला आपण जातच आहोत तर सोबत मैथिलीलाही घेऊन जाऊ."

निलिमा ताई म्हणाल्या," अग बरं केलंस घेऊन आलीस, कशी आहेस मैथिली? तुझ्या बद्दल तुझ्या आईकडून खूप ऐकलं होतं. नाशिक मानवते की नाही"

मैथिली म्हणाली," काकू मी मजेत आहे, मीही तुमच्या बद्दल आईकडून नेहमीच ऐकत आलीय, तुम्हाला भेटण्याची मनात कधीपासून इच्छा होती, तुम्हाला भेटण्याची इच्छा आज पूर्ण झाली. तुम्ही कश्या आहात? आई म्हणाली तुम्हाला दुपारी चक्कर आली होती, तब्येतीकडे असं दुर्लक्ष करू नका."

निलिमा ताई म्हणाल्या," अगदी माझ्या मुलासारखं बोललीस, तब्येत म्हटलं की त्याच्यातलाही डॉक्टर लगेच जागा होतो."

मैथिली म्हणाली," काकू तुमचा मुलगा डॉक्टर आहे का?"

निलिमा ताई म्हणाल्या," हो माझा मुलगा डॉक्टर आहे (तेवढ्यात गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो) बघ आलाच असेल, तुझी आणि त्याचीही आज भेट होईल."

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all