असं का झालं? ( भाग -१)जलदलेखन स्पर्धा

Sad love story

 जलद लेखन स्पर्धा - नोव्हेंबर

विषय - अधूरी प्रेमकहाणी 

शीर्षक - असं का झालं?

(भाग -१)


नंदूला एका गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटत होते.
त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्याचे नावही पोलिसांच्या फाईल मधे नोंद झाले होते पण त्याला हे ही कळत होतं की त्याने काहीही केलं नाहीय.
त्याच्या शरीरावरच्या जखमा बघता त्याला उपचारांची गरज होती म्हणून पोलिसांच्या कस्टडीत ठेवण्याऐवजी त्यांच्याच देखरेखीखाली त्याला सरकारी इस्पितळात भरती करण्यात आलं.


असं का व्हावं? या एका प्रश्नाने त्याला भंडावून सोडलं होतं.

इतरांप्रमाणे तो ही तरूण होता , होतकरू होता. त्यालाही मन व भावना होत्या. मग देवाने त्याच्यासोबतच असा अन्याय का करावा?
हा प्रश्न भेडसावत होता.
डोक्यावर कितीही ताण दिला तरीही त्याला त्या संध्याकाळचं पुढचं काहीच आठवत नव्हतं .

पोलिस दरडावून विचारत होते पण जख्मी अवस्थेत त्याला उत्तरांपेक्षा वेदनांची तीव्रता जास्त वाटत होती.

श्यामलचा चेहरा आठवला. ते मंद स्मित आणि ते डोळ्यातलं हसू! कुठे आहे ती? मी शरीराने एवढा स्ट्राँग नाही तर ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल ?

घटनास्थळी तो बेशुद्ध झाला होता. पुढचं त्याला अाता याक्षणी काहीच आठवत नव्हतं .

रूपेश आणि प्रमोदने त्याला मारलं होतं इतकं त्याला आठवत होतं. अजून कोणीतरी एक अनोळखी मुलगा पण सोबत होता तर!

पण त्याम्हणजे चौरस्त्याच्या टपोरी मुलांच्या ओळखीला मैत्री म्हणावं का ? असा प्रश्न राहून राहून आता मनात येत होता.

कुणीही विचारलं तर तो कोण मित्र, मग गल्लीतले की कोपर्‍यांवरचे कोणीही विचारलं तर ते माझ्या मित्र आहेत असं तो सगळ्यांच्या बाबतीतच सांगायचा.

आज त्याला कळत होतं ओळखीची असणे, परिचित असणे, कुणीतरी माहित असणे आणि ते खरच मित्र असणे यात वेगळेपणा आहे . खरंच तो फरक होता. ते जर खरे मित्र असते तर असं केलं असतं का?

त्याला अजूनही त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर कोणीच देत नव्हतं उलट त्यालाच जाब विचारला जात होता.
दवाखान्यात ऍडमिट होता, बाजूला पोलिसांचा पहारा होता, ते देखील काही सांगत नव्हते.

\"तू बरा हो मग बघू .\" असं म्हणत होते.

दोन दिवस त्याच्या जखमांना मलमपट्टी करून तो ठीक होईपर्यंत त्याला काहीच सांगितलं गेलं नाही.

दोन दिवस त्याच्या जखमांना मलमपट्टी करून तो ठीक होईपर्यंत त्याला काहीच सांगितलं गेलं नाही.

जेव्हा त्याला पुन्हा पोलीस कस्टडीत आणण्यात आलं आणि मग पोलिसांनी चौकशी सुरू केली.

शिंदे हवालदारांनी पी एस आय समोर विचारलं,

"बोल रे त्या मुलीचे नाव काय?"
" शामल."

" कोण लागते तुझी?"
"---"
"बोल ना बहिण , मैत्रीण , प्रेयसी, बायको ?"

"साहेब . . म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे ती?"
ते मिश्किलपणे हसले, सरांकडे पाहून कदाचित त्याच्या दिसण्याला किंवा अवताराला पाहून म्हणाले असतील.
" बरं मग काय करतोस तू ?"

"बीसी एस च्या फा. . फायनल इयरला आहे."

" बर ती काय करत होती?"

" ती नोकरी करते साहेब , एका फॅक्टरीत कामाला होती."

"अजून काय माहित आहे तिच्याबद्दल तुला ?"

" पण काय माहिती? म्हणजे तिच्याबद्दल? तसं काही नाही सर. अभ्यासात हुशार आहे,चांगली आहे."

" तिच्या घरची काय माहिती आहे तुला?"

"सर ते. . तिच्या वडिलांची पिठाची गिरणी आहे, मी दळण आणायला जायचो नेहमी आणि आई घरी मसाले वगैरे करून विकते. म्हणजे आता तर या वरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो."

"तिच्या घरी कोण आहे?"

"सर , काका काकू व ती आणि तिची छोटी बहीण.बस्स! चांगले लोक आहेत सर!"

" मग असं का केलंस तू?"

" काय केलं मी ?"

या प्रश्नावरती पोलिसांनी पटकन हात उगारला होता परंतु इन्स्पेक्टर म्हणाले ,"नाही शिंदे शांततेने घ्या, तो जखमी आहे. थर्ड डिग्री वापरू नका. वेळ द्या तो सांगेल, सगळं सांगेल."

क्रमशः 


लेखिका -©®  स्वाती बालूरकर, सखी

दिनांक  २९.११ .२२

🎭 Series Post

View all