व्हॅनिला केक... बिना अंड्याचा

त्या नंतर त्यात एक जाळी किंवा छोटी प्लेट टाकून त्यावर केकचे मिश्रण ओतलेले भांडे ठेवावे आणि सुमारे पंचवीस मिनीट मंद आचेवर केक बेक करावा. नंतर झाकण उघडून केक झाला आहे की, नाही ते चाकूच्या साहाय्याने तपासावे.


साहित्य...

१ कप मैदा
१/२ कप दही
१/२ कप साखर पावडर
१ चमच बेकिंग पावडर
१/२ चमच सोडा
१/४ कप तेल किंवा तूप किंवा बटर
१ चमच व्हॅनिला इसेन्स


कृती..

प्रथम एका स्वच्छ भांड्यात १/2 कप दही, १/२ कप साखर पावडर, १ चमच बेकिंग पावडर, १/२ चमच सोडा सर्व एकत्र करून चांगले मिसळून घ्या. त्यानं नंतर हे मिश्रण साधारण पाच मिनिट तसेच राहुद्या. पाच मिनिटांनी हे मिश्रण छान फुलून वर येईल.
त्यानंतर त्यात बारीक गाळणीने गाळून घेतलेला १ कप मैदा, १/४ बटर, किंवा तेल किंवा तूप टाका आणि सर्वात शेवटी १ चमच व्हॅनिला इसेन्स टाका.

ज्या भांड्यात आपल्याला केक बनवायचा आहे त्याला थोडे तेल लावून ग्रीस करून घ्यावे त्यानंतर त्यावर थोडा मैदा भुरभूरवून घ्यावा. नंतर त्यात केकचे मिश्रण घालावे.
सगळे मिश्रण छान मिसळून घ्यावे. त्यात कोत्याही गाठी राहता कामा नये.
ज्या भांड्यात आपल्याला केक बनवायचा आहे त्याला थोडे तेल लावून ग्रीस करून घ्यावे त्या नंतर त्यावर थोडा मैदा भुरभूरवून घ्यावा. नंतर त्यात केक चे मिश्रण घालावे.


इथे मी ही रेसिपी कुकर मध्ये कशी करावी हे सांगणार आहे.


वरील कृती करताना एक कुकर घेऊन त्यात तळाशी थोडे मीठ किंवा वाळू घालून तो कुकर दहा मिनिट गरम करून घ्यावा.
त्या नंतर त्यात एक जाळी किंवा छोटी प्लेट टाकून त्यावर
केकचे मिश्रण ओतलेले भांडे ठेवावे आणि सुमारे पंचवीस मिनीट मंद आचेवर केक बेक करावा.
नंतर झाकण उघडून केक झाला आहे की, नाही ते चाकूच्या साहाय्याने तपासावे.


टीप:
कुकर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा. कुकरच्या झकानाची रिंग आणि शिट्टी काढून मग झाकण लावा.


दिलेल्या पद्धतीने व्हॅनिला केक बनवून बघा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.


धन्यवाद.