Nov 30, 2021
वैचारिक

दुवा भाग २

Read Later
दुवा भाग २

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

उमा पिंटूच्या जवळ आली. तिची चाहूल लागताच त्याने मान वळवून तिच्याकडे पाहिलं, अन् हलकस स्मित केले. उमा समंजस आणि मॅच्युअर होती. तिने पिंटूला नेहमीच स्वत: सोबत कम्फर्टेबल फील करवल होतं. आपली आदब राखून ती त्याची चांगली मैत्रीण झाली होती. त्यामुळे पिंटूला आपल्या आईचा धाकही होता, आणि तिच्यासोबत सर्वाधिक मोकळेपणाही वाटायचा. तो आपल्या मनातलं सगळं तिच्याशी शेअर करायचा. ती जे सांगेल ते शांतपणे ऐकून, समजून घ्यायचा. तीही त्याला पटेल अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट समजवायची. त्यामुळे तो तिच्या शब्दाबाहेर नव्हता.
उमानं त्याच्या पुढ्यातल पुस्तक बाजूला सारलं, अन् टेबलाला टेकून बसली. ती गप्पा मारण्याच्या मूडमध्ये आहे हे पिंटूने ओळखलं. तरीही तो म्हणाला

" ममा अगं मला.."

" राहू दे रे एका दिवसाने काही बिघडत नाही. तसंही आता तुझा मूड नव्हता. उद्या थोडा जास्त वेळ कर. मला सांग.. "
मग तो तिला शाळेतल्या गमती जमती सांगण्यात रंगून गेला. आपोआप त्याच्या चेहऱ्यावरची उदासीनता, गंभीरपणा जाऊन तो मोकळेपणाने हसू बोलू लागला. बोलताना उमाचं त्याच्याकडे बारीक लक्ष होतंच. ती मध्येच म्हणाली -

" आता बघ कसा छान फ्रेश दिसतोयस. मी आले तेव्हा अगदी उदास, गप्प गप्प बसून होतास. पपा ओरडले म्हणून का ? "
पिंटू ने मान खाली घातली.

" तशी तर तु चुकलास तर मीही चिडते ; पण तू पुन्हा लाडाने माझ्या जवळ येतोसच ना ? कारण तुला माहित आहे ममाचा राग आपल्या काळजीपोटीच असतो. हो ना ? "

त्याने हलकेच होकारार्थी मान हलवली.

" तसंच पपांचही आहे. त्यांची पद्धत थोडी वेगळी असते, पण तेही तुझ्या भल्यासाठीच असतं रे राजा. "
तो शांतपणे तिचं ऐकत होता.

" हे बघ. पंपांना तू काही मागितलस, तर ते देतात ना ? "
त्यानं मानेनेच होकार दिला.

" ख्रिसमस, उन्हाळ्याच्या व्हेकेशन्स मध्ये आपल्याला नेहमी फिरायला घेऊन जातात ना. "

" हं." तो हळूच म्हणाला.

" मग ते जर तुला इतका जीव लावतात, तुझं सगळं ऐकतात तर तुझ्याच भल्यासाठी ते तुझ्यावर एखादेवेळी रागावू शकत नाही का ? "

पिंटू काही बोलला नाही. त्याला आपल्या हळूहळू पटत असल्याचं उमाच्या ध्यानात आलं.

" तू मात्र पपा थोडेसे चिडल्यावर मनातल्या मनात कुढतोस. ते घरात असताना टीव्ही बघायला, खेळायला भितोस. त्यांच्याशी कामाशिवाय धड बोलत नाहीस‌. जसं तुझ्यावर ओरडल्या मुळे तू रूसून बसतोस, तसंच तुझ्या अशा वागण्याने त्यांनाही वाईट वाटत. तुझ्या या अति घाबरण्यामुळे तेही भिऊन जातात. मला एकदा म्हणत होते - \" मी पिंटूशी फारच खडक वागतो का ? \"

त्याने एकदम मान वर करून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर वाटणारी शरम, पश्र्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवून उमा पुढे म्हणाली

" पपा आहेत ते तुझे. त्यांचं चिडण, रागावणही तुझ्या चांगल्यासाठी असतं. तु त्यांना घाबरून राहावं यासाठी नाही. वडिलांबद्दल भीतीही असावी ; पण ती आदरयुक्त, प्रेमयुक्त असावी, अवास्तव नाही. तू पपांना नीट ओळखलं नाहीस. मनातले त्यांच्या बद्दलचे गैरसमज, अति भीती काढून, त्यांच्याशी मोकळेपणाने वागत बोलत जा. मग त्यांच्या मनात तुझ्या साठी किती माया, प्रेम आहे हे तुला समजेल."

मग थोडावेळ त्याच्याशी बोलून ती उठली, अन् जायला निघाली. तोच पिंटूने तिला हात पकडून थांबवलं. ती वळून त्याच्या जवळ येताच तो तिला बिलगला. तीही त्याच्या केसांवरून हळूवारपणे हात फिरवू लागली.

" थॅंक्यू."

ती फक्त हसली. बोलली काहीच नाही.
एकदम त्याच्या मनात विचार आला - \" अरेच्चा ! पुढच्याच आठवड्यात पपांचा वाढदिवस आहे. आपल्या पिगी बॅंकेच्या पैशातून त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊयात. काय घ्यावं बरं ?

समाप्त

@ प्रथमेश काटे

मराठी कथा ( प्रेम, भय, गूढ, विनोदी ) व लेख

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing