दुष्काळात आशेचा किरण...

शाम तसाच उभा होता, गृहपाठ करायला वही नव्हती, बाईंनी वर्गाबाहेर काढल, बाहेरून तो काय शिकवतात ते ऐकत होता, कसा तरी दिवस गेला,

आई अग अण्णा कुठे गेले? यायला हवे होते एवढ्यात ,

का रे काय झालं रे शाम ,..... आई विचारत होती

शाळेत जायच आहे मला, वही पुस्तक नाही आहे... बाई बसू देणार नाही वर्गात, आज अण्णा घेवून देणार होते सामान,..... शाम

येतील ते चल तु जेवून घे आधी..... आई बोलली ,

शाम बसला खरा जेवायला पण त्याच सगळ लक्ष दाराकडे होता, 12 वाजले 12.30 झाले अण्णा आले नाहीत.... शाम तसाच शाळेत गेला,

प्रार्थना झाली बाई वर्गात आल्या,

झाला का गृहपाठ? बाई विचारात होत्या,..... येवून वह्या टेबलावर ठेवा सगळ्यांनी,

शाम तसाच उभा होता, गृहपाठ करायला वही नव्हती, बाईंनी वर्गाबाहेर काढल, बाहेरून तो काय शिकवतात ते ऐकत होता, कसा तरी दिवस गेला,

घरी आला तर अण्णा आले होते, आनंद झाला त्याला, उत्साहात बोलला चला अण्णा वही पाहिजे, तुम्ही बोलला होता,

घेवू पुढच्या वेळी ,..... अण्णा

नाही..... आजच पाहिजे, बाई बसू देत नाही वर्गात,.... शाम रडकुंडीला आला होता

ह.. पाहू....... म्हणून अण्णा बाहेर निघून गेले,

शाम चिडला आईवर, तुम्हाला काही काळजी आहे की नाही माझ्या शिक्षणाची? रोज शिक्षा होते मला, वही नाही पुस्तक नाही, रोज बाहेर उभ करतात मला

तसा आईने डोळ्याला पदर लावला,

काय झाल आई? , का रडतेस?..... शाम गप्प बसला

काही नाही जा खावून घे काहीतरी, आणू तुला सगळ सामान.

घरची परिस्थिती खूप गरिबीची होती, शेताचा एक छोटासा तुकडा वाटणीत मिळाला होता , त्यात विशेष काही पिकत नव्हत , कर्ज खूप होत डोक्यावर, पाणी नाही शेतात, एक नाही अनेक प्रश्न , घरातल धान्य संपत आलेल, कपडे कधीचे घेतले नाही तिघांनी, काय करणार कोणाला सांगणार, सगळे जवळपास सारख्या परिस्थितीत अडकलेले, या वर्षी पाऊस नीट झाला नाही , सगळी शेत कोरडी पडली होती, विहिरींनी तळ गाठला होता, जो तो एकमेकांना मदतीसाठी विचारत होता, रात्र रात्र भर झोप नव्हती ,थोड्याश्या सामानासाठी चोरी होत होती, खराब परिस्थिती होती,

अहो जरा असतील तर द्या ना थोडे रुपये... शामला बसू देत नाही शाळेत,..... आई अण्णांना सांगत होते

काय करायच शिकून? , त्याला म्हणा चल मजुरीला माझ्या सोबत, दोन चार रुपये मिळतील तेवढे, या वर्षी साठव, मग खुशाल जा पुढच्या वर्षी शाळेत,

अहो असा कसा बोलता तुम्ही? त्याला किती आवड आहे शिक्षणाची,... आई अगतिक झाली होती

सगळ खरा आहे पण काय करू मी, कुठून आणू पैसे, भाजी निघेल शेतातली पुढच्या आठवड्यात तेव्हा बघू ,

शाम एकत होता आतून, काय करावे कळेना.... आज ही बाई शाळेत बसू देणार नाहीत, स्वतः ची सोय स्वतःच करावी लागेल विचार करायला लागला, मित्राला उद्याचा अभ्यास विचारुन येवू म्हणून तो बाहेर पडला,


स्टँड जवळ मोठ धान्य दुकान होत, त्यावर "कामाला मुलगा पाहिजे" ही पाटी होती ,

श्याम विचार करत होता कराव का काम? , पण मग शाळेचं कस होणार? , अस ही कुठे आहे सामान आपल्याकडे, बाई बसू देत नाहीत वर्गात, वर्ष वाया नको जायला,

तो जावुन भेटला मालकाला,

मला दुकानात काम करायची इच्छा आहे

मालकाने श्यामला खालून वरून बघितले, शाळेत जातो का तू?

हो

हे काम का हवा आहे तुला?

मला शिक्षणाची आवड आहे पण वह्या पुस्तकांसाठी पैसे नाहीत, मी काम करून माझ्यासाठी सामान घेणार आहे,

मला पूर्ण वेळ मुलगा हवा कामाला, तू शाळेत जाशील तर हे काम कोण करेन, नाही जमणार,

त्याच वेळी वर्गशिक्षिका बाई तिथून जात होत्या, काय करतोस शाम इकडे ?

शाम रडायला लागला, त्याने बाईंना सगळी परिस्थिती सांगितली , वहि पुस्तक नाही आहे , अण्णा बोलतात शिक्षण पेक्षा मजुरी कर शेतावर

बाईना खूप वाईट वाटले, उगीच शिक्षा करत होते याला, पण बाई तरी काय करतील, शाळेच्या नियमानुसार वागाव लागत,

तू काही काळजी करू नको... आपण करू काही तरी, शामला दुसर्‍या दिवशी शाळेत यायला सांगितल,

बाईनी प्रिन्सिपल सरांची परमिशन काढली,

श्यामला रात्रीच्या शाळेत येवू द्या सर... शिक्षणाची खूप आवड आहे याला , मुलगा हुशार आहे, दिवसा काम आहे त्याला दुकानात , सगळी परिस्थिती सांगितली ,

प्रिन्सिपल सर हो बोलले..... सोबत पुस्तक आणि वही ही मिळाली,

शामला खूप आनंद झाला , तो दिवसा दुकानावर काम करू लागला ,..... रात्री 8 नंतर शाळा असायची , त्याचा भार त्याने उचलला होता,

इकडे वडलांची परिस्तिथी खूप बिकट होत चालली होती, आई वडील स्वतः च शेत असून दुसरी कडे मजुरीवर कामाला जात होते, कर्ज फिटायच नाव घेत नव्हत, आला दिवस सारखा जात होता, दोन वेळच जेवण मुश्किलीने मिळत होत.

एक दिवस एक सरकारी गाडी गावात शिरली,सगळी मुल गाडी मागून धावत होती, गाडी ग्रामपंचायतच्या ऑफिस समोर येवुन थांबली , दोन तीन माणस उतरली गाडीतून... सरळ आत निघून गेली, का आले असतिल ते गावात? सगळे काळजीत पडले,

गावाजवळून नदी वाहत होती, पावसाळ्यात खूप पाणी असायच नदीला , पण पाणी वाहून जायच, उन्हाळ्यात खूप त्रास व्हायचा , बर्‍याचदा दुष्काळच असायचा इकडे, बरेच दिवस झाले नदी वर सरकारी माणसं येत होती काहीतरी बघून जात होती, मोजमाप सुरू होती,

एकदम गावात बातमी पसरली की नदीवर धरण होणार आहे, आपल्या सगळ्यांच्या जमिनी पाण्याखाली जातील, काय कराव समजत नव्हत, कोणी बोलायच चांगल झाल निदान आहे तो जमिनीचा भाव मिळून चार पैसे तर मिळतील, तर काही बोलायचे कवडी मोलात द्यावी लागेल जमिन, समजत नव्हत सही करावी की नाही , कुठे जायचं हि जागा गेली तर? ,मोठा प्रश्न होता, एवढे हाल झाले होते सगळ्यांचे या गावात, दुष्काळामुळे, नवीन ठिकाणी काही खर नाही अशी समजूत करून घेतली होती लोकांनी,
आंदोलन करायच ठरवला गावकर्‍यांनी ,

शामचे वडील ही होते आंदोलनात, काहीही झालं तरी जमीन द्यायची नाही, सही करायची नाही अस ठरत होत,

सगळे गावकरी जमले होते, विरोध सुरू केला त्यांनी,

एक सामाजिक कार्यकर्ते गावात आलेले होते, ते समजावत होते सगळ्यांना,.... तुमचा भाग दुष्काळ गस्त आहे, धरण झाल तर खूप फायदा आहे, दुप्पट पैसे मिळतील शिवाय जागेचे, सध्या तुम्हाला शेतीत काही उत्पन्न ही नाही, कर्जाचा डोंगर वाढत चाललाय, सहकार्य नाही केला तर तुमच नुकसान आहे,

पण आम्ही जायचा कुठे? पुढे करायचे काय?..... एका गावकर्‍यांने विचारला,

धरण बांधून होई पर्यंत तुम्हाला इथे काम मिळेल, शिवाय जमिनीचे पैसे भरपूर मिळतील, त्यातून तुम्ही नवीन गावात जमीन विकत घेवू शकता किंवा व्यवसाय सुरू करू शकतात, शिवाय पैसे बँकेत जमा होतील, व्याज ही मिळत राहील, आणि धरण नदीवर आहे त्याचा पाण फुगवटा त्या बाजूला आहे तुम्ही डोंगराच्या या बाजूला राहू शकतात, तुमचे घर जाणार नाही, विश्वास ठेवा सामाजिक कार्यकर्ते नीट समजून सांगत होते

पण आमच्या जमिनीवर कर्ज आहे, त्याच काय करायचं? , एकाने विचारले

कोणाकडून घेतलाय कर्ज? ,

सावकाराकडून....,

किती वर्ष व्याज भरल? , हिशोब करू आपण उरलेले हफ्ते सरकार भरेन, तुम्ही काळजी करू नका, फक्त सरकारी कामात अडथळा आणू नका,

सगळी कडे आनंदी आनंद झाला ,

श्यामचे बाबा आनंदाने घरी आले,

शाम निघाला होता रात्रीच्या शाळेत जायला ,

उद्या पासुन सोड दुकानातल काम,..... अण्णा

शामला समजत नव्हत अस का म्हणता आहेत ते, आता ही रात्रीची शाळा बंद होते का काय?

तू उद्यापासून रोज सकाळी शाळेत जा, तूला काय लागत ते समान आपण घेवून येवू ,

शाम आश्चर्य चकित झाला ,

श्यामची आईने विचारल काय झाल , कामाचे पैसे मिळाले का?

काही नाही गावाजवळून वाहणार्‍या नदीने तारल आपल्या गावाला, ती माई कामा आली..... एका महिन्यात धरणाच काम सुरू होईल तिथे जायचे आपल्याला कामाला, मी पेपर वर सही केली, दुप्पट भाव मिळाला जमिनीचा, हे बघ थोडे पैसे ही मिळाले, बाकीचे पैसे बँकेत जमा होतील, हे घे पैसे नीट ठेव , आता सगळ नीट होईल,

विश्वास बसत नव्हता त्यांना की आपली परिस्तिथी नीट होणार आहे ,

शाम आणि अण्णा आनंदाने खरेदीला बाहेर पडले.