दुष्काळ

दुष्काळ
*दुष्काळ*

जवा कोपला निसर्ग
तवा पडला दुष्काळ,
कशी आली आम्हांवर
अशी वाईटही वेळ.

पाण्यासाठी वणवण
करी सारे पायपीट,
किती दमलो शिणलो
नाही सरतच वाट.

चा-यासाठी गोठ्यामधी
गुरं- ढोरं हंबरती,
फरपट जीवनाची
डोळे अश्रुने भरती.

शेतं पडली ओसाड
पिक नाही शिवारात,
झुरतोय बळीराजा
पोरं उपाशी घरात.

हाल सोसवेना आता
कसं सुटणारं कोडं,
घालतोयं तो आशेनं
देवालाच रे साकडं.
-----------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all