दुर्गा तूच हो

Durga. Tuch. Ho


गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय - एक दुर्गा अशीही


एक अशी दुर्गा कलियुगात पहायला मिळावी. तिने असंख्य स्त्रीयांना सहन कराव्या लागतात त्या गोष्टी संपवून टाकाव्यात परत कुणाला काही त्रास होणारच नाही. असे काही करावेच. अशाच एका दुर्गेने फक्त स्त्रीयांसाठी अवतार घ्यावा.


दुर्गेने स्त्रीयांचे अनेक प्रश्न निकालात काढले तर.. मग परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे..


बलात्कार नको, विनयभंग नको, स्त्री भ्रूणहत्या नको, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक नको, हुंडाबळी नको, सासुरवास नको, दर महिन्याला त्रास नको, रजोनिवृत्ती त्रास नको, स्त्री म्हणून दूय्यम वागणूक नको, सातच्या आत घरात बंधने नको, रांधा - वाढा उष्टी काढा नको, सासरी नांदायला जाण नको, माहेरी आयुष्यभर रहाता येईल तर, साडीच घाल बंधने नको, हे सगळे नको..


मग मनात विचार आला की का कोणी अवतार घ्यावा. प्रत्येकीने दुर्गा वेळ आली की व्हावेच.


कारण स्त्री जर स्वयंपाक करू शकते, घर संभाळू शकते. मुलाबाळांना जन्म देऊन शिकवून पहिली गुरू होऊ शकते. नोकरी करू शकते. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊन देश चालवू शकते. व्यवसाय करू शकते. संसार सुखाचा करण्यासाठी अनेक त्याग करू शकते.


मग स्त्री स्वतःसाठी दुर्गा होऊच शकते. ऊठ आता तुझ्यातली दुर्गा जागी कर युगानुयुगे होत असलेल्या अन्यायाविरुद्ध उठ आता. तुझे उदाहरण दिले पाहिजे एक दुर्गा अशीही आहे.


सौ भाग्यश्री चाटी सांबरे
©®