दुर्गा अंतिम

दुर्गा
दुर्गा अंतिम


आता जवळपास दीड दोन वर्ष होत आले होते . आर्या दुर्गा दोघंही आपोल्या कामात चांगलेच व्यस्त झाले होते. कामाचं निमित्त सांगून आर्या दुर्गासोबत भेटणं टाळत होता. लग्नाचं पण तो मनावर घेत नव्हता. दुर्गाला सुद्धा त्याचे असे दूर जाणे जाणवू लागले होते. तिने एकदा परस्पर जाऊन त्याला विचारणा सुद्धा केली होती, त्याने सुद्धा त्याला ती आवडत नाही सांगून दिले होते. घराचे पण लग्नाबद्दल विचारणा करू लागले होते, शेवटी तर त्याने लग्नासाठी नकार दिला होता. आर्यांच्या विरहामध्ये दुर्गाला खूप त्रास होत होता, पण प्रेमात जबरदस्ती नाही करता येत, आणि त्याचा निर्णय तिने स्वीकारला होता, दोघांनी पण आपापले रस्ते वेगवेगळे केले होते .
आता दुर्गाने पण स्वतःला कामात खूप व्यस्त करून घेतले होते. ती प्रामाणिकपणे आणि जबरदस्त शिस्तीने आपले काम करत होती. तिचा प्रामाणिकपणा मात्र सिस्टीम मधल्या काही लोकांना खपत नव्हता. गावातली नेते मंडळी इत्यादी लोकं पण तिच्या विरोधात उभे होत. असे करून या दीड दोन वर्षात तिच्या तब्बल अकरा बदल्या झाल्या होत्या. एवढया कामाच्या व्यापात सुद्धा दुर्गाचे साईड बाई साईड मुलींसाठी चे प्रशिक्षण केंद्र, त्यांना स्वपायावर उभे करणे, हे काम सुरू होतेच. चांगल्या कामामुळे तिचा नावलौकिक सुद्धा वाढत होता. तिने चांगले चांगले गुंड लोळावले होते. सगळीकडे तिची रफ अँड टफ इमेज सगळ्यांना आवडू लागली होती. ती मुलींसाठी त्यांची हिरो झाली होती, प्रेरणादायी झाली होती.


दुर्गाकडे नवीन काम आले होते. आणि तिला ज्या ऑफिसर ला रिपोर्ट करायचे होते , ते दुसरं कोणी नसुन आर्या होता. तेव्हा तिला कळलं होते की आर्या एक undercover officer आहे. देशात होणाऱ्या आतंकी हमले, काटकरस्थान , विरोधात काम बघत होता. आर्याच्या हाती बरीच महत्त्वाची माहिती लागली होती. काही हाय प्रोफाइल लोकं दुश्मन सोबत मिळाले होते.
आता दुर्गा सुद्धा त्याचा टीमला जॉईन झाली होती. दुर्गाला कळले होते आर्याने अजून लग्न केलेले नाही आहे, मनोमन ती खुश झाली होती , आणि दुर्गाने तर कधीच आर्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा केला नव्हता, तिचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आर्याच होता. कामा निमित्त आता परत दोघं एकत्र येऊ लागले होते, नजरानजर होत होती, आणि आर्याने कितीही दुर्लक्ष केले तरी दुर्गा त्याचा नजरेतील तिच्या बद्दल असलेले प्रेम अचूक टिपत होती. प्रेम तर आहे , मग लग्नाला नकार का देतोय याचा पाठपुरावा करणे तिने सुरू केले. आणि तिला समजले की त्या दिवशी आर्याला मारण्यासाठी गाडीचे ब्रेक फेल केल्या गेले होते, त्या नंतर आणि त्या आधी सुद्धा आर्यावर बरेच जीवघेणे हमले झाले होते. त्याचमुळे दुर्गाचा जीव सुद्धा धोक्यात येत होता , जे त्याला कधीच सहन होत नव्हते , आणि म्हणून त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केला होता. त्याचसाठी त्याचे काम सगळ्यात प्रिय होते, त्यासाठी तो आपला जीव सुद्धा देऊ शकत होता. पण त्याच बरोबर त्याचा दुर्गावर सुद्धा जीव होता. त्याचमुळे तिला काही झालेले त्याला सहन नव्हते होणार, आणि धोक्याची घंटी त्याने ओळखली होती , आणि वेळेतच तो तिच्यापासून दूर झाला होता.
दुर्गाने परत आपल्या पद्धतीने आर्याकडून आपले प्रेम कबूल करून घेतले होते. यावेळ दुर्गाला त्याला मनवायला थोडे जास्त कष्ट पडले होते , कारण यावेळ आर्या थोडा जास्त टफ बनत होता , ते म्हणतात ना झोपलेल्या उठवणे सोपी पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवणे कठीण, तसेच काहीसे या दोघांमध्ये घडत होते. शेवटी त्याने आपले प्रेम कबूल केले होते. दोन्ही घरात परत लगीनघाई सुरू झाली होती . जवळपास अडीच तीन वर्षांनी सगळं छान घडत होते, सगळीकडे आनंद पसरला होता.
आर्याचा बंगला समोर लग्न मांडव सजला. फुलांची, रंगांची उधळण सुरू होती. लग्नाचे सगळे कार्यक्रम सुरुळीत पार पडत होते. दुर्गाच्या हातावर मेहेंदी सजली, अंगाला हळद लागली.


वर्तमान ….

"सर लग्नासाठी मानले तर, वाह!" बोलता बोलता ईशान चा चेहरा थोडा उतरला होता.

"हो!" दुर्गा

"Congratulations ! शेवटी लग्न झालेच" ईशान

ते ऐकून दुर्गाच्या डोळ्यात पाणी जमायला लागले. तिने नकारार्थी मान हलवली.

"काय ? मेहंदी रंगली, हळद लागली " ईशान

दुर्गा मात्र फक्त भरल्या डोळ्यांनी त्याचाकडे बघत होती.

"तुम्ही गृहलक्ष्मी म्हणून सरांच्या घरी प्रवेश करता करता इकडे कसा काय प्रवेश केला?" ईशान

"हळदीच्या दिवशी संध्याकाळी एक फोन आला, महत्वाची माहिती मिळाली होती.काही भागात काही हालचाली सुरू होत्या. आर्या , मी आणि टीम तिथे पोहचलो. तिथेच सुरू असलेल्या कारवाही मध्ये आर्याला सहा गोळ्या लागल्या. आर्या त्यांच्या दुष्ट प्लॅन समोर ढाल बनून उभे होते, आर्याच्या हाती खूप confidential माहिती लागली होती. ज्यामुळे बरीच मोठी लोकं फसणार होती. त्यांनी सगळ्यांनी आर्याला च टार्गेट केले होते. आर्याला संपवण्यासाठी तो कट रचला गेला होता." दुर्गा आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत बोलली.

एक भयाण शांतता पसरली होती. ईशानला तर काय बोलावे काही कळत नव्हतं. पण त्याला आता सगळं कळलं होते.

"हे envelope !" ईशान ने एक पाकीट तिच्या पुढे धरले.

"हे काय?" दुर्गा.

"बघा !" ईशान

दुर्गाने ते पाकीट ओपन केले तर त्यात तिचे आणि आर्या चे फोटो होते. दुर्गा त्यात अगदी डॉल सारखी दिसत होती, आणि आर्या तिच्या पुढे खाली एका गुडघ्यावर बसला तिला प्रपोज करत होता, असे काही वेगवेगळ्या पोज चे फोटो होते. एका कॅफे मधले ते फोटो होते. ईशान जेव्हा वकिली शिकून परत आला होता, दुर्गाला प्रपोज करायला म्हणून त्या कॅफे मध्ये भेटणार होता, जेव्हा तो तिथे पोहचला होता तेव्हा तिथे त्याने दुर्गा आर्याला बघितले होते. दुर्गाचा होकार ऐकून मग तो परत तिला प्रपोज करायला पुढे गेला नव्हता. तेव्हाच त्याने दुर्गाची शेवटची आठवण म्हणून ते फोटो काढले होते, ज्याची आता सगळ्यात जास्त दुर्गाला गरज आहे असे वाटले होते.

दुर्गाने आर्याच्या फोटोवरून खूप प्रेमाने हात फिरवला. बऱ्याच वेळ एकटक ती त्या फोटोकडे बघत होती. ईशान ने एक नजर दुर्गाकडे बघितले आणि तिथून तो जायला मागे फिरला.

"वकील साहेब , मी इथे का आहे कारण नाही विचारणार ?" दुर्गा त्याला जातांना बघून म्हणाली.

"तुम्ही आधीच सांगितले आहे, आर्यविर सरांसोबतच त्यांच्या नावावर पण तुमचं खूप प्रेम आहे."

"त्यांचं नाव जपायला तुम्ही त्यांच्यावर केले गेलेले चुकीचे आरोप स्वतः वर घेतले आहेत. दुर्गा सारखी वाघीण जर चूप बसते आहे म्हणजे सिस्टीम किती भ्रष्ट झाली आहे , याचा मी अंदाज घेऊ शकतो. माहिती नाही अजून किती आर्या दुर्गा या भ्रष्ट लोकांचे शिकार होणार आहेत? तरी मी आता पण एवढेच सांगेल, आर्याची वाघीण दुर्गा लढणारी आहे… आणि त्यांना पण ती तशीच आवडते. तुम्ही एक पाऊल पुढे टाका , मी सोबत असेल आहे , नेहमीसाठी. तुम्ही नवीन आयुष्य सुरू करू शकता " ईशान म्हणाला.

"प्रेम एकदाच होते!" दुर्गा

तो फक्त हसला.

"आर्या शहीद झाले आहेत, शहीदच आहेत . त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे, आणि ते मी जपणाराच… मग मला इथे सात जन्म का ना राहावे लागेल. " दुर्गा सुंदर हसत म्हणली.

ईशान तिच्याकडे बघून कसंनुस हसला.

"As you wish Mam !" ईशान बोलला आणि परत जायला निघाला.

"शान!"

\" शान \" शब्द ऐकून ईशान च्या डोळ्यात पाणी जमायला लागले , त्याने ते शिताफीने लपवले आणि परत फिरला.

" ओळखलं तर तुम्ही मला?" ईशान

"हो , पहिल्याच दिवशी , आवाजावरून, " दुर्गा

तसा तो हसला.

"लग्न?" दुर्गा

"प्रेम एकदाच होते !"

ईशान आपल्या वाटेने निघून गेला. त्याला आता कळले होते , दुर्गा कधीच ही केस रिओपण करणार नाही कारण तिने आपलं सर्वस्व आर्याला समर्पित केले होते. त्याचं नाव जपणं हेच आता तिच्या जगण्याचं कारण बनलं होतं.

समाप्त

🎭 Series Post

View all