दुर्गा 31

आर्या दुर्गा
दुर्गा 31

मागच्या भागात : दुर्गा , आर्या आणि दुर्गाची आई दुर्गाच्या गावी म्हणजेच चींधिगावला पोहचतात . दुर्गाला अचानक बदलेल्या रुपात बघून सगळे आश्चर्यचकित होतात . ती पोलीस ऑफिसर झाली आहे हे ऐकून सुद्धा गावकरी निशब्द होतात. दुर्गा आपल्या घरी जाते, आजी दुर्गाला आपल्या समोर बघून खूप खुश होते . दुर्गाचा बाप परत दुर्गाच्या आईला मारतो , दुर्गा त्याचा विरोधात कायदेशीर तक्रार नोंदवते , पोलीस त्याला पकडून घेऊन जातात. दुर्गा गाव सोडून जाते तर गावात दुर्गा एका मुला सोबत पळून गेली आहे अशी अफवा पसरते. त्याचे काही नकारात्मक पडसाद सुद्धा उमटलेले असतात.

भाग 31

रात्रीचे जेवण आटोपून सगळे गावकरी दुर्गाने सांगितल्याप्रमाणे गावातल्या मंदिराच्या मोकळ्या परिसरात जमा झाले होते , सगाळ्यांनाच दुर्गाला बरच काही विचारायचं होते, तिचा प्रवास जाणून घायचा होता. पण त्यात काही लोकं अशी होती जी तिच्यावर खूप नाराज सुद्धा होती.

दुर्गा आपलं जेवण आटोपून तिथे आली , सोबत आई , आर्या , आजी सुद्धा आले. दुर्गाला तिथे तिची सगळ्यात जवळची मैत्रीण मंदा दिसते .

" मंदी , कशी आहेस ? बापरे पण पण सुकली का दिसते आहे ? तुझं लग्न पण झालं ? " ,दुर्गा चौकशी करते . मंदा तिला थोडी नाराज नाराज वाटत होती.

" सगळं तुझ्यापाई, तुझ्यामुळे माझ्या बा नं माझं लग्न लवकर करून दिले. " , मंदा

" मी ? मी काय केले ?", दुर्गा

" तू गेली ना पळून कोणत्यातरी मुलासोबत , तुला पाहिजे तसं जगण्यासाठी . मी तुझी जवळची मैत्रीण, मला पण तुझा वाण लागला असेल , मी तुझ्यासारखीच पळून जाईल , घरची अब्रू काढेल , म्हणून जो पहिले भेटला ,वीस पंचवीस वर्षांनी माझ्या पेक्षा मोठ्या माणसासोबत माझं लग्न करून दिले. त्या माणसानं माझ्या शरीराचा खेळ केला , चिरडून फाडून टाकलं , दारूच्या व्यसनापायी मेला पण . पांढऱ्या पायाची म्हणून सासरच्यांनी हाकलून लावलं ", मंदा

दुर्गाला ते सगळं ऐकून खूप वाईट वाटत होते.

" तुला माहिती तरी काय , तुझ्यामुळे गावात किती मुलींचे आयुष्य खराब झाले , आता कोण जबाबदार यासाठी ?", मंदा थोडी चिडत बोलत होती. आणि तिने परत दोन तीन मुलींचे कसे जबरदस्तीने लग्न करून देण्यात आले , ते सगळं दुर्गाला सविस्तर सांगितले . दुर्गाने त्या त्या पालकांना समोर आणले आणि चांगलीच फटकार लावली . असे सगळ्यांसमोर फटकार लावल्यामुळे काही पुरुष मंडळी थोडी चिडली होती. पण त्यातच आता सगळ्यांना कळले होते की दुर्गाने आताच तिच्या वडिलांची जेल मध्ये रवानगी केली आहे. आपल्या वडिलांना नाही सोडले , तर आपली काय हालत करेल , याचा चांगलाच अंदाज त्यांनी बांधला होता . त्यामुळे कोणी मध्ये बोलायची हिम्मत करत नव्हते.

" तुला काय ग जाते प्रवचन द्यायला , तुला पाहिजे तो मुलगा भेटला , तुझं आयुष्य मार्गी लागलं , पण आम्हाला साधं आपल्या आवडीचे कपडे सुद्धा घालायची मोकळीक नाही , साधं कुण्या मुलाबरोबर जरी बोलतांना दिसलं तर चामडी सोलेस्त्वर मारतात . आवडीचा मुलगा , लग्न , स्वप्नात सुद्धा बघायची परवानगी नाही . " , एक मुलगी खूप हिम्मत करून म्हणाली. तिच्या बद्दल सुद्धा दुर्गा ला माहिती पडले होते, ती शहरातून आलेल्या एका मुलीसोबत पळून जाताना तिला गावकऱ्यांनी पकडले होते . आता परिस्थिती अशी झाली होती की सगळीकडे तिची बातमी पसरली होती , त्यामुळे कोणी लग्न करायला सुद्धा तयार नव्हते , अन् ती मुलगी सुद्धा बंड केल्यासारखी वागत होती . आता हळूहळू एकेकाची वाचा फुटत होती. आता बरीच मंडळी बोलायला लागली होती . जेव्हा दुर्गा बोलत होती तेव्हा आर्या मोबाईल मध्ये काहीतरी करत होता. आणि त्याने दुर्गाच्या मोबाईल मध्ये काही माहिती पाठवली .

" ते मालक इथे निवांत बसले आहे तर कोण काही बोलत नाही आहे , अजून तुमचं लग्न पण नाही झाले , तरी एकत्र फिरत आहेत , कोणीच काय नाही म्हणत आहे , मोठ्या आदराने वागणूक देत आहे, श्रीमंत आहे म्हणून ना ? लोकं फक्त पैसाच बघतात , श्रीमंताला प्रेम करता येते , पाहिजे ते करता येते , का माहिती लग्नाच्या आधी अजून काय काय केले असेल.. कोण विचारणार तुम्हाला , तुम्ही आपल्या मनाचे मालक , पाहिजे तेव्हा …. ", ती मुलगी बोलतच असते की दुर्गा रागात ओरडते.

" संगीता , चूप ….. तोंडाला येईल ते बोलू नको. ", दुर्गा चिडली होती, ती आर्या विरुद्ध एकही अपशब्द ऐकून घेऊ शकत नव्हती .

" हो , तुझं प्रेम काय तर प्रेम, अन् आमचं प्रेम काय तर लफडं ? ", संगीता

" तुला काय कळते ग प्रेम म्हणजे काय असते ? ", दुर्गा

" हो तू एकटीच हुशार , आम्ही तर पागल , मूर्ख . आम्हाला काय समजत नाही , देवाने सारी बुद्धी तुलाच दिली आहे . तू श्रीमंत मुलाला फसवले तर तुझ्या प्रेमाची वाह वाह , आणि मी गरीब मुलावर केले म्हणून आमची थू थू ! हे हे गावकरीच सगळे पक्षपाती आहेत , अन् हे असे पालक , ना जगू देत ना मरू देत ! ", संगीता

" संगीता , जास्त बोलून राहायली , चाल हो घराकडे , अगोदरच सारीकडे अब्रू ची थू थू झाली हाय , डोईवर जड झाली हायेस , एवढच हाये तर जा जीव दे , तूया त्रासातून मोकळे व्हू , कुठं तोंड दाखवास जागा नाय ठेऊली ", संगीताची आई ओरडली.

दोघा मायलेकीची वादावादी सुरू झाली .

" आज जीव देऊनच दाखवतो , साऱ्या देखत !", संगीता रागात बोलली आणि तिथे बाजूला असलेला विळा उचलला आणि आपल्या हातावर घाव घालणार होती तोच दुर्गाने एक जोरदार सणसणीत संगीताच्या गालावर मारली की संगीता खाली पडली , ओठातून रक्त यायला लागले. सगळे अवाक् होत बघत होते , संगीताची आई पण एकदम चूप झाली .

" प्रेम काय असतं ते तर तुला नंतर सांगते , पण आता जे काय तू म्हणाली ना , आमचं लफडं , तर ते तसंच होतं , अन् आता जे काही तू जीव देण्याचे नाटक करत होती ना , तर तू ज्याला प्रेम म्हणत आहे त्याचा सोबत असती तर खरंच त्याने तुझा जीव घेतला असता, नाही तर तूच दिला असता . डोळे पण आहेत आणि वाचता ही येतं , हे वाच नीट ", म्हणत दुर्गाने तिचा मोबाईल संगीताला दिला. संगीता ते वाचू लागली. जसं जसं संगीता त्यातील मजकूर वाचत होती तिच्या चेहऱ्यावर भीती , कपाळावर घाम जमा व्हायला लागला होता , डोळ्यात पाणी जमायला लागले होते . हात सुद्धा थरथरायला लागले होते , त्यामुळे तिच्या हातातील मोबाईल खाली पडला . हे बघून आता तिथे जमलेल्या लोकांना सुद्धा काळजी वाटायला लागली होती . सगळे आळीपाळीने कधी दुर्गा तर कधी संगीताकडे बघत होते, पण काय सुरू आहे कोणाला काहीच कळत नव्हते .

" रोशन नाव होतं ना त्याचं , तुझं आयुष्य रोशन करायचं सोडून तुझ्या आयुष्यात अंध:कार भरायला निघाला होता . ", दुर्गा सांगत होती, संगीता मात्र मान खाली घालून जागीच अश्रू गाळत बसली होती .

" हा रोशन ", दुर्गा आपला मोबाईल मधला फोटो सगळ्यांना दाखवत बोलत होती . " सॉरी रोशन नाही , बाबू सलीम , याचं खरं नाव आहे बाबू सलीम , वय तेवीस . याचं काम आहे मुलींना स्वतःच्या प्रेमाच्या , नाही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणं , गोड बोलून , त्यांची काळजी दाखवून , त्यांना आपल्या घरच्यांबद्दल सांगणं , कष्टातून वर आलोय सांगत सिंपथी घेणं , आपल्या चांगल्या दिसण्याचा फायदा घेत , छोटे मोठे गिफ्टस् देऊन आपल्या प्रेमात आंधळं करणं , आपल्या विश्वासात घेणं आणि सगळं नीट जुळून आले की लग्नाचं आमिष दाखवून चुपचाप घरातून गावातून पळवून नेणे , तिच्यावर जबरदस्ती करणे , तिच्या शरीराचा पुरेपूर उपभोग घेणे , तिची देहविक्री करणे , तिला रेड लाईट एरिया मध्ये विकणे . इथेच याचा गुन्हा थांबत नाही , तर जर यात ही काहीच कामात नाही आली तर तिचा मर्डर करून , हात पाय तोडून फेकून देणे . हे याचे काम . "

" घाबरु नको , आता तो पोलीस कोठडीत आहे . आई , वडील आणि आपल्या गावकऱ्यांमुळेच तू या सगळ्यापासून वाचली नाहीतर जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागल्या असत्या . अशी अनेक बाबू सलीम आपल्या आजूबाजूला फिरत आहेत , निरागस निष्पाप मुलींना फसवण्यासाठी. आणि या संगीता सारख्या मुली यांच्या आमिषांना बळी पडतात ज्यांना आपल्या परिवारावर , मित्रांवर कमी विश्वास आणि यांच्या सारख्या मुलांवर जास्त विश्वास असतो. का तुम्हा मुलींना समजत नाही , घरचे वैरी नसतात , ते आपले वाईट चिंतत नाहीत . मान्य आहे काही पालक मंदाच्या पालकांसारखे असतात , त्यांच्या साठी ही शेवटची चेतावणी आहे , हवे तर असे समजा , पण मी मुलींवर कुठलीच जबरदस्ती सहन करून घेणार नाही , मग ती मुलगी असो , बायको असो वा आई असो , त्यांचावर कुठल्याही प्रकारचे झालेले अत्याचार मला चालणार नाही . मी काय आहे हे तुम्हाला माहिती तर झालंच आहे आणि असे समजू नका की मला काही कळणार नाही , माझं पूर्ण लक्ष असेल . इथले पोलीस सुद्धा मला पाहिजे ती माहिती पुरवतील . मी माझ्या बापाला सोडले नाही , तर लक्षात ठेवा कुणाच्याच बापाला सोडत नसते आणि सोडणार पण नाही . आणखी एक , प्रत्येक घरातील प्रत्येक मुलगी शाळेत जाईल . सरकारने जागोजागी सरकारी शाळा सुरू केल्या आहेत , शिक्षणासाठी फार पैसे लागत नाही , बहुतेक गोष्टी विनामूल्य आहे , त्यामुळे उगाच काही कारणं मला चालणार नाही . दुसरे खूप महत्वाचे , तुम्हाला माहिती आहेच , सरकारने मुलीचे लग्नाचे कमीत कमी वय अठरा वर्ष केले आहे , तर जास्त सांगणार नाही , तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा " , दुर्गा एक एक शब्द जोर देत बोलत होती , तिच्या बोलण्यात करारीपणा होता .

" आणि संगीता , प्रेम ते असते ज्यात तुमची उन्नती होती , तुमची स्वप्न त्याची स्वप्न बनतात , तुमचं ध्येय त्याचं ध्येय बनतं , तुमच्या डोळ्यातील आनंद त्याचा ओठांवर उमटतात , तो आपल्या तन , मन सोबतच आपल्या नावाचं पावित्र्य सुद्धा जपतो. खऱ्या प्रेमात आपली उन्नती होते , अधोगती नाही .", दुर्गा

" मी या गावातून पळाली हे खरं होते , पण कुठल्या मुलासोबत किंवा मुलासाठी नाही , तर माझ्या बापाने मला त्या आमदराकडे विकलं होते . देवाला हीच प्रार्थना , असा बाप कोणत्याच मुलीला देऊ नको . असा बाप असण्यापेक्षा अनाथ असलेले बरे ", दुर्गा बोलू लागली , ती गावातून का पळाली , कशी मुंबईला पोहचली पासून ते तिचा आयपीएस ऑफिसर बनाण्यापर्यंत चा प्रवास सगळ्यांना सांगत होती . या दरम्यान तिच्या सोबत घडलेल्या घटना ऐकून सगळ्यांच्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहत होते. आर्याला सुद्धा ते ऐकून खूप वाईट वाटत होते , पण कधी कधी काही गोष्टी कितीही इच्छा असली तरी आपल्या हातात नसतात , हेच सत्य असते , हे त्याला माहिती होते, आणि त्याला त्याचा दुर्गावर पूर्ण विश्वास होता , की ती कधीच हार मानणारी नाही आहे , आलेल्या परिस्थीतोसोबत बेधडक लढणारी आहे , पर दिल है की मानता नही , तिला झालेला त्रास ऐकून त्याच्या डोळ्यात दोन अश्रू तर जमलेच होते .

दुर्गाचा संघर्ष ऐकून सगळे निःशब्द झाले होते . तिथे प्रत्येकाला त्याचा त्याचा प्रश्नाची उत्तरं भेटली होती , आणि कोणी कोणी काय काय चूक केली , हे त्यांचं त्यांना चांगलंच कळले होते . सगळ्यांनी तिची माफी मागितली आणि तिने सांगितल्याप्रमाणे मुलींना खंबीर बनवण्याचे , त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचे तिला वचन दिले . दुर्गाने सुद्धा त्यांना सगळी माहिती पुरवली . मंदा, संगीता सारखे ज्या ज्या मुलींचे आयुष्य उध्वस्त झाले , त्यांच्या पुनर्वसनाची दुर्गाने जबाबदारी घेतली.

हे सगळं सुरू असताना एक मुलगा धावत आला , त्याने म्हाद्या काकाचा जावई आला आणि त्याने नीलिमाला (त्याची बायको ) ओढत शेताकडील मागच्या बाजूला घेऊन गेला असे सांगितले. नीलिमाच्या आईकडून जे काही कळले होते, त्यावरून प्रकरण खूप रौद्र रूप धारण करू शकते याची दुर्गाला कल्पना आली. क्षणाचाही विलंब न करता दुर्गा तिथून नीलिमाच्या शोधात निघाली. दुर्गाच्या पाठोपाठ सगळे आले आणि नीलिमाचा शोध घेऊ लागले. शेवटी एका ठिकाणी दुर्गाला नीलिमा दिसली. तिचा नवऱ्याने एका हाताने तिचे केस आवळून पकडले होते आणि दुसऱ्या हातातील चाकूच्या धाकावर तिला घरी यायला सांगत होता, मात्र नीलिमा जीवाच्या आकांताने ओरडत नकार देत होती. तो नीलिमावर चाकू उगरणार तेवढयात दुर्गाने त्याला किक मारून दुसरीकडे पाडले. तो दुर्गाला नीलिमा माझी बायको आहे, आमच्या दोघात तीसर्याने पडू नये असे धमकावत होता.

"तिच्या नकाराचा अर्थ नाही होतो. नाही म्हणजे नाही असते." दुर्गा

दुर्गाने त्याला चांगलंच मारलं होते. एव्हाना बाकीचे सुद्धा येऊन पोहचले होते. नीलिमाचा नवऱ्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. नीलिमाला मूलबाळ होत नाही म्हणून तिचा नवरा तिला तिच्या मर्जी विरुद्ध दुसऱ्या पुरुषांबरोबर संबंध ठेवायला जबरदस्ती करत होता. आणि याच होणाऱ्या अन्यायाला त्रासून ती माहेरी आली होती पण कोणाला काही सांगायची तिची हिम्मत होत नव्हती. याचाच फायदा नीलिमाचा नवरा घेत होता. आज दुर्गाने त्याला चांगलीच अद्दल घडवली होती. पण वेळेत जर दुर्गा पोहचली नसती तर नीलिमाचे काही बरेवाईट होऊ शकत होते, तिच्या जिवावर सुद्धा बेतू शकत होते. कोणतेही वाद, प्रकरण वेळेत लक्ष दिले तर बरे नाहीतर ते खूप मोठे रौद्ररूप घेऊ शकते , दुर्गाने सगळ्यांना समजावून सांगितले.

दुसऱ्यादिवशी दुर्गा आणि आर्या गाव , आजूबाजूच्या जागा, जिथे आधी ती दोघं भेटायचे फिरायला गेले. त्यांच्या जुन्या गोड आठवणींना उजाळा मिळाला. त्या वेळी आर्या दुर्गाच्या प्रेमात पडला होता पण दुर्गाला मात्र प्रेम बिम काही कळत नव्हते. पण जेव्हा तो गाव सोडून गेला होता , त्याचा विरहात तिला तिचं प्रेम कळले होते. पूर्ण दिवस दोघांनी सोबत घालवला, त्यांची ती आवडती टेकडी, देवीचे देऊळ, जवळ असलेला तलाव, अगदी सगळ्यांचा मनसोक्त आनंद लुटला होता. जुनी आधीची दुर्गा ती बनली होती.

दुसऱ्या दिवशी दुर्गा आणि आर्या माय, आजी आणि गावकऱ्यांचा निरोप घेऊन आपल्या वाटेने लागले. आजकाल पाऊस कधीही येत होता. त्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली होती. दोघंही वातावरणाचा आनंद घेत पुढे जात होते. थोड्या वेळातच आर्याला लक्षात आले की गाडीचे ब्रेक खराब झाले आहे, काही केल्या ते लागत नाही आहे. पण त्याने दुर्गा यातले काही सांगितले नाही. योग्य जागा मातीचे,चिखलाचे छोटे पठार बघून त्याने त्यावर गाडी चढवली आणि गाडी जागेवर थांबली. गावकऱ्यांच्या मदतीने गाडी नीट करून दोघेही परत आपल्या घरी जायला निघाले. आणि रात्रीपर्यंत घरी पोहचले.

इकडे सगळे दोघांच्या साखरपुड्याची तयारी ला लागले होते. आर्याला गाडी चे ब्रेक कोणी फेल केले होते ते कळलं होते. महत्वाचं काम आलेले सांगून आर्या आपल्या कामासाठी निघून गेला. कामात बराच अडकला असल्यामुळे आर्याने दुर्गा आणि त्याचा साखरपुडा सुद्धा कॅन्सल केला होता. कामाचं निमित्त सांगून तो लग्न दूरवर ढकलत होता. आणि आता तर त्याने सुद्धा दुर्गा सोबत भेटणं कमी केले होते.

*******





🎭 Series Post

View all