Jan 27, 2022
स्पर्धा

दुर्गा ... भाग 9

Read Later
दुर्गा ... भाग 9

 

दुर्गा...

( मागच्या भागात आपण बघितले , चींधिगावामधून सेक्युरिटी कमोंडोज नी गोडाऊन मध्ये बंद असलेले मुले आणि तरुण मुलींना सोडवले होते. सोबतच काही संदिग्ध आतंकी सुद्धा पकडले होते. तिथल्या आमदाराला सुद्धा अटक झाली होती. मालक ने दुर्गासोवत शेवटची भेट घेत, तिला माझी वाट बघशील काय...म्हणत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यांनतर गावामध्ये चांगले बदल व्हायला सुरवात झाली होती. दोन वर्षाने परत दुर्गावर काही संकट आली होती....पुढे.....)

 

 

भाग 9

" काय??? कसले संकट? आणि तुमच्या त्या मालकाने तुम्हाला धोका दिला म्हणजे ?" ..... ईशान

" त्यांनी धोका दिला , असे नाही म्हणता येणार. त्यांनी मला  ते कधी येतील ते सांगितले नव्हते. मी वाट बघितली असती तर ते आलेही असते. पण तेव्हा माझ्याकडे त्यांची वाट बघण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता ." ......दुर्गा

" आता असे काय झाले होते की तुम्ही वाट नाही बघू शकलात , आणि असे ते काय संकट तुमच्यावर ओढवले होते?? " ... ईशान

" होते तसेच काहीसे . मी बोलली ना , त्या दिवशी बापाला मारले असते तर बरे झाले असते, ते यासाठीच" .... सांगतच दुर्गा भूतकाळात गेली.

" दुर्गे पळ येथून , थे लोकं यायच्या आधी जा ..." ... म्हणतच मायने डब्ब्यात लपवलेले काही पैसे, अन तिच्या कानात असलेले सोन्याचे कानातले काढून दुर्गाच्या हाथी ठेवले.

" माय, म्या तुला एकटी सोडून कशी जाऊ कुठे?? तुया नवरा तुला त्रास दिल. आज्येला त्रास दिल. मी कुठ नाय जाणार , जे होईल थे पाहू. ".....दुर्गा

" दुर्गे, हट्ट करू नगस , थे लोकं काय खतरनाक हायेत, तुया एकट्यान नाही पेलवत थे. तुझा बाप पण त्यांच्यात गेला हाय. ऐक,  म्या जे सांगत हाय तेच बराबर हाय. इथून जाय " .....माय तिच्या हातात तिची कपड्यांची गाठोडी देत भीतीच्या पोटी तिला गावातून निघून जा सांगत होती.

" दुर्गे, कमळी बराबर बोलत हाये , जा तू येथून, नायतर थे लोक तुज जगू नाही द्यायची चांगल्यान "...आजी

" आज्ये , मी नाय घाबरत कोणास " ....दुर्गा

" दुर्गे जास्ती ताणू नगस आता , जा थे लोकं युन राहिले. " ....माय बाहेर डोकावत घाबरतच  दुर्गाला पळून जायला सांगत होती.

" तू चल, सोबतीन जाऊ" ....दुर्गा

" नाय, तुझी आज्ये हाय हित, माझी गरज हाय येथ, तू जा.  रखमाच्या घरी फोन घेतला हाय , नंबर म्हाईत हाय तुला , जेव्हा येळ भेटल,  फोन कर  , पण आता येळ नग करू. " ...माय , म्हणतच तिला मागच्या दारातून बाहेर ढकलले.  दुर्गा गाठोड  पकडत एकदा भरल्या डोळ्यांनी माय आणि आज्जिकडे बघितले आणि तिथून पळाली.

" दुर्गे ......" ...दुर्गाच्या बापाचा आवाज आला.

" थे नाय घरच्याला , भाईर  कुठे गेली हाय " ....आज्जी

" भाईर कुठं?? , थे लोकं आले न्यास " ..... बाप

" म्हाईत नाय" .....आज्ये

"  ये विस्न्या, कोठ हाय पोरगी ? टायम नाय , लवकर आन भाईर पोरिस्नी" ...एक काळाकुट्ट पहलवान सारखा पण दिसायला एकदम भयानक असा माणूस बोलला. त्याच्यासोबत त्याच्या सारखेच तीन माणसं सोबत होते.

" ये कमळे, कोठ लपौन ठीवली दुर्गीला??? सांग लवकर " ...बाप

" म्हाईत नाय कोठ गेली त ,  सांगून कधी जाते काय ?" .....माय

" हे पाय, डोकस्याचा भुगा नग करू, तुज म्हाईत व्हतं दुर्गीस न्यास लोकं यीनार हायित ते , तूच तिला लपौन ठीवली असशील . थे लोकं लय खतरनाक हायेत " . तो रागात बोलत होता.

" बाप हाय न व तिचा तू, असा कोण वागताय आपल्याच पोरिसंग कोण ? , तू माह्या पोटी जन्मास आला, लय पाप झाले पाय " ...आज्जी

" तू थांब व , तुज नंतर पायतो, कमळे बऱ्या बोलणं सांग कुठं हाय ती , नाय तर माह्या सारखा कोण वाईट नाय " ...तो

" ये किस्न्या , कायची लांबड लांबड लावलीस रे, आण पोरगी लवकर " ... काळाकुट्ट पहिलवान

कमळा काही सांगत नाही बघून किसण्याने तिच्या केसाला पकडून तिचं डोकं भिंतीवर आपटले. हाथा बुक्क्यांनी मारले, पण शेवटपर्यंत कमळा माहिती नाही येवढेच बोलत होती.

इकडे दुर्गाने जवळची  जंगलातून जाणारी पायवाट पकडली होती आणि जेवढ्या जोराने पळता येईल तेवढया जोराने पळत होती. अंधार पडला होता, पण तिला जांगतल्या पायवाटा माहिती होत्या , तिथून ती पळत होती, प्राण्यांची भीती होतीच , जीव मुठीत घेऊन ती पळत होती. कुठे जायचे हा पण एक मोठा प्रश्न होताच. आजूबाजूच्या लहान गावात जाणे पण चालणार नव्हते, तिथे या गुंड लोकांची ओळखी होतीच. विचार करता करता ती बस स्टॉपवर पोहचली ,तर तिला तिचा बाप आणि त्याच्या सोबत ती गुंड लोक ही दिसली. जसाकाही जनावरच त्यांच्यावर सवार होता , अश्या पद्धतीने ते लोकं दुर्गाचा शोध घेत होते. कसल्याश्या घान घान शिव्या ते देत होते. भेटली तर जीवाने सोडणार नाही असे काही काही बोलत होते. दुर्गा दुरून हे बघत होती तेवढयात त्यांच्यापैकी एकाची नजर दुर्गावर पडली आणि ते सगळे दुर्गाच्या मागे धावायला लागले . दुर्गा पुढे , ते लोकं तिच्या मागे  तिला पकडायला पळत होते.

कुठे जावे, काय करावे तिला काहीच कळत नव्हते. त्या लोकांचा सामना करणे म्हणजे पण मूर्खपणाच होता. दुर्गा पळणाऱ्यातली नव्हतीच, आलेल्या परिस्थितीला सामना करणाऱ्या मधली होती. पण ती आगडबांब पहलवान माणसं होती, त्याच्याजवळ काही हत्यार पण होती. त्यांचा सामना करणे हे मूर्खपणा ठरेल , तिला कळत होते , आणि म्हणून ती त्यांच्यापासून पळत होती. सध्यातरी तिला काहीच कळत नव्हते कुठे जावे, जिकडे रस्ता दिसेल तिकडे पळत होती. पळता पळता साइडला एका टपरी जवळ उभा  ट्रक दिसला , क्षणाचाही विलंब न करता ती त्यावर चढली आणि तिथल्या सामानाच्या डब्यांच्या आड दिसणार नाही अशी जाऊन बसली. 

रात्रभर ट्रक चालत होता. बसल्या बसल्या दमल्यामुळे तिचा डोळा लागला. डोळा उघडला तेव्हा दिवस उजाडत आला होता. ट्रक कुठेतरी थांबला होता. हीच योग्य वेळ आहे बघून ती चुपचाप  ट्रक मधून उतरली.  रस्ता जाईल त्या दिशेने चालायला लागली. पुढे काही घर दिसायला लागले. कुठले तरी गाव होते .  तिथे एक चहापाण्याचे दुकान दिसले. तिथे जाऊन पाणी प्यायली , थोड चेहऱ्यावर मारले आणि बाजूला एका झाडाखाली जाऊन बसली. मायने दिलेले गाठोडे सोडले . त्यात एका कागदात भाकरी बांधली होती. तिने ती बाजूला ठेवली. नंतर दोन कपडे, आणि एक प्लॅस्टिकची पिशवी होती, त्यात तिचे महत्वाचे काही कागदपत्रं होते. ते बघून तिच्या डोळ्यात पाणी आले. येवढ्या गडबडीत पण तिची माय  खायची आणि जीवन आवश्यक शिदोरी बांधायला विसरली नव्हती. तिने सगळे कागद एक एके करून डोळ्यांखालून सरकवत होती तशी तिची नजर एका फोल्ड केलेल्या कागदावर गेली. ते बघून तिचे डोळे आनंदाने चमकले.   तिने बाजूला ठेवलेली भाकर खाल्ली .  फ्रेश झाली. गाठोड परत व्यवस्थित बांधले. आणि  विचारत विचारात बस स्टॉप वर आली.

"मुंबई ...१२०km  ".... तिने फलक वाचला तसा तिच्या चेहऱ्यावर थोड स्मायल आले. मुंबईच्या बस मध्ये बसली. अवघ्या दोन अडीच तासात ती मुंबईला  पोहचली.  बस मधून उतरल्या उतरल्या ती भान हरपून चहू बाजूंनी बघत होती.

आकाशाला भिडणाऱ्या मोठमोठ्या  इमारती  आकाश ही दिसेना नीट इतक्या मोठ्या. रस्त्यांवर रस्ता दिसणार नाही इतकी वाहनं, फुटपाथ लोकांनी तुडुंब भरलेली.  गाड्यांचे आवाज , मोठमोठे दुकान , वेगवेगळी कापड घातलेली लोकं, कोणाला कशाचे भान नाही, सगळे आपल्याच तंद्री मध्ये  चाललेले, गर्दी एवढी की एकमेकांना धक्के देत पुढे जाण्याची घाई ,  सगळीच गंमत वाटत होती तिला. पहिल्यांदा हे असे काही बघत होती.  बघता बघता तिची नजर टेलिफोन बूथ कडे गेली. तिने तिथे जाऊन एक फोन केला, बऱ्याच वेळ प्रयत्न केला पण लागला नाही. फोनचा नाद  सोडून ती आता एक पत्ता विचारात तिकडे कसे जायचे विचारत होती. एका भल्या बाईने तिला लोकल ट्रेन बद्दल माहिती देत त्या अड्रेसवर कसे पोहचायचे समजाऊन सांगितले. ट्रेनने आणि थोडी विचारपूस करत करत ती त्या पत्त्यावर पोहचली.  आणि ते घर बघून तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरला. एक

सुंदरसा टुमदार बंगला होता. आजूबाजूने मोठी नारळाच्या झाडासारखी दिसणारी झाडं, त्यात अधूनमधून रंगीबिरंगी फुलांची काही झाडं डोकावत होती. बंगल्या भोवती उंच भिंतीचे कम्पौंड होते, मधोमध एक मोठे गेट. सगळेच कसे तिने टीव्हीमध्ये बघितले होते तसे. ती गेटकडे जायला निघाली.

" कोण तुम्ही??" ....... गार्ड

" मी दुर्गा , तुमच्या साहेबांची मैत्रीण ,  मालकांना भेटायला आली आहे " .....दुर्गा

तिचं बोलणं ऐकून गार्ड तिला खाल पासून वरपर्यंत बघत होता. दुर्गा थकली होती, त्यात विस्कटलेले केस, प्रवासामुळे मळलेला ड्रेस, हातात गाठोड, त्यात तिने मैत्रीण असा उल्लेख केला म्हणून गार्ड तिला अजब नजरेने बघत होता.

" इथे कोणी नाही आहे " ..... गार्डने तिचा अवतार बघून रस्त्यावरची कोणी आली म्हणाऊन तिला टाळले.

" हा पत्ता , हा इथलाच आहे ना??" ...तिने हातातला कागद त्याला दाखवत विचारले.

" हो , हा हाच आहे, तुझ्यासारखे खूप लोक येतात , जा उगाच डोक खराब करू नको , जा  आम्ही परवानगीशिवाय कोणाला आतमध्ये सोडत नाही . " .... गार्ड

" तुम्ही  दुर्गा आली आहे सांगा, मालक ओळखतात मला ".....दुर्गा

गार्ड आणि दुर्गामध्ये बऱ्याच वेळ बोलणे सुरू होते. गार्ड काही ऐकत नाही बघून तिचा हिरमोड झाला. ती परत जायला वळली तसा एक मध्यम वयाचा माणूस तिथे आला.

" तुमचं नाव काय??" ...तो माणूस

" दुर्गा " ........दुर्गा.

" केशव काका, जाऊ द्या , कोण कुठून कुठून येतात  ".... गार्ड वाकडं तोंड करत म्हणाला.

" मी ऐकलं आहे साहेबांच्या तोंडून दुर्गा नाव, ह्या तेच आहे काय  माहिती नाही .... ओ ताई, साहेब आता तर इथे नाही आहेत, पण दोन दिवसांनी येणार आहेत. तुम्ही तेव्हा या. तुमचा काही फोन नंबर वैगरे असेल तर देऊन ठेवा, ते आले की त्यांना देऊ. " ....केशव

त्याचं बोलणं ऐकून तिचा चेहरा उतरला. पण काही इलाज नव्हता. काहीतरी विचार करत ती बोलायला पुढे गेली.

" नंबर???, नंबर नाही आहे , मी येईल दोन दिवसांनी ,. चींधिगावची दुर्गा आली होती तेवढा निरोप द्या" ..... दुर्गा केशवसोबत बोलत आपल्याच विचारात पुढे जात होती. ज्या उत्साहात ती मुंबईला आली होती, तो आता थोडा कमी झाला होता. परत आता कुठे जायचे,  राहायचे कुठे, काय करायचे, असे सगळेच प्रश्न तिच्या डोक्यात सुरू होते.  घरी परत जाता येणार नाही, तिला गिळंकृत करायला ती राक्षस वाटेवरच बसली आहेत, आणि इथे?? इथले सगळंच तिच्यासाठी नविन होते. इतके मोठे कधीच न बघितलेले शहर, कोणीच ओळखीचे नाही . सुरुवात तरी कुठून करायची??? तिच्या मायने दिलेले पैसे दोन चार दिवस पुरतील, पण......पण पुढे काय??? विचारानेच तिचे डोळे पाणावले. ती चालत जात होती, जागा दिसेल तिथे बसत होती. आजूबाजूचा अंदाज घेत होती. परत पुढे जात होती.

" मालक विसरले असतील का??? या दोन वर्षात कधी भेटले नाही, काहीच नाही. फक्त ' मी येईल, वाट बघशील ' येवढेच बोलून गेले. कुठे असतील?? फोन पण लागत नाही. त्यांच्या घरी पण मला कोणी आतमध्ये नाही घेतले. किती मोठे लोकं आहेत ते , ते कशाला मला लक्षात ठेवतील ?? मी गावाची, खेड्यातली, ते शहरातले, ते पण येवढ्या मोठ्या घरचे . दुर्गे तुझा नि त्यांचा काहीच मेळ नाही. आता ते ओळखतील की नाय,  त्याचा पण काय भरोसा नाय. आता इथून पुढचं आयुष्य तुझं तुला पहायचं . कोणावर विसंबून राहायला नको.  फोन बंद असू शकतो, मालक खोटं नाय बोलले, नायतर पत्ता पण चूक दिला असता . पत्ता बरोबर हाय, मालक इथेच राहतात. दोन दिवसांनी येणार आहे म्हणे, तेव्हा एकदा येऊन पाहू. " .....दुर्गा स्वतः सोबतच विचार करत होती.

फिरता फिरता आता रात्र होत आली होती. सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते . फिरता फिरता एक खाण्याची गाडी दिसली. तिथे जात तिने थोड खाऊन घेतले. आता रात्र कुठे काढायची हा मोठा प्रश्न तिच्यापुढे होता. मग तिला आठवले रेल्वे स्टेशन, तिथे तिला खूप गर्दी दिसली होती. कुठे कोपऱ्यात लोकं झोपलेले दिसले होते. ती जवळ असलेल्या रेल्वे स्थानकात ठीक ठाक जागा बघून जाऊन बसली. झोप तर येणार नव्हती. इतकं उभ आयुष्य कसे आणि कुठे घालवायचे हेच विचार तिच्या डोक्यात सुरू होते . विचार करत ती अजाऊबजुचे सगळं न्याहाळत होती. आणि बघता बघता कधीतरी तिचा डोळा लागला. जाग आली ती कुणाच्यातरी स्पर्शाने. कुणीतरी तिला वरती गळ्याजवळ स्पर्श करत आहे तिला जाणवले , तिने डोळे उघडले तर बाजूला एक काळाकुट्ट माणूस दिसला. त्याचे डोळे लाल दिसत होते. खूप घाणेरडा असा तो दिसत होता. त्याच्या बाजूला अजून एक त्यांच्यासारखाच घाणेरडा माणूस होता. खूप वाईट नजरेने ते तिला बघत होते.  जसे तिच्या लक्षात आले तिने  त्याच्या गळ्यावर खाडकन् उलट्या हाताने धक्का दिला, तसा तो थोडा बाजूला जाऊन पडला. त्या आवाजाने आजूबाजूचे झोपलेले लोकं  जागे झाले , काय सुरू आहे ते बघत होते. पण कोणी मदतीला म्हणून पुढे येत नव्हते. तो माणूस खाली पडलेला बघून त्याच्या सोबत असलेला दुसरा माणूस  पुढे आला. आता तो पहिला सुद्धा  उठत तिच्या जवळ येत होता. दुर्गाने आजूबाजूला बघितले, तीला बाजूला एक बंद असलेल्या ठेल्याजवळ काठी दिसली , तिने चपळतेने जाऊन ती काठी आणली आणि दोन्ही माणसांना चांगलच बदडायला सुरुवात केली. तिचा जोश, तिची हिम्मत  बघून आता बाजूच्या दोन बायकाही उठून दुर्गाच्या मदतीला आल्या. हळूहळू बाकीचे पण उठून उभे होत होते. आजूबाजूला जमणारा जमाव बघता ते घाणेरडे माणसं पळून गेले. आता आजूबाजूच्या बायका तिची विचारपूस करत होत्या. ते सगळं बघून ती एक शिकली की तिथे कोणी स्वतःहून मदतीला येणार नाही, स्वतःच स्वतः करावे लागणार आहे. लोकांना मदत करायची पण हिम्मत कोणामध्ये नाही.

दुसऱ्या दिवशी तिने दुकानात जाऊन लाल तिखट पावडर आणि एक चाकू घेतला, आणि हातात एक काठी ठेवली. रात्रीचा प्रकार बघता , तिच्या लक्षात आले होते की हे काही साधेसुधे शहर नाही. आता तर कित्येक रात्री तिला तिथे काढायच्या होत्या.

तीन चार  दिवस असेच कसेबसे तिने रेल्वे स्थानकावर काढले. थोडी आजूबाजूला फिरली. तिथे राहायचे म्हटले तर पोटापाण्यासाठी काहीतरी करावे लागणार होते. डोक्यावर छप्पर शोधावे लागणार होते, ती अशी रेल्वे स्थकावर नेहमीसाठी राहू शकणार नव्हती  . ती   जवळपास कामासाठी वैगरे विचारपूस  करत होती. योगायोगाने एका आजीबाईचा  वडापाव, पाणीपुरी आणि असेच छोटेमोठे काही प्रकारचे ठेलारहित दुकानमध्ये वडे तळण्यासाठी आजीबाईने तिला ठेऊन घेतले. आजीबाई एकटीच होती म्हणून तिने तिला तिच्या घरी झोपायची परवानगी दिली होती.

दोन दिवसांनी ती परत त्या बंगल्याकडे जाऊन आली होती, पण मालक आले नसल्याचेच तिला कळले होते.  आता तिचा हाच दिनक्रम सुरू झाला होता , दिवसभर आजीबाईला मदत करायची, आणि संध्याकाळी झोपायच्या आधी एकदा बंगल्याकडे जाऊन मालक आले काय याची विचारपूस करायची. आता जवळपास तिला तिथे मुंबईला  येऊन पंधरा दिवस झाले होते. आजीबाईचा सोबतीने ती आता मुंबईबद्दलच्या बऱ्याच गोष्टी शिकत होती, समजायला लागली होती. पहिले तीन चार दिवस तिला आजीबाईचा घरी पण भीती वाटायची. ती चाकू आणि तिखट उशाखाली घेऊन झोपू लागली होती.  हळू हळू तिला आजीबाई बद्दल कळायला लागले, आजीबाईचा  मुलाने तिला घराबाहेर काढले होते. त्यामुळे तिचं या जगात दुसरे कोणी नव्हते. पण तिच्या काही ओळखीच्या लोकांच्या मदतीने तिने चहा टपरी सुरू केली आणि हळू हळू मेहानितीने त्याचे हे छोटेसे वडापाव आणि स्नॅक्स सेंटर झाले होते. आजीबाईची कथा ऐकून तिला तिथे जगण्याचं बळ मिळाले. जर एक म्हातारी बाई हार न मानता, भिक न मांगता, धीराने, मेहनीतीने स्वतःच्या पायावर उभी राहू शकते,  तर ती  या शहरात राहू शकते आणि जिंकूनही दाखाऊ शकते.

दुर्गा आजीबाईची आपल्या आजी प्रमाणे काळजी घ्यायची. तिला हव नको ते बघत होती. तिने आता आजीबाईचे बरेच काम आपल्या डोक्यावर घेतले होते. दोघींमध्ये आता आजी नातीचे नाते निर्माण झाले होते. आजीबाई पण तिचा लाड करू लागली होती. काही दिवसानंतर दुर्गाने तिच्या गावाला बाजूच्या घरी फोन करून ती ठीक असल्याचा तिच्या मायला निरोपही दिला होता. दुर्गासोबत फोनवर बोलून तिची माय पण थोडी निर्धास्त झाली होती, नाहीतर दुर्गा गेल्यापासून तिच्या बापाने घरामध्ये तांडव मांडला होता. पण दुर्गा ठीक आहे कळल्यावर तिला झालेल्या कष्टाचं चिज झाल्यासारखे वाटले.

वर्तमान......

" मग मालक भेटलेच नाही तर?, आणि असे काय झाले होते की तुमच्या गावाचे ते लोक तुम्हाला पकडायला आले होते, ज्यामुळे तुम्हाला तिथून पळावे लागले?" ...... ईशान

" सांगितले ना, जर त्याच दिवशी बापाला मारले असते तर कदाचित ती वेळ नसती आली. माझा बापाने मला आमदराकडे काही पैशांसाठी विकले होते. त्याचेच ते गुंड लोकं होते जे माझ्यामागे मला पकडायला लागले होते . बापाच्या नावावर कसाई निघाला तो . बाप असा पण असू  शकतो ,विश्वास नव्हता ".....दुर्गा

" पण आमदार तर जेल मध्ये होता?" .... ईशान

" आमदार काही दिवसांनी जेल मधुन सुटून आला होता. आणि तो कालिमाता पूजेच्या दिवशी झालेल्या गोष्टींचा तपास घेत होता. त्यात त्याला कळले होते की मी त्याच्या गोडाऊनच्या चकरा मारत होती. त्याने  बापाला काही पैसे चारले. दारू पाजली . याची भनक माझ्या मायला लागली होती. आणि म्हणूनच तिने मला घरातून पळवले होते. जर त्यादिवशी तिने मला पळवले नसते तर आज मी इथे नाही , कुठे दुसरीकडे असते, आमदाराची वा कोणाची शिकार झाले असते ." ...दुर्गा

" पण इथेही तुम्ही काही चांगल्या परिस्थीत नाही , हे जेल आहे,  तुम्ही विसरलात वाटते " ... ईशान

त्याच्या बोलण्यावर दुर्गा थोडी हसली.

" तुम्ही विसरलात वाटते  , इथे यायचा निर्णय माझा होता, हे मी निवडले आहे  " .....दुर्गा

तिच्या बोलण्यावर त्यालाही हसू आले.

" हम ..... पण तुमचे ते सो कॉलड मालक नाही भेटले ना ? ज्यासाठी तुम्ही मुंबई शहर निवडले होते " .... ईशान

" माझा निर्णय चुकला नव्हता, बरोबर होता. मुंबई शहराने मला माझं आयुष्य दिले.  मुंबई स्वप्नांची नगरी म्हणतात , ते काही खोटं नाही. माझे सगळे स्वप्नं पूर्ण झाले. मुंबई रात्री झोपत नाही म्हणतात, ते पण माझ्यासाठी लकी ठरले, त्यामुळे मी रेल्वे स्टेशनवर माझ्या सुरवातीच्या चार पाच रात्री काढल्या होत्या. गर्दी आणि लोकं जागी म्हणून मी तिथे टिकू शकले. खूप काही दिलं आहे मला या मुंबई शहराने. प्रेम, प्रेमाची माणसं , सगळे मला इथेच भेटले आहे  "  .... दुर्गा

" ह्मम....तीच माणसं, ज्यांनी तुम्हाला इथे जेलमध्ये ढकलले. " ..... ईशान

" Enough Mr Advocate , you have no rights to talk against anyone without any proof " ... दुर्गा , थोडी रागात मोठ्या आवाजात बोलली.

" मग तुम्ही त्या लोकांना आपल्या प्रेमाची माणसं म्हणत आहात तर तुम्ही हा गुन्हा करूच शकत नाही " .... ईशान

" मला असे वाटते आता तुम्ही गेलात तरी चालेल." ....दुर्गा

" मला तुमचं मन नव्हते दुखवायचे , मी माफी मागतो त्याबद्दल . ठीक आहे आता मी जातो . उद्या येईल " ... ईशान , बोलून निघून गेला.

दुर्गा आपल्याच विचारांमध्ये हरवली होती.

*****

कोण होती ती प्रेमाची माणसं ज्यांना दुर्गा आपली म्हणत होती , ॲड ईशान च्या म्हणाण्या प्रमाणे त्यांच्यामुळे ती जेल मध्ये होती?? कुठे आहे तो मालक?? दुर्गा ज्याची वाट बघत आहे , तो तिला खरंच भेटणार होता काय ?? ... Keep guessing....

 

*****

क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️