Aug 16, 2022
स्पर्धा

दुर्गा ... भाग 8

Read Later
दुर्गा ... भाग 8

 

दुर्गा ... 

( मागच्या भागात बघितले की गोडाऊन मध्ये बरेच लहान मुले आणि तरुण मुली पकडून ठेवल्या होत्या, दुर्गणे खिडकीतून बघितले होते. त्या नंतर तिची तब्बेत खराब झाली. मालकाच्या औषांधंमुळे आणि त्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे ति परत आधीसारखी खंबीर झाली होती. मालकाने ह्युमन ट्राफिकिंग बद्दल दुर्गाला समजाऊन सांगितले होते. ... आता पुढे ..) 

 

भाग 8

वर्तमान ...

" ह्युमन ट्रॅफिकिंग हे सद्ध्या खूप मोठं चॅलेंज झाले आहे आपल्या भारतासाठी . निष्पाप मुल, मुली,  लोकं यात फसावल्या जात आहे . या गोष्टींना आळा घालने कठीण होऊन बसले आहे. मग तुमची मैत्रीण आणि बाकी सगळ्यांची सुटका झाली काय तिथून?" .... ईशान

" हो , कालीपुजेच्या दुसऱ्या दिवशीच न्यूज होती,  अठरा मुली आणि बारा लहान मूल चींधिगाव मधून सुखरूप सोडवल्या गेले आहे . सोबतच तीन आतंकी आणि भरपूर प्रमाणत दारूगोळा जप्त केला गेला आहे. आमदाराला ही अटक झाली होती. ". ...दुर्गा

" बापरे , ह्युमन ट्रॅफिकिंग व्यतिरिक्त हे आतंकी पण होते तिथे तर? " ..... ईशान

" हो,  आमचे गाव समुद्र किनारपट्टी जवळ होते, त्यामुळे बाहेरील देशातल्या लोकांना तिथून आतमध्ये येणे सोपी जात होते.  तसे आमचे गाव तिथून थोडे दूरच होते, पण आमदाराचे गाव म्हणून  या अश्या गोष्टी कधी उघडकीस आल्या नाही ." ..दुर्गा

"  हे सगळं कसे काय झाले?? आणि ते फॅक्टरी चे मालक??? तेच आतंकी ????? " .... ईशान

" मी खूप घाबरली होती. काय सुरू आहे काहीच कळत नव्हते .  कानावर काहीबाही येत होते. आतंकी आलेत गावामध्ये ,बॉम्ब ब्लास्ट झाले. कोणी म्हणाले कमांडो आले होते, कोणी म्हणे पोलिस . पण जेव्हा मी तिथे गेले होते , तिथे असे काहीच नव्हते. फक्त आग लागलेली मला दिसत होती. मालक कुठे दिसत नव्हते. आणि मालकांवर मला थोडा तेव्हा संशय होताच, त्यामुळे मन आणखीच बेचैन झाले होते. " " .....दुर्गा , पुढले सांगता सांगता परत भूतकाळात हरवली.

कालीपुजेच्या दिवशी रात्री  .....

"आग .....आग......." लोकं ओरडत इकडे तिकडे पळत होते.

सगळीकडे गोंधळ, अफरातफर पसरली होती.  लोकं घाबरून आपापल्या घराकडे धाव घेत होते .  आमदाराच्या गोडाऊनच्या जवळ असलेल्या दोन झोपड्यांमध्ये गोळीबार झाला होता. झोपड्यांवर ग्रेनेड फेकले होते,  त्यामुळे  त्यांना आग लागली होती. ब्लास्टच्या  आवाजमुळे लोकं घाबरली आणि इकडेतिकडे पळायला लागली  होती .  जवळपास पंधरा मिनिटांच्या अंतराने गोडाऊनला आग लागली होती.

गोडाऊनला आग लागलेली बघून दुर्गाला काहीच सुचेनासे झाले होते. तिच्या डोळ्यांपुढे फक्त तिला त्या गोडाऊन मध्ये असलेले मुलं मुली दिसत होते . त्या आगीत त्यांना काही झालं तर??....हा विचारच तिला असहाय्य होत होते. बाकी लोक आपल्या घराकडे पळत होते तर दुर्गा गोडाऊनकडे पळत होती . वाटेत दोन तीन माणसांनी तिला अडवले सुद्धा , पण तिने ऐकले नाही, तिच्या डोक्यात फक्त त्या मुलांना वाचवता कसे येईल येवढेच होते. आणि ती कशाचाही विचार न करता त्या गोडाऊनच्या आगीत उडी घेत  होती,  तेव्हढ्यात तिला मागून कंबरेला धरून कोणीतरी ओढत उचलले आणि कोणाला दिसणार नाही असे लक्षपूर्वक  पलीकडल्या झाडाझुडपात झोपडीच्या मागे घेऊन गेले.

" सोडा , सोडा ....तिकडे मुली......." ....दुर्गा  हातपाय झाडत त्या मजबूत पकड मधून सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण ती पकड इतकी मजबूत होती की तिचं त्यापुढे काही चालले नाही.

" दुर्गा, मी आहो......." ....तो

" मालक, ते ....ते.....तिथे आग लागली आहे, सगळे तिथे ...." .....दुर्गा बोलतच होती की त्याने तिला थांबवले.

" शांत हो , सगळं ठीक आहे . तुझी मैत्रीण बाकी मुलं मुली सगळे सुरक्षित आहेत.  " .....तो

" पण........" बोलता बोलता तिचे लक्ष त्याच्याकडे गेले, आणि ती त्याला डोळे विस्फारून बघत होती.

" तू......तुम्ही.......कमांडो......तुम्ही कोण आहात ???" .....दुर्गा त्याला बघून घाबरत अडखळत बोलत होती. कारणही तसेच होते, तो पूर्ण कमांडो लूक मध्ये होता.

" सगळे मुलं सुरक्षित आहेत, गोडाऊनला आग लागायच्या आधीच सगळ्यांना तिथून सुरक्षित काढले आहे , आणि woman's shelter home मध्ये पाठवले आहे. लहान मुलांना पण योग्य ठिकाणी पाठवले आहे. तिथे त्यांचे फिजिकल आणि मेंटल चेकप होतील, आणि त्यानुसार ट्रीटमेंट देतील. काही दिवसातच ठीक होतील ते. " ....तो

हे ऐकून दुर्गाच्या चेहऱ्यावर गगनात मावनार नाही इतका आनंद पसरला होता. पण लगेच त्याला बघून परत तिला तो कोण आहे याचा विचार आला.

" पण तुम्ही कोण आहात???.." ....दुर्गा

" दुर्गा माझ्या जवळ फार वेळ नाही आहे , मला जावे लागेल आहे आता, आणि पुढे पण काही दिवस मी खूप बिझी असेल आहे, कदाचित तुला  भेटू शकणार नाही.  दुर्गा स्वतःची काळजी घे. आज घडलेल्या गोष्टींचा बराच प्रभाव पडेल आहे गावावर, कदाचित तुझ्यावर पण. हा माझा फोन नंबर आणि पत्ता आहे . कधीही काहीही गरज पडली की लगेच फोन कर, मी तुझ्या मदतीसाठी नेहमीच तुझ्यासोबत असेल.  " ...तो , तिच्या हातात एक घडी केलेला कागद देत बोलत होता.

त्याचा एक एक शब्द तिच्या मनाला भिडत होता. त्याचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी साचायला लागले होते.
आता उद्यापासून मालक दिसणार नाही , भेटणार नाही , हीच गोष्ट तिला सहन होत नव्हती.  का तिला ते सहन होत नाही आहे हे मात्र तिला कळत नव्हते. पण हृदयामध्ये दुखल्यासारखे वाटत होते, गळा दाटून येत होता..ती भरल्या नजरेने शांतपणे त्याला बघत होती.

तिच्या डोळ्यातले पाणी बघून त्याला वाईट वाटत होते. किती कमी दिवसात त्या दोघांमध्ये खूप छान अशी मैत्री झाली होती. तिची निरागसता, तिची चपळता, तिची हुशारी त्याचा मनाला भाळली होती . त्याला पण तिच्यापासून दूर जाताना त्रास होत होता, पण जावे तर लागणारच होते. शेवटचे एकदा भेटायचे म्हणून तो वेळात वेळ काढून तिला भेटायला आला होता. त्याच्या कानात लावलेल्या यंत्रात काही आवाज झाला, त्यावर तो काहीतरी बोलला.

" मी कोण आहे,  तुला सद्ध्या सांगू तर नाही शकत, पण मी एक चांगला व्यक्ती आहो.  तू माझ्यावर विश्वास ठेऊ शकते.काळजी घे , आणि सगळी स्वप्न पूर्ण कर " ...तिच्या गालावर एक हाताने थोपटत तो तिला पाठमोरा झाला आणि जायला निघाला. त्याला जातांना बघून , कोणीतरी आपला जीव काढून नेत आहे असे तिला वाटत होते. 

" दुर्गा मालक जात आहेत, ही शेवटची वेळ आहे , भेटून घे दुर्गा, परत भेट होईल की नाही काहीच माहिती नाही " ....दुर्गा मनातच बोलत त्याला जातांना बघत होती .

" मालक......." ....तिचा रडवलेला, दुखरा स्वर त्याच्या कानी पडला,  आतापर्यंत एकवटून ठेवलेल्या सगळ्या भावना,  दोन अश्रू रूपाने बाहेर पडलेच.  तो तिच्याकडे वळला, तर तिच्या डोळ्यात त्याला त्याच्याबद्दल खूप प्रेम दिसले . तो वळलेला बघून ती पळतच त्याच्याकडे गेली, आणि त्याच्या गळ्यात हाथ घालत त्याला बिलगली. त्याने पण तिच्या कंबरमध्ये हाताने पकडत तिला उचलून घेत घट्ट पकडले. दोघांच्या पण विरहाच्या भावना उफाळून आल्या होत्या. त्या शांत होईपर्यंत त्याने तिला स्वतःजवळ पकडून धरले होते. बरं वाटल्यावर थोड्या वेळाने त्याने तिला खाली उतरवले.

" मी घ्यायला येईल, माझी वाट बघशील ???" ...तो

आपल्या पालथ्या हाताने डोळे पुसतच तिने होकारार्थी मान हलवली.

" ठीक आहे, आता माझी जायची वेळ झाली. भेटू लवकरच . Take care. " ...त्याने तिच्या दोन्ही गालांना आपल्या हातांमध्ये पकडत तिच्या कपाळावर छोटेसे किस केले, आणि तिचा निरोप घेतला. ती एकाच जागेवर उभी त्याला पाठमोरी जातांना बघत होती. तो दिसेनासा झाला तेव्हा ती जड पावलांनी  मागे फिरली.

*****

वर्तमान .....

" कोण होता तो मालक??, आणि तो असा अचानक निघून गेला, आणि गावामध्ये इतके सगळे घडले होते, तो तुमच्या सोबत होता तर लोकांनी तुम्हाला प्रश्न नाही केले??" ... ईशान

" तो त्यादिवशी तिथून माझ्यासाठी गेला होता, पण लोकांसाठी त्याने काली पूजेच्या चार दिवस आधीच गाव सोडले होते. फॅक्टरी मध्ये आधीचाच साहेब कामावर आला होता, काही कारणामुळे मालकाला काही दिवसांसाठी फॅक्टरीचा चार्ज दिला होता. मालकांनी कमी वेळातच खूप छान काम केले होते, बाकी कामगारांना नवनवीन संकल्पना शिकवल्या होत्या. वेगवेगळा उपयोगी अशा टेक्नॉलॉजी समजाऊन सांगितल्या होत्या, त्यामुळे कामगारांना खूप गोष्टी कळल्या होत्या. त्यांच्या कामामध्ये बरीच सुधारणा झाली होती. गावामध्ये पण त्यांची बरीच ओळखी झाली होती, ते सगळ्यांसोबत हसून खेळून बोलत होते. जातांना प्रोपर्ली सगळ्यांना सांगून गेले होते . त्यामुळे माझ्यावर कोणी तसा काहीच डाऊट घेतला नव्हता. मला पण वाईट वाटले होते तेव्हा, पण तो त्यांच्या कामाचा भाग आहे म्हणून समजून घेतले होते. पण त्यांनतर जेव्हा ते नव्हते तेव्हा मात्र माझंच मला कळत नव्हते काय होते आहे ते. पण हे सगळं विचार करायला माझ्याजवळ वेळ नव्हता तेव्हा , माझ्या डोक्यात तेव्हा त्या निष्पाप मुला मुलींना तिथून कसे सोडवायचे हेच चालले होते.  " .....दुर्गा 

" त्या नंतर गावात बऱ्याच गोष्टी बदलल्या असतील??" ...तो

" हो . दुसऱ्या दिवशी आमदाराच्या वाड्यावर पोलिसांचे छापे पडले, त्यांच्या बंगला सिल झाला. नंतर कळले की गोडाऊनला आग त्यांनीच लाऊन घेतली होती. जेव्हा त्यांना कळले की सुरक्षा टीमने मुलांना सोडवले आहे, तेव्हा काही पुरावे त्यांच्या हाती लागू नये म्हणून त्यांच्या लोकांकर्वी त्यांनी आग लावली होती. आधी मुलांना सोडवल्या गेले होते, नंतर संदिग्ध आतंकी पकडले होते. वीस मिनिटंमध्ये या गोष्टींना अंजाम देण्यात आला होता. त्यामुळे मी जेव्हा तिथे पोहचली, तिथे मला कोणी कमांडो वैगरे दिसले नव्हते. आमच्याच गावाचे दोन तीन पोलिस होते तिथे, आग विझविण्याचा प्रयत्न करत होते, आणि लोकांना शांत राहायला सांगत होते. " ....दुर्गा

" ओके...".... ईशान

" त्या नंतर जवळपास महिना दोन महिने थोडे टेन्शन आणि भीती मध्येच गेले. परत असे काही होईल याचा लोकांच्या मनाने धसका घेतला होता. पण हळू हळू मग सगळं सुरळीत होऊ लागले. नवीन पोलिस ऑफिसर आला होता. तो बराच स्ट्रीक्ट होता. त्यानें बऱ्यापैकी सांभाळले होते. गावात गुंडागर्दी कमी होत आली होती .  त्यामुळे पण लोक निर्धास्त झाले होते. झालेल्या गोष्टींचा फायदा घेत मी तिथे बायका मुलींना ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल माहिती समजून सांगितली. स्वरक्षणाचे महत्व समजून सांगितले. स्वरक्षणासाठी फिजिकली काही गोष्टी यायला हवा, त्याचा सराव करता यावा ते समजाऊन सांगितलं.  गोष्टी अशा घडल्या होत्या त्यामुळे गावातल्या लोकांनां पण त्याचे महत्व लगेच समजले. त्यानंतर एक वेळ ठराऊन मी मुली आणि बायकांचे काठी चालवणे, हातपाय चालवणे असे बरेच धडे देऊ लागली होती. एकंदरीत सगळं बऱ्यापैकी चांगले सुरू होते. " ......दुर्गा

" पण तुमचे ते मालक?? ? बोलल्या प्रमाणे आले  काय ते परत तुम्हाला घ्यायला??  " .....दुर्गा

" नाही . माझं बारावी झाले. मी चांगल्या मारकाने पास झाले. स्वप्न तर होतेच पोलिसात जायचे. पण कसे करायचे , कुठे करायचे काहीच माहिती नव्हते. म्हणून मग बारावी नंतर मी बाजूच्या तालुक्याच्या गावाला BA साठी कॉलेज मध्ये ॲडमिशन घेतली.  घरी लग्नासाठी कुठले कुठले स्थळ येत होते. पण मी शिक्षणाचं कारण सांगत ते टाळत होती. शिक्षण आणि मालकाची वाट बघणे या दोनच गोष्टींमध्ये मी लक्ष देत होती. मी जवळपास दोन वर्ष वाट बघितली पण ते नाही आले घ्यायला. पण मी हिम्मत सोडली नव्हती. अशातच एक नवीन संकट माझ्यासमोर येऊन धडकले. " .....दुर्गा

" काय??? कसले संकट? आणि तुमच्या त्या मालकाने तुम्हाला धोका दिला म्हणजे ?" ..... ईशान 

 

 

*****

आता हे नवीन कुठले संकट दुर्गावर ओढवले होते??? मालक तिला खरंच सोडून गेला होता?? की तो कधी परतून येणार होता ??? बघुया पुढल्या भागात... 

 

****

क्रमशः 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️