दुर्गा ...
©️®️ मेघा अमोल ( राधिका )
( मागच्या भागात बघितले की गावामध्ये कालीपुजेची तयारी झाली होती. अथादिवस मेळा लागला होता. दुर्गा अचानकपणे मालकाच्या घरी गेली, त्याला बघून तो काहीतरी लपवतो आहे तिला वाटत होते. ती त्याचा सुद्धा पाठपुरावा करत होती. दुर्गा रात्री गोडाऊन जवळ गेली होती. गोडाऊंच्या मागच्या भागाला असलेल्या खिदकिमधून तिला आतमध्ये बघण्यात यश आले होते. ते बघून तिला भोवळ आली होती. आता पुढे .......)
भाग 7
" असे काय बघितले तुम्ही तिथे, की तुम्हाला भोवळ आली होती???" ..... ईशान
" कधीच असे काही तेव्हा बघितले नव्हते , ते सगळे बघून मला खूप असहाय्य वाटत होते ." ....दुर्गा , ते आठऊन आता दुर्गाच्या डोळ्यात फक्त राग जमा झाला होता. ईशान तिच्या चेहऱ्याकडे बघत होता.
थोडा वेळ शांततेत गेला.
" तुम्ही वरून पडलात , तुम्हाला भोवळ सुद्धा आली होती , मग पकडले काय त्या लोकांनी तुम्हाला ??" ..... ईशान
" नाही, माझं भाग्य चांगलं म्हणा किंवा अजून काही, मी कोणाच्या हाथी लागली नाही . " ....दुर्गा ...आणि ती परत भूतकाळात जात ईशानला पुढचे सांगू लागली.
" दुर्गा, आज हार नाय मानायची, आज बघूनच जाऊ काय हाय तिथं, कितीही वेळ लागला तरी " ....ती तिथेच चांस भेटायची वाट बघत बसली. आणि झाले तसेच, रात्री एक नंतर ते पहारेकरी पेंगायला लागले. दुर्गाने तीच वेळ साधली दबक्या पावलाने गौडाऊन च्या मागे गेली. मागे भिंतीला थोडी वर अशी एक खिडकी उघडी होती. तिथे तिचा हाथ पुरत नव्हता , कशीबशी बाजूला दगड, विटांना पकडत ती खिडकी पर्यंत पोहचली , खिडकीच्या सडाखींना पकडत, स्वतःचा समतोल साधत आतमध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करत होती , शेवटी तिचा प्रयत्न सफल झाला. खिडकी मधून बघतांना क्षणाक्षणाला तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते, कधी राग, कधी घृणा , कधी भीती , कधी दया, कधी काळजी , तिच्या डोळ्यात आता पाणी साचायला लागले होते. तिला भोवळ आली आणि ती खाली पडणारच होती की तिला कोणीतरी अलगद आपल्या हातांवर झेलले होते .
" पक्या , आवाज येत आहे मागच्या साईडने काहीतरी " ....एक पहारेदार, त्याला काहीतरी हालचाल जाणवली होती.
" हितं या टायमला कोण येईल, भास झाला असल तुया " ....पक्या , झोपेतून उठत दोळे चोळत बोलला.
" नाय नाय, भास नाय, मज वाटत हाय, कोणतरी हाय तिकडे , चाल एक डाव पाहून यु " .... पहारेदार
" चाल ".....पक्या
दोघेही गोडाऊनच्या मागच्या दिशेने यायला निघाले.
त्याला हे दोन पहारेदार यायचा अंदाज आला, आणि एकही क्षणाचा विलंब न लावता चपळतेने त्याने दुर्गा उचलले आणि गोडाऊनच्या पलिकडच्या साईडला असलेल्या झाडाझुडपात तो गुडूप झाला.
" पाय म्हणलो होतो ना , कोण नाय हिकड ".....पक्या
दोघांनी पण आजूबाजूला थोडे चेक केले, त्यांना तिथे कोणीच दिसले नव्हते.
" पण मज आवाज आला हुता , खोटं नाय बोलत म्या " .... पहारेदार
" काय कुत्रं बित्र असल , रातच्याले इथ लय प्राणी फिरत्यात . चाल जाऊ , चांगली झोप आलती, उडवली सारी" ..... पक्या .
" हितं थांबू थोड्यक येळ , मग जाऊ, मज अजून बी डाऊट हाय . काय कमी जास्ती झाला तर साहेब जीव घील आपला " .... पहारेदार
" ठीक हाय , थोड्या येळ थांबू इथ" ....पक्या . दोघंही थोडा वेळ तिथेच आजूबाजूला बघत उभे होते.
" दुर्गा, ... दुर्गा ... तू ठीक आहे ना?" ....तो तिच्या गालावर हाताने झापड्या मारत हळू हळू बोलत होता. दुर्गा हळूहळू डोळे उघडत बघत होती.
" मालक......." दुर्गा बोलतांना तिचा आवाज घाबरा झाला होता, आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत होते.
" Shssss , शांत रहा, ती लोकं आहेत तिथे अजून " ....तो, दुर्गाला खूप घाबरलेले बघून त्याने तिला आपल्या कुशीत घेतले आणि पुढे जमेल तसे त्या लोकांना बघण्याचा प्रयत्न करत होता. दुर्गा मात्र भयंकर घाबरली होती . ती त्याला घट्ट पकडत त्याच्या जॅकेट मध्ये आपला चेहरा खुपसत होती. तिला असे घाबरलेले बघून त्याला खूप वाईट वाटत होते, कारण त्याने दुर्गाला असे घाबरलेले कधीच बघितले नव्हते . एखाद्या सोल्जरसारखी साहसी होती ती, म्हणून आता त्याला तिची जास्ती काळजी वाटत होती.
थोड्या वेळाने ते पहारेदार तिथून निघून पुढल्या बाजूने गेले. त्यांना गेलेले त्याने बघून मोकळा श्वास घेतला.
" दुर्गा, तू ठीक आहे??? गेले ते लोकं. पण आपल्याला सद्ध्या जाता येणार नाही. ते थोडे अलर्ट झाले आहे. अजून थोड्या वेळ आपल्याला इथेच वाट बघावी लागेल. ".....तो
दुर्गा काही बोलली नाही. स्वतः ला सांभाळत चुपचाप बसली होती. पण वारंवार तिने जे बघितले होते ते तिच्या डोळ्यापुढे येत होते. त्यामुळे तिचे मन अविचल होत होते. तसेच बसल्या बसल्या कधीतरी तिचे डोळे जड झाले आणि ती झोपी गेली.
मध्यरात्र उलटून गेली होती . भयाण शांतता, बोचरी थंडी , त्यात ते दोघे जंगलच्या साईडने झाडाझुडपात एका दगडाला टेकून बसले होते . जंगली जनावरासोबतच विंचू, साप अशा प्राण्यांची सुद्धा तिथे भीती होती.
दुर्गाला झोपलेले बघून, त्याने त्याचे जॅकेट काढले आणि तिच्या अंगवर टाकले . ती दगडाला टेकून झोपली होती. झोपेत तिची मान खाली जात होती. तिची मान खाली जात आहे बघून तो तिच्या जवळ सरकून बसला. तिची मान त्याच्या खांद्याला टेकली, आता तिची चुळबूळ कमी झाली होती. तो डोळ्यात तेल घालून आजूबाजूची जागा चेक करत जागा होता.
आता रात्रीचे जवळपास तीन वाजत आले होते. त्याने आजूबाजूला बघत दुर्गाला उठवले.
" दुर्गा , तू थांब इथेच, कुठे जाऊ नको. मी आजूबाजूला थोड बघून येतो" ....तो
दुर्गाने होकारार्थी मान हलवली. तो उठला नी गोडाऊन जवळ बघून आला. आता तिथली लोकं बरीच झोपली होती. काही पेंगली होती. त्याच गोष्टीचा फायदा घेत तो आणि दुर्गा तिथून पसार झाले. त्याने दुर्गाला घरी सोडले.
" दुर्गा, जास्ती विचार करू नको . घरातले जागे व्हायच्या आधी घरात जाऊन झोप. " ....तो
दुर्गा हळू पावले टाकत घरात गेली. ती घरात जात पर्यंत तो तिथेच उभा होता. तिला घरात गेलेले बघून नंतर तो आपल्या घरी निघून आला.
जवळपास पहाटेच ते दोघे घरी पोहचले होते, आणि त्याला दुर्गाची परिस्थिती कळत होती, त्यामुळे दुर्गा आज काही टेकडीवर येणार नाही त्याला माहिती होते. तो पण आज तिकडे गेला नव्हता.
इकडे दुर्गा घरात येत , कपडे बदलून आजीच्या शेजारी जाऊन झोपली. पण तिला झोप येत नव्हती . ती बघितलेल्या गोष्टीचा विचार करत होती. अशातच सकाळ झाली तरी तिचे दुसरीकडे कुठेच काही लक्ष नव्हते. पहाटे आजीने चहा चहा करत ओरडा केला होता, तिला ते पण ऐकू आले नव्हते. ती आपल्या अंथरुणावर पडली होती.
त्याने फॅक्टरी मध्ये जायची तयारी केली आणि तो फॅक्टरी मध्ये निघून आला. दुपारच्या भोजनाची वेळ होत आली होती तरी दुर्गा त्याचा डब्बा घेऊन आली नव्हती. त्याने थोड्या वेळ वाट बघितली आणि परत आपल्या कामाला लागला. दुपारच्या वागण्यावरून संध्याकाळी दुर्गा डब्बा द्यायला येईल की नाही शंकाच होती , म्हणून फॅक्टरी मधून घरी जाता जाता काकी ( दुर्गाची आई) सोबत बोलून घ्यावे , असा विचार त्याच्या मनात आला. फॅक्टरी सगळे कामं आटोपून तो घरी यायला निघाला, वाटेत तो दुर्गाचा घरी गेला.
" आहे का घरी??" ....त्याने बाहेरूनच आवाज दिला.
" मालक, तुम्ही..??? या या " ...दुर्गाची माय
तिने बाहेर पडवीत एक टिनेची जुनी खुर्ची आणून ठेवली.
" मालक बसा " ....माय
" हो, ते दुपारी तुम्ही डब्बा नाही पाठवला, सगळं ठीक आहे की नाही मनात शंका आली, म्हणून बघायला आलो होतो ." ....तो घराच्या दारातून आतमध्ये बघत बोलला.
" हो मालक, जरा चुकलंच बघा , निरोप धाडायचा होता, पण ही बाजूची पोरं शाळेला गेलती, तर कोणी भेटला नाय. ते सकाळपासून दुर्गीची तब्बेत जरा बरी नाय, म्हणून थे डब्बा द्यास आली नाही बघा. तुम्हाला उपाशी रावं लागलं बगा आमच्यामुळे " .... माय
" अरे नाही नाही, मी उपाशी कुठे, मित्राचा डब्बा होता, त्याच्यासोबत जेवलो. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. काय झालं दुर्गाला?? आता बरी आहे काय तब्बेत तिची?? " ....तो
" झोपली नाय बगा पोरगी रातच्या पासून . अंग गरम लगतिया , अन्न बी उतरत नाय आहे पोटात . लेटून लेटून हाय " ..... माय
" ओह , अच्छा." ...त्याला रात्रीची घाबरलेली दुर्गा आठवली. रात्रीच्या गोष्टींचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला दिसत होता.
" दुर्गे उठ, मालक आले हायेत" .....माय दारातून आतमध्ये आवाज देत बोलली. मायच्या आवाजाने दुर्गा जागेवरच उठून बसली.
" काकी असू द्या. मी आतमध्ये येऊन बघू काय तिला???" नाही म्हणजे माझ्याकडे काही औषध आहे , तर मी देतो तिला, बरे वाटेल." ....तो
" हो हो , या आतमध्ये , बघा थोडं . चेहरा कसा सुकल्यावानी झाला तिचा " .... माय
तो आतमध्ये आला, तर दुर्गा चादर गुंडाळून बसली होती.
" दुर्गा , कशी आहे???" .....तो तिच्याकडे बघत एक स्मायल करत बोलला.
दुर्गा त्याच्याकडे बघत कसनुस हसायचा प्रयत्न करत होती पण तिला ते काही जमले नाही. त्याने तिच्या जवळ जात तिच्या माथ्याला हाथ लाऊन बघितला , तर खरंच डोकं थोड गरम वाटत होते. नंतर त्याने तिचं मनगट हातात पकडत नाडी चेक करत तिच्याकडे बघत होता. तिचा नेहमी टवटवीत राहणारा चेहरा आज खरंच उतरला होता. तिनेही त्याच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यात त्याला एकप्रकारची भीती दिसत होती.
" काकी, तिला खूप दगदग झाली, पाहिजे तसा आराम आणि झोप नाही झाली म्हणून थोडा ताप आहे . मी औषध आणून देतो, घेतले की बरे वाटेल . " ....तो
" ठीक हाय मालक. औषध घेऊन याल तेव्हा जेवणाचा डब्बा घिऊन जा, झाली हाय भाकरी . मी भरुन ठीवते. " .....माय
" ठीक आहे " ....म्हणत तो त्याचा घरी निघून आला.
तो पटापट फ्रेश झाला. त्याने काही औषध सोबत घेतली आणि परत दुर्गाच्या घरी निघून आला.
" काकी, हे घ्या औषध, या दोन गोळ्या आहे , ही काही खाऊ घालून द्या, आणि ही दुसरी झोपताना द्या , झोप चांगली येईल . आणि उद्या सकाळी परत ही पहिली गोळी जेवण झाल्यावर द्या, ताप उतरून जाईल. परवा एकदम बर वाटेल तिला." .....तो मायचा हातात औषध ठेवत बोलला.
" मालक बसा तुम्ही , मी डब्बा आणते" .... माय , आतमध्ये डब्बा आणायला गेली.
तो दूर्गाजवळ जात खाली टोंगळ्यावर बसला. ती डोळे मिटून पडली होती. त्याने तिच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवला. त्याच्या स्पर्शाने तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे बघत होती.
" तू मर्दानी , झंझावती दुर्गा आहे, अशी घाबरलेली, बिथरलेली दुर्गा तू शोभत नाही, आणि तू तशी नाही आहे. आपल्या नावाला जग, आपल्या विचारांना जग , तुला या भिडचा हिस्सा नाही बनायचे आहे , तुला एक चमकता , धगधगणारा तारा बनायचे आहे . परवा टेकडीवर वाट बघतोय पहाटे. " ....तो
ती त्याच्या डोळ्यात बघत होती. त्याच्या डोळ्यात तिला निर्धार होता, कणखरपणा होता, जे तिचे मनोबल वाढवत होते.
" मालक, घ्या डब्बा" ....माय आत्मधून एक पिशवी आणत त्याचा हातात देत बोलली.
" काकी औषधांच्या असरमुळे कदाचित उद्या पण दुर्गाला झोप येईल, तर झोपू द्या . आराम केला की परवा एकदम ठणठणीत होईल . मी उद्या सकाळी फॅक्टरी मध्ये खाऊन घेईल काही , संध्याकाळी येईल डब्बा घ्यायला आजसारखा." ...तो
" ठीक हाय मालक" .....आई
एकदा दुर्गाकडे नजर टाकत तो त्याच्या घरी निघून आला.
रात्री घडलेल्या गोष्टीमुळे ती झोपली नव्हती आणि त्या गोष्टीचा तिच्या मनावर वाईट परिणाम झाला होता, त्यामुळेच तिला थोडा ताप आला होता. त्याने तिला तापाचे औषध तर दिलेच होते पण सोबत झोप यायचेपण औषध दिले होते. झोप झाल्याशिवाय तिला बरे वाटणार नाही आणि औषध शिवाय तिला झोप येणार नव्हती म्हणून त्याने स्लीपिंग पिल्स दिल्या होत्या.
******
औषधांमुळे दुर्गा दिवसभर झोपेतच होती. तिचा चांगला आराम झाला होता. आता तिचा ताप पण पूर्णपणे उतरला होता. पण ती शांत शांत होती.
तो पण पूर्ण दिवस कामात व्यस्त होता. त्याची आता सगळी माहिती गोळा करून झाली होती. प्लॅनिंग झाली होती . तो अटॅक करायला पूर्णपणे तयार होता.
******
पहाटे तो तयार होऊन नेहमीप्रमाने टेकडीवर गेला होता. अजूनपर्यंत दुर्गा आली नव्हती .
" काल दुर्गाची तब्बेत बरी होती, थोडी गुमसुम वाटत होती, येईल की नाही आज??? नाही नाही येईल ती, जेवढे तिला ओळखायला लागलो आहे , त्यावरून तरी वाटते आहे ती येईल " .....तो विचार करत इकडे तिकडे बघत होता.
तो आजूबाजूचे सुंदर दृश्य न्याहळत त्यांचे फोटो काढत होता. फोटो काढता काढता मागे वळला तर त्याला दुर्गा येताना दिसली, पाहिले सारखीच टवटवीत, आत्मविश्वासाने भरपूर. तो कॅमेरा मधूनच तिच्याकडे बघत होता, आणि त्याने तिचे काही सुंदर फोटो क्लिक केले.
"मालक , झाले काय फोटो काढून ?? किती आवड म्हणावी तुम्हाला, काडी कचरा , पालापाचोळा, सगळेच फोटो काढत असता " .....दुर्गा त्याच्या जवळ येत बोलली.
" टोमणा???....राव कसला सॉलिड टोमणा मारला पोरीनी that's why I like her " .... तो आपल्या केसंमधून एक हाथ फिरवत हसत तिच्याकडे बघत होता.
" नाही, आज या गावातल्या सगळ्यात सुंदर गोष्टींचे फोटो काढलेत " .....तो
" बरं वाटते आहे आता ?""......तो
" हो, काल दिवसभर झोप येत होती, पण आता छान वाटत आहे. डॉक्टरकी सुद्धा येते तुम्हाला ? " ......दुर्गा
" हो कळते थोडेफार, म्हणजे माझा मित्र आहे डॉक्टर , त्याच्याकडून माहिती घेत राहतो. आणि तसेही हे छोट्या छोट्या गोष्टींची औषधे बहुतेक सगळ्यांनाच माहिती असतात. " ....तो
" आज लवकर आले?" ...दुर्गा
" हो, जाग आली लवकर आज ".....तो
" तुम्ही झोपत असता काय??" ......दुर्गा
" आज काय माझा क्लास घ्यायचा प्लॅन दिसतोय ?" .......तो
" तुमचं व्यक्तिमत्वच असे आहे , विचारपूस केलेली बरी " ...दुर्गा
" ओह , अच्छा " .....तो
" तुम्ही त्यादिवशी रात्री गोडाऊनच्या मागे काय करत होता?" .....दुर्गा
" हे मी विचारायला हवे, तुला नको सांगूनही तू तिथे काय करायला गेली होती ? तुला मी आधीच सांगितले होते की तिथे जाणं खूप घातक आहे , तरी तू तिथे गेली " .....तो
" मी पण तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितले होते की इथे कुठेही फिरणे घातक आहे, तरी तुम्ही कधीही, मध्यरात्री फिरत असता. " .....दुर्गा
" तुझी मैत्रीण होती ना तिथे?" ....तो
त्याचा प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यात पाणी साचायला लागले. आणि तिला रात्री बघितलेले जसेच्या तसे आठवले. तिने होकारार्थी मान हलवली.
" ते खूप भयानक होते. तिथे फक्त माझी मैत्रीणच नव्हती, अजून पण बऱ्याच मुली होत्या, आणखी काही लहान मूल सुद्धा होती. त्यांना खूप मारलेले दिसत होते. कन्हत होते ते . काही लहान मुलांच्या तर हातातून, पायातून, तोंडातून रक्त येत होते, कुणाचा तरी हाथ तोडल्यासारखाही वाटत होता, जमिनीवर लोळत रडत पडले होते. मुली पंधरा सोळा वयाच्या असतील , भिंतीला टेकून बसल्या होत्या , त्यांच्या डोळ्यातली आसवेही सुकली वाटत होती, त्यांना पण खूप मारलेले दिसत होते . कपाळावर, डोळ्यांजवळ हिरवे नीले काळे डाग होते , कुणाची केस ओढल्यासारखी दिसत होती, कुणाचे कपडे फाटले होते, पाच सात वर्षाची काही मुलं जीवाच्या आकांताने रडत होती. खूप घाण होती तिथे , असहाय्य असा वास होता तिथे, बहुतेक खूप दिवसांपासून त्यांना तिथे डांबून ठेवले आहे. खूप त्रासात , दुःखात होते ते सगळे. खूप असह्य वेदने मध्ये होते ते सगळे.. " .....दुर्गा बोलता बोलता तिचा आवाज खूप कापरा झाला होता, तिच्या आवाजात एकप्रकारची वेदना जाणवत होती. तिला नीट बोलता सुद्धा येत नव्हते , डोळ्यातून पाणी वाहत होते , तिच्या अंगावर भीतीने काटे उभे राहिले होते , तिचं अंग थरथर कापत होते.
तिची अवस्था खूप वाईट झाली होती. त्याला तिची ती अवस्था बघवत नव्हती . त्याने तिला आपल्या मिठीत ओढले आणि जवळ पकडून धरले. तिच्या हृदयाची गती वाढली होती, त्याला ती स्पष्टच जाणवत होती . तिच्या डोळ्यासमोर ते दृश्य जसेच्या तसे उभे राहत होते, त्यामुळे ती आणखीच घाबरत होती . तिने त्याच्या कॉलरला घट्ट पकडून घेतले होते ,नी तिचे कपाळ त्याच्या छातीवर घासत होती . आता तिच्या बोटांची नखे त्याच्या गळ्यावर लागत होती , इतकी जास्ती ती घाबरली होती .तो तिच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवत तिची भीती कमी करायचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळ तो तिला तसाच घेऊन उभा होता.
दुर्गासारखी साहसी मुलगी फक्त ते बघूनच इतकी घाबरली होती , तर तिथल्या मुलांचे काय हाल झाले असेल, तो विचारही करवत नव्हता.
थोड्या वेळाने दुर्गा शांत झाली . तिच्या लक्षात आले की ती मालकाच्या मिठीमध्ये आहे , ती त्याच्या दूर झाली , आणि डोळे पुसले.
" हे इथून टेकडीवरून तो गोडाऊनचा भाग दिसतो. जवळपास पंधरा वीस दिवसांपासून तिथे काही काही हालचाल होतांना दिसत होती. अधून मधून मोठ्या अश्या गाड्या येत होत्या . त्या नंतर काही दिवस आधी माझी मैत्रीण गायब झाली , मला ती तिथल्याच एका माणसासोबत बोलतांना दिसली होती . मला वाटले त्याने त्याचा फायद्यासाठी तिला गायब केले. म्हणून मी त्याच्या मागावर होती. पण हे तर काहीतरी वेगळेच निघाले . खूप भयानक , विचाराच्या बाहेरचे आहे हे सगळे " .....दुर्गा
" ह्युमन ट्रॅफिकिंग " .....तो
" ह्युमन ट्रॅफिकिंग ?? हे काय आहे?" .....दुर्गा
" जिवंत लोकांचा व्यवसाय करणे , त्यांची खरेदी - विक्री करणे , खास करून मुली, बायका आणि लहान मुले यांना विकल्या जाते" .... तो
ती काही न समजल्या सारखे त्याच्या कडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती . त्याला तीला पडलेले प्रश्न तिच्या हावभाव बघून कळत होते.
" ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे बायका, मुली, लहान मुले, आणि इतर पण लोकं, त्यांना फसवून , घाबरवून, किडनाप करून, चोरून पकडले जाते. आणि मग त्यांना इथेच किंवा भारत बाहेर काही पैशांसाठी विकले जातात. बरेचदा बायका मुलींचा वापर ' देह विक्री ' साठी केल्या जातो. बाकी लहान मुलं , मोठे लोक त्यांचा वापर कामगार म्हणून केला जातो . काही फार्मा कंपनीस पण या लोकांना विकत घेतात, त्यांच्यावर नवनविन बनवलेल्या औषांधांच्या टेस्ट, वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी या लोकांचा वापर होतो, त्या औषधांचे खूप वाईट परिणाम त्या लोकांवर होतात, जिवंतपणी मरणप्राय यातना ते भोगत असतात , जे की पूर्ण इलिगल आहे, म्हणून असे चोरून मुलं मुली त्यांना विकल्या जातात. असे बरेच काम आहेत जिथे असे मुल मुली विकले जातात. आणि या उपर कोणी राहिलेच तर त्यांचा वापर भिक मागण्यासाठी केला जातो. आणि जर हे मूल मुली काहीच कामाचे नाही वाटले तर त्यांना मारून त्यांचे अवयव विकले जातात. " ....तो तिला माहिती सांगत होता.
हे सगळं ऐकून दुर्गाला खूप मोठा धसका बसला होता. तिला तर काहीच सुचत नव्हते . कारण इकडे खेड्यात, गावाकडे हे येवढे काहीच कोणाला माहिती नव्हते.
" तुमच्या वयाच्या मुली या गोष्टींचा जास्ती शिकार होतात. जास्तकरून प्रेमात फसावल्या जाते. लग्नाचे आमिष देऊन त्यांना मुलगा पळाऊन नेत तिकडे शहरात जाऊन विकतो. तुमच्या वयाच्या मुली फार जास्ती भावनिक असतात, नवं तारुण्य, प्रेमाच्या भावना नव्याने उमलू लागल्या असतात. त्याचाच हे लोक फायदा घेतात. खूप प्रेम, काळजी , गिफ्टस देऊन तुम्हाला फसवले जाते, आणि जेव्हा खात्री झाली की तुम्ही म्हणाल ते करायला तयार असता, त्यावेळी ही अशी कृत्ये केली जातात. बऱ्याचदा नोकरीचे आमिष सुद्धा दाखऊन फसवले जातात. पूर्ण भारतभर या दलालांचे जाळे पसरले आहेत , असे लहान गाव, खेड्यांना हे लोकं जास्ती टार्गेट करतात. इथे अश्या गोष्टींची फारशी माहिती नसते, मोठ्या शहरात जायला मिळेल, पैसे मिळतील , अशा गोष्टींना मुल मुली भुलतात आणि कोणावरही विश्वास ठेऊन बसतात. हे सगळं जगभर इतके पसरले आहे की आता हे सगळं कंट्रोल करणे अवाक्याच्या बाहेर गेले आहे . भारतातून तर खूप मोठ्या प्रमाणात बायका, मुली, मुल यांची विक्री केल्या जाते. " ....तो
" बापरे , हे तर खूप जास्ती भयानक आहे. इतकी घाणेरडी लोकही असतात?? कसे काय लोकं अशी वागू शकतात?? माणुसकी ही विसरायला लोक??? देवालाही घाबरत नाही?" ....दुर्गा
" पैश्यापुढे सगळं विसरायला होते . आणि तुला माहिती हे काही त्या लहानमोठ्या दलालंचे काम नाही, यांच्या पाठीवर मोठे लोकांचे हाथ आहेत " .....तो
"आधी ही मुलं दुसरीकडे होते. तिथे पोलिसांना खबर लागली, म्हणून त्यांना इकडे हलवण्यात आले. आमदाराचे गोडाऊन, ते ही इथे खेड्या गावात, कोणाला माहिती पडणार नाही, आणि या गावापासून समुद्रकिनारा जवळ आहे , इथून भारताबाहेर या मुलांना घेऊन जाणे सोपे होते, म्हणून त्यांना इथे आणून ठेवले आहे. "
" मी काय करू? कसे वाचऊ सगळ्यांना ?? इथले तर पोलीस सुद्धा त्या आमदाराच्या हातात आहेत, कोण मदत करेल ??" ...दुर्गाला आता खूप जास्ती टेन्शन आले होते.
" दुर्गा, ऐक , तू आता तिकडे जाणार नाही, ते किती घातक आहे तुलाही कळले आहे . त्या दिवशी जर मी तुला ओढले नसते, तर तू त्यांच्या हाथी लागली असती. आणि पुढले तुला माहिती आहेच काय झाले असते. तर तू त्या रस्त्याने सुद्धा अजिबात जायचे नाही " ....तो
" पण मी माझ्या मैत्रिणी ला, बाकी मुलांना, मला सगळे माहिती असूनही एकटी सोडू शकत नाही. " ....दुर्गा
" दुर्गा, तू एकटी तिथे पुरू शकणार आहे काय??? ते कितीतरी लोकं आहेत, त्यांच्याजवळ खूप दारूगोळा सुद्धा आहे . असे मुर्खासारखे विचार करायचे नाही " ...तो
" नाही, मी अशी हातावर हात ठेऊन बसू शकत नाही" ....दुर्गा
" दुर्गा, जी काही सुरक्षा यंत्रणा असेल ती यावर काम करत असेल. तुझ्या किंवा कोणाच्याही छोट्याशा चुकीमुळे त्या मुला मुलींचे प्राणही जाऊ शकतात. त्यांना जर थोडीशीही भणक लागली तर ते लोकं त्या मुलं मुलींसोबत काहीही करू शकतात. तुला जर ते सुखरूप तिथून बाहेर निघावे वाटत असेल तर तिकडे जाऊ नको. किंवा तू त्यांच्यावर पाळत ठेवत आहे हे जरी कळले त्यांना तर ते तुझं जगणं मुश्किल करतील. ते लोक खूप पॉवर्फुल आहेत. " ....तो
"पण मग मी......" ....दुर्गा
" तुला जर मदत करायचीच असेल तर खूप शिक , त्या लोकांच्या विरोधात लढता येईल अशा पदावर ये आधी. पॉवरफुल बन . दुसरी तू इथल्या मुलींना, बायकांना त्यांचा विश्वास संपादून ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल माहिती दे , त्यांना या गोष्टी पटऊन सांग , जेणेकरून त्या या गोष्टीचे गांभीर्य समजून स्वतःची आणि आपल्या मुलांची काळजी घेतील. आणि जमेल तर तुझ्याच प्रमाणे मुली बायकांना स्वसंरक्षणाचे धडे दे . हीच तुझी खूप मोठी मदत होईल." ....तो तिला समजावून सांगत होता. तिच्या चेहऱ्यावरून तिला बऱ्यापैकी समजले आहे असे वाटत तर होते. ती आपल्याच विचारात होती. थोडा वेळ असाच शांततेत गेला.
" पण तुम्हाला हे सगळं कसे माहिती??? " ....दुर्गा
" डीटेक्टिव दुर्गा , परत सुरू झाली " ...मनातच तो तिच्याकडे बघत विचार करत होता.
" मालक, मी काय विचारले, तुम्हाला हे सगळं कसे माहिती?" .....दुर्गा
" माझा एक मित्र न्यूज चॅनलमध्ये काम करतो, म्हणून माहिती सगळं. आणि तसे पण आपण ज्या समाजात राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो, त्यांच्याबद्दल माहिती असायला हवे. बाकी कोणासाठी जरी नाही तरी स्वतःचे रक्षण करता यावे यासाठी तरी आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे ते माहिती असायला हवे.".....तो
" तुम्हाला बरे मित्र आहेत, डॉक्टर, न्यूजवाला, कोणी पोलिस मित्र नाही का?" .....दुर्गा
" दुर्गा खूप वेळ झाला, चल घरी जायला पाहिजे, फॅक्टरीमध्ये जायला उशीर होईल. " ....तो
" ह्मम...."....दुर्गा , पुढे जायला निघाली.
" दुर्गा ...." ....त्याने आवाज दिला. त्याचा आवाज आला तसे तिने मागे वळून बघितले.
" काय...?" ...दुर्गा
" प्रत्येक गोड बोलणारा व्यक्ती आपला नसतो " .....तो
ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती.
" काही नाही ,फक्त लक्षात ठेव " ....तो
दोघेही आपल्या घराच्या रस्त्याने लागले.
*******
" कालीपूजेच्या दिवशी रात्री अटॅक करू , सगळे कामात असतील. कोणाला काही कळणार नाही ".....तो फोनवर बोलत होता.
"........."....पलीकडून काही बोलणे झाले.
" हो , सगळं प्लॅनिंग झाले आहे. टीम पण रेडी आहे "......तो
" ...........".....पलीकडून
" हो, ती मुलगी आता रस्त्यात येणार नाही . " .....तो, फोनवर बोलून फोन ठेऊन दिला .
******
वर्तमान ...
" ह्युमन ट्रॅफिकिंग हे सद्ध्या खूप मोठं चॅलेंज झाले आहे आपल्या भारतासाठी . निष्पाप मुल, मुली, लोकं यात फसावल्या जात आहे . या गोष्टींना आळा घालने कठीण होऊन बसले आहे. मग तुमची मैत्रीण आणि बाकी सगळ्यांची सुटका झाली काय तिथून?" .... ईशान
" हो , कालीपुजेच्या दुसऱ्या दिवशीच न्यूज होती, अठरा मुली आणि बारा लहान मूल चींधिगावमधून सुखरूप सोडवल्या गेले आहे . सोबतच तीन संदिग्ध आणि भरपूर प्रमाणत दारूगोळा जप्त केला गेला आहे. आमदाराला ही अटक झाली होती. नंतर कळले की ते तीन संदिग्ध आतंकीच्या संपर्कात होते ". ...दुर्गा
****
मालक कोणत्या अटॅक बद्दल बोलत होता??? त्याचा काय प्लॅन होता?? तो खरंच दुर्गाच्या प्रेमात पडत होता की त्याचे काही नाटक होते?? मालक सोबत गावात असलेले ते दोन माणसं कोण होते?? ते तीन आतंकी कोण ??? ....keep guessing
*******
या भागामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा भाग कसा वाटला नक्की सांगा....धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा