दुर्गा ... भाग 6

दुर्गा आर्या

दुर्गा....

( मागच्या भागात बघितले, दुर्गा आणि मालक मध्ये काठी खेळ होतो...त्यात दुर्गा हारते .... तोच चांस साधत मालक तिला ती त्या दिवशी रस्त्यावर काय करत होती विचारतो..आणि शेवटी तिला असणारा डाऊट ती त्याला सांगते. मालक दुर्गाकडे आकर्षिला जात आहे  ,तिची वेगवेगळी रूप बघून तो तिच्या प्रेमात पडतो आहे ....आता पुढे ) 

भाग 6
 

" का त रोज रोज तेच तेच जेवण बनवता, तरास आला खाऊनश्यान " .... आजी

" ये आज्ये , रोज रोज काय पायजे खायला? आपलं वय पाय, जरा आराम दे जिभेस " ...दुर्गा

" तू त खूपच मुजोर पोट्टी हाय" ....आजी

" दुर्गे, कोंबडा बनऊ आता?? मालक खातेत का?" ....माय

" माहित नाय माय??? कधी इचारले नाय" ......दुर्गा

"इचारून येतीस का ?? म्हणजी मग बनऊ म्हणते आज " .....माय

" बरं , येते इचारून , बाकी बनव तोपर्यंत" .....दुर्गा

दुर्गा मालककडे त्यांना नॉनवेज चालते काय विचारायला गेली. दार नॉक करणार तेवढयात दार आपोआप उघडले.

" दार उघडेच हाय वाटते" ....मनाशीच बोलत दुर्गा दार लोटून आतमध्ये गेली तर समोरच चित्र बघून अवाक झाली.

एक मुलगा , बॉडी एकदम कसलेली, मजबूत ,  नुकताच एक्झरसाईज करून उठला असावा... शर्टलेस, खाली डार्क ब्ल्यू जीन्स , पाठमोरा कपाट मध्ये काहीतरी उचक वाचक  करत होता.

"चोर घुसला दिसतोय, हे मालक पण ना , घर उघडं करून जाते होय कोण " ...दुर्गा मनातच विचार करत दबक्या पावलाने पुढे जात होती , तिने तिच्या कंबरेजवळ खोचून ठेवलेला तिचा नेहमीचा छोटा चाकू काढला, नी त्या मुलाला मागून गळ्याला पकडत त्याचा पाठीवर चाकू ठेवला.

" हलायच नाय, चुपचाप जस हाय तसं उभा राहायच , जास्ती हुशारी दाखविली तर हा छुरा सरळ पाठीत जायल " ......दुर्गा

दुर्गा अचानक आलेली बघून तो घाबरला, आणि त्याला हसू सुद्धा आले की तिने त्याला ओळखले नाही. ओळखणार पण कशी, तो जेव्हाही तिच्या पुढे गेला होता, लूज कपड्यांमध्ये, त्यामुळे त्यात तो नाजूक वाटायचा, अजिबात वाटत नव्हते की त्याची बॉडी अशी परफेक्ट कसलेली , जिम केलेले मसल्स , अशी असेल. तो शर्टलेस असल्यामुळे एकदम वेगळा वाटत होता. आणि दुर्गाला तो दुसरा कोणीतरी वाटला होता...

" मालक, कुठं आहात, लवकर या, चोर घुसला आहे घरात , मालक, चोर चोर......" ....दुर्गा ओरडत होती.

" बापरे असे तर आजूबाजूचे लोकं घरात येतील" ....विचार करतच त्याने , ती आवाज देण्यात आहे बघून वेळ साधली, आणि हळूच आपला हाथ मागे घेत तिने चाकू पकडुन ठेवला होता त्या हाताला पकडले, नी झरकन मागे वळला , आणि तिच्या हाताला पकडत तिला गोल फिरवत , तिचा हाथ मागे पकडून ठेवत , स्वतः चा दुसरा हात तिच्या तोंडावर दाबून धरला..

" अशी ओरडते का आहे??? मी आहो , मी माझ्याच घरात चोरी करणार आहो काय ?" ......तो

ती गोंधळलेल्या नजरेने त्याला बघत होती . तिला तसे गोंधळलेले बघून त्याला खूप गम्मत वाटली. दुर्गा मात्र त्याला बघण्यात हरवली होती. तो असा तिच्या जवळ होता, त्याचा स्पर्श तिला होत होता.  पहिल्यांदाच कोणी पुरुष तिच्या इतक्या जवळ होता. त्यादिवशीच्या काठी खेळापासून तिच्या भावनांमध्ये काहीतरी गडबड होते आहे तिला कळत होते. पण काय होते आहे ते कळत नव्हते. सतरा वर्षांची  रांगडी, दणकट पोर ती, पण तो जवळ आला की  तिची प्रतिकार क्षमता आपोआप कमी झाल्यासारखी तिला वाटत होती.

ती अंग चोरायला लागली तेव्हा त्याच्या लक्षात आले , आणि तो तिच्या दूर झाला, आणि शर्ट घालून आला.

" काही काम होते?? अशी अचानक आली??" ......तो

" हो, माय विचारत होती तुम्हाला चिकन वैगरे चालते का??, ते आज शिजवायच म्हणत होती" .....दुर्गा

" हो ..... " ......तो

" ठीक आहे ,सांगते मायला"......दुर्गा

" ह्मम...." .....तो

" तुम्ही रोज व्यायाम करता??? नाही म्हणजे हे येवढे उपकरणं आहेत ? तिकडे टेकडीवर येता तर काही करत नाही, फक्त धावत असता, इकडे तिकडे बघत असता, फोटो काढत असता,  म्हणून विचारले" ... दुर्गा

" तू असते समोर, मग कोणाचं मन होईल दुसरे काही करायचे " .....तो , त्याच्या लक्षात आले होते की दुर्गाच्या मनात त्याच्याबद्दल शंका निर्माण झाली आहे . म्हणून तिचे लक्ष वळवण्यासाठी त्याने असे वेगळे उत्तर दिले होते.

" मी, मी समोर असते म्हणजे काय??? " ......दुर्गा

" काही नाही, सोड ते " .....तो

" तुम्ही इतके तंदुरुस्त  असाल, मला वाटले नव्हते  . एकदम एखादा सैनिकासारखी शरीरयष्टी आहे तुमची . ते बाहेर येता तर अस काय वाटतं नाय... " ...ती शंकेच्या नजरेने त्याच्याकडे बघत बोलत होती.

" मला सुदृढ राहायला आवडते . सकाळ संध्याकाळ व्यायाम करतो मी . तिथे टेकडीवर खूप छान निसर्ग सौंदर्य असते, तिकडे शहरात कुठे दिसते असे सगळे, म्हणून त्यांचा आनंद घेत असतो, फोटोग्राफी माझा छंद आहे , निसर्ग फोटो काढायला मला आवडतात , व्यायाम तर घरी पण करता येतो , म्हणून तिकडे बाहेर मी हे बाकी काम करत असतो. " .....तो

" अच्छा , थोड्या वेळाने डब्बा आणून देईल, जाते मी " .....दुर्गा त्याच्या घरावरून नजर फिरवत बाहेर गेली.

" होपफुली तिला काही डाऊट आलेला नसेल. You have to be more careful now " ...तो दुर्गा ला जातांना बघत विचार करत होता.

" मालक काहीतरी लपवत आहे , असे वाटत होते. मालक  इकडे तिकडे बघत लोकांचे, जागेचे फोटो काढत असतात, त्या दिवशी त्यांना आमदाराच्या हवेलीचा खुफिया रस्ता दाखवला त्याचे पण फोटो काढत होते, तिथे कोणते होते निसर्ग सौंदर्य, लक्ष ठेवायला लागते मालकावर, काहीतरी गडबड दिसत आहे "..... दुर्गा स्वतःशीच विचार करत घरी जात होती .

" काय ग दुर्गे किती येळ , चालतंय म्हणले का कोंबडा मालक ?" ......माय

" व्हय ग , खाते म्हणले " ....दुर्गा

******

गावामध्ये कालीपुजेची तयारी सुरू होती, त्या निमित्ताने आठवडाभर गावात उत्साहाचे वातावरण राहत होते.  पाच सात दिवस मेळा भरत होता. आजूबाजूच्या गावाचे लोकं येत होते. मेळा मध्ये छोटी छोटी वस्तूंची दुकाने, घरगुती बनवलेले खाद्यपदार्थ, कपडे, खेळणी , शृंगार सामान असे बऱ्याच गोष्टी होत्या तिथे. लहान मुलांसाठी आकाश पाळणे, झुकझुक गाडी , मुला बायकांसाठी हा काळ तर परवणीचाच काळ असायचा, मुक्तपणे हिंडता फिरता यायचे.

त्याने अगदी गावातील वाटतील असे दोन पुरुष गावामध्ये बोलावली होती,  जे गावातल्या प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेऊन होते, गावातल्या गुंडांच्या मैफेलीमध्ये पण जमवली होती. फॅक्टरी सोबतच बाकी त्याचे काम सुरू होते. त्याचे सगळे प्लॅनच्या हिशोबाने व्यवस्थित सुरू होते. थोडी सुद्धा चूक त्याला महागात पडणार होती, त्यामुळे डोळ्यात तेल घालून तो आपली कामं करत होता .

इकडे दुर्गाचे त्या गोडाऊन मध्ये काय आहे बघायचे प्रयत्न सुरू होते. तिला पूर्ण डाऊट होता की तिची मैत्रीण तिथेच कुठे आहे, पण तिच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. त्या गोडाऊनच्या अवतीभोवती चांगलाच तगडा पहारा होता, त्या तेवढया पहाऱ्यातून आतमध्ये जाणं म्हणजे स्वतः वर खूप मोठे संकट ओढाऊन घेण्यासारखे होते. तरी तिने हार मानली नव्हती, तिचे प्रयत्न सुरूच होते. दुसरे म्हणजे तिला मालकावर पण शंका होती, काहीतरी गडबड सुरू आहे तिला वाटत होते, म्हणून तिने त्याच्यावर पण पाळत ठेवली होती. त्याच्या नकळत तिने त्याचे घर पण तपासून बघितले होते, पण तिथेही तिला असे काही सापडले नव्हते. फक्त डाऊट शिवाय तिला बाकी असे काही खास पुरावे नव्हते सापडले.  

आपण जरा जास्तीच विचार करतोय, आपल्या संशयस्पद वृत्तीमुळेच आपण मालकाबद्दल असे काही काही विचार करतोय असेही तिला वाटून गेले. कारण रोज ते टेकडीवर भेटायचे तर दोघांमध्ये खूप मैत्रीपूर्ण वातावरण असायचे. उलट दिवसेंदिवस तिला त्याच्या बोलण्यातून वागण्यातून तिच्या बद्दलची काळजीच दिसत होती.

तिथे तिच्या मदतीला विश्वासू असे कोणी नव्हते. जे कोणी होते थोडेफार, ते प्रापंचिक मुलबाळ वाले लोकं होते,  ते या फालतू भानगडीत पडायला घाबरायचे, त्यामुळे त्यांना काही सांगून फायदा नव्हता . तिच्या एक दोन जवळच्या मैत्रिणी होत्या, पण दुर्गाला त्यांना यात ओढावेसे वाटले नव्हते, छोट्या चुकीमुळे मुलींचे भविष्य पणाला लागते , तिला माहिती होते, म्हणून तिने तिच्या मनात काय सुरु आहे कोणाला सांगितले नव्हते. पण काहीतरी वाईट होते आहे , सतत तिचं मन तिला सांगत होते, आणि ती तिच्याकडून होईल तसा प्रयत्न करत होती.

****

"ये आज्ये, झोप लवकर, कोणते व्हय त स्वप्न पहात बसते , मग सकाळच्याला तब्बेत बरी लागत नाही करत असतीस " ....दुर्गा , आजी लवकर झोपत नाही आहे बघून तिला म्हणत होती.

" आता झोप ईना,  का करू  " .....आजी

" दिवसभर जरा तोंड कमी वाजवत जा, सतत त्या बाजूच्या बुडगीला मायच्या चुगल्या सांगत बस्तीस, ते सांगते का कधी आपल्या सूनेच काही गाऱ्हाणं ? ....दुर्गा

" थे , धमक हाय का तिच्यात काई, घाबरती आपल्या सूनेस ती, का सांगणार राईली. सून बी तशीच हाये, वच्कन ओरडती तिच्यावर. मी पाय कशी मुठीत ठीवली मायी सून " .....आजी

" म्हणूनच झोप नाई लागत तुज. देवाचे नाव घ्याच्या दिवसात चुगल्या करीत बसती, झोप आता".....?म्हणत दुर्गा उठली नी आजीचे पाय दाबत बसली. थोड्या वेळाने आजी चांगली गाढ झोपी गेली होती. इकडे तिचे मायबाप पण शांत झोपले होते.

दुर्गाने सगळ्या घराचा कानोसा घेतला. सगळे झोपले आहे बघून ती उठली, तिने तिचा काळा ड्रेस घातला, ओढणी अंगाभोवती बांधली,, चेहरा पंचाने बांधला, फक्त डोळे उघडे ठेवले होते, तिचा नेहमीचा चाकू कंबरेशी खोचला, हातात काठी घेतली  आणि बाहेर पडली.

" या दुर्गाला कितीदा समजावले , तरी ही ऐकणार नाही" ...तो दुर्गाला रस्त्याने लपत जातांना बघून विचार करत होता, नी तिच्या मागे गुपचूप चालायला सुरूवात केली.

रात्रीची भयाण शांतता, त्यात प्राण्यांचे अजब अजब आवाज, रातकिड्यांची किरकिर , मधूनच एखाद कुत्रा ओरडायच. रस्त्यावर एकही चिटपाखरू नाही.   दुर्गाने तिची शॉर्टकटवाली पायवाट पकडली नी आजूबाजूचा कानोसा घेत पुढे जात होती.

" भयानक हिमतीची आहे ही दुर्गा , इतर कोणी असते तर या अश्या वातावरणात जागीच गार झाला असता " ....मनाशीच बोलत तो तिच्या पाठी जात होता.

दुर्गा गोडाऊनच्या बरीच जवळ पोहचली होती . आणि कोणाला दिसणार नाही अशी थोडी लांब लपून बसली.   गप्पा गोष्टी करत पहारेकरी पहारा देत होते.

" दुर्गा, आज हार नाय मानायची, आज बघूनच जाऊ काय हाय तिथं, कितीही वेळ लागला तरी " ....ती तिथेच चांस भेटायची वाट बघत बसली. आणि झाले तसेच, रात्री एक नंतर ते पहारेकरी पेंगायला लागले. दुर्गाने तीच वेळ साधली  दबक्या पावलाने गौडाऊनच्या मागे गेली. मागे भिंतीला थोडी वर अशी एक खिडकी उघडी होती. तिथे तिचा हाथ पुरत नव्हता , कशीबशी बाजूला दगड, विटांना पकडत ती खिडकी पर्यंत पोहचली , खिडकीच्या सडाखींना   पकडत, स्वतःचा समतोल साधत आतमध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करत होती , शेवटी तिचा प्रयत्न सफल झाला.  खिडकी मधून बघतांना क्षणाक्षणाला तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते, कधी राग, कधी घृणा , कधी भीती ,  कधी दया, कधी काळजी , तिच्या डोळ्यात आता पाणी साचायला लागले होते. तिला भोवळ आली आणि ती खाली पडली.

वर्तमान .....

" असे काय बघितले तुम्ही तिथे, की तुम्हाला भोवळ आली होती???" ..... ईशान

" कधीच असे काही तेव्हा बघितले नव्हते , ते सगळे बघून मला खूप असहाय्य वाटत होते ." ....दुर्गा  , ते आठऊन आता दुर्गाच्या डोळ्यात फक्त राग जमा झाला होता. ईशान तिच्या चेहऱ्याकडे बघत होता.

 

********

कोण आहे तो आमदार?? काय केले आहे त्याने ?? असे काय बघितले तिने गोडाऊनमध्ये की तिला चक्कर आली .. ती सुद्धा पकडल्या गेली काय ??? 

Keep guessing ... 

*****

क्रमशः 

कथा कशी वाटते आहे , नक्की कळवा.

धन्यवाद 

🎭 Series Post

View all