Jan 27, 2022
स्पर्धा

दुर्गा ... भाग 5

Read Later
दुर्गा ... भाग 5

 

दुर्गा...

©️®️ मेघा अमोल ( राधिका )

 

( मागच्या भागात आपण बघितले की दुर्गा आणि मालकाची मैत्री होते. मालक गावत नवीन असल्याने दुर्गा त्याला गाव दाखवायचे प्रॉमिस करते. पण वारंवार ही विचारून ती त्या दिवशी तिथे काय करत होती त्याला सांगत नाही. तो कोणासोबत तरी फोनवर बोलत काहीतरी प्लॅन करता असतो . आता पुढे ...) 

भाग 5

 

" Yes, l know we don't have much time , don't worry everything will be done on time " .... फोन वर बोलत त्याने फोन कट केला. 

 

घराचे सगळे दार खिडक्या बंद करत त्याने आपला लॅपटॉप काढला , आणि सराईतपणे कीबोर्ड वर बोट फिरवू लागला...आणि त्यातली काही माहिती त्याने पेन ड्राईव्ह मध्ये घेतली. तेवढयात त्याचा घराचा दरवाजा नॉक झाला. त्याने पटापट लॅपटॉप बंद केला आणि सगळं गुंडाळून कपाटात ठेवून दिले. आणि जाऊन दरवाजा उघडला.

 

" काय मालक, किती वेळ लावला दार उघडायला " ... दुर्गा

 

" ह्मम, टीव्ही बघता बघता थोडा डोळा लागला होता, आवाज नाही आला . " ...तो

 

" बरं हे घ्या डब्बा " ...दुर्गा हातातला थैला त्याच्यापुढे धरत बोलली 

 

" दुर्गा , तू मला सगळं गाव फिरवले पण तो आमदाराचा वाडा नाही दाखवला ?" ....तो

 

" मालक.... श ssss" .....म्हणतच ती आतमध्ये गेली आणि दार बंद करा. तो तिच्या या कृतीकडे बघत होता, त्याला काहीच कळले नव्हते.

 

" अहो, मालक , त्याचं नाव पण काढू नका, मोठा नालायक माणूस आहे तो " ....दुर्गा

 

" पण गावात तर लोकं त्यांना देवासारखे मानतात " ...तो

 

" ते त्याचे माणसं फिरत राहतात गावात म्हणून , खूप वाईट माणूस आहे बघा तो . मोठी वाईट नजर राहते त्याची . तिकडे जाऊ पण नका तुम्ही . " ...दुर्गा

 

" मी तर ऐकले आहे गावसाठी बरेच चांगले काम केले त्यांनी ?? " .....तो

 

" ते निवडणुका असल्या म्हणजे दोन चार गोष्टी करतो तो" ... दुर्गा

 

" ह्मम, इथेच राहतो काय??" ....तो

 

" हो येऊन जाऊन राहतो इथेच, बाकी सगळं घर इथेच आहे " ...दुर्गा

 

" Okay"..... तो

 

" आता पंधरा दिवसांनी देवळात कालिमातेची मोठी पूजा असते, आमदारच करतो, तेव्हा येईल बघा आता तो. तेव्हा गावात मोठी जत्रा पण असते. बरेच आजूबाजूच्या गावाचे लोक वैगरे येतात. वर्षभरात ते दोनच दिवस मजा असते ."  " .... दुर्गा 

 

"ह्मम " ....तो

 

" दुर्गाला बरीच माहिती दिसते आहे आमदाराची . त्या दिवशी रात्री ती त्याच रस्त्याने पळत होती. हिचा आणि आमदाराचा काही संबंध तर नसेल ??" ....तो मनातच विचार करत होता. 

 

" का ग , इथे मी बघितले बरीच दादागिरी करतात काही लोक ?? बाकीचे लोक पण घाबरून असतात त्यांना ?" ...तो

 

" ते त्या आमदराचेच लोकं आहेत , म्हणून आंगात आले आहेत. " ...दुर्गा

 

" पोलिस स्टेशनला काबरे कंप्लेंट नाही करत??" ...तो

 

"पोलिसला सांगून काहीच फायदा नाही बघा.   सगळे पोलिस विकले आहे , सगळे त्याच्यासाठीच काम करतात. जे त्याच्या विरुद्ध जातात , एकतर त्यांची बदली होते नाही तर काही अपघात तरी होतो. " 

 

" ह्मम " .....तो

 

" मालक, तुम्ही फार चौकशीमध्ये पडू नका बरं, चांगले लोकं नाही ते . तुमचं काम करा नि आपल्या गावी परत जा " .....दुर्गा

 

दुर्गा बोलत होती, आणि तो फक्त तिच्या चेहऱ्यावर प्रत्येक शब्दासोबत बदलणारे हावभाव टिपत होता..

 

"मालकाला काय झाले, असे का बघत आहेत माझ्याकडे, अन काय चालले आहे यांच्या डोक्यात, केवढी विचारपूस करत आहेत ??  " ...दुर्गा मनातच विचार करत होती. 

 

 

" मालक, जेवण करा , नाहीतर थंड होईल. " ...दुर्गा बोलून निघून गेली. 

 

 

 

******

 

फॅक्टरी मध्ये काही लोकं थोडी गुंड प्रवृत्तीची वाटत होती, त्या लोकांवर त्याने खास नजर ठेवली होती. बाकी त्याने बऱ्याच लोकांसोबत चांगले बोलून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. 

 

आता दुर्गामुळे बऱ्याच लोकांसोबत त्याची ओळखी झाली होती. दुर्गासारखं तो पण त्यांना अडली नडली मदत करत होता , त्यामुळे गावातल्या लोकांना पण तो चांगला वाटायला लागला होता. .

 

दुर्गाचे सुद्धा , घर, शाळा असे सगळे चांगले सुरू होते. पण अधूनमधून ती त्याला विचारात , तर कधी टेन्शनमध्ये वाटायची. कधी काही विचारण्याचा प्रयत्न केला की ती उडवाउडवची उत्तरे देऊन विषय टाळायची. पण तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी आहे,  त्याला राहून राहून वाटायचे. म्हणून त्याने आता तिच्यावर पण पाळत ठेवली होती. 

 

 

 

*****

 

 

तो रात्री  लॅपटॉप वर बऱ्याच वेळ काम करत बसला होता, त्यामुळे सकाळी त्याला  लवकर जाग आली नाही.

 

" बापरे उशीर झाला आज, होप दुर्गा गेली नसेल" ...म्हणतच तो फ्रेश झाला. त्याने ट्रॅक सूट घातला, पायामध्ये शुज घातले, घड्याळात बघत बघत शूजची लेस बांधली , हुडीची टोपी डोक्यात सरकवली  आणि तो मॉर्निंग रनिंग करत टेकडी कडे जायला निघाला. 

 

सूर्याने नुकतेच डोकं बाहेर काढले होते, पुढले दिसेल, तेवढा तांबडा सूर्यप्रकाश पसरला होता. थोडी थंड हवा वाहत होती.  सगळीकडे थोड धुक पसरले होते . हिरवीगार झाडांनी जसेकाही पांढरी लुसलुशीत शाल पांघरली होती . फुला पानांवर दवबिंदू मोत्यासारखे चमकत होते . पक्षांचा किलबिलाट सुरू झाला होता. मनमोहक असे ते वातावरण झाले होते. 

 

पळत पळत तो टेकडीवर पोहचला, आणि जागीच खिळला....डोळे दिपून टाकणारे असे सुंदर दृश्य त्याच्या डोळ्यांपुढे होते , आणि तो ते बघण्यात हरवला. 

 

आकाशात सूर्याची लाली पसरली होती , सोबतीला तांबडा लाल असा मोठा सूर्य आणि त्या सूर्याच्या मधोमध एक पाय फोल्ड करत दुसऱ्या पायाच्या टोंगळ्यावर ठेवत, दोन्ही हात वरती जोडलेले, डोळे बंद करत एका पायावर उभी दुर्गा त्याला दिसली. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, तिच्या त्या स्मित हास्याने पूर्ण वातावरण खूप प्रसन्न वाटत होते. 

 

"A marvelous , dashing rising Star.  Nothing is more beautiful than this , if really heaven is there, then this is the heaven " ... समोर योगाच्या पोझमध्ये असलेल्या दुर्गाला बघून आपोआपच त्याचा तोंडून शब्द बाहेर पडले. आणि तो हळू हळू तिच्या जवळ जात उभा राहिला आणि तिला न्याहाळू लागला... 

 

" Mr focus on your mission..... ही प्रेमात पडायची वेळ नाही" ...त्याचा फोन वाजला तसा तो भानावर आला. त्याने फोनमध्ये नंबर बघितला आणि फोन कट केला. 

 

त्या फोनच्या आवाजाने तिने पण डोळे उघडले.....

 

" मालक उशीर केला आज?" ....दुर्गा

 

" ह्मम , सकाळी जाग नाही आली, पण आज तू इथे कशी ?" ....तो

 

" आज शाळेला सुट्टी आहे, काही घाई नव्हती आणि तुम्ही पण आले नव्हते , म्हणून थांबली" ....दुर्गा

 

" आज हे योगा वैगरे??" ....तो

 

" हो , वेळ मिळाला की करत असते, तुम्ही आले नव्हते, मग वेळ होता तर करत होती" ...दुर्गा

 

" बरेच काही येते तुला ??" ... तो

 

" शरीर आणि मन चांगलं राहते, तुम्ही पण करत जावा " ....दुर्गा

 

दुर्गाने एक काठी त्याच्याकडे फेकली,  एक काठी आपल्या हातात घेत  चालऊ लागली. आणि  त्याच्याकडे बघत होती...

 

तिने त्याच्याकडे फेकलेली काठी त्याने अलगद झेलली ...आणि  तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता. 

 

" इतके दिवस बघितले ना कशी चालवायची ते, होऊन जाऊ द्या दोन दोन हाथ ?" ...दुर्गा

 

" Challenge??" .... तो

 

" तुम्हाला हवे तर ते समजा" ..... दुर्गाने काठी एका हातात वरती धरली,आणि बोटांवर एकच हाताने गरगर फिरवायला सुरू केली. झुं झुं आवाज करत तिची काठी हेवेपेक्षा जास्ती स्पीडने फिरत होती.p आता काठी फिरवता फिरवता ती त्याच्या भोवती त्याच्यावर नजर रोखत बघत फिरायला लागली होती. आधीच सकाळच्या तिच्या योगमुद्रेने तो घायाळ झाला होता...आता त्यात हे नवीन , तो तिला बघत होता. 

 

" Oh God .... She is driving me crazy ...." ..त्याने एक हाथ आपल्या केसांमधून फिरवत, स्वतःतच गालात हसत लाजतच तिच्याकडे बघत होता. 

 

 

" ओ मालक, काय झाले??? आधीच हार मानली काय??" ...दुर्गा , तो स्वतःतच हरवलेला बघत बोलली. 

 

 

" मी जिंकलो तर काय देणार???" ...तो 

 

" आधी काठी तर चालवा, बघू कोण जिकतया " ...दुर्गा 

 

तो तिच्याकडे बघत गालात हसला , आणि त्याने तिला आता काठीने  प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. 

 

आता दोघांमध्ये काठीचा खेळ चांगलाच  रंगात आला  होता...दोघांपैकी एकही माघार घ्यायला तयार नव्हता. त्याचा खेळ बघून दुर्गा आश्चर्यचकित झाली होती. इतक्या दिवस तिने कधीच त्याला असे काही करतांना बघितले नव्हते. लाठी चालवता चालवता दुर्गाचे वरती बांधलेले केस मोकळे झाले, हवेवर उडत ते तिच्या डोळ्यांवर आले , नि तिचे  लक्ष चुकलं, त्या संधीचा फायदा घेत त्याने काठीचे दोन्ही टोक पकडत ,  तिच्या डोक्यावरून मागे  घेत तिच्या कंबरेमध्ये काठी घातली आणि तिला स्वतःजवळ ओढले...

 

अचानकपणे झाल्याने थोड्यावेळ तिला काय झाले कळलेच नाही , पण तो तिच्या खूप जवळ होता, तिला त्याचा स्पर्श होत होता, येवढे तिला कळत होते. तिने त्याच्याकडे बघितले तर तो एकटक तिच्या डोळ्यांमध्ये बघत होता. त्याच्या त्या नजरेत काहीतरी होते की तिचे हृदय आता जोऱ्याने धडधडायला लागले होते. तिला तिच्यात अचानक वेगळाच पण गोड असा  काही बदल जाणवायला लागला होता, जे तिने या आधी कधीच अनुभवले नव्हते .  ती त्याचा डोळ्यात बघत होती, तिच्या हातातली काठी आपोआप गळून खाली पडली,  आता ती पण त्याच्या डोळ्यांमध्ये कैद झाली होती .  जसे काही , काळ वेळ सगळच  तिथेच थांबले असावे , असे ते दोघे एकमेकांमध्ये हरवले होते.

 

तिचे ते लांब, रेशमी केस हवे सोबत झिम्मा फुगडी घालत होते. हवेवर उडता उडता ते आता तिच्या चेहऱ्यावर येत होते, ज्यामुळे तिचा बरासचा चेहरा झाकल्या जात होता . त्याला तिचे डोळे आता नीट दिसत नव्हते....आणि न रहाऊन त्याने त्याच्या हातातली काठी सोडली, आणि एका हाताने तिच्या कंबरेमध्ये घालत तिला आपल्याजवळ घेतले , आणि  दुसरा हाथ तिच्या कपळवरून खाली आणत तिचे केस तिच्या कानामागे अडकवले. त्याच्या अशा अचानक झालेल्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले, आणि चेहऱ्यावर भांबावल्या सारखे भाव होते. तिला तसे बघून तो गालात हसला , नी तिच्या कानाजवळ झुकत होता. त्याला तस जवळ येनातांना बघून तिच्या पोटातून एक कळच गेली, पण त्याला आपण जवळ येण्यापासून का रोखू शकत नाही आहे , याचेच तिला नवल वाटत होते. त्याला तसे जवळ येताना बघून तिच्या श्र्वासांची गती वाढली आणि तिचे डोळे आपोआप मिटल्या गेले. 

 

"दुर्गा,  तू त्या दिवशी रात्री त्या रस्त्यावर काय करत होती?" ....तो तिच्या कानाजवळ जात एकदम हळूवारपणे बोलला.

 

" हां...???..."...त्याच्या या वाक्याने ती भानावर आली आणि तिने डोळे उघडले. 

 

" तू तिथे काय करत होती? " ....तो

 

" मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितले, मी कुठे गेली नव्हती " ....दुर्गा 

 

" मी तुला पहिल्यांदा फॅक्टरी मध्ये बघितले तेव्हाच ओळखले होते. तुझा चेहरा जरी झाकला होता , तरी तुझे हे डोळे मी कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी तूच होती, मला माहिती आहे . तू का पळत होती आणि ती लोकं कोण होती? " ....तो

 

" नाही सांगितले तर?" ... दुर्गा 

 

" तर अशीच माझ्या जवळ,  माझ्या  मिठीमध्ये " ...तो

 

" सोडा मला "....दुर्गा

 

" अं..... ह , आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, मग " ...तो

 

" कोणी बघेल" ...दुर्गा

 

" बघू दे " ....तो

 

" कोणी बोलेल ".... दुर्गा 

 

" बोलू देत " ....तो 

 

" हे तुमचं शहर नाही मालक, गाव आहे, माझं तर जाऊ द्या, लोकं तुम्हालाच मरतील ".....दुर्गा

 

" मारू देत, I don't care " ... तो

 

" तुम्ही साजूक नाजूक, नाही उभे राहू शकणार इतक्या वेळ" ......दुर्गा

 

" बघुया , कोण थकते आहे " ....तो

 

तो तिच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होता, आता पुढे काय बोलायचे तिला कळत नव्हते. तिने बऱ्यापैकी जोर लावत त्याच्या हातांच्या विखळ्यातून सुटायचा प्रयत्न करत होती .

 

" हे मालक दिसतात नाजूक, पण भलताच जोर दिसत आहे यांच्यात. येवढे मजबूत  कसे काय पकडून ठेवले ? आजपर्यंत कोणी असे मला पकडू नाही शकले , भलतेच शक्तिशाली दिसत आहेत ?? नक्कीच फॅक्टरीवाले आहेत की अजून दुसरे काही?" ...दुर्गा मनातच विचार करत होती

 

 

" ही जवळ हवीहवीशी का वाटत आहे ??? असे नाही की मी कधी मुली बघितल्या नाहीत की जवळ आल्या नाही , ही तर दिसायला एकदमच साधी आहे , तरी पण काहीतरी आहे हीच्यामध्ये , जे मला आकर्षित  करत आहे. हिच्या डोळ्यात बघितले की हरवायला होते, असे चालणार नाही, Mr focus on your work " .... तो तिला बघत मनातच विचार करत होता. 

 

 

" थोड्या वेळ शांत,  असेच रहुयात, थकले की आपोआपच सोडतील " ....मनातच विचार करत ती चुपचाप शांत उभी होती. तो मात्र तिच्याकडेच बघत उभा होता. 

 

असाच थोडा वेळ गेला, कोणीच कोणासोबत बोलत नव्हते. तो तिला बघण्यात व्यस्त होता ,तर ती कधी इकडे, तर कधी तिकडे, नी नजरानजर झाली तर खाली बघत उभी होती. त्याने अजूनही तिच्या भोवतीचा त्याचा हातांचा वेढा काढला नव्हता.

 

 

" हे मालक, आज सरकल्या सारखे का वागत आहेत ?? कोण भूत बित पिसाटले की काय ह्यांना ?"  " मनातच ती विचार करत होती.बऱ्याच वेळ कोणीच बोलत नाही बघून दुर्गाने परत बोलायला सुरुवात केली. 

 

 

" तुम्ही चुकीच्या व्यक्ती सोबत पंगा घेत आहात " ....दुर्गा

 

" याला पंगा नाही म्हणत, हे काहीतरी वेगळं आहे , आता कुठे योग्य व्यक्ती भेटलिये " ...तो

 

 

" वेगळं ??? काय??? हाथ सोडा माझे , म्हणजे सांगते वेगळं काय असते ते " ...दुर्गा

 

" ना.....मला माहिती आहे तुझे हाथ खूप चालतात, मी जेवढे विचारतोय ते सांग, सोडेल तुला. तशी सोडायची इच्छा तर नाही आहे, पहिल्यांदा आयुष्यात कुठली मुलगी मिठी मध्ये आहे , पण तरीही तू सांगितले तर सोडेल " ...तो

 

" हट्ट का करत आहात?? तुमच्या कामाचं नाही आहे काही? उगाच तुम्ही यामध्ये पडू नका" ....दुर्गा

 

" तुझी काळजी वाटते आहे, ती लोकं गुंड होती , म्हणून मला जाणून घ्यायचे आहे ?" ....तो

 

" ते आमदाराचे गुंडे होते. त्या हवेलीच्या मागे एक गोडाऊन आहे , तिथे कोणाला तरी जबरदस्ती ठेवले आहे असे मला वाटते. " ...दुर्गा

 

 

" कोणाला???" .....तो

 

 

" तेच बघायला मी तिथे गेली होती , पण बघू नाही शकली" ....दुर्गा

 

 

" तू कन्फर्म नव्हती तर तिथे जायची एवढी मोठी रिस्क का घेतली ? ,  किती डेंजरस होते ते लोकं?? त्यांच्या जवळ चाकू छुरे तर होतेच,  पण बंदुका ही होत्या .अशा ठिकाणी एकटीने जायचे असते काय?? तुला काही झाले असते तर??  " ...तो

 

 

 

" पण काही झाले नाही ना , आणि मी स्वतःची काळजी घेऊ शकते. " ...दुर्गा

 

 

" ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही. समोरच्याला कधीच कमजोर समजू नये " ...तो

 

" पण तुम्ही का इतकी काळजी करत आहात?? माझं मी बघून घेईल " .....दुर्गा

 

" चल सोड , तुला नाही कळणार, पण पुढल्या वेळपासून अशी एकटी कुठे जाऊ नको, खूप घातक लोकं आहेत ती " .....तो , त्याने तिच्या भोवती धरलेला त्याचा हाथ दूर केला,  तिच्या बाजूला झाला , जवळच असलेल्या एका मोठ्या दगडावर जाऊन बसला.

 

 

" तुम्हाला कसे माहिती ते लोकं घातक आहेत? " ...दुर्गा

 

" तूच तर सांगितले होते, विसरली ??" .....तो

 

 

" मालक , तुम्ही इतकी चौकशी कशापायी करत आहात??, मी गावात पण बघितले तुम्हाला लोकांसोबत लयच विचारपूस करत होता? " ...दुर्गा 

 

 

" असेच, आता जिथे राहतो तिथल्याबद्दल माहिती असायला नको ? उद्या जाऊन काही काम आले तर करता यायला पाहिजे , म्हणून सहज बोलचाल करत असतो.  बर ते जाऊ दे , तुला असे का वाटले तिकडे कोणी आहे ??? आणखी एक, इथे कोणी मुलगी पळून जाऊन लग्न केले काय?? ." ....तो 

 

" तुम्हाला कसे माहिती??." ...दुर्गा

 

" ते लंच टाईमला डब्बा खात होतो तर बाजूला बसलेले कामगार बोलत होते, तर कळलं " ...तो

 

 

" ती पळून नाही गेली आहे , ती गायब झाली आहे " ...दुर्गा

 

" म्हणजे??? गायब??? पण त्या बायका तर बोलत होत्या कुठल्या मुला सोबत पळून गेली वैगरे" .....तो

 

 

" ती माझी मैत्रीण होती . तीच प्रेम होत एका मुलावर, आणि त्याच पण आहे , ते लग्न पण करणार होते . पण तो मुलगा इथेच गावात आहे . तीच गायब झाली आहे, तिला कोणीतरी गायब केले आहे " ....दुर्गा 

 

 

" तू इतके ठामपणे कसे काय सांगू शकते की तिला कोणी गायब केले???? तुला डाऊट आहे काय कोणावर?? आणि मग असे आहे तर गावात सगळे असे का म्हणतात ती पळून गेली वैगरे?? आणि खरंच जर तिला कोणी किडनाप केले असेल तर ही खूप काळजी ची गोष्ट आहे?? तुला जर काही माहिती असेल तर सांग, पोलिसकडे जाता येते " ....तो

 

 

 

" तुम्हाला सांगितलेना  इथले पोलिस त्या आमदाराच्या मुठीत आहेत. पोलिसांकडे जाऊन काहीच फायदा होणार नाही आहे . मी तिला शेवटची आमदाराच्याच एका माणसाबरोबर बोलतांना बघितले होते. मी तिला विचारणार पण होती, पण अचानक घरी काही काम आले . दुसऱ्या दिवशी विचारू ठरवले ,तर त्याच दिवशी ती गायब झाली . आणि मला शंका आहे की तिला तिथेच त्या गोडाऊन मध्ये ठेवले आहे , म्हणून मी बघायला गेली होती. " ....दुर्गा

 

 

" तुझा भ्रम झाला असेल "......तो

 

 

" माहिती नाही, पण तिथे काहीतरी आहे, रोज काहीना काही गडबड, हालचाल सुरू असते तिकडे " ....दुर्गा

 

"पण मग कोणाला सोबतीने घ्यायचे , अशी एकटी का जाते तिकडे ?" .....तो

 

" इथ कोणीच विश्वासाचा माणूस नाय आहे " .....दुर्गा

 

" मग मला कसे काय सांगितले येवढे सगळे ??? माझ्यावर कसा काय ठेवला विश्वास ?" ....तो

 

 

" तुम्ही कोणाला जाऊन सांगितलं ना मी जे बोलली ते, कोणच विश्वास नाही ठेवेल तुमच्यावर आणि वरतून तुम्हालाच मारतील , नाहीतर दुसऱ्या दिवशी तुम्हालाच गायब करतील, दूर राहा मालक या सगळ्या गोष्टीमधून, आपलं काम करा नि परत जावा  " .....दुर्गा हसतच बोलली.

 

 

" माझं नाव आहे काहीतरी, मला नेहमी अशी मालक मालक का करत असते?" .....तो

 

" नको, माणसानं आपली पायरी ओळखून वागावं, मालकच ठीक आहे " .....दुर्गा 

 

 

" बरं, चल निघू, आज उशीर झाला उठायला, काही न खाताच आलो आहे , त्यात तू खूप थकवले काठी गेममध्ये  " ....तो

 

 

" मालक, तुम्ही खूप छान खेळता काठी, तुम्हाला कशी काय येते?" .....दुर्गा

 

 

" तुला बघुन शिकलो , चल आता, भूक लागली आहे " ....त्याने दुर्गाने जास्ती विचारपूस करू नये म्हणून भुकेचा बहाणा केला होता.

 

 

" अरे आधी सांगितलं असते, थांबा बसा इथे, मी आली पाच मिनिटात " ....दुर्गा बोलतच पळत पळत टेकडीवरून खाली उतरत गेली ,  दहा मिनिटातच पेरू आणि सीताफळ घेऊन आली. 

 

" मालक, घ्या ही ताजी ताजी फळं, खूप गोड हायेत " ...दुर्गा , त्याच्या हातात फळं देत बोलली.

 

 

" Wow, custard apple, my favourite " ....त्याने सीताफळ घेतले नि खायला पण सुरू केले . दुर्गा पण पेरू खात होती . दोघेही तिथे दगडांवर बसत गप्पा करत खात होते. 

 

 

" काय ग , त्या दिवशी तू ज्या रस्त्यावर पळत होती, तो तर तिकडे आमदाराच्या घराकडचा नव्हता??"......तो

 

" मालक,  तुम्हाला भारीच चौकश्या लागल्या, हे इकडे का अन् ते तिकडे का ?? तुम्ही पोलिसात जायला पाहिजे होते" ....दुर्गा

 

 

" दुर्गा ,तू ना कामाचं सोडून , बाकी बिनकामाचे जास्ती बोलते , मुद्ध्याच बोलत नाही ".....तो

 

 

"  एक छोटी पायवाट आहे, गुपित आहे, जास्ती कोणाला माहिती नाही, मी शोधून काढली आहे " ....दुर्गा

 

 

"Okay"....... तो

 

आता चांगलच उजाडले होते , दोघेही घराकडे परतीच्या वाटेने निघाले होते. 

 

" मालक, आज दुसरा रस्ता दाखवते , तिकडे देवळाकडून जातो ".....दुर्गा , हातात काठ्या पकडत खेळत उड्या मारत चालत होती, तो तिच्या मागे मागे काही विचार करत येत होता. 

 

 

" काय ग दुर्गे, दारचानच नमस्कार करून जाशील व्हय ग?? इथ आतच्याला येऊन पाया पडशील तर पाय दुखतील व्हय ग तुझं ?" ....एक बाई दुर्गाला देवाला बाहेरूनच नमस्कार करतांना बघून बोलली.

 

 

" मावशे, पोचतो म्हाया नमस्कार तेच्यापाशी हितनच . देव सगळीकड रायातो मावशे, कधच्याने समजेल तूम्हासणी , म्हाईत नाय " .....दुर्गा

 

" व्हय ग, राऊ दे तुय, मंग हे देऊळ फुकट्यालाच बांधले लोकायनी" ..... बाई

 

" मावशी, रोजची येतं हिथ , सुटला व्हय ग तूवा प्रॉब्लेम ? ऐकले व्हय ग काली न??" ...दुर्गा

 

 

" पाय ना बाई, रोजची येते हिथ, उपास तापस सगळं करून झालं बघ, पण देवी काय जागी नाही व्हायची ?,काय करावं काय समजेना बघ "....बाई

 

" देवीने दिले न हाथ पाय सलामत, ते वापर की, तूयातली देवी जागव की , मग पाय होते का न्हाय त तुझे प्रॉब्लेम बंद, का रोजच्याले देवीस त्रास देत " ......दुर्गा

 

 

" राहू दे बाई तुझं गाऱ्हाणं, करल माझी माय मदत मले " ..... बाई

 

 

" ठीक हाय, वाट पाय मग , चल जातो घरचाला" .....दुर्गा तिथून पुढे निघाली. तो तर दुरून दुर्गाचे आणि त्या बाईचे बोलणे ऐकत होता. 

 

" दुर्गा, तुझा विश्वास नाही देवावर? नास्तिक आहेस तू?? " ....त्याने कौतूकाने विचारले.

 

 

" मालक, खूप विश्वास आहे ओ , देव आहे म्हणून तर चांगल्या गोष्टी टिकून आहे बघा . पण मला सांगा, देवाने आपल्याला सगळं दिले, हाथ,  पाय,  तोंड, डोकं सगळच. मग त्याचा वापर नाही का करायचा??? अत्याचार झाल्यावर देवीने काली मातेचे रूप घेतले होते दुष्टांचा नायनाट करण्यासाठी , तसेच आपल्याला पण तेवढे खंबीर नको का व्हायला , कशापायी दुसरा मदतीला धाऊन येईल याची वाट पाहायची. ?" ....दुर्गा

 

" म्हणजे?" .....तो

 

" देवाने वेगवेगळे रूप कशापायी घेतली?? त्यांनी त्यांच्या जीवनात चांगली कामं केली , सगळ्यांसमोर एक आदर्श घालून दिला , कसं जगायचं याचा. आपण का करतो??" ....दुर्गा

 

 

" काय ???" ....तो

 

" आपण त्याच्या मूर्तीची, फोटोची पूजा करतो. त्याचा चित्राची पूजा करतो, पण त्याचं चरित्र अंगिकारत नाही. तो जसा वागला तसे आपण वागत नाही. देव कसं जगायचं सांगून गेला , धर्म शिकवला , तसे काहीच नाही करत आपण . देवाची पूजा म्हणजे देवाचे गुण अंगीकारणे होय , असे मला वाटते मालक " ....दुर्गा

 

 

" Impressed,  right "..... तो

 

 

" आता ही मावशी, तिचा नवरा खूप दारू पितो, आणि मग घरी खूप मारतो, तमाशे करतो. मुलं ऐकनात , सासू त्रास देते, एकटी बाई कमवते, खाणारी पाच सात तोंड .  बिचारी खूप मेहनतीने पैसे कमावते, घर चालवते नी तो संसाराची नासाडी करतो. त्यासाठी रोज इथे देवीला साद घालयाला येते. आता जर हिनीच थोड कडक होऊन दोन चार त्याचा कानाखाली दिली ठेऊन तर रस्त्यावर येते तो . पण नाय, ती देवीच्या मदतीची वाट पाहील. " .....दुर्गा 

 

 

" बापरे दुर्गा मॅडम, तुम्ही लहान वयातच महाज्ञानी झाल्या" ....तो तिच्या पुढे हाथ जोडत हसत बोलला.

 

 

" तस नाय मालक, चांगल्या गोष्टी फक्त वाचण्यासाठी नस्त्यात, त्या आपल्या जीवनात वापराच्या पण अस्त्यात." ...दुर्गा

 

 

" ह्मम"......तो

 

"चला घर आलं, निघते मी " .....दुर्गा आपल्या घरी गेली.तो पण आपल्या घरी निघून आला. 

 

*****

 

" दोन माणसं पाठवा, गावच्या पेहराव मध्ये. आणि बाकी आपली टीम तयार ठेवा. " ....तो फोनवर बोलत होता. 

 

"..........." ....पलीकडून काहीतरी बोलणे झाले. 

 

" कालीपुजेच्या दिवशी काम पूर्ण करू, तोपर्यंत वाट बघावी लागेल . " .....तो , बोलून फोन ठेऊन दिला , आणि समोरच्या प्लॅनिंगला लागला. 

 

******

 

" दुर्गे, मालकासणी कोंबडी चालते व्हय ग ?" ... माय 

 

" माहित नाय माय??? कधी इचारले नाय" ......दुर्गा

 

"इचारून येतीस का ?? म्हणजी मग बनऊ म्हणते आज " .....माय

 

" बरं , येते इचारून , बाकी बनव तोपर्यंत" .....दुर्गा 

 

दुर्गा मालककडे त्यांना नॉनवेज चालते काय विचारायला गेली. दार नॉक करणार तेवढयात दार आपोआप उघडले. 

 

" दार उघडेच हाय वाटते" ....मनाशीच बोलत दुर्गा दार लोटून आतमध्ये गेली तर समोरच चित्र बघून अवाक झाली. 

 

*****

तो नेहमी नेहमी कोणासोबत बोलतो??? कालिमाता पूजेच्या दिवशी त्याचा काय प्लॅन आहे ?? दुर्गाची मैत्रीण खरंच पळून गेली आहे की दुर्गाच्या म्हणण्याप्रमाणे तिला कोणी किडनाप केले आहे ??? आणि किडनाप केले असेल तर का केले आहे ???? दुर्गाने त्याच्या घरी काय बघितले ??? Keep guessing .....

 

*****

क्रमशः 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️