Aug 16, 2022
स्पर्धा

दुर्गा ... भाग 4

Read Later
दुर्गा ... भाग 4

 

दुर्गा ....

 

( आधीच्या भागात आईला त्रास देतो म्हणून तिने तिच्या वडीलाला वठणीवर आणले होते. दुसऱ्या दिवशी काही कामाने फॅक्टरी मध्ये दुर्गा जाते, तिथे तिची मालकासोबत म्हणजेच त्या दिवशी तिला वाचवणारा त्या मुलासोबत भेट होते. रोज सकाळी पहाटेच्या अंधारात दुर्गा गावाजवळ असलेल्या टेकडीवर लाठी शिक्षण आणि व्यायाम करत असते . लाठी प्रॅक्टिस करत असताना तिला जाणवते कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. .... आता पुढे ) 

 

 

भाग 4

दुर्गा सकाळची काम आटोपून , पहाटेच्या अंधारातच गावाजवळच्या टेकडीवर येऊन तिचा रोजचा व्यायम आणि लाठी चालवायची प्रॅक्टिस करत होती .

दुर्गा काठी चालवायची प्रॅक्टिस करत होती की तिला जाणवले कोणीतरी तिच्यावर नजर ठेवत तिचा पाठपुरावा करत आहे . ती काठी चालवतांना , डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत किती लोकं आहे,  आजूबाजूचा अंदाज घेत  होती.  अचानक तिला कोणीतरी तिच्या जवळ आलेले जाणवले , वेळेचा थोडासाही विलंब न करता तिने तिच्या कंबरे मध्ये खोचलेला छोटा चाकू काढला,  हातातली काठी त्या व्यक्तीच्या डोक्यामागे घेत, त्याला हलता येणार नाही असे पकडून ठेवले.

" नाद नाय करायचा, दुर्गा म्हणत्यात मला, चार हाथ लांब राहायचं " ....दुर्गा दुसऱ्या हातातला चाकू त्या व्यक्तीच्या गळ्यावर ठेवत म्हणाली.

हे सगळं इतक्या फास्ट झाले होते की ती व्यक्ती थोड्या वेळ साठी घाबरली होती, नी घाबरतच दुर्गाकडे बघत होती. दुर्गाचे लक्ष गेले आणि ती दचकलीच.

" मालक, तुम्ही???, इथे काय करताय, ह्या वेळेला? " ....दुर्गा  आश्चर्यचकित होत त्याच्याकडे बघत होती.

" हो मीच, सांगतो,  पण.....पण आधी तो चाकू बाजूला कर, लागून जाईल " ....तो थोडा अडखळतच बोलत होता.

" ह्मम " .....दुर्गाने त्याच्या गळ्यावरचा चाकू बाजूला केला.

" मी मॉर्निंगवॉक साठी निघालो होतो, रस्त्याने येत होतो की समोरून तू जातांना दिसली. येवढ्या पहाटेची कुठे जात आहे, काळजी वाटली म्हणून तुझा पाठलाग करत इथे आलो होतो. पण  तुला इथे बघून मीच अवाक् झालो . किती भारी चालवते काठी तू, मी कधीच कुठल्या मुलीला इतकी भारी काठी चलावतांना नाही बघितले. आणि म्हणूनच तुला बघितले तर स्तब्धच राहिलो. जेव्हा भानावर आलो तर तू माझ्या गळ्यावर चाकू ठेवलेला दिसला. " ....तो

" अच्छा, मी रोज येते इथे व्यायाम आणि काठी चालवायला शिकायला " ...दुर्गा

" पण हे इथे?? हे खूप डेंजरस जागा वाटते आहे. म्हणजे इथे कोणी दिसत नाही आहे , काही झालं तर कोणाला काही कळणार पण नाही आणि कोणाची मदतही मिळणार नाही. " ....तो

" मी माझी काळजी घेऊ शकते. कोणी येऊन हाथ त लाऊन दाखवाव?? " ..दुर्गाच्या आवाजात आत्मविश्र्वास होता.

" हो, ते तर मी अनुभवलेला आहे . पण तरीही इथे का?? म्हणजे हे तू तुझा घरीच करू शकते ?" ....तो

" मालक , कसं आहे ना हे गाव आहे, तुमच्या शहरासारखे नाही, त्यामुळे इथे गावप्रमाने वागावं लागते. मी हे असे मर्दानी गोष्टी करील तर सगळे काय काय बोलतील , वरून बघनाऱ्यांची नजर वेगळी .  आई आज्यी पण करू द्यायचे नाही मला हे सगळं तिथे, शिक्षणच तर खूप मुश्किलीने घेत आहे, हे सगळं करील तर शिक्षण पण बंद होईल. म्हणून इथे हे लपून  , पण माझ्या मायला माहिती आहे , तिचा पाठी हाथ आहे म्हणून जमते " ...दुर्गा

" Okay ! पण सांभाळून " ....तो

" तुम्हाला कशापायी माझी येवढी काळजी?" .....दुर्गा

" नाही, सहज . बरं हे सगळं शिकली कुठून?? तू  खूप सराईतपणे चालवते काठी" ...तो

" मालक, तुम्ही येवढे का विचारत आहे?? जासुस वैगरे आहात काय??" ....दुर्गा

" हा हा हा..नाही, असच कौतुक वाटले म्हणून विचारतोय. म्हणजे मुलींना या वयात असे सजने सवरणे वैगरे आवडते, तुझं जरा वेगळं दिसत आहे ,म्हणून विचारले  " ...तो

" माझी शाळा त्या बाजूच्या गावात आहे. इथे गावात शाळा नाही, म्हणून तिथे जाते. त्या गावात पहिलवान आहे , त्याची तिथे गावच्या बाहेर शाळा आहे, तिथे बरेच मुल जातात शिकायला. तिथेच हे काठी चालवणे पण शिकवतात. रोज नसते, आठवड्यातून दोनदा असते , मग शाळा बुडाऊन लपून छपून गपचुप ते बघते, आणि मग इकडे येऊन तसेच करून बघते, त्याचा अभ्यास करते. मला ते कुस्तीचे पण काही काही हातखंडे येतात. " ..दुर्गा

" Wow , great . हे शिकायची काबरे इच्छा आहे तुझी??? " ... तो

" मला पोलीस व्हायचे आहे , दुसरे म्हणजे इथे बायकांवर खूप अत्त्याचार होतात, ते संपवायचे आहे . लहानपणा पासून पाहते, हे माणसं स्वतहाला मर्द म्हणत काय काय अत्याचार करतात बायका मुलींवर , पण कोणाची बोलायची , त्यांच्या विरुद्ध जायची हिंमत नाही . मला मुली बायकांना स्वतचं रक्षण करता यावे येवढे शिकवायचे आहे, पण त्यासाठी आधी मला शिकावं लागेल, काही करून दाखवावे लागेल. म्हणून हे सगळं " ...दुर्गा

" अरे वाह , गावातल्या मुली असा पण विचार करतात तर, मला वाटलं फक्त चूल नी मुल मध्ये अडकून पडल्या आहेत " ....तो
 

" मालक , एक विनंती आहे , गावात कोणाला हे सांगू नका " ....दुर्गा

" ह्मम,पण  एका अटीवर ...." ....तो

" काय..?" .....दुर्गा

" मी इथे नवीन आहो, थोड्या दिवसासाठी काम बघायला आलो आहे ,  कोणी ओळखीचे नाही , तर माझी मैत्रीण व्हायचं आणि मला गाव दाखवायचं " ....तो

"काय...?? मैत्रीण??? तुमचं डोकं टाळ्यावर तर आहे??? मैत्रीण वैत्रिन काही नाही " ...दुर्गा

" मी बघितले तुला , तू तर सर्वांसोबत बोलते, तुझं अख्ख्या गावासोबत चांगलं पटते, तुला काही कठीण नाही, आणि तुला घाबरतात पण लोक हा  ."  तो....दुर्गाची मस्करी करत बोलला.

" हा ते तर आहे, आपल्या सारखी आपणच इथे , ठीक आहे मैत्रीण तर नाही होत, पण गाव फिराविल. " ...दुर्गा

" मैत्रीण का नाही होणार??" ..... तो एक भुवई उंचावत तिच्या कडे बघत होता.

" जो नवरा होईल, तोच मित्र होईल. आपले पण काही उसुल आहेत मालक ." ...दुर्गा ठसक्यात म्हणाली.

तिचे असे बोलणे ऐकून त्याला हसायला आले .

" बरं अजून एक, तू तर गावात लोकांसोबत त्यांच्या भाषेत बोलते, मग इथे माझ्यासोबत वेगळीच बोलते आहे?" ....तो

" मालक, जैसी भाषा , वेसा उत्तर " .....दुर्गा स्वताहवरच हसत होती.

तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता..

" अहो म्हणजे मला अशी तुमच्या सारख्या शहरातल्या लोकांसारखी मराठी येते, शाळेत जाते, पुस्तकांमध्ये अशीच मराठी असते. पण गावात तशी बोलत नाही. आपल्या गावच्या बोलीभाषेत एक वेगळीच आपुलकी जाणवते, नाही काय???" ....दुर्गा

"हुशार आहेस " ....तो हसत बोलला.

" हो, बर मी निघते माझी वेळ झाली जायची."...बोलतच दुर्गा पाठी वळली नी जायला निघाली.

" दुर्गा, त्यादिवशी रात्री त्या सामसूम रस्त्यावर काय करत होती??" ......तो

त्याचा त्या प्रश्नांनी दुर्गा अवाक झाली, तिचे पाय तिथेच खिळले . तिला आता थोडी भीती पण वाटत होती. ती काय सांगू याचा विचार करत होती.

" तर, यांनी मला ओळखले होते ....पण आता यांना काय सांगू??? यांना काही कळता कामा नये " .....दुर्गा मनातच विचार करत होती .

" दुर्गा, उत्तर नाही दिले तू?" ...तो तिच्या जवळ येत बोलला.

" कधी????कुठे....??? " ......दुर्गा

" त्या दिवशी रात्री, काही लोकं म्हणजे गुंडेच बहुतेक ...." तो बोलतच की दुर्गाने त्याच्या तोंडावर हाथ दाबून धरत मागे नेत एका झाडाच्या मागे नेले.....नी इकडे तिकडे बघत होती...

" इथे सांभाळून बोला....नाही तर असल्याचे नव्हते होऊन जाल, तुम्ही समजता तेवढ साधं गाव नाही हे , सांभाळून राहा , आणि परत हा विषय काढू नका "  दुर्गा त्याच्या नजरेला नजर देत कडक शब्दात बोलत होती.

तो मात्र परत तिच्या त्या गूढ नजरेत हरवला होता...ती काय बोलते आहे त्याला काहीच ऐकू जात नव्हते.

" ओ मालक, कुठे हरवलात ?"" ....दुर्गा त्याच्या समोर हाथ हलवत बोलत होती.

"  हां , कुठे नाही " ....तो भानावर येत बोलला.

" इथे रात्रीचे बाहेर पडणं म्हणजे आपल्या अंगावर मरण ओढाऊन घेण्यासारखे आहे , गावच्या आजूबाजूला जंगल पसरले आहे , खूप प्राणी असतात बघा. तुम्ही पण नका निघत जाऊ रात्रीचे बाहेर. सांभाळून रावा " ...दुर्गा ने त्याला घुमावत उत्तर दिले नी ती गोष्ट टाळली.

" ह्मम, ते तर आहे , येतांना बराच जंगली भाग दिसला." ....तो

" मी निघते , उशीर होईल शाळला " ....दुर्गा

" उद्या याच वेळी भेटू इथे " ...तो दुर्गा ला जातांना बघून ओरडला.

" हो" .... दुर्गाने पाठमोराच हाथ उंचावत हलवला नी घराकडे पळाली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आपल्याच विचारात हरवला.

" ही काहीतरी लपवत आहे ?? पण काय?? काय होते तिकडे??? कोण होते ते लोकं??? शोध घ्यावा लागेल. " ...तो मनातच विचार करत  त्या पहाडावरून सगळी कडे नजर फिरवत होता......आता दिवस उजाडत आला होता, आजूबाजूचे स्पष्ट दिसत होते........

" Wow, amazing...... दुर्गा जागा चांगली शोधली आहेस तू " .....तो मनातच बोलत स्वतःशीच हसला. आणि तिच्याच मागे मागे परतीच्या वाटेला लागला.

दुर्गाच ते रूप बघून तो थोडा बावरला होता....पहिल्यांदा भेटली तेव्हा घाबरलेली पण डोळ्यात तेवढाच आत्मविश्वास, दुसऱ्यांदा भेटली तेव्हा एक शाळकरी, निरागस साधी  मुलगी, आणि आज एकदम मर्दानी दुर्गाचेच रूप , प्रत्येकवेळी वेगवेगळे रूप , त्याला तिचे नवल वाटत होते.

 

*****

आता तो रोज पहाटे त्या पहाडावर येत होता, दुर्गा ही येत होती . दुर्गा तिचे व्यायाम, हातपाय चालऊन तिचा रोजचा अभ्यास करायची. तो तिला बघत तिला फॉलो करत असायचा. सोबतच गावाबद्दल इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू असायचा.

" काय ग , तुमच्या इथे काही हॉटेल, रेस्टॉरंट वैगरे नाही?? "  ...तो

" मालक, कुठल्या गोष्टी करत आहात तुम्ही?? इथे कोण जाते हॉटेलात खायला?? कधी कधी दोन वेळ जेवायला भेटले की नाही याची चिंता राहते, हॉटेल चा तर विचार पण नाही येत डोक्यात . पण का , तुम्ही का विचारत आहात???, घरचे अन्न खाऊन बोअर झाले की काय???" ...दुर्गा

" घरचे जेवण ??? मला काही बनवता येत नाही , जेवायचं कुठे हाच प्रश्न पडला आहे . फॅक्टरी मध्ये दोन दिवस डब्बा दिला , पण रोज रोज ठीक नाही वाटत, म्हणून हॉटेल वैगरे आहे काय शोधत होतो." ....तो

" अच्छा, असा प्रॉब्लेम झाला तर??? आधीच सांगायचे असते , मी आणून देईल की रोज डब्बा. मी अन् माझी माय चांगलं जेवण बनवतो,म्हणजे आमचं आपलं भाकरी, भात, भाजी असच गावाकडचे जेवण असते ,  बघा तुम्हाला आवडत असेल तर ?" ...दुर्गा

" अरे वाह, हे तर उत्तम झाले . माझा जेवणाचाच प्रश्न मिटला. तुम्ही जे बनवता तेच दिले तरी चालेल. मी डब्ब्याचे पैसे  देईल म्हणजे काही  ओझे पण वाटणार  नाही. " ...तो

" चालेल मग मालक, मी पोहचौन देत जाईल डब्बा , सकाळी फॅक्टरी मध्ये आणि संध्याकाळी घरी आणून देत जाईल." ....दुर्गा.

" Thank you " .... तो .

त्याला सगळं जेवण बनवता येत होते . पण कुठेतरी त्याला दुर्गाची ओढ लागली होती, तिच्या बद्दल जाणून घ्यायची त्याची तीव्र इच्छा झाली, काहीतरी होते जे त्याला कळत नव्हते.   म्हणून त्याने हा बहाना शोधला होता. त्यामुळे आता त्याची दुर्गाची दिवसातून तीनदा तरी भेट होणार होती.

घरी पैशाची थोडी उणीव होतीच, म्हणून दुर्गाने मायला नी तिच्या शिक्षणासाठी  पैशाने थोडी मदत होईल म्हणून मालकाचे डब्ब्याचे काम घेतले होते. भाजी वैगरे तर शेतातून, माळ्यातून भेटून जात होती त्यामुळे जास्ती खर्च पण नव्हता येणार , त्या निम्मित आपल्या गावातल्या पाहुण्याची खायची सोय पण होईल, आणि त्यांच्याकडून शहारा बद्दल माहिती पण काढता येईल  असा विचार तिने केला होता.

रोजच्या भेटीगाठी, गप्पा गोष्टी, त्यात दुर्गा वेळ मिळेल तसे त्याला गाव, आजूबाजूचा परिसर सुध्दा दाखवत होती. त्या बद्दलची माहिती पण सांगत होती. आता त्यांच्या मध्ये चांगलं फ्री निखळ रिलेशन तयार झाले होते. फॅक्टरी मध्ये तो खूप कडक वागत होता, पण दुर्गा सोबत असताना मात्र एकदम वेगळा, हसरा, गप्पिष्ट, मस्तीखोर, मस्करी करणे असे सगळे चालत होते .

" मालक , नाजूक साजूक बघा तुम्ही,  इथल्या उन्हात कोमेजून जायचे हो  " .....दुर्गा त्याला गाव फिरवत असताना त्याचा उन्हाने लाल पडलेला चेहरा बघत ,त्याची मस्करी करत  बोलली.

" काय करणार कामच तसे आहे . जिथे काम निघाले तिथे जावेच लागते. तसेपण कोणी मैत्रीण व्हायला तयार नाही, काय फरक पडतो चेहरा लाल होतोय की काळा ? " ...तो हसत बोलला.

" तुम्ही जाम बोलायला लागला हा मालक , तिकडे फॅक्टरी मध्ये वेगळेच असता, इथे माझ्यासोबत वेगळे?" ....दुर्गा

" ते कामाचं ठिकाण आहे , तिथे स्त्रिक्टच राहावं लागते , थोडी सुद्धा चूक झालेली परवडणार नाही तिथे. " ....तो

" ते पण आहे , बर निघते, अभ्यास आहे थोडा . " ....दुर्गा

" ह्मम, मन लाऊन अभ्यास कर. बाय " .....तो

दुर्गा सायकलवर पाय मारत निघून गेली.

तिच्या पाठमोऱ्या आकृतकडे बघत तो उभा होता. तेवढयात त्याचा फोन वाजला.

"................" .....पलीकडून काही बोलणे झाले .

" Yess started , will update accordingly " .... तो.

"............"... पलीकडून

" Yes, l know we don't have much time , don't worry everything will be done on time " .... फोन वर बोलत त्याने फोन कट केला.
 

****

" कोण आहे हा मालक??? तो फोनवर कोणासोबत बोलत होता??? काय आहे त्याचा प्लॅन ??? दुर्गा का लपवाते आहे तिने त्या रात्री काय बघितले ते??? Keep guessing .... 

 

भाग कसा वाटला नक्कीच कळवा. 

*****

आतापर्यंत कथेतून हेच सांगायचं प्रयत्न केला आहे , की चिकाटी असेल तर कुठलेच काम अशक्य नाही, जसे ईशान एक वर्षापासून दुर्गाच्या बोलण्याची वाट बघत होता. 

मुलीने कणखर असण्याची गरज आहे . अत्याचार होत असतील तर त्याला सहन न करत उत्तर द्यायलाच हवे मग ते घरात असो वा बाहेर, जसे दुर्गाला आपल्या आईवर होणारे आत्त्याच्र सहन होत नाही आणि ती आपल्याच वडीलाला चांगला चोप देते. 

मुलींना स्वसंरक्षण करता यायला हवे. त्यासाठी नियमित exercise , व्यायाम , दुसऱ्याचा प्रतिकार करत येईल असे हातपाय चालवता यायला हवे , जसे दुर्गा लहान वयातच हे सगळं समजली आहे. प्रत्येक भागातून काहीना काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे... 

 

Thank you ...

 

 

****

क्रमशः 

 

*****

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️