दुर्गा ... भाग 29

आर्याविर

दुर्गा 29

मागच्या भागात : दुर्गाची आई , आजी आणि आर्याची आई दुर्गा आणि आर्याच्या लग्नासाठी तयार होतात . सगळीकडे आनंद ओसंडून वाहत असतो, सगळे या दोघांच्या लग्नासाठी खूप खुश असतात . दुर्गा तिच्या आईला त्यांच्या गावी पोहचवायला जाणार असते. 

आता पुढे : 

भाग 29

" माय , चल लवकर लवकर कर तयारी , निघायला उशीर नको व्हायला , बस सुटली तर मग बराच वेळ वाट बघत थांबावं लागेल ", दुर्गा 

" अरे पण पोरी, गाडी हाय ना तुझ्याजवळ ?", आजी

" आजी , ते कामासाठी आहे , पर्सनल कामासाठी नाही . तस पण सध्या नाही , आता कामाचा चार्ज घेतला की मग सगळं मिळेल , मग तुला जीप मधून फिरवेल हा आज्जी ", दुर्गा मस्करी करत आपले ओले केसं पुसत खोलीच्या बाहेर आली . 

" आर्या ! ", दुर्गा , आर्या खाली त्याचा ब्लॅक गाडीला टेकून उभा फोन वर बोलत होता . 

" हे सकाळी सकाळी इथे काय करत आहे ? बापरे पण काय भारी दिसत आहे ", आर्याला बघत स्वतःशीच विचार करता करता दुर्गाचे लक्ष समोर लाकडी खांबाला अडकवलेल्या छोट्या आरश्यात गेले. 

" दुर्गा , ते बघ एकदम एखाद्या हिरोला सुद्धा लाजवेल इतके हँडसम , आणि तू …. काय बघितले असेल त्यांनी माझ्यात ? नाही म्हणजे मी पण बेस्टच आहे , माझ्यासारखी तर कोणी त्यांना कधी भेटणार पण नाही , पण ऑफिसर तर मी आता झाले , यांना तर मी आधी पासून आवडते … हो पण का आवडत असेल , हाच तर प्रश्न आहे !", स्वतःशीच विचार करता करता दुर्गाचे लक्ष आजूबाजूला गेले , तर तिकडे पलीकडे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुली आर्या कडेच बघत होत्या .ती तडतड पायऱ्या उतरत आर्याच्या समोर जाऊन उभी राहिली . एका हातात टॉवेल पकडत आपले दोन्ही हात कंबरेवर ठेवत आर्या कडे बघत भुवया उडवत इशर्यानेच इथे काय करत आहे विचारत होती .  

" मी नंतर बोलतो !", म्हणत आर्या ने फोन ठेवला. 

" Good morning जानेमन !", आर्या आपल्या ओठांवर गोड स्मायल आणत म्हणाला. 

" इथे काय करत आहात , ते पण सकाळी सकाळी , ते पण एवढं नटून थटून ?", दुर्गा 

" तुला बघतोय ", आर्या 

" एवढं तयार होऊन ? काय आज सगळं ब्लॅक ? ब्लॅक टीशर्ट ,ब्लॅक शूज , ब्ब्लॅक गॉगल , ब्लॅक कार सुद्धा ", दुर्गा 

" Yess , ब्लॅक मोबाईल आणि ब्लॅक ह्रिस्ट वॉच सुद्धा !", आर्या आपला हात दाखवत म्हणाला. 

" हा तेच … तेच म्हणतेय , काय … काय स्पेशल आहे ?", दुर्गा 

" You know black is very hot and sexy ! हॉट कंपनी कोणाला नाही आवडत ", दुर्गा 

" कोणाला कंपनी द्यायला आलात ? यांना ….?", दुर्गा आजूबाजूला येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे इशारा करत म्हणाली. 

" Are you feeling jealous, baby ? " , आर्या 

" मी …? मी का जेलस होऊ ? मी एक ऑफिसर आहे ते पण पोलीस ऑफिसर ", दुर्गा 

" हा , पण मुलगी पण आहेस ना !", आर्या मस्करीच्या सुरात तिला चिडवत म्हणाला. 

" मी काय ते कॉलेज गोइंग गर्ल वाटली काय ?" दुर्गा 

" No baby …. You are legend ", आर्या 

" By the way , that girls also very cute ha ", आर्या परत चिडवायला लागला. 

" हा बरोबर आहे , गोऱ्या गोऱ्या आहेत ना, cute च वाटेल.. आता तुम्हाला वाटत असेलच , का ही काळी सावळी उगाच आवडून घेतली ?", दुर्गा 

" I told you na baby , black is very hot and s……..!", आर्या 

" मिस्टर आर्या ….", दुर्गा 

" येस मिसेस आर्या ?", आर्या 

दुर्गा डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती …

" ते काय आहे ना हार्ट ला डोळे नसतात ना, त्याला काय रंग बिंग दिसला नाही , प्रेम करायला गोरा आहे की काळा आहे बघायला जमलं नाही !", आर्या बिचारा चेहरा करत म्हणाला. 

" तुम्ही ना ….", 

" I know , I am so sweet "!" आर्या तिला ओठांनी किस करायची अक्टिंग करत म्हणाला. 

" देवा , हे आयटम असं कसं झालं ….काय करू यांचं ? ", दुर्गा डोक्यावर हात मारत बोलली. दुर्गा ला बघून त्याला फारच मजा वाटत होती . 

" तसं मी आज जास्तच हँडसम दिसत आहे ….नाही ? ", आर्या बाजूला इशारा करत म्हणाला पण नजर मात्र दुर्गाच्या नजरेत स्थिरावली होती . 

दुर्गाने त्या बाजूला बघितले तर मुली आर्याला बघत होत्या … 

" वैसे साली आधी घरवाली होती हैं ?", आर्या 

" मार खाणार आता तुम्ही … " , दुर्गाने दोनचार फटके आर्याला दिलेच . 

" डोळे काढून ठेवेल मी , दुर्गा काय आहे माहिती नाही ", दुर्गा जरा चिडत म्हणाली . 

" दुर्गा काय आहे हे तर हे तर दाखवूनच दे अख्ख्या देशाला ! But now Chill sweetheart ! " , आर्या प्रेमाने बोलला. 

" ह्मम ! इथे का आलात ? ते पण एवढया सकाळी ?", दुर्गा 

" अरे यार , तू एकाच प्रश्नावर अडकली आहेस ? मी स्वतंत्र भारतातला स्वतंत्र व्यक्ती आहो , मी पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा जाऊ येऊ शकतो . ", आर्या 

" हो ? ", दुर्गा 

" हो ….. ", आर्या 

" ये मेरा इलाका है , इधर कायकू आये सिधेसे बताओ ", दुर्गा 

" इथे माझी बायको राहते , मला तिचं सकाळचे गोड रूप बघायचे होते , ते टीव्ही सीरियल मध्ये दाखवतात , केस पुसताना , कपाळाला टिकली लावताना , तुळशी पुढे उदबत्ती लावताना वगैरे असते तसं ", आर्या छान स्वप्नवत बोलत होता . 

" मग ?", दुर्गा ( दुर्गाला हसू येत होते , पण ती हसू ओठात दाबून ठेवत बोलत होती, तिला पुढे ऐकायचे होते … ) 

" मग काय ….. हे एक खुंखार जानवर पुढे येऊन उभे राहिले ", आर्या 

" काय ? …. आता मी सोडायची नाही तुम्हाला ", आणि त्याला मारायला म्हणून त्याचा मागे धावली पण त्या आधीच तो वरती खोलीकडे आला होता . 

" आई , झाली काय तयारी ?", आर्या 

" अरे मालक , तुम्ही ?", दुर्गाची आई 

" ये, आत ये पोरा ", आजी 

त्याचा पाठोपाठ दुर्गा पण तिथे पोहचली . 

" आजी , आल्याचा मस्तपैकी फक्कड चहा होऊन जाऊ द्या ! ", आर्या दुर्गाला एक डोळा मारत खोलीत पलंगावर जाऊन बसला . 

" मी तुम्हाला सोडणार नाही ", दुर्गा 

" Okay !", आर्या बत्तिशी दाखवत म्हणाला. 

" हा…? एवढी हिम्मत ?", दुर्गा 

" काय झालं दुर्गे ?", आई 

               तेव्हा तिच्या लक्षात आले की आजी आई तिथे आहे… ती चूप झाली … आणि आपल्या हाताच्या स्लीवस वर करत इशाऱ्यानेच आर्याला नंतर बघते म्हणत आतमध्ये गेली . 

         चहा नाश्ता वगैरे करून झाला . आई गावाला जाण्याची तयारी करत होती .

" बरं माय , पाहुण्यांना सांग आता आपण निघत आहो , दोन दिवसांत परत येईल !", दुर्गा आतमधून ओरडली . आईने आर्याकडे बघितले. 

" आजी , कोण पाहुणे येणार आहेत काय ?", आर्या 

      आजी आणि आई खुदकन हसले. त्यांच्याही लक्षात आले होते दोघांची लुटपुट भांडणं , रुसवाफुगवी सुरू आहे ते . 

" त्यांना सांगा , जावयाला पाहुणे म्हणतात आपल्याकडे !", दुर्गा 

" दुर्गीच्या आजी , येतो बघा आम्ही . काळजी घ्या तुमची ", दुर्गाची आई आजीला नमस्कार करत म्हणाली . 

" हो , आरमाण जावा , अन् दुर्गाच्या साखरपुड्यास या लवकर लवकर , लय तयारी करायची बघा ", आजी 

" हो हो , तुम्ही समदे हायेत ना, काय काळजी नाय बघा !' , आई एक थैली हातात घेत बोलल्या . 

" बरं आजी येतो !", आर्या दुर्गाच्या आईच्या हातातली थैली आपल्या हातात घेत बोलला. 

" अहो मालक , राहू द्या !",आई 

" आई , यांना सांगावं की आमच्याकडे जावई मुलगा असतो ", आर्या 

" कळलं …..!", दुर्गा 

आर्या खाली आला आणि त्याने बॅग्स गाडीच्या डिक्की मध्ये ठेवल्या . 

" हे काय ? तुम्ही कुठे निघाले ? मी कॅब बुक केली आहे , येईलच !", दुर्गा 

" मॅडम , तुमच्याकडे आपला परमनंट पर्सनल ड्रायव्हर असताना दुसऱ्याची गरज पडते ?" आर्या 

" तुम्ही बस स्टॉपला सोडायला येत आहेत ?", दुर्गा 

" हे भगवान ! खूप डफर आहे या दुर्गादेवी ", आर्य 

" म्हणजे ? तुम्ही गावी येत आहेत ?", दुर्गा 

" येस !", आर्या 

" काय गरज नाही ! " दुर्गा 

" आजी , दुर्गा देवींचा काय भरवसा नाही , गाव बघून तिथेच थांबल्या तर…. ? तसे पण मी सुट्ट्या झोप काढायला नाही घेतल्या आहे ! बसा आई !", आर्या गाडीचे दार उघडत बोलला. 

       दुर्गा आईला नको म्हणत नकारार्थी मान हलवत होती , पण आई गाडीत जाऊन बसली . 

" हा ? ही माझं ऐकत नाही ", दुर्गा 

  

" Your highness !", खाली वाकत आर्याने गाडीच्या समोरील सीटचे दार उघडलेले …. दुर्गा पण चुपचाप आतमध्ये जाऊन बसली , आर्या गोड हसला , दार बंद करून तो ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला. आणि गाडी चींधिगाव च्या दिशेने निघाली. अधूनमधून आर्या चे दुर्गाला सतावणे सुरू होते . आई मात्र मागे टेकून छान स्वस्थ झोपून गेली होती . दुर्गा उगाचच लटका लटका राग दाखवत होती, पण तो सोबत आल्यामुळे मनोमन सुखावली सुद्धा होती. 

      जवळपास चार पाच तासांचा प्रवास करत आता दुर्गाच्या गावाचा परिसर लागला होता . आज पाच सहा वर्षांनी दुर्गा इकडे येत होती . तिचा ओळखीचा , बालपणीचा परिसर बघून तिला खूप आनंद झाला , जरी थोड्याफार वेदना होत्या तरी बालपण सगळ्यांचे आवडीचे आणि हवेहवेसे वाटते. आणि कदाचित त्या वेदनानीच तिला इथवर पोहचायला मदत केली असावी . 

      थोड्या वेळातच आर्याच्या गाडीने गावात प्रवेश केला. ती मोठी गाडी बघून लहान लहान मुलं फारच उत्साही झाली आणि ओरडत गाडीच्या मागे पळत येऊ लागली . लहान गावात अश्या मोठ्या गाड्या खूप कमी , कधीतरीच येत असत , नेहमी त्यांना बघायला मिळत नसत , टीव्ही मध्येच काय तेवढे बघायला मिळत. त्यामुळे असे प्रत्येक्षात बघितले की गावतल्यांना या गोष्टींचे फारच कौतुक वाटे . 

        गाडी मोठा रस्ता संपला तशी तिथे थांबली. दुर्गाच्या घरापर्यंत जाणारा रस्ता अगदी अरुंद अश्या पायवाटा , गल्ल्या होत्या , त्यामुळे मध्ये चौकात गाडी पार्क केली . तोपर्यंत मुलांचा घोळका तिथे जमला होता. पुरुष मंडळी सुद्धा बऱ्यापैकी जवळ आली होती. बायका घराच्या अंगणात आल्या होत्या . सगळे टक लाऊन बघत होते , कोण उतरते ते … 

" बाई बाई , केवढ गोरं गोमट पोरगं आहे , बघ त ", आर्या गाडीतून बाहेर उतरला तसे एक बाई बाजूच्या दुसऱ्या बाईला म्हणाली. 

" सुमे , ते सोड , तिकडे पाय ते पोरगी , शर्ट पँटातली , टीव्ही मध्ये दाखवत नाय काय ते पोलिसिंन , एकदम तशीच पाय !"

    दुर्गा गाडीच्या बाहेर उतरली होती. तिने ब्लुईश जीन्स , डार्क ब्लू चेक्सचा छान फिटिंग चा शर्ट , अगदी मुलाप्रमाणे शर्ट च्या बाह्य वरती फोल्ड केलेल्या , हातात जाडसर चौडे काळया बेल्ट चे घड्याळ , केसांची पोनी टेल , पायात शूज , डोळ्यांवर काळा गॉगल , जबरदस्त भारदस्त अन् तेवढीच attractive ती दिसत होती . 

" शाले, थोडी सावळी हाये पोरा पेक्षा , पण दिसायला त्याचा पेक्षा पण भारी हाय पाय !", सुमी 

" नवरा बायको असतील कांते दोघं ? ", शालू 

" मंगळसूत्र नाय , टिकली नाय , भांगेत कुंकू नाय …. काय माहित बाई !", सूमी 

" हो , या शहरातल्या लोकाईचे येगळेच थेर असतात !", शालू 

( झालं , गाव म्हटलं की हे आलेच , एक मुलगा मुलगी दिसले की त्यांचं नातं काय असेल , हे ठरवायला लागून जातात ) 

" शाले , ते पोरगी पाहायला सारखी वाटते का ?", सूमी 

" मी तर नाय पह्याली बाई अशी पोरगी कधीच गावात !" शालू  

तेव्हढ्यात दुर्गाची आई कार मधून बाहेर आली . 

" कमळा …… ते पोरगी दुर्गा …. शाले , ते बघ ते दुर्गा हाय , आपली दुर्गा ", सुमी ओरडली . 

" मी म्हणलं नव्हं , पाहायला सारखी वाटते , दुर्गा च हाय ती ", शालू ओरडतच दुर्गा होती तिथे आली. 

" कमळे , ही दुर्गा हाय ना ?", सूमी 

" हो , आपली दुर्गा , पोलीस इन्स्पेक्टर झाली हाय !", कमळा 

" क….. क…..काय ?", सुमी सोबत सगळेच डोळे तोंड फाडत दुर्गाकडे बघत होते. कोणाला विश्वासाच बसत नव्हता. 

         गर्दी बघून, परत काय भांडण बिंडण झाले काय बघायला म्हणून तिथे गावातले दोन हवालदार आले . दुर्गा कोणी पोलीस आहे , यावर त्यांचं काही विश्वास बसला नाही . ते न्यूज सांगत पोलीस स्टेशन ला आले . थोड्या वेळातच तिथल्या इन्स्पेक्टर तिथे दुर्गाला भेटायला आला. दुर्गाला बघून त्याने कडक स्यल्युट मारला. गावातला छोटा इन्स्पेक्टर म्हटलं तरी गावकऱ्यांसाठी तो म्हणजे एकदम मोठा माणूस असतो . त्याला दुर्गाला स्यल्युट मारताना बघूनच गावकऱ्यांना दुर्गा किती मोठी आहे याचा अंदाज आला . 

" नमस्कार मॅडम , मी पाटील ", पाटील

" नमस्कार इन्स्पेक्टर पाटील , मी दुर्गा आणि हे कॅप…."

" हॅलो सर , मी आर्याविर ", दुर्गा पुढे काही बोलायच्या आतच तिला नको सांगू असे मानेने इशारा करत आर्या पाटील सोबत बोलला. दुर्गा अजब नजरेने आर्या ला बघत होती. का यांनी सांगायला नकार दिला, तिच्या डोक्यात आता वेगळेच प्रश्न निर्माण झाले होते . 

***** 

क्रमशः 

***** 

🎭 Series Post

View all