Jan 26, 2022
प्रेम

दुर्गा ... भाग 28

Read Later
दुर्गा ... भाग 28

दुर्गा 28

 

 

मागच्या भागात : दुर्गाने तिच्या आई कडून आर्या आणि तिच्या लग्नासाठी होकार मिळवला असतो . दुर्गा भविष्याची गोड गोड स्वप्न रंगवत असते , आर्या तिला रिॲलिटी ची आठवण करून देतो . दुर्गा तिच्या चाळीत पोहचते. खूप जल्लोषात तिथे तिचे स्वागत केलं जाते. 

 

भाग 28

 

      दुर्गाचे सगळ्यांसोबत यथेच्छ नाचून झाले होते. त्यांच्या सोबत खूप गप्पा करून झाल्या होत्या. काय काय प्रश्न विचारून सगळ्यांनी तिला त्रासावून सोडले होते , पण ती सगळ्यांच्या प्रश्नाची उत्साहाने उत्तरं देत होती. त्यांचं तिच्या बद्दल असलेले कुतूहल , तिच्या कामा बद्दल , ट्रेनिंग बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता , तिचं कौतुक , त्यातून तिच्याप्रती त्यांचा आदर हेच सगळं त्यांच्या बोलण्यातून दिसत होते. बऱ्याच वेळ गप्पा टप्पा मारून आता दुर्गाने आपली गाडी आजीच्या घराकडे वळवली . दिवसभर पासून सतत तिचं बोलणं , धिंगाणा घालणं सुरू होते. आता ती दमली होती. आर्या , आजी , आई आणि दुर्गा वरती आजीच्या खोली मध्ये गेले. 

 

          आर्या आणि दुर्गाच्या मदतीने आजीचा छोटंसं हॉटेल छान चालत होते . एवढया वर्षात आजीने बऱ्यापैकी पैसे कमावले होते. ती आता स्वत:साठी एखादा छोटा फ्लॅट किंवा घर घेऊ शकत होती. पण इथे चाळीत माया लावणारी लोकं होती , तिच्या प्रेमाची लोकं होती, आणि मोठ्या घरापेक्षा आपली लोकं महत्वाची, आधीच्या तिच्या मुलाने तिला घरातून बाहेर हाकलले होते , आता तिला ही मायेची लोकं सोडायची नव्हती. दुर्गा आणि ही चाळीतील लोकं हेच काय तिचं कुटुंब होते, म्हणून आजीने इथेच राहणं पसंत केले होते. आणि आपल्या जमलेल्या पैशातून ती चाळीतील मुलांना शिक्षणासाठी मदत करत होती. हेच ध्येय आजीने ठरवले होते. सगळ्यांना मदत करत होती त्यामुळे आजी आता तिथे सगळ्यांच्या अगदी खूप जवळची झाली होती, आजीची सुद्धा ती लोकं अगदी आई आजी सारखी काळजी घेत. चाळीतील लोकांच्या मनाची आणि प्रेमाची श्रीमंती इतकी जास्त होती की पैशाने श्रीमंत लोक सुद्धा यांच्यापुढे कमी पडत होते. 

 

 

     आजीने सगळ्यांसाठी मस्तपैकी आल्याचा चहा टाकला.  

 

" काय पोरा , आज शांत बसला आहे ?", आजी चहा करता करता आर्याला चिडवत होती. आजीला सुद्धा आर्या आणि दुर्गाच्या नात्याची खोली माहिती होती. तीच तर साक्षीदार होती यांच्या प्रेमाची. 

 

" काय बोलणार , आता तुमच्या दुर्गा मॅडम मोठ्या ऑफिसर बनल्या , आम्हाला कोण विचारतेय आता. तसे पण यांची बडबड थांबेल , तेव्हा कुठं आम्हाला बोलता येईल. !", आर्या 

 

" हो न कोणतं टॉनिक पिऊन आली त , किती बोलत हाय, तोंड नाय दुखलं का तुझं ?", आई 

 

" दुखत आहे वाटते , ताणून झोपल्या !", आर्या दुर्गाकडे इशारा करत बोलला. दुर्गा बाजूला एका कोपऱ्यात खाली चटई वर बसल्या जागी झोपी गेली होती. ते बघून आजी आई हसू लागल्या. 

 

" ये पोरी चहा आणि काही खाऊन घे मग झोप !", आजी दुर्गाला आवाज देत होती. 

 

" ह्ममम ….!", दुर्गा झोपेतच बोलली पण उठली नाही. 

 

" आजी , झोपू देत तिला , सगळ्यांना भेटल्याचा आनंदनेच पोट भरले आहे तिचं. ", आर्या दुर्गाकडे बघत बोलला. तिच्या चेहऱ्यावर समाधानकारक तेज होते. 

 

आर्या , आई , आजी चहा घेत गप्पा करत होते. दुर्गा मात्र चांगलीच गाढ झोपली होती. 

 

" आजी , मावशी , मला तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे, म्हणाजे तुमच्या दोघींची परवानगी हवी आहे !", आर्या 

 

" मज माहिती काय मागायचे हाये, म्हणजी तुझा चेहरा बोलतूया सारं , तरी बोल तू !", आजी आपलं हसू दाबत बोलली.  

       ते ऐकून दुर्गाची आई पण खुदकन गालात हसली. त्या दोघींना बघून आर्याला सुद्धा लाजल्या सारखे होत होते. तो पण गालात हसत झोपलेल्या दुर्गाकडे बघत होता. 

 

         आजीने दुर्गाच्या आईला डोळ्यांच्या इशाराने ' तुझं काय मत आहे आणि आर्या सोबत बोल ' म्हणून खुणावले. 

      ' यांच्या समोर मी काय बोलू , तुम्हीच बोला' , असे दुर्गाच्या आईने खुणेनेच होकारार्थी मान हलवत सांगितले. 

 

" तुझीच होती , तुझीच हाये अन् तुझीच राहील जा कधी पण घेऊन !", आजी हसत बोलली.  

 आर्या आळीपाळीने आजी आणि आईकडे बघत होता. 

 

" असं का बघतूया , आमच्या साऱ्यांपेक्षा तुझा हक्क जास्त हाये तिच्यावर, तू घडवलं हायेस तिला , लग्न तर ठीक हाये समाजासाठी ते करावं लागते , पण त्या पुढे हाये तुमचं प्रेम , पण तुमच्या नात्याला कोणत्या नावाची गरज नाय , लय पवित्र हाये तुमचं नातं , अन् मी साक्षीदार हाय त्याची . ", आजी 

 

      आर्या तर स्तब्ध आजीचे विचार ऐकत होता . जुनं माणूस , या नवीन गोष्टी स्वीकारू शकते याचेच त्याला कौतुक वाटत होते. 

 

" आर पोरा , इतकी जिंदगी झाली , जवळचे पाह्यले , दूरचे , रक्ताचे सारे पाह्यले , खरं सोनं अन् खोट सोनं , लगेच समजती बघ . ते सोड , बोल कधी वाजवायचा बँड ? आता वरात तू घेऊन येतो का ती घेऊन येते, ते तुम्ही तुमचं ठरवा , नाय म्हणजी हे पोर पण काय कमी नाय ! " , आजी हसत बोलली. 

 

" दुर्गा म्हणत्यात मला , नाद नाय करायचा !", आजी आणि आर्या दोघेही एकसाथ म्हणाले आणि हसू लागले. 

 

" ठीक आहे , लवकरच घरी बोलतो आणि सांगतो !", आर्या 

 

" घरी अजून बोलले नाय होय मालक ?", दुर्गाची आई 

 

" माझ्या मॉमला दुर्गा आणि माझ्या बद्दल माहिती आहे . मानेल ती लवकरच !", आर्या 

 

ते ऐकून दुर्गाच्या आईच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. 

 

" नको टेन्सन घेऊ , दुर्गा नाय तर कोण नाही , अन् जिंदगीभर तिचाच बनून राहील असा हाये माझा पोरगा , अन् ही बाय याच्या पण दोन कदम समोर हाय !", आजी हसतच बोलली. ते ऐकून दुर्गाच्या आईची काळजी थोडी कमी झाल्यासारखी वाटली. 

 

 

" बरं तुम्ही करा आराम , मी येतो उद्या सकाळी !", आर्या 

 

" दुर्गा उठ, हे घरी चालले !", आजीने आवाज दिला

 

" आजी झोपू दे तिला , कधी कधी झोपलेली वाघीण पण गोड दिसते !", आर्या आजी आणि आई ला नमस्कार करत बोलला आणि त्याच्या घरी निघून आला. 

 

 

………………………. 

 

            सकाळी आर्या दुर्गा कडे जायची तयारी करत होता , तेवढयात त्याचा फोन वाजला..

 

 

" Come fast , it's an emergency !", आर्याला फोन आला. 

 

" Coming !", आर्या फोन वर बोलत बोलतच त्याचा गाडीत जाऊन बसला आणि त्याने वेगाने गाडी पळविली.  

 

" या जंगली मुलगीला तुम्ही आतमध्ये सोडलेच कसे ? ", स्वाती ( आर्याची आई) बंगल्याच्या मेन दारात उभी सेक्युरिटी गार्डस् वर ओरडत होती , आणि ते आम्ही काय केले नाही असे सांगत होते.)  

 

" You down market , तू आतमध्ये आली कशी ?", स्वाती 

 

" हे काय इथून , दारातून !" , दुर्गा गेट कडे हात दाखवत , हसू ओठात दाबत बोलली. दुर्गाचे हे असे बोलणे ऐकून स्वाती आणखीच चिडली. पण या दोघींचे असेच एक्वेशन होते , स्वाती चिडते माहिती असूनही दुर्गा तिला आणखी चीड आणायची . 

 

 

" पण हे डाऊन मार्केट आज सुपर मार्केट दिसत आहे !", स्वाती दुर्गालाला न्याहाळत स्वतःशीच विचार करत होती . 

 

 

" हिने अशीच माझ्या मुलावर भुरळ घातली माझ्या हातून निसटला तो . स्वाती , be careful !" , स्वाती स्वतःशीच बोलत होती .

 

" I know , I am looking very na na super beautiful ! मला बघून झाले असेल तर घरात येऊ काय ?", दुर्गा 

 

" तुला बघेल माझी ज्युती ! ", स्वाती

 

" इंग्लिश मॅडमच्या ज्युती मावशी , तुमचं मला बघून झाले असेल तर मी घरात येऊ शकते काय ?" , दुर्गा स्वातीच्या पायातील चपले कडे बघत आपले दोन्ही हात जोडत उभी बोलली. 

 

" हिचा आगाऊपणा अजिबात कमी झाला नाही, आणखी जास्तच आगाऊ झाली आहे ही ", स्वाती 

 

" नाही , तू इथे बाहेरच थांब , तुझा काहीच भरवसा नाही , कुठे इथे कंबरेत चाकू वगैरे असेल !", स्वाती 

 

" चाकू तर आहेच , पण आता बंदूक सुद्धा आहे !", दुर्गा त्यांना घाबरावल्या सारखी करत बोलली. 

 

" गुंड तर तू आधी होतीच . हिला पकडा , अजिबात आतमध्ये येऊ द्यायचे नाही !", स्वाती

 

       स्वाती बोलली तसे गार्ड्स दुर्गाला पकडायला म्हणून तिच्या जवळ येऊ लागले . 

 

 

       दुर्गा गार्ड्सच्या दिशेने वळली , ती शांतपणे उभी होती, तिने आपल्या हातातील आयडी कार्ड वर केले , ते बघून सगळे तिच्या पासून दूर झाले , कोणीच तिच्या जवळ यायला बघत नव्हते आणि स्वाती त्यांना दुर्गाला पकडा म्हणून सांगत होती . असा तिथे गोंधळ सुरू असतो. 

 

" काय झालं मॉम , तू इतक्या अर्जंटली का बोलावले ? काही प्रोब्लेम झाला काय ?", आर्या बोलताच भराभर चालत तिथे येत होता. 

 

" ही बघ ही , हिने सगळा गोंधळ घालून ठेवला आहे , घरात नाही यायचं सांगूनही खूप अरेरावी करते आहे , उद्धटपणे बोलते आहे. आणि हे तुझे हे गार्ड्स , बदल त्यांना , काही कामाचे नाही ", स्वाती 

 

" Okay mom , तू शांत हो , मी बघतोच माझ्या मॉम ला त्रास देण्याची कोणी हिम्मत केली , आणि काळजी नको करू सेक्युरिटी पण बघतो ", आर्या बोलत बोलत पुढे आला. 

 

" काय झालं ? अहो बाई कोण आहात तुम्ही ? काय गोंधळ घातला आहात इथे ?", पाठमोऱ्या साडी मधल्या दुर्गाला बघून आर्या म्हणाला. 

 

         आर्याचा आवाज ऐकून दुर्गा एकदम स्टाईल मध्ये मागे वळली , ती जशी आर्या च्या समोर गेली , तिचे ते साडीतील सुंदर रूप बघून आर्याचे तर शब्दच हरवले , तो एकटक तिला बघण्यात ध्यानस्थ झाला होता ( जसे मै हू ना मध्ये साडी मधली सुश्मिता शाहरुखच्या समोर येते , आणि शाहरुखला सभोवतालचा विसर पडतो , आणि व्हायोलीन वाले म्युझिक वाजायला लागते अगदी तशीच काहीशी दुर्गाला साडी मध्ये बघून आर्याची हालत झाली होती ) 

 

        इतक्या वर्षात दुर्गा पहिल्यांदा आर्या समोर साडी मध्ये आली होती . ती त्या साडी मध्ये इतकी सुंदर दिसत होती की आर्या तर तिला वेड्यासारखा बघत होता. दुर्गाने त्याचाकडे बघून एक गोड स्मायल केले , झालं… आधीच साडीतील दुर्गा , त्यात ही अशी गोड स्मायल , आर्या तर तिथेच खल्लास झाला होता. 

 

" वीर , हीच इथे गोंधळ घालत होती ", स्वाती 

 

" घालू दे , गोंधळ खूप सुंदर आहे ", आर्या हीप्नोटाईझ झाल्यासारखा एक हात आपल्या गालावर ठेवत दुर्गाकडे बघत बोलला. 

 

" Oh God ! एरवी हा वाघासारखा दाहडत असतो , हिच्या समोरच का असा गध्या सारखा वागतो . काय करू याचं , वाटलं इतक्या वर्षात विसरला असेल , पण नाही हे तर अजून जास्त पागल झाल्यासारखं दिसत आहे !", स्वाती कसातरी चेहरा करत आर्या कडे बघत होती. तिचं लक्ष गेले तर सगळे सेक्युरिटी गार्ड्स आपली नजर खाली झुकावून उभे होते. स्वातीने त्यांना तिथून जाण्याचा इशारा केला तसे ते तिथून निघून गेले. 

 

" वीर !", स्वातीने थोडा मोठ्याने आवाज दिला. 

 

" हा मॉम ", आर्या 

 

" इकडे बघ , माझ्याकडे ", स्वाती 

 

तेव्हा त्याच्या लक्षात आले तो काय गडबड करतो आहे ते . 

 

" Yess mom , बोल ", आर्या दुर्गाच्या बाजूला उभा होत म्हणाला. 

 

" तिला विचार , ही इथे काय करते आहे ?", स्वाती 

 

" अरे हो ! Durga, Gorgeous you , gorgeous saree , gorgeous smile , what a beautiful surprise yaar ! ", आर्या 

 

" वीर , gorgeous , beautiful च्या पुढे बोलशील काही ? आंधळा !", स्वाती 

 

" Ohh Yess , काय सुंदर प्रसन्न सकाळ आहे . इतकी सुंदर सकाळ मी आजपर्यंत नव्हती बघितली !", आर्या 

 

दुर्गाला गालातच खूप हसू येत होते . 

 

स्वातीने डोक्यावर हात मारून घेतला. 

 

" आज अचानक , इतक्या दिवसांनी इथे का आली आहे , ते पण हे साडी अँड ऑल ?", स्वाती 

 

" माझ्यासाठी तुमच्या मुलाचा हात मागायला ! ", दुर्गा 

 

" What ? ", स्वाती 

 

" What ? ", आर्या 

 

" Ohh God , आज मारण्याचा इरादा आहे काय …. सकाळपासून असे ब्युटीफूल gorgeous धक्के मिळून राहिलेत ! हाय रे मेरी किस्मत , किती सुपर awesome आहे !", आर्या स्वतःच्याच छातीवर ( हार्ट वर ) आपल्याच हाताच्या मुठ्ठीने ठोकत म्हणाला. 

 

" आपलं ठरल्याप्रमाणे, मी तुम्हाला प्रॉमिस केल्या प्रमाणे , की मी तुमच्या स्टेटसला शोभेल असे काही बनून मग या घरचा उंबरठा ओलांडेल , तर ते मी पूर्ण केले आहे . हे माझं आयडी कार्ड, मी एक पोलिस ऑफिसर झाले आहे . आणि माझ्या कामा नुसार पुढे माझे पोसिशन्स वाढत जाईल , जे मी वाढवणाराच आहे चांगले आणि प्रामाणिकपणे काम करून . तर आता मी लग्नासाठी आर्यविर यांचा हात मागायला आले आहे , आणि तुम्ही आता नकार देऊ शकत नाही ", दुर्गा पूर्ण आत्मविश्वासाने बोलत होती. आर्या तर आपले दोन्ही हात फोल्ड करून दाराला टेकून दुर्गा काय काय बोलते आहे ते ऐकत होता. 

 

           स्वातीला तिच्या बोलण्याचे खूप कौतुक वाटत होते आणि जे म्हणाली होती ते तिने करून दाखवले होते , तिने तिचा शब्द सुद्धा पाळला होता . तिच्या डोक्यात सुद्ध तो सेम स्पार्क , सेम चमक स्वातीला दिसत होती जी नेहमी आर्याच्या डोळ्यात दिसत होती . दुर्गाच्या बोलण्यात, हावभावात , तिच्या त्या आत्मविश्वासात पूर्णपणे आर्याची झलक तिला दिसत होती . स्वाती आपल्या मुलाला चांगलीच ओळखत होती आर्या किती हट्टी आहे हे पण जाणून होती , तिला आतापर्यंत हे चांगलंच कळले होते की आता आर्या दुर्गा शिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार सुद्धा करणार नाही , ज्या गोष्टीवर त्याचा जीव जडतो त्यासाठी मग तो आपला जीव द्यायला सुद्धा मागेपुढे बघत नाही , आणि जी मुलगी स्वातीच्या दिलेल्या शब्दासाठी इतकं काही करू शकते , ती मुलगी आर्याला किती जपेल , हे सुद्धा तिच्या कल्पनेच्या बाहेर होते . त्यामुळे दुर्गा आणि आर्याच्या लग्नाला नकार देण्यात काहीच अर्थ नव्हता, शेवटी ती आईच होती , मुलाच्या सुखापुढे सगळंच ठेंगणं पडतं . मनातून होकार तर होता , पण उगाचच दुर्गा पुढे असली की त्यांना सुद्धा तिचा विरोध करायची सवय लागली होती आणि दुर्गा सुद्धा स्वाती समोर असली की उगाचच त्यांच्या खोड्या काढायची. पहिल्या भेटीपासून सुरुवातच अशी झाली होती त्यांची की दोघीही टशन मध्ये असायच्या. 

 

" ओ इंग्लिश मॅडम , देताय ना तुमच्या मुलाचा हात माझ्या हातात ?", दुर्गा 

 

" नाही म्हणेल तर काय करशील ?", स्वाती

 

" मला त्यांना पळवून न्यायला काही वेळ लागणार नाही , आणि आता तर मी पोलीस आहे , मला कोण अडवणार की पकडणार आहे ? आणि माझ्या विरोधात कंप्लेंट कोण करणार की साक्ष कोण देणार ?", दुर्गा मिश्कीलपणे हसत बोलली. 

 

स्वाती तर अचंभित होत दुर्गाकडे बघत होती .

 

" मग देताय ना यांचा हात माझ्या हातात ?", दुर्गा आपला एक हात पुढे करत म्हणाली. 

 

" हो हो … हो !", स्वाती काही बोलायच्या आतच आर्याने आपला हात दुर्गाच्या हातात दिला . " I am ready !" 

 

 " Oh God ! थोडा तर धीर धरायचा होता , मी हो म्हणणारच होते ना वीर !", स्वाती 

 

" काय ?", आर्या दुर्गा दोघेही एकसाथ आश्चर्यचकित होत स्वातीकडे बघत होते . 

 

" याचं देवदास रूप कोण बघेल ? ", स्वाती 

 

" काय …. देवदास ? ", दुर्गाला खूप हसू येत होते. 

 

" हो, मला तू सून म्हणून , वीर ची बायको म्हणून मान्य आहेस !", स्वाती हसत म्हणाली. 

 

" Mom , I love you !", आर्या भयंकर आनंदात आला होता , त्याने आनंदाच्या भरात आपल्या आईला पकडत बॉल डान्सच्या स्टेप्स करू लागला. दुर्गा ला पण खूप आनंद झाला होता , तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. तिच्या आनंदपुढे आज आभाळ सुद्धा ठेंगणे वाटू लागले होते . 

 

          फायनली सगळं छान मनासारखं झाले होते. मध्ये दुर्गाच्या आयुष्यात खूप कष्टाचा , परीक्षेचा काळ आला होता. एक वेळ अशी सुद्धा आली होती की ती या पूर्ण जगात एकटी पडली होती . एकटी पडली होती पण तिच्यासोबत होती तिची स्वसंरक्षण करण्याची शक्ती , न भिता न डगमगता आल्या परिस्थितीला खंबीरपणे लढत समोर जाण्याची जिद्द , आणि तिची स्वप्ने, आणि नशिबाने मिळालेली आर्याची साथ , ज्यांच्या जोरावर आज ती इथपर्यंत पोहचली होती. आज तिला ती जगातली सगळ्यात भाग्यवान आणि श्रीमंत व्यक्ती वाटत होती , आयुष्यात जे हवे होते ते तिला सगळं मिळाले होते.  

 

 

" वीर , बस बस , आता चक्कर येईल मला . आणि चल तिला घरात घे , तुम्हा दोघांना एकत्र घरात घ्यायचं म्हणून कधीचं ताटकळत उभे ठेवले आहे तिला इथे बाहेरच ! चल घे तिला सोबत , आणि या आतमध्ये !", स्वाती 

 

" Your wish is my command !", आर्या अगदी कांबरेतून वाकत स्वातीला म्हणाला. 

 

" पागल ! या आता !", म्हणत स्वाती पुढे घरात गेली . 

 

" मिस्टर आर्या , वेलकम टू अवर होम !", म्हणत दुर्गाने आर्याचा हात आपल्या हातात घेण्यासाठी पुढे केला . 

 

" No !", आर्या 

 

त्याचे नो ऐकून दुर्गाला टेन्शन आले , ' आता यांना काय झालं? इंग्लिश मॉम मानली तर इंग्लिश मॉम चे सुपुत्र रुसले वाटतं ' , दुर्गा विचार करतच होती की आर्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेत आपल्या मिठीत घेतले . 

 

 " हे काय करत आहात ? इथे सगळे …." 

 

" मिसेस आर्यविर आहात मॅडम तुम्ही , पहिल्यांदा आता घरात येत आहात , एन्ट्री स्पेशल च असेल !", आर्या तिला एक डोळा मारत म्हणाला. ते ऐकून तिला लाजल्यासारखे झाले .तिने सुद्धा आपले दोन्ही हातांचा वेढा त्याचा गळ्याभोवती घातला, आणि लाजून आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. आर्या तिला घेऊन आतमध्ये घरात आला. 

 

" Yeah , that's like a super strong boy !", स्वाती बोलतच हसत आतमध्ये गेली. 

 

दुर्गा आर्याच्या हातातून खाली उतरण्यासाठी धडपड करत होती.

 

" Wait !", आर्याने परत तिला आणखी घट्ट पकडुन धरले. 

 

" खाली उतरवा ! कोण बघेल तर काय विचार करेल ?", दुर्गा 

 

" आता पर्यंत पळवून न्यायाच्या गोष्टी करत होती , आणि आता लोकं काय म्हणतील आठवतेय !", आर्या 

 

" आर्या , आगाऊपणा नाही हा , खरंच कोणी बघेल आहे , काय वाटेल त्यांना ?", दुर्गा

 

" काय वाटेल म्हणजे , म्हणतील मिसेस आर्या मिस्टर आर्या च्या मिठीत आहे. किती गोड कपल आहे !", आर्या 

 

" सोडा ना प्लीज , मला खरंच खूप ऑकवर्ड वाटत आहे !", दुर्गा 

 

" एका अटीवर ?", आर्या 

 

" काय ? " , दुर्गा 

 

" जेव्हा पण घरात तू माझ्या सोबत असेल, तेव्हा साडी मध्ये असायचे . खूप गोड दिसते साडी मध्ये !", आर्या 

 

" इश्श !", दुर्गा 

 

" हा हा हा , दुर्गा हे इश्श तुझ्याकडून ऐकणे मला झेपत नाही !", आर्या हसायला लागला. आर्याने तिच्या कपाळावर किस करत तिला आपल्या मिठीतुन खाली उतरवले. 

 

       दुसऱ्यादिवशी स्वाती आणि आर्या दोघेही आजीकडे जाऊन रितसरपणे आजी आणि दुर्गाच्या आईकडे लग्नासाठी दुर्गाचा हात मागितला. दुर्गा आणि आर्या सुट्टीवर असल्यामुळे लवकरात लवकर इंगेजमेंट करायचे ठरले. आजी तर दुर्गासाठी खूप खुश होती. तिने अख्ख्या चाळीला पेढे वाटले होते , आणि दुर्गा आर्याचे कौतुक करणं थांबत नव्हते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते . 

 

         दुर्गाची आई खूप खुश होती. गावी परत जायचं होत , दुर्गाच्या साखरपुड्याची तयारी करायची होती. दुर्गाला सुद्धा तिच्या आजीला भेटायचे होते, गावाला जायचे होते. दुर्गा आणि आईचे गावाला जायचे ठरले. 

 

 

******

 

क्रमशः 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️