Jan 27, 2022
कथामालिका

दुर्गा 23

Read Later
दुर्गा 23

दुर्गा 23

 

 

आर्यांचे असे तुटक बोलणं दुर्गाच्या जिव्हारी लागले होते , त्याचे बोलणे ऐकून दुर्गा त्याच्या रूममधून निघून आली . आर्या सुद्धा झालेल्या गोष्टीने थोडा चिडला होता , त्याने पण तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्याचे जे कॉल मिस झाले होते , ते त्याने रीकनेक्ट केले. मिस केलेली त्सगळी माहिती त्याने मिळवली . 

 

आर्याने फोन न उचलल्यामुळे त्यांचा थोडा लॉस तर झाला होता , पण त्याच्या टीमने बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स सोडवले होते. एखादे मेंबर काही कारणाने ॲक्टिव नसले तरी त्यांच्याकडे बॅकप प्लान असतोच... पण तरीही आर्या त्याच्या कामामध्ये खूप एक्सपर्ट होता , जे काम त्याला पंधरा वीस मिनिटात जमायचे तेच काम इतरांना करायला तीन चार तास लागायचे , ऐवढे करूनही कधी कधी त्यांना परफेक्ट माहिती मिळायची नाही. आर्या त्याच्या कामात खूप स्ट्रॉंग आणि हुशार होता , म्हणून मग आर्याच्या तब्येतीबद्दल माहिती असून सुद्धा त्याला टीमने रात्री कॉन्टॅक्ट केला होता , त्यांची थोडीशी ही चूक म्हणजे दुसऱ्यांचे जीवनमरणाचा प्रश्न होता म्हणून आर्या एवढा चिडला होता. 

 

 

आर्याच्या रूम मध्ये त्याची एक सिक्रेट खोली होती, घरात कोणालाच त्याबद्दल माहिती नव्हते . त्याने स्पेशली त्याच्या सीक्रेट कामासाठी ती तयार केली होती .रूमचे दार बंद करत तो तिथे गेला , तिथे वेगवेगळ्या मशीन होत्या , वेगवेगळे टाईपचे पोस्टर्स , वेगवेगळ्या टाईपच्या शस्त्रांचे चित्र व त्यांची माहिती , भिंतीवर काही चार्ट , कशाचेतरी मॅप्स , कुणाकुणाचे फोटो ….. बुक्स ...असे बरेच काही लागले होते . आर्या जवळ काही माहिती होती , त्यावरून त्याला काही ऍड्रेस आणि काही लोकांची माहिती मिळवायची होती. 

 

आर्या टॉप लेवल चा हॅकर सुद्धा होता , कम्प्युटर्स, मोठ्या लोकांच्या आयडी ...वगैरे तो सहजासहजी हॅक करायचा ...आणि पटापट माहिती मिळवायचा . देशातील नेत्यांवर त्याची तीक्ष्ण नजर होती , त्यातल्या त्यात मोठे श्रीमंत लोकांवर पण त्याने नजर ठेवली होती. सराईतपणे सिस्टीम वर त्याने पटापट बोट फिरवली आणि बरीच माहिती काढून त्याच्या टीमला पाठवली . 

 

आर्याला मेडिकल लाईन मधले खूप ज्ञान होते . मेडिसिन्स , इंजेक्शन्स , कुठली नस दाबल्याने मानवी शरीरावर काय फरक पडतो, नैसर्गिक मृत्यू कसा आणायचा , असे त्याला खूप काही माहिती होते. त्यासोबतच वेगवेगळ्या हत्यारांची ...अगदी जुन्या काळची शस्त्र ते आधुनिक शस्त्र ...याबद्दल त्याचा डिटेल मध्ये अभ्यास होता ...थोडक्यात काय तर मेडिकल सायन्स आणि तंत्रज्ञान याचे भरपूर नॉलेज यांचे कॉम्बिनेशन असलेला हा आर्या होता. 

 

फोन सायलेंट मोडवर असल्यामुळे त्याचे बरेच काम थांबले होते, वेळ लागला होता पण उशीर झाला नव्हता , याचे त्याला समाधान वाटले . दिलेले काम वेळेत पूर्ण झाल्यामुळे आता त्याला रिलॅक्स वाटत होते . लोकं सुद्धा बऱ्यापैकी शांत झाले होते. 

 

थोड्या वेळ विचार करता करता त्याला एकदम दुर्गा आठवली आणि सकाळी आपण तिला काय काय बोलून गेलो हेसुद्धा त्याला आठवले ….आतापर्यंत कामाच्या गडबडीत तो दुर्गला सुद्धा विसरला होता. 

 

" Oh shit ….. तिला माझी काळजी होती म्हणून ती अशी वागली, आणि मी रागाच्या भरात मी तिला काय काय बोलून गेलो …..डोकं गरम असले की आर्यविर तुला कधीच काही कळत नाही , कामापुढे दुसरे काही दिसतही नाही ….चला मनवा आता दुर्गा मॅडमला ".......स्वतःशीच बोलत तो दुर्गाला शोधायला निघाला. 

 

आर्याने दुर्गाला रागवल्यावर दुर्गा चिडत रडतच दुसऱ्या रूम मध्ये गेली होती….त्याचे बोलणे तिच्या मनाला खूप लागले होते . आर्याच्या कामापुढे माझं काहीच अस्तित्व नाही , त्याच्या जीवनात मला काहीच महत्त्व नाही , त्यांचं माझ्यावर प्रेम नाही , या भावनेने तिला ग्रासले होते . तिने रूममध्ये येत रडतच लगेच आपले कपडे पिशवीत भरायला घेतले, कपडे भरता भरता तिला तिचा आणि तिच्या आईचा फोटो दिसला. हा एकच तिच्या आईचा फोटो तिच्या जवळ होता, तो नेहमी ती तिच्याजवळ ठेवत होती . आईचा फोटो दिसला आणि तिला परत रडू कोसळले. आई नंतर आर्याच होता ज्याच्यावर तिचा जीव होता , त्याच्यामुळे तिचे आयुष्य सुंदर झाले होते, ज्याच्या सहवासाने... ज्याला बघून तिला जगण्यासाठी नवी उमेद मिळत होती , जगण्याची नवीन सुंदर कारण मिळत होते….. तोच तिला आज खूप बोलला होता . तिला आतून खूप तुटल्यासारखे वाटत होते , तिच्या सुरक्षित आयुष्यासाठी आई सुटली होती आणि आता आर्यापासून दूर झाली होती . तिला आता तिचा जीव खायला उठत होता , समोर सगळं अंधारमय दिसत होते . दुर्गा तिथेच एका कोपऱ्यात कोणाला दिसणार नाही अशी बसली होती... हातात आईचा फोटो आणि डोळ्यात सतत वाहणारे अश्रू …..तिचा एक मन म्हणत होते की आर्याला जाऊन जाब विचारावा, इतके प्रेमात पाडून तो असे कसे बोलू शकतो? असे कसे स्वतःपासून दूर लोटू शकतो ? ...दुसरे मन बोलत होते की कुणाच्या आयुष्यात अशी ढवळाढवळ नाही करता येत, प्रेमात जबरदस्ती नाही , कोणाला आपल्या आयुष्यात जबरदस्ती नाही बांधून ठेवता येत…. असे बरेच विचार तिच्या डोक्यात धुमाकूळ घालत होते आणि अश्रू डोळ्यात…. कितीही पुसले तरी थांबायचं नाव नव्हते घेत. 

 

आर्याने सगळं घर पालथं घातले , पण त्याला दुर्गा काही सापडत नव्हती . रागावून घरी निघून गेली की काय ?....त्याच्या डोक्यात विचार आला . त्याने खाली सगळ्यांना विचारले तर त्याला कळले होते की दुर्गा खाली आली नव्हती व घराबाहेर सुद्धा पडली नव्हती. आणि आता त्याला घरातही सापडत नव्हती. 

 

 

" बापरे, लोकांना शोधून काढण्यात तू हुशार आहे आर्यवीर, पण या मॅडमने तर तुला सुद्धा चॅलेंज केले आहे ".....त्याला स्वतःलाच हसू आले. चुकीचे तर ती काही करणार नाही , त्याला तिच्यावर पूर्ण विश्वास होता . ती थोड्या खचेल पण हिमतीने उभे राहण्याची तिच्यात ताकद आहे , त्याला माहिती होते . तिने अजून पर्यंत येऊन जाब का नाही विचारला, याचे त्याला नवल वाटत होते . 

 

तो त्याच्या रूममध्ये आला आणि त्याने आपला लॅपटॉप उघडला. त्यात त्याने काहीतरी केले आणि समोर स्क्रीनवर दुर्गा दिसली . तिचा तो अवतार , भागुबाई सारखी बसली होती, ते बघून त्याला हसू आले . त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि उठून त्याच्या बाजूच्या खोलीत गेला. 

 

 

आर्याने त्याच्या पूर्ण घरात आणि घराच्या बाहेर कॅमेरे फिक्स केले होते. काही बेसिक कॅमेर्‍यांचे एक्सेस सिक्युरिटीकडे होते , पण बाकी बेडरूमस वगैरे मधल्या कॅमेराचे सगळे एक्सेस त्याच्याकडे होते . त्यातच त्याने दुर्गा कुठे आहे हे शोधून काढले होते. 

 

 तो बाजूच्या रूममध्ये गेला , कपाटांच्या बाजूला अगदी एक छोट्यासा कोपरा होता , कोणाला सहजासहजी दिसणार नाही अशी ती जागा होती , दुर्गा मॅडम तिथे लपून बसल्या होत्या. 

 

" Durga , come out ".... आर्या खाली गुढघ्यावर बसत तिच्यापुढे एक हात धरला.

 

 दुर्गाने त्याला काहीच उत्तर दिले नाही . 

 

आर्याने परत दोन-तीनदा तिला आवाज दिला पण दुर्गा ने त्याचाकडे दुर्लक्ष केले. 

 

" दुर्गा, प्रेमाने आवाज देतोय , येते आहेस का ?नाही तर…..?".....

 

 

" नाहीतर काय …?"....दुर्गाने मान वर करून बघितले, तिचे डोळे रडून रडून सुजले, लाल झाले होते . अजूनही डोळ्यात पाणी होतेच. 

 

ते बघून त्याला खूप वाईट वाटले , माझ्यामुळे दुर्गा रडली याचेच त्याला वाईट वाटत होतं. 

 

" नाहीतर ……. मला सुद्धा माहिती नाही मी काय करेल "....म्हणतच आर्याने तिच्या कमरेत हात घातला , तिला आपल्या हातांवर घेत आपल्या कुशीत उचलून घेतले. 

 

" सोडा मला".... दुर्गा आपले पाय झाडत होती , तिचा जोर बघून त्याने तिला परत घट्ट पकडून धरले. 

 

" तुमच बरं असते, तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही जवळ घेणार , नसेल तर दूर लुटणार …. तुमच्या मताप्रमाणे तुमचं वागणं मी खपवून घेणार नाही . फालतू माझा नाद नाही करायचा नाही …..नाहीतर मी तुमच्या सोबत काय करेल ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही . मी काय ती छुईमुई मुलगी नाही , मुलाने म्हटलेले प्रेम नाही , तू इम्पॉर्टंट नाही , तर मी सोडून जाईल , काय ते हा ब्रेकअप , हे ब्रेकअप वगैरे फालतू मला सांगायचं नाही हा , मी काय त्यातली नाही…. मी हात पाय तोडून हातात देणारी मुलगी आहे "....त्याच्या कॉलरला पकडून दुर्गा बोलत होती . मनातून तर खूप तुटली होती, पण त्याच्यासमोर ती हरली आहे , हे तिला दाखवायचे नव्हते. 

 

 

आर्याने तिला तसेच पकडून ठेवले होते, बाजूला सोफ्यावर येऊन बसला आणि तिला आपल्या मांडीवर बसवले. 

 

" हा , आता बोल…..तुला असेच पकडून हात दुखायला लागले होते , बापरे लोखंडासारखी अवजड झाली आहेस …...हा तर बोल... काय काय तोडायचं म्हणतेस?"..... आर्या हसत तिची मस्करी करत होता. 

 

 

त्याला असे हसताना बघून ती परत परत चिडत होती. आणि तिला चिडतांना बघून आर्याला मजा वाटत होती. 

 

" मला बोलायचं नाही काही ...सोडा मला , मी घरी चालले , तुम्हाला गरज नाही आहे ना माझी , मग मला पण कोणाची गरज नाही... एकटीच होती मी , आताही एकटीच राहू शकते ".....दुर्गा त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. 

 

 

" सॉरी बच्चो…."... त्याने तिच्या डोक्याला पकडत आपल्या छातीशी तिला कवटाळून धरले. 

 

" हे बघ सोन्या, मला तुला दुखवायचे नव्हते पण माझा नाईलाज होता म्हणून बोलल्या गेले.. जर माझ्या कामासाठी मी माझा जीव देऊ शकतो तर हे पण तेवढेच खरं आहे की मी तुझ्याशिवाय जगू सुद्धा शकत नाही …... "... आर्या

 

त्याच्या या वाक्याने तिची त्वचा मिठीत सुरू असलेली वळवळ थांबली आणि त्याच्या भोवती तिचे हात घट्ट झाले . ती काही बोलेल याची वाट बघत , तो तिला बराच वेळ तसेच घेऊन बसला होता. तिची त्याच्या भोवतालची मिठी सैल झाली, तसे त्याने तिच्याकडे बघितले तर ती त्याच्या मिठीत झोपी गेली होती. 

 

" सतत मारायच्या , हात-पाय तोडायच्या गोष्टीच सुचतात ना तुला ? जरा कुठे प्रेमाने वागणे बोलणे तर अजिबात जमत नाही".... स्वतःशीच बोलत शांत झोपलेल्या दुर्गा कडे तो बघत होता. 

 

*********

 

आर्याची तब्येत बरी झाली तसे तो परत आपल्या कामासाठी बाहेर जाऊ लागला . दुर्गा सुद्धा आजीकडे निघून आली. 

 

आर्या अधून-मधून यायचा . मग दोघेही सोबत वेळ घालवत , मौज मस्ती करत . पण नेमके काही सणवार असले, काही महत्त्वाच्या सुट्टी असल्या की नेमका आर्या तेव्हाच गायब असायचा . तिचा दिवाळी-दसरा त्याच्याशिवाय झाला होता. तो असा महत्त्वाच्या दिवसांना नसला की तिचं मन खूप खट्टू व्हायचं . 

 

दुर्गा आता त्याच्यासोबत तिच्या भविष्याची स्वप्न रंगवू लागली होती. आर्याच्या या घराला तिने आपली स्वप्ननगरी बनवली होती. तो जरी सणांना तिथे नसला, तरी तिने प्रत्येक सणाला घरी जाऊन तिने पूजा केली, दिवाळीला दिव्यांनी अख्खं घर तिने सजवले होते. आर्या जेव्हा पण यायचा तेव्हा ती इथे घरीच त्याचा सोबत वेळ घालवत असे. बरेचदा आर्या काय काम करतो तिला विचारावे वाटत होते , एक दोनदा तिने विचारले सुद्धा होते पण त्याने त्याचा बिजनेस च्या नावाखाली तिचे समाधान केले होते… पण तरीही तिला त्याचा संशय यायचाच , पण त्याचा कामाला घेऊन तो किती स्त्रिक्ट आहे तिला माहिती होते , हा एकच असा विषय होता ज्यामुळे त्यांच्यात भांडणं व्हायची आणि म्हणून मग ती तो विषय जास्ती तानायची नाही. कधी कधी तर दोघं तासन्तास आपल्या लग्नाबद्दल , भविष्याबद्दल , कधी तर अक्षरश: किती मुलं करायचे , मुलगा की मुलगी…? या सगळ्या विषयांवर बोलायचे आणि मग स्वतःच आपल्या बालिशपणावर हसायचे . दिवसेंदिवस दोघांचेही नाते मजबूत होत होते . अगदी कोणी काहीही, कितीही बोलले तरी त्यांच्या नात्यांवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. दोघंही मनाने खूप जवळ आले होते. बरेचदा दुर्गा त्याची रूम शेअर करायची , पण तरीही दोघांनी त्यांची मर्यादा कधीच सोडली नव्हती . दुर्गाने तर त्याला साध लीपलॉक सुद्धा करू दिले नव्हते . तो अधून मधून गडबड करायचा, पण त्याने दुर्गाच्या इच्छेचा मान ठेवला होता. 

 

********

 

दुर्गा आता तिच्या कॉलेजमध्ये चांगलीच फेमस झाली होती . इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मधून तिने बऱ्याच खेळात मेडल मिळवले होते . सोबतच डिबेट स्पर्धा , वकृत्व स्पर्धा देखील तिने गाजवल्या होत्या . टीचर्स , विद्यार्थ्यांची ती आवडती विद्यार्थिनी झाली होती. तिचे सेल्फ डिफेन्स सारखे सोशल काम सुरू होते. 

 

************

 

हे सगळं सुरू असताना अधूनमधून शानचे फोन येणे सुरू होते . त्याचे अभ्यासाकडे लक्ष कमी आणि इकडे फालतू गोष्टींमध्ये जास्ती लक्ष आहे बघून शेवटी एक दिवस दुर्गा त्याचावर चांगलीच चिडली होती . आतापर्यंत बोलण्यातून तरी तिला तो एक चांगला मुलगा वाटला होता , त्याने सुद्धा आजपर्यंत कधीच बोलण्यामध्ये लिमिट क्रॉस केली नव्हती, त्यामुळे तिला तो एक चांगला मुलगा वाटला होता...पण तरीही तिला तो बापाच्या नावावर मजा मारणारा मुलगा आहे हे कळले होते . एक दिवस त्याला ती खूप घालून पाडून , नको ते बोलली होती . बापाच्या दमवर मजा मारणारा , स्वतःमध्ये हिम्मत नसणारा , असे काही बोलली होती आणि जर स्वतःमध्ये हिम्मत असेल तर काही बनवून दाखव आणि मग समोर ये , असे म्हणाली होती. शानला पण तिचे बोलणे खूप जिव्हारी लागले होते . त्याने पण मोठा काहीतरी , स्वतःचे भरोशावर काहीतरी बनेल आणि मग पुढे येईल असा प्रण घेतला. त्यानंतर त्याने दुर्गाला फोन करणे बंद केले , पण अधून मधून तिला बघायला म्हणून तो तिच्या चाळीतून , तर कधी कॉलेजला चक्कर नक्की मारायचा. येवढे सगळं होऊनही तीच्याप्रती त्याचे प्रेम तसूभर सुद्धा कमी झाले नव्हते. आता एक वेगळीच जिद्द त्याच्यात संचारली होती. आणि अभ्यासात तो खूप मेहनत घेऊ लागला होता. त्याचं आता एकच उद्दीष्ट झाले होते, काहीतरी बनायचं आणि मग तिला प्रपोज करत दुर्गाला आपले बनवायचे. 

 

*********

 

 

असेच दिवसामागून दिवस , महिन्यात मागून महिने जात होते. दुर्गाचे कॉलेज संपले होते . तिने तिचे ग्रॅज्युएशन डिस्टिंक्शन मध्ये पूर्ण केले होते . आता तिचे सगळे लक्ष युपीएससीच्या परीक्षेकडे होते . अधून मधून ती आजीला रेस्टॉरंटमध्ये मदत करत , बाकी पूर्ण वेळ अभ्यास करत होती . पुस्तकी अभ्यासासोबतच तिच्या फिजिकल अभ्यासावर सुद्धा आर्याने पूर्ण लक्ष दिले होते. ऑक्टोंबर महिन्यात परीक्षा होणार होती , तीन टप्प्यात परीक्षा होणार होती . आता तर दुर्गाने अभ्यासात दिवसरात्र एक केले होते . फायनली परीक्षा झाल्या. दुर्गा परीक्षेत तिसरी आली होती. तिचा निकाल बघून आर्या आणि आजी खूप खुश झाले होते. दुर्गाने आपल्या आईला सुद्धा फोन करून ही माहिती दिली होती . तिच्या आईला सुद्धा खूप आनंद आणि आपल्या पोरीवर गर्व वाटत होता. ती देवाकडे आणि आर्याचे आभार मानत होती. 

 

 सगळ्या प्रोसीजर पुर्ण झाल्या आणि शेवटी दुर्गा आयपीएसचा ट्रेनिंगसाठी गेली . फिजिकल ट्रेनिंग बरच कठीण होते. दुर्गाचा दिवस सकाळी साडेचारला सुरू व्हायचा. चार पाच किलोमीटर रनिंग, घोडसवारी, शस्त्रांची ट्रेनिंग, स्विमिंग ड्रायव्हिंग , ट्रेकिंग , जंगल ट्रेनिंग, त्यासाठी जंगलामध्ये कमीत कमी जीवनावश्यक वस्तू वापरून रहाणे, गड चढणे, चिखलात ट्रेनिंग ….अशा अनेक कठीण ट्रेनिंग सुरु होत्या. हे सगळं इतकं कठीण होते की काही काही लोक तर अर्ध्यातच तुटून गेले होते , पण दुर्गाला आधीपासून अशा बऱ्याच गोष्टी येत होत्या, तिला मनापासून या सगळ्या गोष्टींची आवड होती आणि आर्याने पण तिच्याकडून बरेच काही करून घेतले होते, त्यामुळे हार न मानता ती प्रत्येक ट्रेनिंगला सामोरे गेली होती. उत्कृष्ठरित्या तिने सगळा अभ्यास पार पाडला होता. ट्रेनिंग सेंटरला सुद्धा ती आवडती विद्यार्थिनी झाली होती . 

 

जवळपास तीन वर्षाचे हे ट्रेनिंग होते , वेगवेगळे टप्प्यातून हे ट्रेनिंग होणार होते . दुर्गा तीन वर्षात दोन तीनदा इकडे घरी आली होती , पण नेमका आर्या तेव्हा त्याच्या कामा निमित्ताने बाहेर होता . या तीन वर्षात त्यांची एकदाही भेट झाली नव्हती . पण फोनवर मात्र बोलणं सुरू असायचे . 

 

या तीन वर्षात तिचं शरीर तर पौलादी बनले होतेच , पण मन आणि तिची आत्मा सुद्धा पौलादी झाली होती. देशसेवा करणे आता तिच्या रक्तात भिनले होते . देशाबद्दल कोणी काही बोलले बोलले तिला अजिबात खपत नसे. कोणी चुकीचं चुकूनही बोललं तर तिचे रक्त खवळून उठत आणि तिथेच ती त्या व्यक्तीला जमिनीवर लोळून टाकायची. तिच्या सगळ्या सिनियर मध्ये तिची ख्याती वाढली होती. 

 

 आज तीन वर्षानंतर फायनली तो दिवस आला , तिने पोलीस बनायचे बघितलेले स्वप्न , ते पूर्ण झाले होते. दुर्गा आयपीएस ऑफिसर झाले होती. 

 

 

********

 

 

" वेलकम ऑफिसर "......आर्याने तिचे स्वागत करत तिला शेकह्यांड करायला हात पुढे केला. 

 

" हॅलो , मिस्टर आर्यवीर चव्हाण "......त्याला बघून तिचे डोळे लाल झाले होते. तिने त्याचा हातात हात दिला आणि जोरात दाबला. 

 

" तुम्हाला काय वाटते , मला कळणार नाही तुम्ही कोण आहात? खूप मोठी चूक केली तुम्ही मला या क्षेत्रात आणून , तुम्ही तुमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही, तुमची पूर्ण जन्मकुंडली माझ्याकडे आहे …. "......दुर्गा 

 

*********

 

क्रमशः 

 

 

********* 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️