Jan 27, 2022
कथामालिका

दुर्गा ... भाग 22

Read Later
दुर्गा ... भाग 22

दुर्गा 22


 

आर्या घरी असल्यामुळे त्याने पूर्ण लक्ष दुर्गाच्या अभ्यासावर आणि फिजिकल फिटनेस वर देत होता. कुठल्याही हालतीत त्याला दुर्गाने पहिल्या प्रयत्नात परीक्षा पास करायला हवी होती . तो फार कमी घरी राहत होता , त्याचा कामा निमित्त त्याला बाहेरच राहावं लागत , त्यामुळे घरी असला की तो वेळेचं सोनं करून घेत . सोबतच तो तिच्यासोबत  फ्लर्टिंगचा एक चान्स सोडत नव्हता. आर्यांचे मनमिळावू व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यात दिसायला एकदम भारी हँडसम त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्याला मैत्रिणी भरपूर होत्या , मुली त्याचसोबत फ्लर्ट करायचा एक चान्स सोडत नसे , पण त्याचे मन मात्र दुर्गा मध्येच गुंतले होते . 


 

" हे बेबी , तू मला सांगितले नाही तुझा एक्सीडेंट झाला ते? हाऊ आर यू फिलिंग नाउ?".... स्वाती

 

आर्या  आणि दुर्गा रूममध्ये बसले होते , आर्य लॅपटॉप वर आपले का काही काम करत होता आणि दुर्गा तिचा  अभ्यास करत बसली होती . तेवढ्यात आर्याची मॉम रूम मध्ये आली. 

 

" मॉम,  मच बेटर नाउ ,  आणि तू बाहेर होती , मला तुला डिस्टर्ब करावेसे वाटले नाही"..... आर्या

 

" अरे पण तू  एकटा होता ना,  तुझ्याकडे लक्ष द्यायला नको का कोणी?  म्हणून म्हणते लवकर लग्न कर,  म्हणजे माझी काळजी मिटेल "........स्वाती


 

" मॉम , मी माझी काळजी घेऊ शकतो,  तसे पण इथे आहे कोणीतरी माझी काळजी करायला , यु डोन्ट वरी"..... आर्या


 

" ओह ,  ही जंगली  आहे तरी इथे".... त्यांचे दुर्गाकडे लक्ष गेले तशी दुर्गा उठून त्यांच्या जवळ आली. 

 

" चल तू जा  आता , वीर ची  मॉम आहे त्याच्या जवळ , त्याची काळजी आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला"..... स्वाती

 

" मी कुठेही जाणार नाही मॅडम,  मी इथेच राहणार"..... दुर्गा

 

" तुझी गरज नाही इथे,  तू तुझ्या घरी जा"..... स्वाती

 

" मला माहिती आहे माझी गरज नाही आहे , पण मला गरज आहे आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगते हे माझं घर आहे तर मी इथेच राहणार "......दुर्गा

 

" व्हॉट ? तुझं घर ? Who told you ?".... स्वाती 

 

दुर्गाने डोळ्यांनीच आर्याकडे इशारा केला….

 

" Oh Veer ,  not again ….  ".... स्वाती 

 

आर्याने त्यांना बघून खांदे उडवले..

 

" तरी पण मी जा म्हणते आहे "....स्वाती

 

" मी जाणार नाही".... दुर्गा

 

दोघांची शब्दांची चकमक बघून आर्या कधी आईकडे तर कधी दुर्गा कडे बघत होता …." कधी सेटल होतील यांचे प्रॉब्लेम्स , आणि केव्हा मी आणि दुर्गा एक होऊ  ".... तो त्यांना बघून मनातच विचार करत होता .

 

"फारच उद्धट आहे तू "....स्वाती

 

"तुम्हीपण तर हट्टी आहात".... दुर्गा

 

"तुम्ही नवरा-बायको नाही आहात ,इथे एकत्र राहायला "......स्वाती

 

"आम्ही शत्रू सुद्धा नाही,  वेगळे राहण्याकरिता ".....दुर्गा

 

"तरुण मुला-मुलींनी असे एकत्र राहू नये "......स्वाती

 

" हे तुम्ही सांगताय?  तुमच्या सोसायटीमध्ये तर फॅशन आहे मुलामुलीने एकत्र राहण्याची,  ते काय म्हणतात हा लिव्ह-इन-रिलेशनशिप".... दुर्गा

 

"आगाऊपणा तर संपत नाही या रानटी मुलीचा ".....स्वाती

 

"फार फार तर काय होईल मॅडम , तुम्ही आजी बनाल ".... दुर्गाने आर्याला  एक डोळा मारला , आर्याने  डोक्यावर हात मारून घेतला. 

 

" व्हॉट ? आर यु मॅड?  हे आजी बीजी खूप डाऊन मार्केट आहे , मला नाही बनायचं आजी वगैरे "..... स्वाती

 

" आली मोठी मला आजी बनवणारी ….. तुला हिला किस तरी करायची इच्छा होते काय रे?".... स्वाती आर्या जवळ जात हळूच बोलली

 

" मॉम, शी  इज द मोस्ट ब्युटीफुल गर्ल ऑन द प्लॅनेट ".... आर्या

 

" तुझ्या टेस्टला काय झाले?  आधी तर तू मला सुंदर सुंदर मुली दाखवत सांगायचा मग अशी बायको पाहिजे अँड ऑल …. आणि आता जेव्हा खरंच लग्न करायची वेळ आली तर हे रानटी ध्यान आवडली  तुला ?".....स्वाती

 

" मॉम , मी तेव्हा छोटा होतो,  मला सुंदर या शब्दाचा खरा अर्थ माहिती नव्हता,  पण जेव्हापासून दुर्गाला भेटलो आहे तेव्हापासून कळले खरे सौंदर्य काय असते ते".... आर्या

 

"यु आर टोटली गोन , यु आर फुल्ली मॅड".... स्वाती वैतागत बोलत होती

 

" मॅडम , हे सगळे मनाचे खेळ आहे , जोपर्यंत तुमच्या डोक्यात हा विचार येत नाही की आपल्याला त्या मुली सोबत अथवा मुलासोबत काही करायचे आहे , म्हणजे शारीरिक रित्या काही केले पाहिजे असे डोक्यात येऊ देत नाही  , तोपर्यंत असे विपरीत काही घडत नाही .  जर स्वतःच्या विचारांवर कंट्रोल असला तर एकत्र राहून सुद्धा काही अयोग्य घडत नाही . समोरच्या व्यक्ती कडे बघण्याची नजर आपली पवित्र  पाहिजे मग काहीच वाईट होत नाही , मग हे असे लहान कपडे घालने , दिसणे वगैरे यांनी काहीच फरक पडत नाही"....... दुर्गा 

 

" I don't understand this logic …"... स्वाती ने डोळे फिरवले.. 

 

" तुमच्या डोक्यात तुम्ही काय भरून ठेवले आहे ना त्यावरून ठरत असते सगळं .  आजची तरुण मंडळी तर आपल्या परिवरापासून  लपवून एकत्र राहतात , आम्ही तुमच्यापासून असे काहीच लपवले नाही . माझं जाऊ द्या तुम्हाला तुमच्या मुलावर तर विश्वास असायला हवा"..... दुर्गा

 

" माझा त्याच्यावर विश्वास आहे पण तुझ्यावर नाही . आधीच काय जादूटोणा करून ठेवला आहे काय माहिती  आणि आता आणखी काय काय करशील"..... स्वाती डोळे फिरवत बोलल्या

 

" ठीक आहे , मग तुम्हाला तुमच्या नातवाच्या बारशाला बोलवू ".... दुर्गा हसत बोलली


 

" Oh God , save me and my son from this down market and  jungli Girl "......स्वाती तनतन करत आर्याच्या रूममधून निघून गेल्या. 

 

" भयंकर आहेस तू  that's why I like you baby !" …. आर्या दुर्गा समोर हात जोडत  , हातानेच किस करायची अँक्शन करत हसतच आईची मनधरणी करायला आईच्या मागे गेला  . दुर्गा पण हसत हसत आपल्या अभ्यासाला बसली. 

 

जेवण वगैरे आटोपून तिघही हॉलमध्ये गप्पा गोष्टी करत बसले होते , म्हणजे बोलत तर आर्या आणि त्याची मॉम  होते  , दुर्गा फक्त त्यांचे बोलणे ऐकत होती . तेवढ्यात स्वातीचा फोन वाजला,  फोनवर बोलून त्यांनी फोन कट केला.  

 

" वीर , आय नीड टू गो होम , युवर dad इज  वेटिंग फॉर मी".... स्वाती

 

" Okay mom ".... आर्या

 

" तुला वाईट तर नाही ना वाटणार , म्हणजे तुला इथे बरे नाही आणि मी घरी जाते आहे".... स्वाती

 

" No  mom , I am perfectly fine ,  तू जा ".... आर्या

 

 " दॅट्स माय  सुपर स्ट्रॉंग बेबी ".....स्वातीने त्याच्या कपाळावर किस केले आणि त्या त्यांच्या घरी निघून गेल्या . 

 

आर्याचे लक्ष दुर्गकडे गेले तर त्याला तिच्या डोळ्यांमध्ये खूप प्रश्न दिसत होते. 

 

" विचारा डोक्यात जे  सुरू आहे ते?".... आर्या

 

" तुम्हाला बरं नाही आहे,  त्या तुमच्यासाठी इथे का थांबल्या  नाही आणि मुख्य म्हणजे तुम्ही सगळे एका घरात एकत्र का राहत नाही?  एकाच गावात असून तुमचे वेगळे वेगळे घर का आहे?"...दुर्गा

 

" मी तुला आधीच सांगितले आहे मला कोणावर डिपेंड राहायला आवडत नाही आणि कोणी माझ्यावर डिपेंड रहावे असेही वाटत नाही.  दुसरे ते मॉम आणि माझ्या सो-कॉल्ड वडीलांचे घर आहे "......आर्या

 

"म्हणजे?".... दुर्गा

 

" ते माझे स्टेप डॅड आय मीन  सावत्र वडील आहे आणि ते मला अजिबात आवडत नाहीत , लहान होतो ऑप्शन नव्हते म्हणून मी तिथे राहिलो पण आता मी माझा एकटा राहू शकतो".... आर्या

 

" पण तरीही ते तुमचे वडील आहे आणि तुमची आई त्यांच्यासोबत खुश आहे"... दुर्गा

 

" आय डोन्ट नो , पण त्यांनी माझ्या आई सोबत तिचे पैसे बघून लग्न केले आहे,  मला ती व्यक्ती अजिबात आवडत नाही".....आर्या 

 

" ही सगळी प्रॉपर्टी , बिजनेस माझ्या डॅडचा आहे , आम्ही आरामात राहू शकत होतो,  आम्हाला त्यांची गरज नव्हती ".....आर्या

 

" तुम्ही स्त्री नाही ना म्हणून तुम्हाला नाही कळणार एका स्त्रीचे मन , स्त्रीची गरज".... दुर्गा

 

" असेल,  पण मला चांगले- वाईट कळते".....आर्या 


 

"मग  तुम्हाला कोणी बहिण भाऊ ?"....दुर्गा

 

"हो आहे ना , एक बहीण रेवा,  शी इज  वेरी स्वीट अँड माय बेस्ट फ्रेंड टू,  इथे आली की तेवढा मी मग तिकडे तिच्यासाठी जातो ".....आर्या

 

" इथे म्हणजे? ती इथे नाही का?"... दुर्गा

 

" ती  लंडनला तिचे मास्टर्स करते आहे"..... आर्या

 

दुर्गा आपल्याच काहीतरी विचारात हरवली होती . 

 

" बरं,  मी काय म्हणतो,  झाले असतील प्रश्न विचारून तर तू जे मॉम ला  सांगितलं ते मनावर घ्यावे म्हणतोय".... आर्या तिच्याजवळ जात बोलला

 

" काय ?"....दुर्गा,  ती त्याच्या डोळ्यात बघत होती,  त्याच्या डोळ्यात तिला खट्याळपणा दिसत होता. 

 

" तेच बारशाचे,  मॉम ला  बारशाचे निमंत्रण द्यायचे  आहे ना !"....आर्या  तिला जवळ घेत बोलला. 

 

" ती गंमत होती, आणि त्या चिडत होत्या म्हणून  " …. दुर्गा त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती

 

" मग ते खरं करूया".... आर्या

 

" हो , लग्नानंतर …"....दुर्गा

 

" त्यात तीन-चार वर्षे जातील".... आर्या

 

" हो , तोपर्यंत वाट बघावी लागेल "..... दुर्गा

 

" तेच तर नाही होत आहे "...आर्या

 

" हो का? आणि ते काय किसचे,  कोण आपल्या आई सोबत असं बोलतं काय ?"...दुर्गा

 

" डोन्ट वरी , मॉम  आणि माझ्या मध्ये मैत्रीचे नाते आहे,  we two are so much free ,  आमच्या नात्यात मोकळेपणा आहे ,हा ती थोडी  मॉमगिरी करते , पण तेवढे चालते "....  आर्या

 

" वाह! "... दुर्गा 

 

"तर…. ती मला म्हणाली…. की... मी तुला किस कसा करतो ?"....आर्या

 

त्याच्या बोलण्यावर दुर्गा डोळे मोठे करत त्याला बघत होती….

 

" लेट मी ट्राय वन्स ,  तेव्हाच मला कळेल ना टेस्ट कशी आहे ते "..... आर्या

 

" आर्या , आगाउपणा नाही हा ".....म्हणत ती  त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत पळाली,  तो पण हसत हसत तिच्या मागे गेला. 

 

आर्याला खूप फोन येत होते , त्याचा हवा तसा आराम होत नव्हता . दुर्गाचे  सगळे लक्ष त्याच्याकडे होते . रात्री तो झोपल्यावर  त्याची चांगली झोप व्हावे म्हणून तिने त्याचा फोन सायलेंटवर करून ठेवला.  सकाळी तो उठला आणि त्याने फोन चेक केला तर त्याला ५८ मिस कॉल दिसले.  ते बघून आता मात्र तो खूप भडकला होता. तो पूर्ण स्टाफवर ओरडत होता … त्याचे एकेकाला फाईलवर घेणे सुरू होते, त्याला त्याचा कामात कोणीही हस्तक्षेप केलेला चालत नव्हता. 

 

दुर्गा आपला व्यायाम आटोपून आतमध्ये आली तर आर्या तिला चांगलाच रागावलेला दिसत होता . तिने कधीच त्याला इतके चिडलेले बघितले नव्हते, तो नेहमी संयमाने आणि शांततेने कुठलेही प्रकरण हाताळताना दिसला होता , त्याचे ते रागावलेले रूप बघून ती पण थोडी घाबरली, ती त्याच्या जवळ गेली तर  त्याचा ओरडण्यावरून काय झाले आहे हे तिला कळले होते. 

 

" ते …. ते …. मी ….मोबाईल …. सायलेंट….."..... 

 

" Enough "..... दुर्गा पूर्ण  बोलायच्या आतच तो जोराने ओरडला आणि वरती आपल्या रूम मध्ये गेला… त्याला कळले होते कोणी केले आहे ते पण स्टाफ समोर काही नको म्हणून तो तेवढे बोलून चालला गेला होता. 

 

सगळ्यांसमोर ओरडल्यामुळे दुर्गाच्या डोळ्यात पाणी दाटून आले…. तिने सगळ्यांना आपल्या कामाला जा सांगून ती वरती आर्याच्या रूम मध्ये आली …. 


 

" Why did you touch my phone ? "..... आर्याने तिचा हाताला पकडले आणि ओढतच तिला भिंतीवर भिरकावले आणि रूमचा दरवाजा बंद करत तिच्या एकदम जवळ गेला… त्याचा अशा वागण्याने दुर्गा खूप घाबरली , ती भेदरल्या नजरेने त्याला बघत होती 

 

" तुम्ही येवढ्या छोट्या कारणासाठी माझ्यावर ओरडत आहात?".... दुर्गा 


 

" हे खूप मोठं कारण आहे , तुला माझ्या फोनला हात लावायची परमिशन कोणी दिली ?".... आर्या 

 

" ते … ते …..तुम्ही झोपला होता , वारंवार फोन वाजत होता , तुमची झोपमोड होऊ नये म्हणून मी ……"....दुर्गा अडखळत बोलत होती 

 

" तुला कळते काय कामाचं , नको तिथे डोकं का लावते तू ?".... आर्या 

 

" तुम्हाला आरामाची गरज होती, दिवसभर  सतत तुम्ही फोन आणि लॅपटॉप वर होता ….. ".... दुर्गा , दुर्गा पण आता त्याला जाब विचारू लागली, त्याची काळजी वाटत होती तिला म्हणून ती अशी वागली होती, तिने काही चुकीचे केले असे तिला वाटत नव्हते. 

 

" माझं काम सगळ्यांपेक्षा महत्वाचं आहे …."...आर्या 

 

" तुमच्या तब्येती पेक्षा पण ?".... दुर्गा 

 

" हो "..... आर्या 

 

" माझ्या पेक्षा पण ?".... दुर्गा

 

" हो , तुझ्या पेक्षा पण माझं काम सगळ्यात महत्वाचं आहे "..... आर्या 

 

" असे कोणते काम आहे तुमचे , जे रात्री रात्री करावे लागते? असा कोणता बिजनेस आहे तुमचा की ज्यात झोपायचे पण नसते ? असे कोणते काम आहे तुमचे की तब्येत बरी नसतांना पण करायचे असते ?".... दुर्गा 

 

" माझं काम माझ्या काय कोणाच्या पण लाईफ पेक्षा महत्वाचे आहे , माझा शेवटचा श्वास सुरू असेल आणि मला काम आले तरी मी ते माझं प्राण जाई पर्यंत करेल "..... आर्या 


 

" असे काय करता तुम्ही की तुम्हाला कोणाच्या जीवाची पर्वा नाही , मला पण सांगा "...दुर्गा 


 

" दुर्गा , मला कोणी म्हणजे कोणीही माझ्या कामात बोललेले नाही चालत , हा अधिकार मी माझ्या मॉम ला सुद्धा दिलेला नाही आहे , सो तू पण या सगळ्यांपासून दूर राहा . माझ्या कुठल्याच वस्तूंना हात लावलेला मी खपवून घेणार नाही , नाहीतर .."......आर्या 

 

" नाहीतर , काय?...काय कराल तुम्ही"....दुर्गा 


 

" मी विसरून जाईल तू कोण आहेस ते ".....आर्या 

 

" आपलं नातं?".....दुर्गा 

 

" ते सुद्धा तोडायला मी मागेपुढे बघणार नाही , and don't dare to touch my things "..... आर्या 

 

त्याचा अशा बोलण्याने तिच्या काळजावर अगिणत घाव झाले होते , तिचा कंठ दाटून आला होता , तिच्या डोळ्यात आसवे गर्दी करू बघत होते, आता तिच्या डोळ्यात अश्रू आले तरी त्याला काही फरक पडणार नव्हता तिला कळून गेले होते…. आणि त्याला तिचे अश्रू दिसायच्या आधीच ती तिथून बाहेर चालली गेली . 

 

आजपर्यंत घरात त्याचा सामानांना कोणीही हात लावत नसे , त्याची रूम सुद्धा तो कोणाला साफ सफाई  करू देत नसे , त्याने तशी ताकीदच देऊन ठेवली होती सगळ्या स्टाफला , त्यामुळे कोणीच तो नसतांना त्याचा रूम मध्ये सुद्धा येत नसे… पण आज दुर्गाने त्याचा फोन ला हात लावल्यामुळे त्याचा राग कंट्रोलच्या बाहेर गेला होता . 


 

******

 

क्रमशः  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️