Jan 27, 2022
कथामालिका

दुर्गा ... भाग 21

Read Later
दुर्गा ... भाग 21

दुर्गा 21

 

आर्या आजच हॉस्पिटलमधून आला होता , आठ दिवस तो बेडवर होता  त्याचे घाव अजून भरले नव्हते , त्यामुळे अजूनही त्याला थोडी कणकण होती , हातात पेन होते , अजूनही त्याच्या बऱ्याच मेडिसिन सुरू होत्या . त्याच्याकडून दुर्गाने  औषध आणि त्याच्या वेळा सगळं डिटेल समजून घेतले.  तसे तर  त्याच्याकडे घरी सगळं बघायला मोठा स्टाफ होता,  पण दुर्गाला स्वतः जातीने सगळं बघायचे होते . त्याने पण जास्ती आढेवेढे घेतले नाही.  रात्री जेवण वगैरे आटोपून आर्या आणि दुर्गा रूम मध्ये निघून आले. 

 

" हे काय करते आहे ?"...आर्या

 

" झोपायची तयारी"..... दुर्गा

 

" हो , ते दिसते , पण खाली का?  तू इथे बेडवर झोपू शकते , मी दुसऱ्या रूम मध्ये जातो ".....आर्या

 

" नाही , तुम्ही माझ्या डोळ्यांसमोर हवे , रात्रीतून तुम्हाला काही लागले तर …"....दुर्गा खाली चादर टाकत बोलत होती. 

 

" ओके , पण मग तू इथे बेडवर झोपू शकते , माझी भिती वाटत असेल तर निश्चिंत राहा , मी तुला काही करणार नाही  " ….आर्या


 

" भित तर  मी कोणाच्या बापाला नाही , फिर आप किस खेतकी मुली हो"..... दुर्गा


 

" चॅलेंज?... बघ हा मनात आणले तर मी बरेच काही करू शकतो "....आर्या तिची मस्करी करत होता. 

 

" हिम्मत असेल तर करून दाखवा?".. दुर्गा

 

" खुलेआम चॅलेंज ? ठीक आहे, देन  वेट अँड वॉच ".....आर्या बेडवर उशीला टेकुन बसला आणि  तिची मजा घेत होता. 

 

" बापरे मी  जास्ती तर नाही बोलली ,  आता हे काय करतील?"... दुर्गा मनातच बोलत होती

 

" क…. काय…. काय.. करणार आहात तुम्ही ?".....दुर्गा

 

" मी का सांगू ?"...आर्याने  हातात एक बुक घेतले आणि तो वाचत बसला. 

 

" तुम्ही खूप बदमाश झाला आहात,  तिकडे गावात किती साधे,  सज्जन बनवून फिरत होता ".....दुर्गा

 

" तर….. मी आहोच सज्जन".... आर्या तिला एक डोळा मारत बोलला

 

" इकडे येऊन फारच शेफराला आहात तुम्ही ".....दुर्गा

 

" संगत आगाऊ  असल्यावर  असेच होणार "....आर्या

 

" काय?? मी आगाऊ??"... दुर्गा

 

" हा मग मी बदमाश कोणामुळे झालो ? आता तूच म्हणाली ना की सज्जन होतो".....  आर्या

 

" खरच आधी किती शांत वाटत होते , आता तर अंगातच येते यांच्या"... दुर्गा त्याच्याकडे बघत मनात  विचार करत होती , " पुढे बोलले तर परत दोन चार  डायलॉग फेकातील "..... विचार करत तिने अंगावर पांघरून घेतले आणि आर्याच्या बेडच्या बाजूला खाली झोपली


 

" रात बाकी sssss…..बात बाकीsssss ".... गाणं गुणगुणत आर्याने  लाईट्स ऑफ केले आणि त्याच्या बेड जवळचा छोटा Lamp सुरू केला आणि बुक वाचत बसला

 

" खरंच हे काही करतील का? पण हे काय करतील? "..... दुर्गाच्या डोक्यात त्याचेच शब्द सुरू होते , ती थोड्या थोड्या वेळाने डोक्यावरच्या  पांघरूण मधून डोकावत आर्या काय करत आहे बघत होती , आर्य सुद्धा पुस्तकाच्या आडून तिला बघत होता.  त्याला तिला तसे करताना बघून हसायला येत होते. 


 

" मी काय म्हणत होतो,  मान अकडून  जाईल , इथे बाजूला येऊन झोप,  डायरेक्ट बघता येईल ".......आर्या

 

" कोण …..कोण बघते , मी झोपली आहे "....तिने सरकान  डोळ्यावरून पांघरून  घेतले आणि झोपली. 

 

" Okay …. As you wish ".... परत त्याने पुस्तक वाचणे सुरू ठेवले. 

 

 बराच वेळ शांततेत गेला,  काहीच आवाज नाही आणि अंधार झालेला बघून दुर्गाने परत पांघरून काढून बघितले तर आर्याचे डोळे बंद होते . ती जागेवरून उठली आणि आल्या जवळ गेली  आणि त्याचा चेहरा न्याहाळत होती,  खूप दिवसांनी ती त्याला बघत होती . आता कुठे तो शांत होता नाहीतर आतापर्यंत तो तिला त्रास देत तिच्या खोड्या काढत होता. 

 

" खरंच खूप बदल झाला तुमच्यात ,  पण आवडते मला , खूप मिस करत होते तुम्हाला , खूप सवय झाली आता तुमची,  तुमची आजूबाजूला असण्याची , तुमच्याशिवाय आता एक क्षण नकोसा वाटतो".... म्हणत तिने त्याच्या गालावर  ओठ टेकवले. 

 

" लव यू बच्चा "....तो झोपेतच बोलला.  औषधांमुळे त्याच्या डोळ्यावर झोपेची झापड होती . दुर्गा त्याच्याकडे बघून हसली त्याच्या अंगावर पांघरून सारखे केले आणि आपल्या जागेवर येऊन झोपली. 


 

रोजच्या वेळेप्रमाणे दुर्गा पहाटे उठली . उठल्याबरोबर तिने आर्याला ताप आहे की नाही ते चेक केले.  त्याचं ग तिला थोडं कोमट  वाटले.  त्याला आरामाची गरज आहे लक्षात घेऊन तिने त्याला उठवले नाही.  तिने  आपले सकाळचे रुटीन आटोपले,  रनिंगला बाहेर जाण्याची तिने टाळले, आर्याने  त्याची पर्सनल जिम तयार केली होती , तिथेच तिने तिचे वर्कआउट आटोपले . ज्याप्रमाणे डायटीशियनने डायट प्लान  केले होते त्याप्रमाणे कुकला  ऑर्डर देऊन ती आर्याच्या रूममध्ये गेली. 

 

" गुड मॉर्निंग".... दुर्गा, आर्या  सोफ्यावर पेपर वाचत बसला होता. 

 

" व्हेरी ब्युटीफुल मॉर्निंग बच्चा , "..... आर्याने  हातातला पेपर बाजूला ठेवला. 

 

" कसे वाटते आहे आता ?".... दुर्गाने त्याच्या  गळ्याला हात लावून बघितले.

 

" फिट अँड फाइन ".....आर्या

 

" ह्मम , ताप आहे थोडा".... दुर्गा

 

" इट्स फाईन , काही दिवस राहील,  पण तू आहेस ना समोर,  लगेच ठीक होईल "..... आर्या तिची मस्करी करत होता , पण जरा थकल्यासारखा वाटत होता. 

 

" काहीही होऊ द्या,  कितीही बरे नसू द्या,  मस्ती नाही जाणार ना तुमची?" …. दुर्गा

 

" नेव्हर "....आर्या

 

" वाटलेच".... दुर्गा रुमची आवराआवर करत बोलत होती. 

 

"तू  कॉलेजला जायची तयारी नाही केली "....आर्या

 

" मी काही दिवस  कॉलेजला जाणार नाही  आहे"..... दुर्गा

 

" का ?"....आर्या

 

" मी इथे , घरीच तुमच्याजवळ थांबणार आहे ".....दुर्गा

 

" अजिबात नाही,  तू कॉलेजला जाते आहे".....आर्या

 

"  जास्ती काही  फरक पडत नाही,  मी अभ्यास कव्हर करून घेईल"..... दुर्गा

 

" मला चालणार नाही,  माझ्यामुळे कोणाचं लाईफ डिस्टर्ब झालेले  मला आवडत नाही आणि कॉलेज मोस्ट इम्पॉर्टन्ट आहे"..... आर्या


 

" अहो... पण... इथे…".. दुर्गा

 

" दुर्गा कोणामुळे कोणाचं लाईफ थांबत नसते , कितीही  काही  झाले तरी आपल्या ध्येयावरून  आपले लक्ष विचलित होऊ द्यायचे नसते . राहिली माझी  गोष्ट, तर  मी स्वतःची काळजी घेऊ शकतो . मला कोणावर डिपेंड राहायला आवडत नाही आणि तू पण राहू नये असेच मला वाटते . सो यू आर गोईंग टू कॉलेज,  एम आय क्लिअर?".... आर्या 

 

" ठीक आहे".... दुर्गाने त्याला बघून तोंड वाकडे केले आणि तनतन करत आपली कॉलेजची तयारी करायला निघून गेली.  आर्याला तिला बघून हसू आले . 

 

ब्रेकफास्ट करून दुर्गा कॉलेजला निघून आली.  आर्यांने  सुद्धा आपल्या मेडिसिन घेऊन आराम केला.  थोड्या वेळाने त्याने आपला लॅपटॉप काढला,  त्याला पेन ड्राईव्ह लावले आणि काही काम करत होता.  त्याला थोड्या थोड्या वेळाने फोन येत  होते , त्यातून काही इन्फॉर्मेशन तो नोट डाऊन करत होता. 


 

" काही लोकेशन्स चे अड्रेस पाठवतो आहेत,  ती लोकेशन्स लपण्यासाठी सेफ समजली जातात ".....आर्या फोन वर 

 

"........"......पलीकडून


 

" डोन्ट वरी,  आय एम स्टील ऑन ड्युटी ".......आर्या

 

".........."...पलीकडून 


 

" हो सध्या बाहेर नाही जाणार,  माझ्या जवळ सिस्टीम आहे , सो आय कॅन मॅनेज माय  वर्क ".....एवढे बोलून त्याने फोन कट केला. 

 

 आज दुर्गाचे कॉलेजमध्ये काही मन लागत नव्हते , तिचे सगळे लक्ष घरी आर्याकडे होते . आज तिचे अभ्यासात पण मन लागत नव्हते . विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तिला सांगता आली नव्हती.  1-2 मुलांसोबत सुद्धा तिचे वाद झाले होते .  रागातच री  कॉलेजमधून घरी आली,  ते सरळ आर्याच्या रूममध्ये , आर्या झोपला होता,  त्याला बघितले आणि मग तिचे  तिचे मन शांत झाले.  तिथे सोफ्यावर त्याला बघता बघता तिचा पण डोळा लागला. 

 

संध्याकाळची दुर्गाला जाग आली तर आर्या  तिच्या समोर हातात ट्रे घेऊन उभा होता. 

 

" हे काय?"... दुर्गा

 

" चहा , तुला आवडतो तसा "....आर्या

 

" हो,  ते मला दिसते आहे , पण तुम्ही का आणला ?"....दुर्गा

 

" कोणीतरी जाम फुगलं आहे, कोणाचा तरी लाडू झाला आहे  "....आर्या

 

" त्याने तुम्हाला काय ? कोणी कोणावर दिपेंड  राहू नये यावर मला सकाळीच खूप मोठं प्रवचन मिळाले आहे,  आता परत नको,  माझं मला करता येते"... दुर्गा


 

" बापरे वातावरण फारच तापले आहे ,  ठीक आहे नको पिऊ चहा , पण आजीने विचारले कसा झाला होता चहा,  तर चांगला झाला सांगशील"..... आर्या

 

" म्हणजे?  तुम्ही केलेला हा चहा आपल्या हाताने ?"....दुर्गा

 

" एस बेबी,  ओन्ली फॉर यु आय वेंट इन द किचन , हात पण  दुखतोय आणि तू घेत नाही आहेस "....आर्या आपला पपी फेस करत बोलला. 

 

त्याला असे बघून तिला हसू आले आणि तिने त्याच्या हातातून ट्रे घेतला. 

 

" कोणी सांगितले तुम्हाला काम करायला ? ही इतकी लोक काय घरातील लोकसंख्या वाढवण्यासाठी ठेवली आहे काय?".... दुर्गा

 

" करावे लागते बाबा , गर्लफ्रेंड अशी रुसलेली असणार तर आमचं कसं व्हायचं".... आर्या


 

" गर्लफ्रेंड? ई sssss  गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे मी "....दुर्गा

 

" मग काय आहेस?".... आर्या


 

" मी ….ते…ते…..".. दुर्गाला काय उत्तर द्यावे  काही कळत नव्हते. 

 

" खरंच की , आमच्या नात्याला काही नावच नाहीये ".... दुर्गा विचार करत होती

 

" बरं असू दे,  डोक्याला जास्त ताण नको देऊस . गरज पण नाही आहे आपल्या नात्याला काही नाव देण्याची.  We love and respect each other , and this is enough for us  आणि आता तो चहा घे,  थंडा होतोय , माझी सगळी मेहनत वाया जाईल".... आर्या

 

त्याचे बोलणे ऐकून दुर्गाच्या चेहऱ्यावर समाधानकारक हसू पसरले . आर्या  बेडला टेकुन बसला,  दुर्गा पण सोफ्यावर बसून चहा पीत होती.  चहा पिता पिता दोघांचा पण डोळ्यांमध्ये बघत एकमेकात हरवण्याचा खेळ सुरु होता.  तेवढ्यात दुर्गाचा फोन वाजला,  इतका छान क्षण  डिस्टर्ब झाल्यामुळे तिला फोनचा राग आला. 

 

" रॉंग नंबर,  तुला आधी सांगितलेले कळले नाही वाटते"... दुर्गा ओरडतच बोलली

 

" मॅडम मॅडम , तुम्ही म्हणाल्या होत्या काम असेल तर फोन केला तर चालतो ".....शान

 

" काय काम होते?".. दुर्गा खेकसावली

 

" ते नोट्स हवे होते "....शान

 

" कशाचे ?"...दुर्गा

 

" फिजिक्सचे "....शान

 

 त्यांचे बोलणे ऐकून रवीने डोक्यावर हात मारला .

" अबे फिजिक्स नाही".... रवी हावभाव करत त्याला काही सांगत होता पण शान ला मात्र  काही समजत नव्हते. 

 

" फिजिक्स?  डोके फिरले काय तुझं ? आणि काय वर्गात मुलं हुशार नाहीत की काय , मुलीं कडूनच  नोट हवे असतात तुम्हा लोकांना?"..... दुर्गा

 

" अबे,  दुर्गाचे आर्ट्स  आहे ".....रवी शान जवळ येऊन कुजबुजला

 

" मुर्खा , आधी नाही सांगत आले काय तुला ?"....शान

 

" तेच तर सांगतोय कधीचा , तुझं लक्ष नाहीये "...रवी चिडत बोलला


 

" ते….ते…. म्हणजे फिजिकल ट्रेनिंगचे नोट्स म्हणायचं होते मला".... शान

 

ते ऐकू परत रवीने डोक्यावर हात मारून घेतला

 

" नोट्स काय,  समोर ये ,  प्रॅक्टिकल देते तुला म्हणजे मग परत नोट्स मागायची गरज पडणार नाही" …... दुर्गा


 

" मॅडम तुम्ही यामध्ये एक्सपर्ट आहात म्हणून सेल्फ डिफेन्स शिकायचे होते".... शान

 

" हो ते  शिकूनच घे सेल्फ डिफेन्स,  कधी माझ्या समोर आलास ना गरज पडेलच तुला ".... दुर्गा ने फोन कट केला. 

 

" सेल्फ डिफेन्स शिकायचं म्हणे….".... 

 

" हिम्मत आहे बाबा मुलांमध्ये , दुर्गादेवी सोबत पंगा घेतोय,  व्हेरी इंटरेस्टिंग"... आर्या 

 

"तुम्ही विचारले सुद्धा नाही कोण आहे? कशाला फोन केला? वगैरे…" …. दुर्गा

 

" त्याने काय होणार?".... आर्या


 

" मी कोणासोबत बोलते? का बोलत कोणाला भेटते? काहीच फरक पडत नाही तुम्हाला ?"....दुर्गा

 

" मला कळते आहे तुला काय म्हणायचं आहे ते , आपले नाते विश्वासाच्या धाग्याने बांधले आहे आणि जर मी तुझ्यावर अविश्वास दाखवत असेल तर माझ्या आई लव यू म्हणण्याला काहीच अर्थ उरणार नाही.  मला तर हे पण माहिती,  की मी या जगात नसताना सुद्धा तू माझीच राहशील "..... आर्या तिच्याजवळ जात तिच्या कानाजवळ  बोलला. 

 

" आर्या sssss , हे असे बोलणे मी परत खपवून घेणार नाही "...दुर्गा रागाने  थोडी ओरडली  , तेवढ्यात आर्याचा फोन वाजला. 

 

" ओके बेबी , chill ,  मी जस्ट  माझी दुर्गा कशी आहे, ते  तुला सांगत होतो "....तो तिच्या जवळ झुकला  आणि तिच्या कानाजवळ मानेवर  हळुवारपणे कीस केले आणि फोन उचलत बाहेर बाल्कनीमध्ये निघून आला. 

 

" बापरे , किती ओळखता ते मला"... त्याने किस केले तिथे आपला एक हात ठेवत ती त्याच्याकडे बघत होती . त्याच्या आशा स्पर्शाने तिच्या पोटात असंख्य बटरफ्लाय उडायला लागले होते आणि नजरेसमोर चांदण्या चमकत होत्या. 


 

" परफेक्ट , या क्लू मुळे बरीच माहिती मिळेल"..…. आर्या फोन वर 

 

".......".....


 

" त्यांना डाऊट आला आहे बहुतेक , सिग्नल्स मिळायला त्रास होतो आहे , त्यामुळे मेसेज दिकोड करायला वेळ लागत आहे , पण don't worry , त्यांचा प्लॅन तर क्लिअर झाला आहे ".... आर्या 

 

".......".....

 

" हो मला , जास्ती वेळ नाही , फेस्टिवल टार्गेट आहेत "..... आर्या 


 

"......."....

 

" Yess I am working on that , गरज पडली तर येईल मी "..... फोन वर बोलून आर्या ने फोन कट केला. 

 

*******

 

क्रमशः 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️