दुर्गा ... भाग 20

आर्या दुर्गा

दुर्गा 20

शहरामध्ये गोकुळाष्टमी धामधूम सुरू होती . सगळीकडे दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले होते . शहरातील रौनक,  तयारी  बघण्यासारखी होती . सगळीकडे खूप उत्साहाचे वातावरण होते . तरुण मंडळींच्या अंगात तर उत्साह सळसळ वाहत होता . 

दुर्गासाठी हे सगळे नवीन होते.  तिकडे तिच्या गावात  छोटे-छोटे कार्यक्रम होत होते , पण हे दहीहंडी वगैरे फोडणे,  हा इतका मोठ्या प्रमाणात होणारा कार्यक्रम ती पहिल्यांदा बघत होती. 


 

" दुर्गा,  चल बाहेर , बघ  चाळीत किती धामधुम सुरु आहे "....आजी

" आजी,  तू जा ,  मला अभ्यास आहे"... दुर्गा

" मला खुळी  समजते की काय ? अभ्यासात तरी मन लागत आहे का तुझं ?  तू ही  अशी काळजी करत बसली म्हणजे त्याचा फोन येईल  असं होते का?  असेल काही महत्वाच्या कामात म्हणून नसेल केला फोन , काही दिवसांपासून बघती अशीच गुमसुं बसली असते , आपल्याच विचारात,  चल थोडी बाहेर बरं वाटेल"..... आजी तिला समजावत तिचा मूड चांगला करायचा प्रयत्न करत होती. 

" आजी,  नको असा हट्टीपणा  करू , खरच माझं मन नाही आहे,  तू जा ,  मी इथून गॅलरीमधून बघते"..... दुर्गा

" बरं बाई,  तुझी मर्जी,  पण खरंच बघ , भारी मज्जा येते दहीहंडी फोडताना,  चाळीतली  मुलं बायका-माणसं भारी मज्जा करतात "....आजी 

" हो".... दुर्गा

आजी तिच्या सोबत बोलून बाहेर निघून आली. 

दुर्गा रोज आर्याला फोन लावून बघत होती,  पण त्याचा फोन लागत नव्हता . मेसेज करून झाले होते,  पण त्यांना सुद्धा रिप्लाय आलेला नव्हता . आता मात्र तिला आर्याची  खूप काळजी वाटत होती. आणि म्हणूनच तिचे कशात मन लागत नव्हते. आजी तिला बाहेर घेऊन जायला आली होती तरी ती गेली नव्हती. ती खोलीतच बसून आपल्या विचारात गढली होती. 


 

चाळीत  खूप  धुमाकूळ सुरू होती.  लहान मुलांची तर मज्जा मस्ती सुरू होती . मोठ्याने गाणे,  ढोल-ताशे वाजत होते . पण दुर्गाचे मन मात्र सुन्न होते.  तिला आर्यची  आठवण सतावत होती.  तेवढ्यात तिचा फोन वाजला,  तिला वाटले आर्याचा फोन  आहे,  फोनचा आवाजाणे  तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.  उठून तिने मोठ्या उत्सुकतेने फोन हातात घेतला आणि स्क्रीनवर झळकणार  नंबर बघितला,  ते बघून तिचा हिरमोड झाला.  तिने चिडून  फोन उचलला. 

" रॉंग नंबर,  बिन कामाचा फोन केला ना परत , तर तिथे येऊन मारेल ".....दुर्गा ओरडली. 

दुर्गाचा आवाज ऐकला आणि पोट कट झाला. 

" दुर्गाला कसे कळले मी फोन केला आहे?  मी तर वेगळ्या नंबर वरून फोन केला होता?".... शान 

" तू विसरला आहेस , दुर्गा आहेत त्या , काही पण करू शकतात . बाय द वे काय बोलली?"... रवी

" तिथे येऊन मारेल "..... शान

" बघ शान,  मी तुला आधीच बोललो होतो,  सोड तिचा नाद"..... रवी

" मी मार खायला तयार आहो ".....शान

" शान ती मारेलच ,  पण तुझ्या बापाला माहिती झालं ना  तर ते पण झोडतील आणि तुझ्यासोबत मला पण फ्री मध्ये दोघही चोपून काढतील ".....रवी

" अरे,  बिन कामाचा फोन केला तर मारेल म्हणाली  ती, घाबरु नको ".....  शान

" म्हणजे?".... रवी

" आता नेक्स्ट टाइम पासून कामाचा फोन करेल "... शान

" हे भगवान!".... रवीने डोक्यावर हात मारून घेतला. 

 आर्याचा नाही भलताच कुणाचा फोन  निघाला म्हणून परत दुर्गा दुखी झाली होती.  फोन हातात पकडून बऱ्याच वेळ  ती फोनमध्ये आर्याचे फोटो बघत होती.  ती त्याच्या विचारात एवढी मग्न झाली होती की,  बाहेरील ढोल वगैरेचा आवाज सुद्धा तिला ऐकू येत नव्हता.  कितीही रडायचे नाही म्हटलं तरी त्याच्या आठवणीने तिचे मन मात्र खूप भरून येत होते.  कितीतरी वेळ झाला ती तशीच उभी त्याचे फोटो बघत  होती. 

दुर्गाच्या खोलीचे दार नॉक झाले. 

"कोणी नाही घरात".... दुर्गा आर्याचा  फोटो बघत आपल्याच तंद्रीत बोलली. 

परत दार थोड्या मोठ्याने ठोठावले गेले. 

" एकदा सांगितले तर समजत नाही काय , कोणी नाही घरात, जावा इथून नाही तर मार खाल "....  दुर्गा परत दारात कोण आहे न बघता ओरडली. 

परत दार ठोकण्याचा आवाज आला आणि आता दार बंद करत कडी लावण्याचा सुद्धा आवाज आला. 

" कोण हाय रे , जीव जास्ती झाला वाटते , आज तुझा जीव तर आता माझ्या हाताने जाणार "....म्हणत  दुर्गाने हातातील मोबाईल बाजूला ठेवला आणि कानोसा घेत  झटकन मागे वळत तिने डायरेक्ट आपल्या हाताने त्या व्यक्तीचा गळा पकडला. 

" आ sss".... तो कळवळला

" तू ….. तुम्ही?".... दुर्गा डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती . दुर्गाने  लगेच आपला हात त्याच्या गळ्यावरुन बाजूला केला . त्याने नाटकी  नाटकी खोकण्याचा  आवाज केला. 

" आज खरंच राम नाम सत्य झाले असते ".... तो हसत मिश्कीलपणे बोलला. 

" आर्याsss ….. आवर घाला आपल्या तोंडावर ".... दुर्गा रागाने ओरडली आणि त्याला बघून मनातील भावना अनावर झाल्या होत्या. तिने क्षणाचाही विलंब न करता त्याला घट्ट मिठी मारली. 


 

" ओके , सॉरी , बट आज तुझा मूड तसाच दिसतोय,  साधं  वळून बघायला सुद्धा तयार नव्हती तू?"... आर्या तिच्याभोवती आपली मिठी घट्ट करत बोलला . 

" हो,  सतत कोणी ना कोणी त्रास देत होते "....दुर्गा

" बापरे ! कोणाची हिंमत झाली दुर्गादेवीला त्रास देण्याची?"..... आर्या तिची मस्करी करत होता,  तिच्या डोळ्यातील पाणी त्याने बघितले होते जे तिने  शिताफीने लपवण्याचा प्रयत्न केला होता. 

" तुमच्याशिवाय अजून कोणामध्ये हिम्मत नाही मला त्रास देण्याची आणि आता शांत बसा थोड्यावेळ , कधीची बडबड करत आहात "...... म्हणत दुर्गाने त्याच्या छातीवर आपले कपाळ घासले आणि तिने त्याच्या पाठीवर आपली पकड घट्ट केली . तो पण आता थोडा वेळ शांत  होता. 

थोड्या वेळाने त्याला त्याच अवस्थेमध्ये एकसारखे  उभे राहून अवघडल्यासारखे झाले होते. 

" दुर्गादेवी जरी मी खोलीचे दार बंद केले असले  तरी खिडकी खुली आहे ".....आर्या

" असु दे"... दुर्गा

" कोणी बघेल"..... आर्या 

" बघू देत "...... दुर्गा

" दुर्गा,  मी काय म्हणतो, मी खिडकी बंद करून येतो , म्हणजे त्या दिवशी अर्धवट राहिलेले काम पूर्ण करता येईल ".....आर्या

" कोणते?".... दुर्गा

" मी जाताना तू मला  कीस केले होते,  माझी टर्न  राहिली होती "..... आर्या  तिच्या कमरेवर त्याने आपली एका हाताने पकड मजबूत करत तिला स्वतःकडे घेत , तिची हनुवटी पकडत तिचा चेहरा वर केला.  त्याच्या डोळ्यात आता तिला खट्याळपणा दिसत होता. 

" बदमाश "......म्हणत तिने त्याच्या हाताच्या दंडावर मारले  आणि त्याच्या मिठीतून दूर झाली. 

तिने त्याच्या दंडावर  मारले  तसा तो एकदम कळवळला.  त्याच्या चेहऱ्यावर आता तिला थोड्या वेदना  दिसत होत्या , थोडा थकल्यासारखा पण वाटते होता आणि आता तिने त्याच्याकडे नीट निरखुन बघीतले तर  त्याच्या कपाळावर पांढरी पट्टी बांधली होती.  तिने त्याच्या शर्टाची बाही वरती करून बघितले तर तिथे सुद्धा जखम दिसत होती आणि हातावर पट्टी गुंडाळलेली  होती . ते सगळं बघून तिच्या पोटात गोळा आला. 

" हे काय…. काय झालं ? कसं झाले ?"....दुर्गाचे प्रश्नावर प्रश्न सुरू झाले.  तिच्या प्रश्नात त्याच्याबद्दलची काळजी त्याला दिसत होती. 

" नथिंग ".....आर्या

" नथिंग काय नथिंग?  हे इतकं लागलं आहे आणि ती म्हणे  नथींग . काय झालं सांगता की नाही ?" दुर्गा  त्याला धमकावत विचारत  होती. 

" खरंच काळजी करण्यासारखं काही नाही , छोटासा एक्सीडेंट झाला होता , आता ठीक आहे ".....  आर्या

" छोटासा एक्सीडेंट ? दिसत नाही आहे काय किती लागले आहे ते?  आणि असा कसा एक्सीडेंट झाला?  लक्ष कुठे होते तुमचे?".... दुर्गाचे परत प्रश्नांची भडीमार सुरू झाली. 

" टिपिकल वाइफ सारखी करते आहेस . आताच अशी करते आहे तर खरंच बायको झाल्यावर काय करशील?"... आर्या तिच्याकडे बघत हसत होता. 

" बनू तर द्या  तुमची बायको , नाही तुम्हाला सुतासारखे सरळ केले तर दुर्गा नाव लावणार नाही"..... दुर्गा 

" मी तयार आहो सुटासारखे सरळ  बनायला . करायचं काय आत्ताच लग्न?".... आर्या

" आर्या , परत नौटंकीपणा  सुरू केला तुम्ही? आधी काय झाले ते सांगा नीट?".... दुर्गा

" अगं खरंच एक्सीडेंट झाला होता,  फोन पण तेव्हाच तुटला,  म्हणून तुला कॉन्टॅक्ट नाही करू शकलो . आजच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला,  तर सरळ इकडे आलो.  भूक लागली आहे मला , काही खायला  देणार की प्रश्नच विचारून पोट भरणार आहे माझं ?".... आर्या 

" हो , विसरलेच ,  बसा तुम्ही,  मी लगेच बनवते "..... दुर्गा. 

 दुर्गा त्याच्यासाठी खायला बनवत होती,  तो तिला न्याहाळत बसला होता. 


 

त्याने मुद्दाम  खाण्याचे नाव काढले होते . नाहीतर दुर्गाचे प्रश्न काही संपले नसते आणि मग तिला त्याच्या उत्तरांवर डाऊट निर्माण झाला असता. 

आर्याला हाताला बंदुकीची गोळी लागली होती आणि त्याच्या डोक्यावर सुद्धा जोरदार वार झाले होते . त्यामुळे तो बेहोश झाला होता , शुद्ध आली तेव्हा तो हॉस्पिटल मध्ये होता. त्याचे घाव ऐवढे खोल होते, ब्लड लॉस पण खूप झाला होता ,  दोन दिवसानंतर तो शुद्धीत आला होता . घरी आणि दुर्गा  काळजी करतील  म्हणून त्याने कोणालाच काही कळवले नव्हते.  8 दिवसानंतर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता . त्याची आई घरी नव्हती म्हणून मग तो  डायरेक्ट तिकडे दुर्गाला भेटायला आला होता. 


 

दुर्गाने त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला होता.  दोघांनीही गप्पा मारता मारता तो फस्त केला . बाहेर आता दहीहंडी फोडण्याचे कार्यक्रम सुरू झाला होता.  चाळीतल्याच  गोविंदा टोळीने एकमेकांच्या खांद्यावर उभे होतात हंडी पर्यंत पोहोचण्यासाठी मनोरा तयार केला होता . चाळीतल्या लोकांचे  त्यांना प्रोत्साहन देण्याचे,  ओरडण्याचे आवाज येत होते.  आर्या आल्याने  आता दुर्गा सुद्धा खूप खुश होती . बाहेरील आवाज ऐकून  तिला सुद्धा उत्साहही वाटत होते . आर्या  आणि दुर्गा दोघेही खोलीच्या समोर गॅलरीमध्ये येऊन दहीहंडी फोडण्याचा खेळ बघत होते. 

 दहीहंडी बरीच उंचावर बांधलेली होती.  मुलांनी मनोरा  पण बराच उंच केला होता . जसा शेवटचा गोविंदा दहीहंडी फोडायला जायचा , चाळीतल्या आजुबाजूचे  त्याच्यावर पाणी फेकले जायचे आणि त्याचे कॉन्सन्ट्रेशन जाऊन तो खाली पडायचा,  किंवा मग तो हंडी फोडायला हंडी पर्यंत पोहोचला की हंडी वर उंचावर ओढल्या  जायची , असाच खेळ सुरू होता . असेच  बरेचदा सुरू होते,  वेगवेगळ्या गोविंदाने प्रयत्न करून बघितले होते,  पण कोणालाही यश येत नव्हते.  तिथली काही मुलं गोविंदा मुलांची मस्करी करत त्यांना चिडवत होते की त्यांना हे काम जमायचं नाही . अशीच धमाल सुरू होती. 

ते सगळं बघून आता दुर्गामध्ये पण जोश चढला होता , आणि असे कामं तर तिचे फेवरेट होते . कोणाच्या ने हंडी फुटत नाहीये बघून दुर्गाने आपली ओढणी कंबरेभोवती गुंडाळत घट्ट बांधली  , आणि वाऱ्याच्या वेगाने पायऱ्या उतरत खाली मुलांच्या मनोऱ्या जवळ आली , आणि त्यांना इशारा करत सरसर मुलांच्या खांद्यांवर पाय ठेवत वरती चढली. तिने दहीहंडीला हात लावला होताच की चारी बाजूंनी तिच्यावर पाणी पडले…. आणि तिचा तोल गेला आणि ती घसरत खाली आली . ती पूर्णच ओलीचिंब झाली होती. 

तिने गोल फिरत पूर्ण चाळीवरून नजर फिरवली आणि फेका पाणी म्हणून इशारा केला …आर्या वरती उभा तिला बघत होता. तिचा हाच उत्साह आणि हार न मानण्याची जिद्द त्याला भारी आवडत होती.

ओले झालेले केस आपल्या दोन्ही हातांनी मागे सरत दुर्गा परत शिताफीने मनोरा चढून वरती हंडी जवळ पोहचली आणि हंडी नीट पकडत होती की परत सेम तिच्या अंगावर पाणी आले, पण आता तिने तिचे concentration बिघडू नाही दिले . 

" दुर्गा sssss , दुर्गा sssss "...... आता चाळ भर तिच्या नावाचा गजर सुरू होता …..

दहीहंडी एका हाताने पकडत दुर्गाने चौफेर नजर फिरवली….आणि तिची नजर आर्यावर  स्थिरावली …. 

आर्याने तिला बघून स्मायल केले आणि  थम्सअप दाखवले , दुर्गाने त्याच्या कडे बघतच आपल्या डोक्याने दहीहंडी  फोडली .. दहीहंडी मधील दूध दही चा वर्षाव दुर्गाच्या डोक्यावर आणि क्रमाने सगळ्या गोविंदांवर झाला . आणि तसाच ढोल ताशांचा गजर होऊ लागला, टाळ्यांचा आवाज चौफेर घुमू लागला..  दुर्गा घसरत मनोऱ्यावरून खाली उतरली…आणि तेवढयात रिमझिम पाऊस सुरू झाला आणि एकाच जल्लोष झाला.. आजूबाजूची सगळी मंडळी तिथे जमली. ढोल ताशे गाण्यांचा आवाज वाढला.. सगळे फेर धरून नाचू लागले. 

गो गो गो गोविंदा

गो गो गो गोविंदा

गो गो गो गोविंदा

गो गो गो गोविंदा

अट्ट के मैट के

झट्ट के मारे है

तू आज शोला तोह

हम भी कुहरे है

तू आसमान पे है

तू चाँद टारे है

हम अट्ट के मैट के

झट्ट के मारे है

तू आज शोला तोह

हम भी कुहरे है

तू आसमान पे है

तू चाँद टारे है हम

चाहे दम निकले यह दम

है कसम तेरी कसम

तुझे आज छोड़ेंगे न हम

गो गो गो गोविंदा

गो गो गो गोविंदा


 

सणावारांची खरी मजा असे सगळे एकत्र मिळून साजरी करण्यातच येत असे . पूर्ण चाळीचा उत्साह, चेहऱ्यावरील आनंद वाखणण्या जोगा होता. किती श्रीमंत दिसत होती ती लोकं , किती खुश . छोट्या पासून मोठ्या पर्यंत सगळे एकाच रंगात , आनंदाच्या रंगात रंगले होते . किती मनसोक्त आनंद लुटत होते ते , एखाद्या करोडपतीला ही लाजवेल अशी श्रीमंती होती त्यांच्या चेहऱ्यावर….. आर्या वरतून सगळ्यांचे चेहरे टिपत होता. 

सगळे आपल्याच तालात नाचत होते , दुर्गा तर अक्षरशः टपोरी डान्स करत होती. तिने तर एका लहान मुलाला आपल्या खांद्यावर घेतले होते आणि आजी सोबत नाचत होती . तिला बघून तर आर्याच्या ओठांवर हसू आलं, त्याला पण तिथे जाऊन शिट्या मारत नाच करावा वाटत होते , पण तो नुकताच हॉस्पिटलच्या बेड वरून उठला होता, त्यात डोक्याला - हाताला  पट्टी होती  , पावसामुळे ती ओली झालेली त्याला झेपली नसती आणि म्हणूनच तो तिथे वरती उभा होत हा सगळा गोंधळ बघत होता. 

नाचता नाचता दुर्गाचे लक्ष आर्यकडे गेले … आणि तो एकटाच उभा आहे तिच्या लक्षात आले…. ती पळतच वरती त्याचा जवळ आली आणि त्याचा गोल फिरत खाली वाजणाऱ्या ढोल सोबत नाचत होती . तिला बघून आता त्याला हसू अनावर झाले आणि तो खळखळून हसू लागला अगदी त्याचा डोळ्यातून पाणी येई पर्यंत. वातावरनात चैतन्य निर्माण झाले होते. 


 

दहीहंडी चा कार्यक्रम खूप छान पार पडला होता. सगळेच थकले होते. सगळे आपापल्या घरी निघून आले. आजी सुद्धा वरती खोलीत आली. 

" तरीच म्हटलं दुर्गाच्या  अंगात एवढी मस्ती आली कुठून ….".... आजी आर्याला बघून मस्करी करत बोलल्या. आजीच्या बोलण्याने दुर्गा लाजत आत मध्ये पळाली.  … आर्या पण लाजत इकडे तिकडे बघत होता. त्या दोघांना असे लाजातांना  बघून आजीला हसू आले. 

" हे काय रे पोरा , हे डोक्याला काय झालं ? बारा आहेस नव्हं ?".... आजी 

" हो हो ठीक आहे , ते असच छोटासा ॲक्सिडेनट झाला होता ….".... आर्या 

" बरं बरं , दुर्गी ला खूप काळजी लागून होती तुझी .  ये आतमध्ये ….".... आजी 

" बस , मस्त गरम गरम जेवण बनवते , किती दिवस झाले दुर्गी पण बरोबर जेवली नाही , आज तू आहेस ना , मस्त पोटभर जेवू घालती ".... आजी 


 

" आजी , नको , खूप वेळचे आले आहे , आजच हॉस्पिटल मधून सुट्टी झाली, आरामाची गरज आहे , घरी जाऊन आराम होईल " … दुर्गा आतमधून ओरडली. कपडे चेंज करून ती बाहेर आली. 

" हो तर स्वयंपाक होई पर्यंत इथे झोपेल तो , मग जेवण करून जावा घराला , काय रे पोरा चालते काय ? नाही म्हणजे आज मी पण घरी हाय , किती दिवस झाले तुम्हा पोरांसंग वेळ नाय घालवला "..... आजी 

" आजी चालते काय धावते म्हणा ….. . मी पण किती दिवस झाले घरच जेवलो नाही . 

मी इथेच झोपतो थोड्या वेळ, तुम्ही करा आरामात स्वयंपाक …. ".... आर्या बोलतच तिथे एक पलंग होता त्यावर आडवा झाला. 


 

" पाय , माह्या पोराला चालते सगळं "..... आजी दुर्गाला बोलली आणि आनंदाने  स्वयंपाक करायला निघून गेली. 

दुर्गाची आपली बडबड सुरु होती , एवढया दिवसात तो नव्हता तर काय काय झालं , कॉलेज वगैरे सगळ्या गोष्टी ती सांगत होती… तो ह्मम ह्मम करत तिचं बोलणं ऐकत होता… 


 

" ए दुर्गे , बडबडत काय बसली आहे, आराम करू दे त्यास , चल इकडे ये तू मला मदत करायला …."..... तिची सतत सुरू असलेली बडबड ऐकून आजीने तिला आवाज दिला.  दुर्गाने आर्या कडे बघितले तर तो सुद्धा झोपला होता. 

" मी काय अंगाई गीत गात होती यांना झोप लागायला ?" ….. दुर्गा 

" तुझा आवाज कर्कश्श असला तरी मला मधुरच वाटतो ".....आर्या डोळे बंद करत बोलला. 


 

" काय ? माझा आवाज कर्कश्श काय ? मरिज आहात म्हणून , नाहीतर तुम्हाला सोडले नसते "..... दुर्गा 


 

" मी तर म्हणतो सोडूच नको , जवळ ये अशी…. "..... आर्या 


 

" खूपच वात्रटपणा करायला लागले "....दुर्गा 

" जा आजीला मदत कर , मला झोपू दे मग , आजी हिला आतमध्ये बोलवा, त्रास देते आहे मला "..... आर्या

" आगाऊ "..... दुर्गा पाय आपटत आतमध्ये निघून आली . 

आर्या हसत झोपी गेला. 

आजीने दुर्गा आणि आर्याच्या आवडीचे जेवण बनवले होते. तिघेही गप्पा मारत जेवण करत होते. 

" आजी , मी जाऊ काय यांच्यासोबत घरी ?"... दुर्गा 

" हो , जा "..... आजी 

" नाही , म्हणजे , मी काय म्हणते आजी, त्यांना थोडं बर नाही आहे , त्यांची आई पण इथे गावात नाही तर …. आणि त्यांच्या हाताला पण लागलं आहे … तर मी काही दिवस राहू काय त्यांच्या कडे ? ".... दुर्गा 

" हो म्हणाली न मी , तू जाऊ का विचारले तेव्हाच समजलं ".... आजी 

" आजी , thank you ".... दुर्गा आजीच्या गळ्यात पडत आजीचे गालगुच्चे घेत होती . 

" काळजी घे त्याची.. त्रास नको देऊ …"... आजी 

" हो ".... म्हणत दुर्गा उठली आणि तिने एका पिशवीत आपले दोन चार कपडे भरले. 

दोघेही आर्याच्या बंगल्यावर निघून आले. 


 

संध्याकाळी दोघंही कॉफी पीत टीव्ही बघत होते … 

" खूप मोठ्या प्रमाणावर दारूगोळा आणि सोबतच तीन आतंकी पकडले . दोन आतंकी पळून गेले ,त्यांचा अद्याप शोध सुरू आहे . ".... अशी न्यूज टीव्ही वर येत होती. 

" गोकुळाष्टमीच्या दिवशी गर्दीचा फायदा उचलत आतंकी हल्ल्याचा  चा मोठा प्लॅन उधळून लावला " … असे न्यूज अँकर सांगत होते. 


 

" बापरे , काय मिळतं या आतंकी ना असे करून ? निष्पाप लोकांचे जीव घेऊन ?"... दुर्गा काळजीने बोलत होती. 

" ह्मम ".... आर्या 

दुर्गा बोलत होती आणि आर्या आपल्या विचारात होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला 

" न्यूज बघितली काय ?".... 

" ह्मम माझं लक्ष आहे  , नेक्स्ट टाईम!  ".... आर्याने बोलून फोन कट केला. 


 

*****

क्रमशः 

🎭 Series Post

View all