दुर्गा ... भाग 18

दुर्गा

दुर्गा 18 


 

" ताई , खरंच काही प्रोब्लेम होणार नाही ना ? घरच्यांना कळले तर ….मला भीती वाटते आहे ."..... गीता 

" काहीच प्रॉब्लेम नाही होणार , , तू घाबरु नको . आणि जर आता घाबरली तर मग आयुष्यात पुढे नाही जाऊ शकशील  . मी आहे ना , विश्वास ठेव माझ्यावर . ".... दुर्गा गीताला समजावत धीर देत होती. 


 

खरं तर दुर्गा एकटीच त्या मुलाला चांगला धडा शिकवत रस्त्यावर आणू शकत होती , पण गीता ची भीती घालवणे आणि तिला भविष्यासाठी तयार करणे तिला महत्वाचे वाटत होते , म्हणून रात्रभर विचार करून दुर्गाने एक प्लॅन बनवला होता , पण तो गीता ला पूर्ण करायचा होता …. आणि दुसऱ्या दिवशी सेम टायमिंग ला त्या क्लासेस वाल्या रस्त्याजवळ आल्या होत्या. 

" काळजी करू नको , आम्ही आहोत तिथे , आणि हो ही ओढणी घे , तुझी दे मला"..... दुर्गाने तिच्या बॅग मधून एक ओढणी काढून तिला दिली, आणि तिची ओढणी बॅग मध्ये नीट ठेवली. गीताने सुद्धा ती नीट ओढून घेतली … दुर्गा आणि तिच्या दोन नेहमीच्या मैत्रिणी पलीकडे कोणाला दिसणार नाही अश्या पण काही झाले तर लगेच मदतीला जाता येईल अशा ठिकाणी लपून बसल्या . 

नेहमीच्या वेळेवर गीता त्या रस्त्याने पायी चालत येत होती …. त्या मुलाने गीताला येताना बघितले , आजूबाजूला कोणी आहे का कानोसा घेतला  आणि त्याने आपली बाईक सुरू करत गीता कडे येऊ लागला …. त्याला बघून भीतीने गीताच्या हृदयाची धडधड वाढली होती , कपाळावर घाम जमा व्हायला लागला होता … पण तिच्या डोक्यात दुर्गाचे वाक्य फिरत होते " जर आता घाबरली तर मग आयुष्यात पुढे नाही जाऊ शकशील "   आणि तिने सगळा धीर एकवटला आणि पुढे चालू लागली . नेहमी प्रमाणे त्या मुलाने गाडी तिच्या जवळून घेत  तिच्या छातीला हात लावला आणि पुढे जाणार तोच तो जोराने ओरडला….गाडीचा ब्यालन्स गेला आणि तो खाली पडला आणि चालत्या गाडी सोबत घासत पुढे गेला….त्याचा हात चांगलाच रक्तबंबाळ झाला होता , पडल्यामुळे लागल्याने पण तो कण्हत होता. 


 

दुर्गाच्या प्लॅन नुसार तिने गीताला एक छोटा चाकू दिला होता  आणि तिला धारदार बाजू समोरच्या दिशेने करत आपल्या छातीजवळ पकडून ठेवायला सांगितला होता . ओढणी नीट झाकोळती घेतल्यामुळे समोरून फार लक्षात येत नव्हते...नेहमीप्रमाणे त्या मुलाने प्रेशर देत गीताच्या छातीवर पकडायचा प्रयत्न केला होता , पण चाकू छोटा आणि धारदार असल्यामुळे त्याच्या हातात घुसला होता , आणि अचानक असा वार झाल्याने गाडीवरचा त्याच्या ताबा सुटला होता आणि तो खाली पडला. 

लपलेली दुर्गा बाहेर आली …. 

" शाब्बास गीता …".... म्हणत त्या मुलाजवळ गेली… 

" काय , कसा वाटतोय पाहुणचार ?" …. दुर्गा 

" मी सोडणार नाही …."..... तो मुलगा उठायचा प्रयत्न करत होता पण भारी भक्कम गाडी त्याचा पायावर पडली होती … वरून त्याला त्याच्या उजव्या पायात पण असह्य  वेदना जाणवत होत्या. 

" अरे वाह , अंगातली गर्मी अजून गेली नाही वाटते , थांब ती पण घालवते ".... म्हणत तिने हातातल्या मोबाईल मध्ये त्याचा व्हिडिओ आणि काही फोटो दाखवले. व्हिडिओ आणि फोटो इतके परफेक्ट काढले होते की त्यात गीता चा चेहरा दिसत नव्हता पण तो मात्र स्पष्ट दिसत होता … 

दुर्गाने त्याच्या हातात खुपसलेला चाकू काढला तसा तो कळवळला… तिने चाकू आणि ओढणी उचलून घेतली….


 

" जर तू परत हिला त्रास दिला किंवा कुठल्याही दुसऱ्या मुलीला त्रास देताना दिसला , तूच काय जर तुझा मित्र वैगरे पण असे काही करतांना दिसले  तर हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया वर व्हायरल व्हायला वेळ लागणार नाही , वेळ पडलीच तर तुझ्या घरी तुझी कॉलर पकडून तुला घरा बाहेर काढत तुझी धींड काढायला पण मागेपुढे बघणार नाही  आणि पोलिसांच्या स्वाधीन द्यायला माझ्या जवळ पुरावे आहे , आणि इथे कुठे सीसीटीव्ही असेल तर त्यात पण तुझे रोजचे कारनामे कैद झाले असतील , आपल्या हद्दीत राहायचं  … हवं तर warning समज  , एक शेवटचा चान्स देत आहे ….." ….. दुर्गा 


 

तो हे सगळं बघून चांगलाच शॉक झाला होता , आता त्याचं दुखणं वाढत होते , तो कण्हत होता … बाजूला त्याचा पडलेला मोबाईल उचलायचा प्रयत्न करत होता पण त्याचा मोबाईल थोडा अंतरावर पडल्यामुळे त्याचा हात पोहचत नव्हता. 

दुर्गाने त्याचा मोबाईल उचलला , आणि त्यात my home नावाचा नंबर दिसला तो लावला… 

" हॅलो काका , तुमच्या मुलाचा इथे accident झाला आहे ".... बोलत तिने त्यांना  तिथला पत्ता फोनवर सांगितला आणि फोन ठेऊन दिला. 


 

" दुर्गा म्हणत्यात मला , नाद नाय करायचा …. ".... दुर्गा तिथून उठून परत आली . 


 

गीता तर आवासून दुर्गा कडे बघत होती , तिचं ते बोलणं , ती देहबोली सगळ्यांचाच गीताला खूप कौतुक वाटले.  

" तू फोन का केला त्याचा घरी ? सडू द्यायचं होते ना त्याला तिथे , त्याची लायकी तीच होती  '... दुर्गाची एक मैत्रीण 


 

" त्याचा हातात चाकू घुसला आहे , चांगलच रक्त वाहत आहे , आणि बहुतेक पाय फ्रॅक्चर झाला दिसते गाडी पायावर पडल्यामुळे …. तो जरी माणुसकी विसरला असेल तरी आपण विसरायला नको … त्याचा चुकीची शिक्षा त्याच्या आईवडिलांना का द्यायची , ती माऊली वाट बघत असेल आपल्या लेकराची . अंधार झाला आहे आणि रस्ता पण वर्दळीचा नाही आहे , कोणी मदत करायला नाही इथे , म्हणून केला फोन "..... दुर्गा 


 

" तू ना आम्हाला अजून कळलीच नाही आहे कशी आहेस तर …. ".... दुर्गाची मैत्रीण 

" माणसाने अत्याचार सहन करायचा नाही , त्याला प्रखर उत्तर द्यायलाच  पाहिजे , पण माणुसकी सुद्धा जपली पाहिजे " ….. दुर्गा 


 

" The Great Durga !! चला आमचे काम झाले … आम्ही जातो घरी आता ".... दुर्गाच्या मैत्रिणी 

" ताई , thank you ग …. खरंच तू ग्रेट आहेस "..... गीता 


 

"चल असे काही नाही , एकमेकांना मदत तर करायलाच हवी .  धन्यवाद पोरींनो , तुमच्यामुळे शक्य नव्हते ".... दुर्गा 

" आम्ही काय केले ?".... मैत्रीण 

" कसलं भारी फोटोशूट केलं आहे …. मला तर हा मोबाईल ही नीट वापरता येईना …".... दुर्गा 

"ये ताई , मी शिकवेल तुला "....गीता 

" हो चालेल…. फिट्टमफाट मग आपलं ….. "....दुर्गा 

तिचे बोलणे ऐकून सगळ्या हसायला लागल्या …  सगळे आपापल्या घराकडे निघून आले… 


 

दुर्गा घराकडे जायला निघाली होती की तिचा फोन वाजला … 

" कोण आहे रे ..?".... दुर्गा , आधीच हे सगळं झाले होते , त्यात unknown नंबर चा फोन बघून ती ओरडत बोलली . 

फोनवर पलीकडून काही आवाज आला नाही …. 

" कोण टाईमपास करत आहे रे ? तिथे येऊन मारीन "...... दुर्गा खेकसली , तसा पलीकडून फोन कट झाला. 

दुर्गाने एकदा फोन बघितला आणि बॅग मध्ये ठेऊन दिला… 


 

" इथे तोंडातून एक शब्द नाही निघत अन् Love at first sight म्हणे "...... रवी हसायला लागला. 

" गप रे , पहिली वेळ होती बोलायची , होता है होता है …. " ….. शान 


 

" बाळा , हे जमायचं नाही आपल्याला , उगाच तिच्या नादी लागू नको . नंबर वगैरे शोधून काढला ना तिने , आपली चांगलीच धुलाई करेल ती . नाद सोड तिचा ".....रवी 

" शान ने एक बार कमिटमेंट करली तो फिर वो किसी के बाप की नहीं सुनता.  "..... शान फिल्मी स्टाईल मध्ये 


 

" कमिटमेंट ? कोणाला केली ?"..... रवी 

" हमने अपने दिल के साथ …. अपने दिल की मलिका को हम पाकर ही दम लेंगे ".... शान 

" शान , तुझे काहीच नाही  होऊ शकत , तू वेडा झाला आहेस ….".... रवीने  त्याचा अंदाज बघून डोक्यावर हात मारून घेतला. 


 

" मला वेड लागले प्रेमाचे ssss , प्रेमाचे ssss…. ".... शान आपल्या केसांतून हात फिरवत स्वप्नवत झाला जसे काही शाहरुख त्याच्या अंगात आला होता. 

" मग आता काय प्लॅन आहे ? ".... रवी 

" सद्ध्या तरी डायरेक्ट तिच्या पुढे तर नाही जाऊ शकत , उद्या परत फोन करून बघेल ".... शान 


 

" अरे पण तिने फोन नंबर शोधून काढले तर ? ती काहीही करू शकते बरं , ती चेहऱ्यावरून च बघ की दांडगी दिसते "..... रवी 


 

" Don't worry bro , आपल्याला कोण कागदपत्र मागते , हे बघ इतके नंबर्स आहेत माझ्याजवळ , एक पण माझ्या नावाचे नाही आहे "........ शान त्याला दहा बरा सिम कार्ड दाखवत बोलला.  


 

" बापाच्या नावाचा फायदा उचलतो …..".... रवी 


 

" हो मग ….. एकुलता एक वारीस आहो …. कशाची कमी आपल्याला ….. शिकलं नाही तरी किती तरी पिढ्या बसून खातील ….. हे काय नावासाठी काहीतरी शिकायचं आपलं "..... शान 


 

" बरं आहे बाबा तुझं , कर ऐश ….. पण मग तू डायरेक्ट तिला प्रपोज का नाही करत ? तुला कोण नकार देणार ?"..... रवी 


 

" पहिल्यांदा प्रेम झालंय भावा …. प्रेमानंच जिंकायचं आहे ……"..... शान 


 

" तू आणि तुझी फिलॉसॉफी….".... रवीने त्याच्या पुढे हात जोडले..


 

दुर्गा आपल्या घरी आली … आजी अजून घरी यायची होती. तिने हातपाय धुतले , आणि रात्रीसाठी जेवण बनवून ठेवले. पुस्तकं उघडून ती अभ्यासाला बसली. 

दुर्गाचे एक चांगले होते, एकाग्र बुद्धी शक्ती चांगली होती  , बाकीचे फालतू विचार ती डोक्यात भटकू सुद्धा द्यायची नाही.  ती मन लाऊन अभ्यास करत होती. 


 

" Lifeline calling ….. " फोन ची रिंग वाजली तसे तिचे लक्ष फोन कडे गेले … आणि फोन वरील झळकणारे नाव बघून तिच्या ओठांवर हसू पसरले…. 

आर्याने स्वतःच तिच्या मोबाईल मध्ये स्वतःचा नंबर Lifeline या नावाने सेव्ह केला होता… दुर्गा वर किती विश्वास होता त्याला , त्याला माहिती होते की तो तिची lifeline आहे …. आणि बिनधास्त त्याने आपले नाव सेव्ह केले होते…. तिला पण तिच्यावर असलेल्या त्याचा विश्वासाचे कौतुक वाटत होतें .


 

" बोला मालक , लवकर फुरसत मिळाली तुम्हाला आमच्याशी बोलायला ?".... दुर्गा 

" हे मालक काय यार बच्चा ….  ".... आर्या फोन वर पलीकडून 

" मग नाही तर काय , तुमची वाट बघत राहावे लागते. मालक फोन करतील , मग आम्हाला बोलायचा चांस मिळणार "..... दुर्गा 


 

" कामात होतो राणी , बरं सोड ते , काय म्हणतेस? ".... आर्या 

" तुमच्या आठवणीत मजेतच "..... दुर्गा 

" काय आज कोणासोबत तरी पंगा झालेला दिसतो ?".... आर्या 


 

" मी काय तुम्हाला भांडकुदळ दिसते काय , की नेहमीच पंगा घेत असते ?".... दुर्गा 


 

" हा हा हा … now I am sure ….. कोणाचे हात पाय तोडले ?" ….. आर्या 

" मी काय नाही केले , त्याचेच त्याने तोडून घेतले …. नामर्द कुठला "..... दुर्गा 

" दुर्गा , काय झालं आहे ?" …. तिचे शेवटचे दोन शब्द ऐकून त्याला परिस्थितीचे गांभीर्य कळले . 

" दाढी मिशी फुटली की स्वतःला मर्द म्हणवून घेतात ही मुलं . मुलींना कुठेही अश्लील स्पर्श करण्याचं जसे लायसेन्स च मिळतं यांना . नामर्द कुठले …. जिथे पाहिजे तिथे आपली मर्दांगी दाखवायला येत नाही , असहाय्य मुलींना बरोबर पकडतात आपली मर्दांगी दाखवायला …. मुली , बायकांना त्यांच्या परवानगी शिवाय हात लावणे , अश्लील भाषेत कॉमेंट्स पास करणे , खूप अभिमानस्पद काम वाटते नाही त्यांना …. ….. एका आईच्या मतृत्वसाठी शिवी आहेत ही असली घाणेरडी मुलं/माणसं …. कचरा आहेत ही लोकं धर्तीवर,  बिचारे हिजडे तरी चांगले"....... दुर्गा 

" दुर्गा , तृतीयपंथी म्हणायचं "..... आर्या 

" हो , सॉरी …. " दुर्गा 

"It's okay , everyone deserves the respect , they  one of the creation by God  , we all are same .".... दुर्गा 

" हो " … दुर्गा 

"  काय केले तू त्या मुलाचं  ?" ….. आर्या 

दुर्गाने गीता सोबत झालेली भेट पासून त्या मुलाला दिलेल्या शिक्षे पर्यंत सगळं सांगितले. 

" बापरे, किती फिल्मी , एकदम साऊथ स्टाईल मध्ये  "..... आर्या 

" हो मग , चित्रपटातून चांगलं काही घ्यायचं असते …., खूप विचार केला काय करावं कळले नाही , गीताला तिच्या घरी सुद्धा माहिती नव्हते पडू द्यायचे  , मग काय करणार ..जे ठीक वाटले ते केले..  " … दुर्गा 

" ठीक आहे , तू केले ते योग्यच केले , पण जरा सांभाळून वाग "..... आर्या 

" हो, काळजी नका करू माझी "...... दुर्गा 


 

" बरं ,मी काय म्हणतो गीताला आपल्या सेल्फ डिफेन्स क्लासेस ला एडमिशन करून दे , अर्थातच तिच्या आई वडिलांची परवानगी घेऊन . मला खात्री आहे तू तिच्या घरी सेल्फ डिफेन्स बद्दल नीट समजावून सांगशिल ".... आर्या 


 

" हो , माझ्या पण डोक्यात तेच आहे …. बरं ते जाऊद्या , कधी येताय? भयंकर आठवण येते आहे मला तुमची , कधी एकदाची तुम्हाला बघतेय असे होत आहे ….".... दुर्गा 

" नुसतीच बघत बसणार तू …. माझा काय फायदा ?".... आर्या मस्करी करत होता. 

" आगाऊपणा नाही हा आर्या , गपगुमान लवकर परत यायचं "..... दुर्गा त्याला दम देत बोलत होती 


 

" कोणाचं काय , तर कोणाचं काय … इथे लोकं फोन वर romantic गोष्टी करतात दूर असले की , आणि तू …. तुला मला धमकावत आहेस , मारपीटच्या गोष्टी सांगत आहेस "..... आर्या 


 

" बालमनावर परिणाम नका करू हा ".... दुर्गा 


 

" बालक ? कोण म्हणतं तुला बालक , लोकांची हाड तोडून ठेवतेस ….. "....  आर्या 


 

" मी लहानच आहे …. आणि मला लहानच राहायचं ….. दिल तो बच्चा है जी ".... दुर्गा 


 

" Okay माझी मनिमाऊ …. काम आटोपले की लगेच येतो …. ".... आर्या 


 

" पण इतकी काय महत्वाची कामं असतात तुमची की फोन सुद्धा बंद ठेवावा लागतो ?".... दुर्गा 


 

" असतात बच्चा काही कामं अशी की तिथे मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत . बरं अभ्यासाकडे तर दुर्लक्ष नाही ना ?"..... आर्या 

" नाही , छान चालला आहे अभ्यास . जे प्रश्न नाही येत ते काढून ठेवले आहेत तुमच्यासाठी ".... दुर्गा 


 

" ठीक आहे , परत आलो की करूया सोल्व . ".... आर्या  


 

" हो ".... दुर्गा 


 

" आजी कश्या आहे ? आली काय?फोन  दे त्यांना , बोलतो त्यांच्या सोबत "..... आर्या 


 

" ती छान आहे , यायची अजून घरी …. आता मस्त चालले आहे , खूप गर्दी असते म्हणाली ".... दुर्गा 

" Good , लवकरच आपण त्याचं रूपांतर रेस्टॉरंट मध्ये करू ".... आर्या 


 

" हो …. " … दुर्गा 

" बरं ठीक आहे नंतर करतो फोन , आणि हो उगाच माझ्या आठवणीत रडत वैगरे बसायचं नाही "...... आर्या 

" हाहाहा छान जोक होता , मी रडत नसते "... दुर्गा 


 

" I know …. अशीच आवडते तू मला …. तू तर देणार नाहीसच , मीच घेतो... उsssम्मह ! "..... फोनवर किस करत त्याने फोन ठेवला. 


 

" अवघड आहे हे …..".... दुर्गा स्वतःशीच लाजत हसत होती. परत तिने पुस्तकात आपले डोकं खुपसले. 

गीता सगळं करायला तयार तर झाली होती, पण ती खूप घाबरली होती . घरी आल्यावर तिच्या डोक्यात हाच विचार सुरू होता की कोणाला काही कळले तर काय होईल ? आईबाबा ला कळले तर काय होईल ? ते काय म्हणतील मला ? रागावतील काय ? असेच विचार तिच्या डोक्यात घोळत होते. 


 

दुर्गाला एक अंदाज येत होता , झालेल्या गोष्टीचा गीतावर काय परिणाम झाला असेल . गीता लहान आहे , घाबरली तर नक्कीच असणार , पण दुर्गाने तिला नीट समजावून सांगत विश्वासात घेतले होते. मनाने सुद्धा तिला स्ट्राँग बनवणे गरजेचे आहे हे दुर्गाच्या लक्षात आले  होते. पण घरातील लोकांची , आईवडिलांची साथ जर मुलींना मिळाली , लोकं काय म्हणतील हा विचार जर सोडला आणि खंबीरपणे आई वडील आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील तर मुलगी नक्कीच लवकर स्ट्राँग बनायला मदत होते. गीता च्या घरी जाऊन सगळं नीट समजावून सांगायचे, हाच दुर्गाचा पुढला प्लॅन होता.  

गीताची छेड काढणारा मुलगा बऱ्याच वेळ तिथे रस्त्यावर पडला होता. रस्ता सामसूम होता म्हणून त्याला लगेच काही मदत मिळाली नव्हती. वेदने मुळे आणि हातातून रक्त वाहल्या मुळे  येव्हणा त्याची शुद्ध हरपली होती. पायावर गाडी सुद्धा तशीच पडली होती.  थोड्या वेळाने त्याचे वडील आणि भाऊ तिथे आले , त्याच्या पायावरून गाडी बाजूला केली , त्याला उचलून कारमध्ये टाकले , त्यांनी त्याला हॉस्पिटल मध्ये आणले… चाकू हाताच्या आरपार गेला नव्हता पण बरीच खोल जखम झाली होती  , त्यावर सहा टाके पडले होते . पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असेल असा अंदाज होता, पण भारी गाडी पायावर पडल्यामुळे ते तुटले होते , त्यावर शस्त्रक्रिया करून आतमध्ये रॉड घालावा लागणार होता. त्याला चांगलीच अद्दल घडली होती , त्यात काय झाले हे सुद्धा त्याला सांगता येत नव्हते, तो झालेल्या प्रकराने चांगलाच घाबरला होता आणि आयुष्यभराचा धडा घेतला होता …. त्याने गाडी स्लीप झाली आणि पडलो येवढेच सांगितले. कुठल्या तोंडाने तो त्याने केलेले हे गलिच्छ  काम सांगणार होता ? 


 

*****

क्रमशः 


 

******  

एक आठवण शेअर करते , जवळपास ,15वर्ष पूर्वीची  . 

मी दुसऱ्या गावाला शिक्षण घेत होते. नेहमीच एकटीने प्रवास करत होती. एकदा बस ने प्रवास करत होती… माझ्या शेजारी खिडकीच्या बाजूने एक ताई बसली होती . पाठीमागे एक पुरुष बसला होता. सीटला खिडकीच्या बाजूने थोडी फट असते , तो माणूस त्या फटीतून हात घालत त्या ताईला स्पर्श करत होता. तिने दोन तीन दा महे वळून रागाने त्याच्याकडे बघितले , तरी तो बाधला नाही , त्याचे सेम तसेच करणे सुरू होते . ताईने आपल्या ओढणीची पिन काढली आणि त्याने जेव्हा फटीतून हात घातला तेव्हा त्याला ती चांगलीच टोचवली . नंतर मात्र तो माणूस गपगुमान बसला आणि पुढल्या स्टॉप ला त्याने सीट पण बदलली. मला जाम आवडली तिची आयडिया. मी फक्त अठरा वर्षाची होते तेव्हा … तिने मग मला अश्या बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. असा तो माहितीपूर्ण प्रवास नेहमीच आठवणीत राहिला आणि ती ताई सुद्धा. 

*******

भाग कसा वाटला नक्की कळवा. 

तुम्ही गीता दुर्गाच्या जागी आता तर काय केले असते , हे पण सांगा . स्वरक्षणासाठी काही छोट्या आयडिया मिळतील जे आपल्या सगळ्यांना उपयोगी पडतील , नक्की शेअर करा. 

भेटूया पुढल्या भागात. 

****** 


 

🎭 Series Post

View all