दुर्गा ... भाग 17

दुर्गा आर्या

दुर्गा 17

जेलची भेटण्याची  वेळ संपली होती … ॲड. ईशान दुर्गाची रजा घेऊन उद्या परत येण्याचे सांगून परत गेला होता . पण त्याचा एक प्रश्न दुर्गाच्या डोक्यात घोंगावत होता …" इतकं प्रेम आहे तर आर्या कुठे आहे आता …?" 

दुर्गा स्वतःशीच विचार करत आर्याच्या आठवणीत रमली त्याच्या आठवणींनी तिच्या ओठांवर हसू उमलले….तिने त्याला प्रॉमिस जे केले होते कधीही न रडण्याचे…. ते तिने तंतोतंत पाळले होते…


 

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे ठरलेल्या वेळी ॲड ईशान आला… 

" Good morning मॅडम …"...हवालदाराने तिच्या सेल चे दार उघडले तसा ईशान आत आतमध्ये येत बोलला. 

" Very good morning वकील साहेब ". ….. तिने किंचित स्माईल करून म्हटले.. 

" किती सुंदर दिसतात या , अजूनही तितकंच तेज आहे चेहऱ्यावर  …. यांची स्माईल बघून  खरंच आजची मॉर्निंग very good झाली आहे…" ... ईशान तिच्याकडे बघत मनातच बोलत होता.  

" काय विचार करत आहात वकील साहेब ? आज काही प्रश्न नाही वाटते विचारायचे ?".... दुर्गा 


 

" नाही नाही , प्रश्न विचारणे तर माझे काम आहे , ते तर करावे लागेल , सहज काही जुन्या आठवणी आठवल्या …. ".... ईशान 


 

" Okay …. तुमच्या कालच्या प्रश्नाचे उत्तर ….. प्रेम किती होतं, किती आहे हे कोणाला सांगून थोडी कळणार आहे वकील साहेब …..त्यासाठी प्रेम करावं लागतं , प्रेमात पडावं लागतं  …देशावर असो वा माणसावर , प्रेम कसे असते ते आर्यानेच तर शिकवले आहे …..  आर्या नेहमीच जवळ होते… आताही आहे …. आम्ही शरीराने जवळ नसलो तर काय झाले …. आम्ही मनाने एकमेकांसोबत बांधले आहोत …. नेहमीसाठी … "..... दुर्गा 

" स्वतःची समजूत घालण्यासाठी हे असे बोलणे उत्तम असते …. "... ईशान 

" मिस्टर ईशान , आधीच सांगितले त्यासाठी प्रेम करावं लागते …. तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडले नाही दिसता …?म्हणून असे बोलत आहात ..."...दुर्गा 

तिचे बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यांपुढे काही जुन्या  गोड आठवणी तरळल्या ….. आणि  तो स्वतःशीच हसला.. 


 

" याच दोन्ही प्रेमाने तुम्हाला आज ही जागा दाखवली…. नाहीतर आज तुम्ही तुमचे धडाकेबाज नेतृत्व करत असता …".... ईशान

" हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे …"...दुर्गा 

" Leave it ,  …. पुढे सांगा काय झाले …?"... ईशान 

दुर्गा पुढे सांगत भूतकाळात गेली … 




 

त्या दिवशी दुर्गाने आणि आर्याने चाळीतल्या बायकांना समजून सांगितल्या पासून आर्याला आता कोणी तिथे यायला अडवत नव्हते…. कधी वेळ मिळालाच तर तो त्यांना चांगल्या गोष्टी समजावून सांगत, नवीन नवीन गोष्टींची माहिती देत असे ..येवढ्या दिवसात त्यांना आर्या कसा आहे हे सुद्धा कळले होते… तो पण आता त्यांच्या चाळी चा एक भाग झाला होता…अगदी सगळ्यांना तो आपल्या घराचा वाटू लागला होता. 

दुर्गा अभ्यास करत बसली होती . आर्या घाईघाईने दुर्गाला भेटायला तिच्या चाळीतल्या घरी आला…. दुर्गा त्याला बघून आपले बुक्स बंद करत उभी राहिली . 

" बच्चा मला खूप महत्त्वाच्या कामाने बाहेर जायचं आहे …. तुझ्यासाठी हा मोबाईल आणला आहे …."...आर्या तिच्या हातात बॉक्स देत बोलला. 

" पण याची काय गरज ? ".... दुर्गा 

" दुर्गा गरज आहे …. प्रत्येक वेळ तुला घरी जाऊन माझी विचारपूस करावी लागणार नाही … आणि मला पण तुझ्यासोबत पाहिजे तेव्हा बोलता येईल…. तसे तर मीच  तुला फोन करेल … पण जर खूप गरज असली की तू करू शकते …. "......आर्या 

" ठीक आहे …."....दुर्गा 

" माझा नंबर  सेव्ह केला आहे यात मी ….. आणि हो exercise आणि आपले सगळे मॉर्निंग रूटीन्स परफेक्ट करायचे , अगदी न चुकता, आणि भरपूर अभ्यास…. कंपेटीटीव्ह परीक्षेचा अभ्यास चांगला कर, जे नाही आले ते इथे फोन मध्ये तू सर्च करू शकते, किंवा ते काढून ठेव , मी आलो की सांगेल … okay ?".... आर्या घाईघाईने बोलत होता.

" हो मास्टर्जी , तुस्सी टेन्शन ना लो …..".... दुर्गा 

तिचं ते बोलणं ऐकून तेवढया गडबडीत पण त्याला हसू आले… 

" बरं , येतो ….."...म्हणत तो मागे वळला…. तेवढयात तिने त्याला मागून मिठी मारली….. आणि त्याचे पुढे पडणारे पाऊल तिथेच अडखळले ..… त्याने तिच्या हाताला पकडत तिला आपल्या पुढे आणले आणि आपल्या मिठीत घेतले .. 

" कधी याल परत ? …"...ती त्याच्या मिठीतच बोलली . 

" जसे काम संपले तसे लगेच तुझ्याजवळ …"... आर्या 

" लवकर लवकर संपवा काम …..."....दुर्गा 

" Yess Boss …. '..... आर्या 

ते ऐकून ती त्याच्या मिठीतच हसायला लागली…

" आता निघायला लागेल, उशीर होईल   . बच्चा टेक केअर …..."..... आर्या तिच्या डोक्यावर किस करत बोलला..

" तुम्ही पण काळजी घ्या " … दूर्गाने हळूच त्याच्या गालावर किस केले…

" तुम्ही मुली ना … फार बदमाश असता … जेव्हा तुमच्याजवळ असतो तेव्हा हे असलं काही सुचत नाही तुम्हाला , दूर पळता तेव्हा…. आणि आता माहिती वेळ नाही जास्ती तर लगेच असे काही करता की मन तुमच्या भोवती फिरत मग ….". .. आर्या 

" हे या साठी की तुम्ही लगेच माझ्या ओढीने परत यावे…..".... दुर्गा एक डोळा मारत बोलली 

" हुशार ….. चल बाय ".... परत त्याने तिला एक छोटीशी झप्पी मारली आणि भरभर बाहेर गेला. 


 

******

दुर्गाचे रोजचे रुटीन सुरू होते, आर्या ने सांगितल्या प्रमाणे ती खंड पडू देत नव्हती… अभ्यास कॉलेज सुद्धा व्यवस्थित सुरू होते...आता तिला कॉलेज मध्ये दोन तीन चांगल्या मैत्रिणी मिळाल्या होत्या. मुलं मात्र तिच्या दूर राहायचे …. 

दुर्गाचे कॉलेज सुटले होते, ती आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा करत चालत  येत होती. 

" रवी तिचे नाव काय ?".... 

" कोण रे ? …."... रवी 

" ती … मरून सलवार कुर्ती मधली ?"....

" दुर्गा ….. "....रवी 

"  She is super marvelous yar " … दुर्गा ला बघून  शानचे  डोळे आणि तोंड उघडचे उघडे होते… 

" शान , तुझ्या चॉईसला काय झाले?आणि आधी ते तोंड बंद कर…. "...रवी 

" Durga ….. wow , तिला शोभेल असेच नाव आहे …..".... शान 

" नावंच नाही , ती आहे पण नावा प्रमाणे…. हात पाय खूप चालतात तिचे… आणि मजनू मुलांना तर सरळ करते …..".... रवी 

" Interesting …."..... शान

" एकही मुलगा भटकत नाही तिच्या जवळ …. आणि तशीही out of coverage आहे ती ….. ."... रवि

" म्हणजे ?"..... शान 

" लहान खेड्यातील आहे ती …. आणि मोस्ट इंपॉर्टन्ट तुझ्या पेक्षा दोन वर्षांनी  मोठी आहे …"... रवी 

" Great ….. तसही चिल्लू पिल्लू , पावडर पफ, लिपस्टिक वाल्यांमध्ये  मला  इंटरेस्ट नाही …".... शान 

" अबे ओ तू स्वतःच पिल्लू आहे सद्ध्या …"..रवी 

"व्हॉट डू यू मीन ?... "....शान 


 

 " तू चिकना छोरा , ती गावरान गोरी…. … गोरी नाही दणकट  सावळी…"..... रवी 

" Love at first sight ….."... शान 


 

" काय? तुला कॉलेजमधील सगळ्यात सुंदर मुलगी मिळेल…. वरून तू एवढा श्रीमंत …. मुली तशाही तुझ्या मागे आहे….. ".... रवी

" Not interested …. ".... शान 

" शान , मरवशिल तू मला…. एकतर तू या कॉलेज चा नाही , मला फसावशील ….तिला जर कळले ना तू तिला बघतोय , दोघांना पण जमिनीवर लोळवेल  ती "..... दुर्गा ला जवळ येताना बघून रवीने शानचे तोंड आपल्याकडे केले …. दुर्गा बोलत तिथून निघून गेली . 


 

" तुझे देखा तो ये जाना सनम ……. ".... शान तिला जातांना बघत आपल्या हृदयावर हात ठेवत गाणे म्हणत होता …


 

" पागल झाला तू …".... रवी 

" हो यार, कोणत्याच मुलीला बघून अशी फिलिंग नव्हती आली …… रवी उद्या पासून मी तुला कॉलेजला सोडायला आणि घ्यायला येणार….. .".... शान 

" तुझे कॉलेज opposite side ला ….. उगाच वेळ वाया घालवू नको तिच्यामागे  … ".... रवी 

" No yar , आता कुठे आयुष्यात काही ध्येय मिळाले आहे …… "... शान 

रवीने डोक्यावर हात मारून घेतला….. आणि शान मात्र आपल्या स्वप्नात हरवला 

******

आता मात्र शानच्या दुर्गाच्या कॉलेज मध्ये चकरा वाढू लागल्या … लपून छपून तो दुर्गाला बघू लागला… दुर्गाला बघणे जसे त्याचा आवडता छंद झाला होता… तिचा फोन नंबर मिळवण्याची धडपड करू लागला … आणि फायनली तिचा नंबर मिळवण्यात तो यशस्वी झाला होता. 

एक दिवस एका मुलाने कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या  मुलीला काही कॉमेंट्स पास करून त्रास देत होता…ते बघून दुर्गाने त्याच्या कानशिलात अशी जोरदार वाजवली की ती सगळे बोटं त्याच्या गालावर उलटली आणि तो बाजूला बेंच वर जाऊन पडला… शान दुरून हे बघत होता…. 

" बापरे , डेंजर आहे रे ही ….."....शान , तिचे ते रूप बघून त्याचे छक्के पंजे उडाले …..  त्या मुलाला मार बसलेला बघून आपोआप शानचा हात आपल्या गालावर गेला ..

" हो , मग मी आतापर्यंत तुला काय सांगत होतो ….?"..... रवी 


 

" आता तर पक्का इरादा, ये नही तो कोई और भी नहीं ….."...... शान 


 

तिच्या समोर जाऊन तिला प्रपोज करावे असा त्याचा प्लॅन होता .. पण हे सगळं बघून त्याने त्याचा प्लॅन कॅन्सल केला…

******

दुर्गा कॉलेज मधून घरी येत होती…. रस्त्याने येत असताना पार्क जवळ एका बेंचवर एक मुलगी रडत बसलेली तिला दिसली. ते बघून दुर्गा लगेच तिच्या जवळ गेली … दुर्गाला जवळ आलेले बघून तिने आपलं तोंड लपवत डोळे पुसले. 

" मी दुर्गा…. तू? "....दुर्गा 

" मी गीता ".....गीता 

"काय झालं, का रडत आहे ?".....दुर्गा 

" काही नाही ….."....गीता 

" घरी रागावले काय? कोण काही बोलले काय ?"....दुर्गा 

तिने नकारार्थी मान हलवली . 

" मी बऱ्याच वेळ पासून बघते आहे , तू खूप रडत आहे …. हे बघ मी ते तिकडे पलीकडल्या चाळीत राहते …. मला तू तुझी मैत्रीण समज …. "..... दुर्गा 

तशी ती हसली… 

" Friends….?".... दुर्गाने मैत्रीसाठी तिच्या पुढे  हात केला… तिने पण तिच्या हातात मैत्रीसाठी हात दिला. 

" आता आपण मैत्रिणी झालो …. आता तरी सांगशील काय झाले? "..... दुर्गा 


 

" मी अकरावीत आहे , बारावी साठी माझे तिकडे ट्युशन क्लासेस आहेत… जातांना दादा सोडतो तिकडे, येताना मी पायी येते, अर्ध्या रस्त्यापर्यंत मैत्रिणी असतात… पण हा तो पलिकडला रस्ता तिथून मी एकटी येते…. ".... गीता 

" मग ?"..... दुर्गा 

" ते … ते …."....गीता पुढे बोलायला थोडी अडखळत होती . 

" घाबरु नको सांग,  मी आहे ना …"....दुर्गा 

"त्या रस्त्यावर खूप सामसूम असते, आणि लाइट्स सुद्धा नाही … पण तोच एक रस्ता आहे घरी यायचा…. " ….. गीता 

" मुलं त्रास देतात ?".....दुर्गा 

" हो …. एक मुलगा आहे …. तो ….तो …"....गीता 

" तो….काय ?".....दुर्गा 

" मी घरी आईला क्लासेसला नाही जायचे बोलली , तर आई रागावली …."....गीता रडत रडत बोलू लागली

" तो काय करतो?".... दुर्गा 

" तो…. मी पायी येत असते तर तो गाडी घेऊन येतो , आणि "......गीता बोलता बोलता थांबली 

" आणि काय गीता , स्पष्ट बोल ".....दुर्गा 

" तो गाडीवर जवळून येतो आणि एका हाताने माझ्या इथे जोरदार दाबतो , आणि पळतो"....ती आपल्या छातीकडे हात दाखवत बोलत होती. 

" ह्मम….."....दुर्गा 

" मला खूप भीती वाटते त्याची  ….."....गीता

" तू तुझ्या घरी सांगितले हे ?".....दुर्गा 

" नाही "....गीता 

" का?"....दुर्गा 

" माझ्या घरचे जुन्या मताचे आहेत , जर मी असे काही सांगितले तर ते मलाच रागावतील …. मी कपडे , ओढणी ठीक घेत नाही , हसत राहते , वगैरे बोलतील … आणि मग ते माझं शिक्षण पण बंद करतील …. लग्न करून देतील… आमच्याकडे लवकर करतात लग्न, आणि मग त्यांना विषयच मिळेल…'.... गीता 

" तुला शिकायचं आहे ….  पण मग क्लासेसला पण नाही जायचं म्हणतेय ? ".....दुर्गा 

" मी घरी करेल अभ्यास ".... गीता 

" गीता , क्लासेस बंद करणे हे सोल्युशन नाही …. अशी बरीच लोकं भेटतील तुला पुढे तुझ्या आयुष्यात , रस्त्याने, नवीन कॉलेज मध्ये, बस मध्ये, रस्त्याने गर्दीचा फायदा उचलणारे …. काय काय बंद करशील? असं झालं तर तुला घरातच बसावे लागेल…. बरं घर तरी सेफ आहे काय??.. नातेवाईक , मित्र , शेजारी असे कोण कोण कितीतरी  लोकं घरी येत असतात, आपण कितीदा तरी घरी एकटे राहतो …. मग काय करशील?" ….दुर्गा 

दुर्गाचे बोलणे ऐकून गीता विचारात पडली ...

"ताई तुझं म्हणणं बरोबर आहे ,  पण मग मी काय करू ….? ".... गीता 

" हे बघ , पहिली गोष्ट तर हे जे काही आहे हे आपल्या घरी सांगायला पाहिजे. कदाचित घराचे थोडे रागावतील , चिडतील….पण तीच लोकं आपल्यावर सगळ्यात जास्ती प्रेम करतात, आपली काळजी घेतात…आपल्या प्रत्येक प्रॉब्लेम वर ते सोल्युशन काढतात….. त्यांच्या मुलांसोबत काय होत आहे हे जाणून घेण्याचा त्यांचा हक्क पण आहे , आणि आपण ते सांगायला सुद्धा पाहिजे …. आणि ..".....दुर्गा 

" आणि काय?"....गीता 

" आणि आपल्याला स्वतःला मजबूत बनावे लागते , या सगळ्या गोष्टींचा सामना करायला शिकावे लागते….. त्या मुलांना जर असेच सोडले तर त्यांची हिंमत आणखी वाढते….. आज तू आहे उद्या दुसरी कोणती मुलगी असेल…. आज त्याने नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा प्रयत्न केला , उद्या तो आणखी काही जास्ती करेल… ".... दुर्गा 

" मग काय करायचं ?"....गीता 

" ह्मम …. विचार करू दे …."....दुर्गा 

******

वर्तमान 

" तर तुम्ही त्या मुलाला मारले ?  आणि आर्या ते कुठे गेले? ते आले काय परत ?".... ईशान 

त्यावर दुर्गा फक्त हसली .. 

*****

क्रमशः 

आजचा जो गीताचा प्रॉब्लेम आहे,  अशा प्रकारचे प्रॉब्लेम बहुतेक मुलींसोबत घडत आले आहे …. बस मध्ये, रस्त्याने, बाजाराच्या ठिकाणी , गर्दी मध्ये ….

गीताने त्या मुलाबद्दल घरी सांगितले असेल काय?तिने सांगायला पाहिजे काय? 

काय केले असेल दूर्गाने आणि गीताने त्या मुलासोबत? 

तुम्ही गीताच्या जागी असता तर काय केले असते ? 

आर्या परत येतील काय ? 

बघुया पुढच्या भागात …. 

🎭 Series Post

View all