Login

दुर्गा ... भाग 16

दुर्गा आर्या

दुर्गा … 16

घडलेल्या प्रकारामुळे दुर्गा चांगलीच चिडली होती … आर्या ने जबरदस्ती तिला कारमध्ये आणून बसवले …. आर्याने पोलिसांसमोर खोटे बोलल्या मुळे तिला जास्तीच राग आला होता …. तिचा प्रश्नांवर प्रश्नांचा भडिमार सुरू होता .. पण आर्या ला माहिती होते ती खूप रागात आहे … आता तिला सांगूनही काहीच समाजनार नाही …. पण तिचे प्रश्न मात्र सुरूच होते 

" तुम्ही कोण आहात? काय काम करता ?".....दुर्गा .

" दुर्गा please calm down ….. घरी गेल्यावर बोलू …. "..... आर्या ड्राईव्ह करत बोलत होता.  .

" नाही …. मला आताच जाणून घ्यायचे आहे …. ".....दुर्गा 


 

" दुर्गा …. I need to concentrate on driving now ……"...... आर्या , त्याचा डोक्यात पण बऱ्याच गोष्टी सुरू होत्या .. 


 

" मला आताच सांगा….कोण होता तो ?".....दुर्गा हट्ट करत होती. 


 

" Shut up Durga .….. "..... आर्या थोडा चिडून मोठ्याने बोलला…. त्याच्या आवाजाने ती एकदम शांत झाली… चूप बसली आणि खिडकीतून बाहेर बघत होती ….. .. आर्याने गाडी घराच्या दिशेने घेतली …. दोघांमध्ये पण शांतता होती …. अधूनमधून आर्या तिच्याकडे बघत होता….पण तिने जे आपली मान खिडकिमध्ये रोवली होती…. की एकदाही पलटून आर्या कडे बघितले नाही …

" थांबवा……"..... दुर्गा 

" का?"...... आर्या

" मला घरी जायचं आहे …..".....दुर्गा 

" आपण घरीच जातोय  …."..... आर्या 

" मला आजीकडे जायचं आहे …..".... दुर्गा 

" आपण आधी घरी जातो आहे ….. नंतर आजीकडे पोहचवेल……"..... आर्या 

" मी तुमचं का ऐकून घ्यायचं??...... दुर्गावर कोणाची मनमानी चालणार नाही…"....दुर्गा 

" I know ….. आपण घरी जातोय…. That's final …. No argument now….."... आर्या 

आर्याने कार त्याच्या बंगल्यात घेतली…..दुर्गा लगेच कार मधून उतरून रागातच आतमध्ये पळाली आणि थेट वरती त्याच्या (जी आता तिची सुद्धा रूम झाली होती , त्या रूम मध्ये जायला तिला कोणाच्याच परमिशनची गरज नव्हती ) रूममध्ये गेली ….

" Park the car "...... आर्या गार्डला इन्स्ट्रक्शन देत तिच्या मागे पळाला….. 

आर्या रूममध्ये आला तर दुर्गा खिडकी जवळ हात गुंडाळून उभी बाहेर बघत होती … आर्याला पाठमोरी होती…..

" दुर्गा , तुला  माहित आहे  आपले किती बिजनेस आहेत …. बिजनेस मध्ये असे शत्रू निर्माण होत असतात …. टॉपचे प्रोजेक्ट हवे असतात ….. आणि बरेच काही असते … त्यात मी ग्रूप्स ऑफ बिजनेसचा ओवनर आहे…..तर अश्या धमक्या किंवा या अश्या गोष्टी घडत असतात……". .. आर्याने तिला समजावत दुर्गाच्या खांद्यावर हात ठेवला….. तिने तो झटक्यात खाली झटकला … 

" दुर्गा … please listen …..".... आर्याने परत तिच्या खांद्यावर हात ठेवला…. परत सेम तिने तो रागात झटकला… तेवढयात त्याचा फोन वाजला … फोनवर बोलून त्याने फोन कट केला… 

" दुर्गा … look… त्या माणसाला पकडले आहे , आणि आपल्या वकिलाने माझ्या वतीने बरोबर कंप्लेंट पण केलीय …. आता तरी बघ बच्चा इकडे ….."..... आर्या ने जबरदस्ती तिला पकडले आणि स्वतःकडे वळवले …. तर तिच्या डोळ्यांमध्ये पाणी होते…. 

" तुम्हाला कळत कसे नाही ….. तुम्हाला आज काही झाले असते म्हणजे ??….  मी कुणाकडे बघायचं होतं?? कोण होतं माझं …? घर सुटले… माय जवळ जाऊ नाही शकत…. आता परत तुम्ही …………" ...दुर्गा रडत रडत बोलत होती …तिला बोलणे सुद्धा कठीण झाले होते….. आज झालेल्या प्रसंगाने ती खूप घाबरली होती …. 

आर्याने लगेच जात तिला आपल्या कुशीत घट्ट पकडून घेत तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न करत होता.    

" दुर्गा , असं काहीच झाले नाही आहे …. See I am perfectly all right ….. "...... आर्या 

" तुम्ही सोडून द्या हे सगळं …. हे काही नकोय …. मला फक्त तुम्ही हवे आहात. …." …..दुर्गा त्याच्या कुशीतच रडत बोलत होती …

" दुर्गा ,मी तुझ्याकडून अशी छोट्याश्या गोष्टीने  खचून जाण्याची अपेक्षा नव्हती केली …. ठीक आहे मी सगळं सोडतो … पण माझी एक अट आहे … तू पण पोलीस नाही व्हायचं … आपण लग्न करूया आणि छोटेसे एक घर … एक जॉब असा राजाराणी सारखा संसार करूया..…".... आर्या 

" पोलिस बनणे माझं स्वप्न आहे , मला अन्यायाच्या विरोधात काम करायचं आहे …. हे तुम्हाला पण माहिती आहे … तरी तुम्ही अशी कशी अट ठेऊ शकता ….."...... दुर्गा , आतापर्यंत रडणारी दुर्गा एकदम आपल्या मूळ रूपात आली … 

" पण पोलीस हे खूप जीवावर बेतनारे प्रोफेशन आहे …जीवाला घातक अशी लाईन आहे ती ,.... प्रत्येक क्षणाक्षणाला मला भीती वाटत राहील की माझा बच्चा ठीक असेल की नाही ….. कामावरून सुखरूप घरी येईल की नाही … नाही नकोय मला हे काही … आपण दुसरी स्वप्न बघू …. मला सुखी जीवन हवे आहे …."... आर्या 

आर्यांच्या अश्या बोलण्यावरून दुर्गाला  तिची चूक कळली होती …. 

" सॉरी …."...., दुर्गा मान खाली घालून बोलत होती .. 

" दुर्गा , जसे आयुष्यात प्रेम, परिवार इत्यादी सगळं महत्वाचं असते तसेच आपले आयुष्यात ठरवलेलं  एक ध्येय ( आणि ते असायलाच हवे )  , आपलं काही बनण्याचे , काही करून जाण्याचे त्यात देशसेवेसाठी बघितलेले स्वप्न हे सगळ्यात वरती असायला पाहिजे …. आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असायला पाहिजे …. आयुष्यात अशी छोटी किंवा मोठी प्रसंग तर येतच राहतील …. त्याने आपण डगमळता कामा नये…. कितीही मोठं वादळ  आले तरी आपण लोखंडासारखे मजबूत येणाऱ्या वादळाचा सामना करायला दटून राहायला हवे … मरण येणे हे आपल्या कोणाच्याच हातात नाही आहे … अगदी काही न करता सुद्धा केव्हाही मरण  येऊ शकतं … त्यामुळे अश्या छोट्या गोष्टींना घाबरून जाणे हे शौर्याचे लक्षण नाही … कमजोर मनाचे लक्षण आहे …. आणि मरण येत असेल  तर निधड्या छातीने स्विकारता यायला पाहिजे ….. आपल्या मरणाचा सुद्धा जयजयकार झाला पाहिजे असे आपले कर्तृत्व पाहिजे …. "..... आर्या , दुर्गा त्याचं बोलणे ऐकत होती .. त्याचा आवाजात एक वेगळंच जबरदस्त आत्मविश्वास होता ...

" बघ , हे सगळं जमत असेल तर पुढे जा … नाहीतर अजूनही वेळ आहे …. पण एकदा त्यात गेलं की मागे वळून बघायचे नाही …. आपलं तन मन धन सगळं अर्पण करायची तयारी असेल तरच पुढे जा …. "..... आर्या 

 त्याचा एक एक शब्द तिच्या मनावर डोक्यावर कोरत होता … 

" हो , मी तयार आहे …..".....दुर्गा निर्धार करत डोळे पुसत बोलली 

" पुढे तू मला अशी रडतांना दिसायला नको … प्रेम आणि आपलं काम , हे दोन्ही मिक्स नको व्हायला...".... आर्या 

" नाही …. आता मी कधी रडणार नाही …." … दुर्गा कडक आवाजात म्हणाली 

" निडरपणे  जगायचं आपलं आयुष्य, प्रॉमिस …? "..... आर्या , त्याने हाताची मुठ्ठी करत तिच्या पुढे धरली….

" पक्का प्रॉमिस "..... दुर्गाने पण आपल्या हाताची मूठ बांधली आणि त्याच्या मुठी वर पंच मारला… 


 

" That's like a my Durga , उगाच नाद नाही केला  या मुलीचा "...... त्याने परत तिला आपल्या मिठीत घेतले……. त्याच्या या वाक्याने ती त्याचा मिठीतच खुदकन हसली … 

" पण मी त्याला सोडणार नाही ….. माझी रोमँटिक डिनर देट त्याने वाया घालवली …. ".... आर्या तिच्या कर्ली आपल्या हातांच्या बोटांमध्ये गुंफत त्याचा खेळ करत बोलत होता .. 

" ह्मम… त्याला थोडं माझ्या स्वाधीन पण करा …. मला पण हिशोब चुकता करायचा आहे ….. माझ्या आर्यावर जो कोणी डोळे उचलून बघेल… त्याचे मी डोळे फोडून ठेवेल …" …… दुर्गा 

" हा हा हा …. जाऊ दे ...तसा ही तो अर्धमेला झाला होता ….. मी काय म्हणतो तुम्ही त्याच्या ऐवजी माझ्यावर लक्ष केंद्रित केले तर ……"..... आर्या 

" तुमच्याकडे …? काय खास ….."..... दुर्गा 

" ठीक आहे ….. आपल्या एका चुटकीसरशी मुलींची लाईन लागते ….. फक्त चुटकी वाजायची देरी …….चाललो मी …".... आर्या पलटून जायचं नाटक करत मागे वळला..

त्याला वळताना बघून तिने  झटक्यात आर्याच्या शर्टाची कॉलर पकडत त्याला आपल्याकडे ओढले…" त्या मुलींच्या तंगड्या आणि तुमचे हे चुटकी वाजवणारे हात नाही तोडून ठेवले तर दुर्गा नाव नाही ….."....तो बेसावध होता...तिच्या असे करण्याने ती तिच्यावर आदळला , त्याच्या धक्क्यामुळे ती पण मागे खिडकीला जाऊन धडकली...पण तिने त्याची कॉलर सोडली नाही .. 

" तंगड्या ??' …. आर्या काही न कळल्यासारखे  तिच्याकडे बघत होता.. 

" पाय ……शेवटची वॉर्निंग आहे ही … याद रख" ….. दुर्गा 


 

" बापरे … तू काही करू देणार नाही …. आणि दुसरीकडे बघायचं पण नाही ….. this is not fair …. " …. आर्या एकटक तिच्याकडे बघत होता ….. त्याच्या डोळ्यात तिला खट्याळ भाव दिसले …. तो जवळ येत आहे बघून तिने त्याला दूर ढकलले आणि तिथून पळाली … आता मात्र दोघांचा एकमेकांना पकडण्याचा खेळ सुरू झाला .. एकमेकांमागे पळत ते खाली आले… .


 

" ही जंगली परत इथे ? …..".....स्वाती (आर्या ची आई ) 

त्यांच्या आवाजाने पळता पळता दोघंही जागेवर थांबले… 

" मॉम … तू अचानक …? " ….. आर्या 

" म्हणजे काय ….इथे यायचं तर मला आता परमिशन घ्यावी लागेल काय??" …..स्वाती 

" माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता…." ….आर्या 


 

" वीर तुझ्या बोलण्याचा अर्थ मला चांगलाच कळतो , आणि तू नाही तुझ्या मार्फत ही बोलतेय ….  आपल्या तरुण मुलावर लक्ष ठेवावे लागते, त्यात ही अशी जंगली मांजर जर त्याच्या आसपास असेल तर जास्तीच लक्ष द्यावे लागते ….. वाह आजतर रुप बदलून आली आहे ही जंगली गावठी मुलगी , भुरळ पाडत माझ्या मुलाला फसवायचा  पूर्ण प्लॅन दिसतो हीचा  " ...स्वाती रागात बोलत होती . 


 

" मॉम , प्लीज तू परत सुरू नको होऊ …. असे काही नाही आहे …. ".... आर्या 

मायलेकांमध्ये सुरू असलेले दोन दोन शब्द ऐकून ती मध्ये बोलली … 

" मी निघते ……".....दुर्गा 

" Wait …. I will drop you "...... आर्या 

" तू इथे आली कशी ….? तुला नाही सांगितले होते ना घरात पाय ठेवायला ….तरी तुझी इतकी हिंमत की इथे आली ?".....स्वाती तिच्या हाताला ओढत तिला दरवाजाकडे ढकलत बोलल्या 

" मॅडम , तुम्ही तुमच्या घरी यायला बंधन घातले होते …. त्या घरात पाय ठेवेल तर काहीतरी बनुनच , दिसणं माझ्या हातात नाही पण कर्माने तुमच्या स्टेटसला मॅच नक्की करेल …. हे दुर्गाचे शब्द आहेत …. आणि हे …. हे माझ्या मित्राचं घर आहे …. इथे मी कधीही येऊ जाऊ शकते …."..... दुर्गा ठामपणे म्हणाली 


 

" मित्र की आणखी काही ….? तुझी लक्षणं फक्त मैत्रीसारखी दिसत नाही ".....स्वाती 

" सद्ध्या तरी मित्रच आहोत , मैत्रीच्या ही पुढे जाऊ ते पण तुमचा आशीर्वाद घेऊनच , हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला …. "..... दुर्गा 

तिला आत्मविश्वासाने ते पण त्याच्या मॉम समोर बोलतांना बघून तो तर अवाक् झाला .. 

" मी म्हटलं नव्हतं , ही मुलगी खूप आगाऊ आहे…. वीर तुला शेवटचं सांगतेय हिच्या दूर राहा …. आणि तू ग … माझ्या मुलाला काही झाले ना तर तुला मी सोडणार नाही …..".....स्वाती 

" Mom … mom …. Please calm down …. आणि आज मी तिच्यामुळेच सुरक्षित आहो.  .. नाहीतर उद्याच्या न्यूज मध्ये असते आर्यविर यांच्यावर आत्मघाती हल्ला, त्यातच त्यांनी आपला जीव गमावला…"......आर्या

" What rubbish are you speaking?  …."..... स्वाती 

" आर्या , हे काय फालतू बोलत आहात तुम्ही ? …."...दुर्गा 

स्वाती आणि दुर्गा दोघीही एकत्र बोलल्या.   

" Ladies …. दोघींही किती प्रेम करता माझ्यावर….. माझ्यासाठी एकमेकांसोबत मैत्री नाही करू शकत तुम्ही ?" ….. आर्या 

" No way ….....".... स्वाती   

" मी तर करणारच आहे पण आता नाही … या मॅडम ची लेव्हल गाठल्यावर ……"....दुर्गा 

" जबरदस्ती …??…"....स्वाती 

" हो … यांच्यासाठी जबरदस्ती करावी लागली तर जबरदस्तीच "...... दुर्गा ठसक्यात बोलत होती. 

परत त्या दोघींचे दोन दोन शब्द सुरू झाले … आर्याने डोक्यावर हात मारून घेतला … 

" सगळं पॉसिबल आहे  , नसेल तर करू शकतो … पण या दोघींचे तंत्र जुळणे कठीण आहे … "... तो मनात विचार करत होता. … 

" जोसेफ , ज्यूस…. विथ lots ऑफ आइस क्यूब्स , फास्ट. ….". ... आर्याने कंटाळून किचन मध्ये काम करणाऱ्याला ऑर्डर दिली …. 

" बसा…. थकला असाल ….." ... आर्या दोघींना उद्देशून बोलला…. दोघीही समोरासमोर सोफ्यात बसल्या होत्या ...आर्याची आई तिला खुन्नस देत बघत होत्या…. दुर्गा ला मात्र त्यांना बघून हसू येत होते ..पण तिने आपले हसू दाबून धरले होते. . 

जोसेफ ने सगळ्यांना ज्यूस आणून दिला .. 

" आर्या , मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे ….".....स्वाती 

" मॉम , बोल …..दुर्गा पासून काही लपलेलं नाही ."..... आर्या 

" त्या मिसेस रेवा…. त्यांची पुतणी , MBA केले आहे तिने US मधून , आताच काही दिवसांपूर्वी आली आहे परत भारतात…. खूप सुंदर आहे… आणि शिकलेली हुशार, एकुलती एक आहे … मिसेस रेवा ने तुझ्यासाठी विचारले आहे … मी तिला परवा भेटले …. मला खूप आवडली "...... स्वाती 

ते सगळं ऐकून दुर्गाचा चेहराच उतरला … तिने गटागट ज्यूस घशात ओतला… 

" मी निघते. ….". …म्हणत ती मोठी मोठी पावले उचलत बाहेर जाऊ लागली . 

" दुर्गा wait…… , मॉम मी तिला पोहचवून येतो ….. "..... आर्या 

 " ड्रायव्हर सोडून देईल… तुला जायची काय गरज आहे. … आणि मी इथे काही महत्वाचं बोलत आहे ….."....स्वाती 

" मॉम , आपण नंतर बोलू …. बाय " …. स्वातीचे पुढले काहीही न ऐकता तो बाहेर पळाला आणि कार घेऊन पुढे आला … दुर्गा जास्ती दूर नव्हती गेली … नुकताच तिने बंगल्याचा बाहेर पाय ठेवला होता.  

आर्याने गाडी तिच्या बाजूला थांबवली…. आणि दुसऱ्या साईडचे दार उघडले 

" दुर्गा… come inside "..... आर्या

" मी माझी जाईल ". .. दुर्गा 

आर्या साईडने उतरला आणि तिचा हात पकडत तिला जबरदस्ती कारमध्ये बसवले. दुर्गा मात्र गाल फुगवून बसली होती...

" आता कुठे हीचा मूड ठीक केला होता की मॉम अवतरली …. त्यात हे लग्नाचं …… आजचा दिवस सगळा मनाविरुद्ध दिसतोय …. थोडा वेळ मिळतो  ….त्यात पण हे सगळं असे होऊन बसते …… "..... आर्या ड्राईव्ह करत मनात बडबडत होता .. 

अंधार पडला होता    ,  दुर्गाच्या चाळीमध्ये गाडी येऊन थांबली… दुर्गा रागातच बाहेर पडली…. आर्याला काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला… थोडा दूर जाऊन त्याने फोन उचलला…

" Okay … उद्या येतो "....फोन वर बोलून फोफोन कट केला… 


 

" त्या सुंदरीला दूर ठेवायचं … नाही तर तुम्हाला पण माहिती आहे जे  मी बोलते ते करायला मागेपुढे बघत नाही …तिच्यासोबत तुम्हाला सुद्धा सोडणार नाही  ".... दुर्गा 

" तेच तर म्हणतोय …."..... आर्या 

दुर्गा त्याच्याकडे बघत होती .

" सोडू नकोस …. असेच तर म्हणतोय …"... आर्या 

" आर्या …. मी जोक नाही करत आहे …."..... दुर्गा 

" Yeah , I am also not joking , I am serious ……"..... आर्या 

" आजचा दिवसच बेकार आहे …. ".... तनतन करता पाय आपटत ती वरती आपल्या खोलीकडे जाऊ लागली ...… 

तिचा चिडलेला चेहरा बघून त्याला आणखी हसू आले …..  तिला बघत तो उभा होता ..


 

आजकाल आर्याचे दुर्गाच्या चाळीमध्ये येणे जाणे वाढले होते …. त्यामुळे चाळीत बराच चर्चेचा विषय बनला होता .. 

दुर्गा थोडी पुढे गेली तोच एका बायकांच्या घोळक्याने तिला थांबवले … 

" दुर्गा , हे काय चालवले आहे इथे …. हे सगळं चालणार नाही ….. ".....एक बाई 

" आणि या श्रीमंत मुलांवर विश्वास ठेवते … हे फायदा घेतात आणि सोडून देतात ….. त्यांना जे पाहिजे ते मिळालं की ओळख पण दाखवणार नाही ….."....दुसरी बाई 

" नाही तर काय , कोण कुठला तो ….. आपल्या इथ तरुण मुली बायका राहतात ….. कोण कुठले कसे कसे लोक येतात तर …."....तिसरी बाई 

" हो नाही तर काय …… हे यांचे वागणे असे. … आपल्या मुलांवर नको ते वाईट संस्कार ….."...दुसरी बाई 


 

" ओ काकी ….. एक शब्द काढायचा नाही त्यांच्या विरोधात …. एक शब्द खपवून घेणार नाही मी …… आणि काय हो मुलांवर वाईट संस्कार होतात म्हणे ….. आपल्या घरात बघा जरा आधी …. तो … तो तुमचा नवरा दारू पिऊन येतो आणि किती घाणेरड्या शब्द बोलायला ही लाज वाटते अशा अश्या शिव्या देतो ….. त्याने बरे चांगले  संस्कार होतात तुमच्या मुलांवर …… तो तुमचा मुलगा आणि त्याचा तो ग्रूप तिथे टपरीवर उभा येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना घाण घाण अश्लील  कॉमेंट करतो ते नाही दिसत तुम्हाला … तुम्ही टीव्ही वर काय काय बघता…. सोबत मुलं पण बघतात त्याने वाईट संस्कार नाही होत …...घरामध्ये जोरजोराने शिव्या देत भांडणं करतात त्याने चांगले संस्कार होतात नाही ….. "..... दुर्गा चांगली चिडली होती … आधीच  आज आर्या थोडक्यात वाचला होता….. त्याने ती आधीच रागावली होती त्यात आता हे बायकांचे काही काही बोलणे ….. तिचा राग अनावर झाला होता …. 


 

दुर्गाचा आवाज ऐकून आजी बाहेर आली ऐकत होती..… दुर्गाला बघून ती खाली आली ..

" काय ग दुर्गा … काय झाले …. "...... आजी 


 

" हिला चांगलं काही सांगायला गेलो तर आमच्यावर भडकली….."....एक बाई

" भडकली काय …. बरोबर तर बोलली दुर्गा …. सगळं ऐकलं मी …. मला बोलायला लावू नका …. कोण काय करते अन् काय हाय सगळं सांगते मग ….. आपलं घर , आपले पोरं नाय सांभाळता येत बराबर….. संस्कार म्हणजे काय असते माहिती काय तुम्हाला…?... आल्या मोठ्या माझ्या पोरीला शिकवायला …. " ... आजी 

" काय काकी …. ते सर दर रविवारी तुमच्या मुलांना , मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देतात ते नाही दिसले तुम्हाला…. चांगल्या गोष्टी सांगून पुढे जाण्यास प्रोत्साहन देतात…. ते नाही दिसत….. "...दुर्गा 

" आम्ही नव्हतो गेलो त्यांना शिकवा म्हणून सांगायला"....दुसरी बाई 


 

"हो बरोबर आहे , स्वसंरक्षण करता यावे याची तुम्हाला गरज नाही वाटत. …. आताचा जमाना किती वाईट आला आहे …….बघता ना न्यूज मध्ये.….. ज्या गोष्टींचा पुढाकार घेऊन तुम्ही आपल्या मुलींना शिकवायला पाहिजे त्या गोष्टी हे सर शिकवतात आहेत …. तुम्हाला म्हटले तर काय म्हणतात पैसे नाहीत… मुलींना घरकाम , स्वयंपाक येणे महत्त्वाचे… हे बाकी काही गरजेचे नाही….. तुमच्याकडे पैसे नाही म्हणून फ्री मध्ये शिकवतात आहेत ना ते ….. चांगली कामं दिसत नाही काय तुम्हाला…. बरोबर आपली सामाजिक प्रवृत्तीच तशी आहे …. चांगलं काही दिसणार नाही … मुळात चांगलं काही बघायचंच नाही …. आपल्या घरात काय चुकतंय बघायचं सोडून दुसऱ्यांना नावं ठेवण्यात मजा वाटते तुम्हां लोकांना … ".....दुर्गा 

दुर्गाचे सडेतोड बोलणे ऐकून त्या बायका चूप झाल्या… सगळ्यांना विचार करावं लागेल अशीच ती बोलली होती…. पण स्वतःची चूक मान्य कोण करणार….. 

" आणि हो …. ही दोघं माझी पोरं हायेत ….. तो इथ कधी पण येऊ शकतो….. ध्यानात ठेवा… नाहीतर गाठ माझ्याशी आहे …."....आजी 

आर्या हे सगळं ऐकत होता …. तो त्यांच्याजवळ आला …. 

" नमस्कार काकी , मावशी ….. हे बघा तुम्हाला नाही आवडणार असेल मी इथे आलेले तर मी येणार नाही ….. कारण हे तुमचं घर आहे…. पण आता जे झालं त्याचा राग दुर्गावर काढू नका…. ती खूप चांगली मुलगी आहे ….. तुमच्या चाळीचं नाव खराब होईल किंवा आमच्यामुळे तुमच्या मुलांवर वाईट संस्कार होतील असे आम्ही कधी पब्लिकली  वागलो नाही आहोत आणि वागणार ही नाही ….. दुसरी गोष्ट आम्ही दोघे प्रत्येक रविवारी पलीकडल्या मैदानावर self defence चे क्लास घेतो …. अजूनही बरीच मुलं मुली येत नाहीत…. तर रिक्वेस्ट करतो तुम्ही त्यांना पाठवा… मुलींना दुर्गाच शिकवते….मी मुलींना हात लावत नाही….. आणि तुमच्या परमिशन शिवाय लावणार सुद्धा नाही…. मोकळ्या मैदानात हे क्लासेस होतात .. तुम्ही विश्वास ठेऊ शकता … पण खरंच ही काळाची गरज आहे ….. जास्ती बोललो असेल तर माफ करा….."..... आर्या विनम्रपणे हात जोडत बोलला ..

आर्यांचे बोलणे ऐकून आता मात्र त्या बायका चांगल्याच नरम झाल्या….. आपण किती मोठी चूक करत होतो त्यांच्या लक्षात आले….

" माफ करा साहेब …. ते श्रीमंत मुलं आमच्या गरीब मुलींना फसवतात, त्यांचा फायदा घेतात , आणि दुर्गा आमच्या मुलीसारखी आहे म्हणून बोललो "......एक बाई 

" It's okay ….. दुर्गाचा कोणीच फायदा घेऊ शकत नाही ….. आणि मी पण तुम्हाला वचन देतो माझ्यामुळे कोणाला काही प्रोब्लेम होणार नाही …आणि दुर्गाला कधीच सोडणार नाही ..".....आर्या 

" साहेब , आता तुम्ही आम्हाला लाजवत आहात…. आम्हीच जास्ती बोललो… हे  तुमचं सुद्धा घर आहे …. तुम्ही या कधीही इथे…. जशी दुर्गा आमची तसेच तुम्ही आमचे …".....दुसरी बाई 

" आर्यविर नाव आहे माझं …. नावाने हाक मारा….".... आर्या 

आता तापलेले वातावरण एकदम निवळले होते … बायका दुर्गा , आर्याचा निरोप घेऊन आपल्या घरी चालल्या गेल्या….

" दुर्गे ये …. जेवायला वाढते…पोरा तू पण ये जेवायला.."....आजी 

" नंतर कधी… आई वाट बघत आहे……."....,आर्या 

" बरं ….. आरमण जा घरी …."..... आजी निरोप घेऊन वरती खोलीत निघून आल्या..

" दुर्गा ….. बच्चा. … इतकं चिडायची काय गरज होती ?…."..... आर्या 

" मला अजिबात खपणार नाही कोणी तुमच्या नावावर बोटं जरी उचलली …...मी तुमचं नाव जपण्यासाठी  काहीही करू शकते….. मरू सुद्धा शकते...…."....दुर्गा 

" Sh ssss ……. शांत हो ,आता इथे तुला जवळ सुद्धा घेऊ नाही शकत…. प्रॉमिस केलं आहे .…. "..... बिचारा चेहरा करत बोलला…. ते बघून तिला हसू आले…. 

" Keep smiling … " ….. आर्या 

" हो ….. बाय ….."..... दुर्गा

बाय करत आर्या वळला 

" आणि हो त्या चुडेल पासून दूर राहा….."....दुर्गा 

" कोण …?".....आर्या 

" तीच ती सुंदरी …. तुमच्या मॉम घेऊन आल्या आहेत ….."....दुर्गा 

" ती…..?... हा फोटो बघून ठरवतो …..करायचं तर…."... आर्या मस्करी करत बोलला .

" मार खाल….."....दुर्गा घरी पळत जात ओरडली  

*****

वर्तमान 

" त्या दिवसापासून आर्याचे तिथे चाळी मध्ये सगळ्यांसोबत खूप छान बाँडींग झाले होते …. सगळे त्यांच्यासोबत मानाने वागत होते … कोणी कधी त्यांच्या येण्याजाण्यावर काही आक्षेप घेतला नाही "......दुर्गा 

"Okay …. पण त्यांनी एक प्रॉमिस सुद्धा केले होते तुम्हाला कधीच सोडणार नाही …. त्याचं काय ? … आज तुम्ही इथे एकट्या आहात … "... ईशान 

" He never broke promise …." ... दुर्गा 

" Where is he then ?"....... ईशान 

त्याच्या वाक्याने दुर्गा शून्यात हरवली ….. 

" Mam , आजची वेळ संपली…. मी उद्या पुन्हा येईल …... "..... ईशान 

ईशान बोलून तिथून निघून गेला….. दुर्गा मात्र आर्याच्या आठवणीत हरवली होती..