Jan 27, 2022
कथामालिका

दुर्गा ... भाग 15

Read Later
दुर्गा ... भाग 15

दुर्गा कथा आतापर्यंत ..... थोडक्यात 

( दुर्गा कैदी नंबर आठशे बारा , गेल्या तीन वर्षापासून जेल मध्ये बंद आहे ... तिने तिचा गुन्हा कबूल केला आहे .... ती एक मोठी केस होती ... तीन वर्षांपासून बऱ्याच वकिलांनी तिची केस ओपन करायचा प्रयत्न केला होता ... पण ती कोणासोबत एकही अक्षर बोलत नव्हती .. ॲड ईशान ...एक उमदा तरुण त्याने मात्र तिला बोलते केले... दुर्गा ने तिची कथा सांगण्याकरिता  त्याच्या पुढे काही अटी ठेवल्या...त्याने त्या मान्य  केल्या... आणि पुढे दुर्गा तिची कथा सांगू लागली. 

दुर्गा एका छोटे खेडेगाव चींधिगाव येथील सतरा वर्षाची  रांगडी पण मनमिळावू मुलगी ... मर्दानी खेळ , काठी चालवणे , व्यायाम करणे तिचा आवडत्या गोष्टी. तिला  अन्याय अजिबात सहन होत नसे ,मग तो घरात असो वा बाहेर... ती नेहमीच अन्याय विरुद्ध आवाज उठवत. गावात आमदाराचे राज्य.... त्यामुळे गुंडागर्दी खूप . त्यांना सामोरे जायचे म्हणजे तिच्या एकटीने जमणार नव्हते .. तिचे लहानपणापासून चे स्वप्न होते पोलीस बनण्याचे...  

एकदा गावात एक तरुण येतो... तिथल्या असलेल्या कारखाण्याचा चार्ज सांभाळतो....एकदा दुर्गा उशिरा रात्री सामसूम रस्त्यावर पळत असते, तिच्या मागे काही गुंडे लागले असतात.... तो तरुण तिला त्या गुंडांपासून वाचवतो... दुर्गाने आपला पूर्ण चेहरा ओढणीने बांधला असतो....त्याला फक्त तिचे डोळे दिसतात... आणि तो त्या डोळ्यांच्या प्रेमात पडला असतो... 

दुर्गाच्या घरी आई , वडील आणि आजी असतात... वडील सतत आईचा छळ करणारे असतात.... दुर्गा त्यांना धमकावून सगळा बंदोबस्त करते... 

फॅक्टरी मध्ये दुर्गाची ओळख त्या मुला सोबत होते  .... ती त्याला मालक म्हणत असते... मालक आणि दुर्गाची छान मैत्री होते... मालक एका मिशन वर आला असतो... तो दुर्गाच्या साहाय्याने गावातील बरीच माहिती मिळवतो... पण दुर्गाला ते माहिती नसते... रोजच्या होणाऱ्या भेटी दरम्यान मालक दुर्गाकडे आकर्षित होत असतो... पण सतरा वर्षाची दुर्गा तिला हें काही कळत नसते....पण तिला मालकाचा सहवास आवडू लागतो... मालक आपले मिशन पूर्ण करून परत जातो...जातांना दुर्गाला तो आपला पत्ता देऊन जातो...आणि तिला घ्यायला येईल असे सांगून जातो... 

दुर्गा सोबत असे काही घडते की तिला तिचे गाव सोडून पळावे लागते.... कुठे जायचं विचार करत असताना तिला मालकाने दिलेला त्यांचा पत्ता आठवतो ....आणि ती तिथे जाते ...पण मालक तिला तिथे भेटत नाही .... 

मालक तिला भेटतो की नाही , तिचं पुढे काय होते.... आता पर्यंतचे सगळे भाग वाचायला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

Thank you !) 

भाग १

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-1

भाग २

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-2

भाग ३ 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-3_4738

भाग ४ 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-4_4753

भाग ५ 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-5_4786

भाग ६ 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-6_4802

भाग ७ 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-7_4822

भाग ८ 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-8_4850

भाग ९ 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-9_4873

भाग १० 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-10_4901

भाग ११

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-11_4931

भाग १२

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-12_5019

भाग १३ 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-13_5080

भाग १४ 

https://www.irablogging.com/blog/durga-...-part-14_5349

 

भाग 15

आर्याने  आपल्या आवडीने मनसोक्त दुर्गासाठी शॉपिंग केली होती....गरजेचे आणि हौसेने असे सगळेच त्यांनी घेतले होते....दुर्गा तर फक्त बघायचे आणि तो सांगेल तसे ट्राय करायचे काम करत होती...आर्याने दुर्गासाठी एका स्पा मध्ये ॲपॉइंमेंट बुक केली होती...

" आर्या , हे खरंच गरजेचे होते काय???"....दुर्गाला त्या दिवशीचा बुटिक मधला घडलेला प्रकार आठवला.... परत इथे पण तसे काही होईल याची तिला भीती वाटत होती....

" Don't worry दुर्गा.... इथे तसे काहीच घडणार नाही...."..... आर्या

" पण.... मला सवय नाही या सगळ्यांची......"....दुर्गा

" अगं तुला खूप बरे वाटेल.... बघ किती थकली आहेस.... स्वतः साठी कधीतरी चालते हे सगळं.....आणि मी तर म्हणतो स्वतः साठी जगायलाच हवे.... स्वतः रिलॅक्स आणि खुश असशील तर मग सोबतच्यांना पण खुश ठेऊ शकशिल "..... आर्या तिला एक डोळा मारत बोलला..

" तुम्ही ना..... खूप जास्त आगाऊ झाला आहात....बालमनावर वाईट परिणाम होतात अश्याने......".... दुर्गा

" बालमन??? कोण???...इथे तर मला कोणी छोट दिसत नाही आहे......".....आर्या

" तुम्ही ना फारच जास्ती बदमाश झाला आहात....तिकडे गावात आला होता तर  किती मासूम बनून फिरायचे.....या तुमच्या मासूम चेहऱ्याला बघून लोकं फसायची  बिचारी......"....दुर्गा

" ह्मम..... असे होते काय??...पण तू मला कुठल्याच अँगल ने बिचारी नाही दिसत आहे....झणझणीत लवंगी मिरची आहेस........"...आर्या तिला सगळकडून बघत विचार करणायचे नाटक करत बोलत होता....दुर्गा कंबरेवर दोन्ही हात ठेवत  डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती. 

" दुर्गा आहे मी, नाद नाही करायचा......असे बोलून किती लोकांना घाबरवत असतेस......."....आर्या

"मी कधी काय केलंय तुम्हाला???"......दुर्गा

" हाच तर प्रॉब्लेम आहे......".... आर्या मिश्कीलपणे हसत बोलला

" म्हणजे???? "..... दुर्गा

" बिचारी दुर्गा....... असू द्या जास्ती विचार करू नका......चला आतमध्ये.....".... आर्या

" तुम्ही पण येणार????"......दुर्गा

"हो......".... आर्या

" पण ते तर बायकांचे असते ना???"... दुर्गा

"माणसांसाठी पण असते....."....आर्या

"काय??....तिथे माणसं पण असतात???"....दुर्गा

" हो......".... आर्या

"मला नाही जायचं......भलत्याच वेळ तिथे कोणी आलं तर..??...नको नको मला नाही जायचं तिथे".....दुर्गा

" कोणाला हाऊस आहे काय आपला जीव गमवायची???" ..... आर्या

" म्हणजे.......".......दुर्गा

" मी तिथे सगळ्यांना आधीच कल्पना देऊन ठेवलीय....की या मिरचीचे तोंड कमी आणि हातपाय जास्ती चालतात ते..........."...आर्या


" काय??? तुम्ही असे सांगितले.....????"......दुर्गा


" तुझ्या कंबरेमध्ये तू चाकू नाही लपावला आहेस काय सांग???"".......आर्या, 

" सेल्फ प्रोटेक्शन म्हणतात त्याला..... आणि मला वाटते प्रत्येक मुलीने तिला जमेल तसे स्वतच्या सुरक्षतेसाठी काही ना काही करायलाच हवे......"....दुर्गा 

" हो 100% बरोबर..... चल बाबा आता.... कोणी काही नसते करत तिथे.... तुला छान मसाज देतील... खूप रिलॅक्स वाटेल आहे तुला....आणि मुलीच असतात तिथे..".....आर्या

" तुम्हाला पण मुली देतील म......सा......ज???"....दुर्गा....

आर्यां तिच्याकडे बघत मिश्कीलपणे हसत होता....

" आगाऊपणा करायचा नाही हा......तुम्हाला माहितीच आहे चाकू आहे माझ्या जवळ......".... तिने त्याला धमकावत त्याच्या दंडावर एक मोठा पंच मारला...

" आई गsss..... किती मारकुंडी आहे तू.......प्रेमाने तर कधी जवळ येत नाही.... मारायला बरोबर तयार असते....."..तो

" मग सांभाळूनच राहायचं...... अन् पुढल्या वेळ पासून लक्षात पण ठेवायचं......दुसरी कोणीने तुम्हाला हात जरी लावला ना तर माझ्यापेक्षा कोणी वाईट नसेल..... दुर्गा म्हणतात मला...... नाद नाय करायचा....."....दुर्गा ठसकावत बोलत होती.....तिचे त्याच्यावर असे अधिकार गाजवने त्याला भलतंच आवडले.....

" राणी सरकार घाबरलो आम्ही........आता आम्ही असा कुठलाच नाद करणार नाही...फक्त तुलाच सोडायला आलोय ......माझं थोडे काम आहे ते आटोपून तुला घ्यायला येतो..... ."....आर्या दोन्ही हात जोडत बोलला. 

"म्हणजे तुम्ही इथे......."....दुर्गा

"नाही.....चला आता  आतमध्ये....".... आर्या

तशी ती हसली आणि दोघंही आतमध्ये गेले.... आर्या तिला तिथे सोडून आपल्या कामासाठी निघून आला........

दुर्गा आधी तर सगळं तिथला बघून अजीब वाटत होते....पण तिथल्या मुलींचे (स्टाफ)  प्रेमाने रिस्पेक्टने बोलतांना बघून ती त्यांच्यासोबत थोडी रिलॅक्स झाली. तरी जेव्हा तिचा मसाज वैगरे सुरू होता तेव्हा तिला खूप अवघडल्यासारखे होत होते. 

......


" काही माहिती मिळाली??".... आर्या 

" दोन लोकं पकडली आहेत...... त्यांचे फोन रेकॉर्ड करतोय...."... टोनी

" Okay good...... किती लोकं आहेत त्यांचे, काही माहिती???" .... आर्या

" ज्यांच्या ज्यांच्या सोबत ते काँटक्टमध्ये आहेत त्या सर्वांवर पाळत ठेवली आहे..."... टोनी

" ठीक आहे....आणखी काही लोकं कामासाठी हवे असतील तर घ्या....पण आपल्याला हे लवकरात लवकर करायचे आहे....".... आर्या

" हो ...पण तुम्ही काळजी घ्या...ते लोकं तुमची ओळख काढायच्या पूर्ण प्रयत्नात आहे, ....so please be careful ....risk वाढली आहे आता.....".....टोनी

" Don't worry.......".... आर्या

" आणि हे पेन ड्राईव्ह, काही कोडेड मेसेजेस आहेत...hope this will help us...."... टोनी

"That's great....बघतो मी ..."... आर्या 

टोनी आणि आर्या काही कामाचं बोलून आपल्या दिशेने निघून आले....

आर्या दोन तीन तासांनी दूर्गाला घ्यायला स्पा मध्ये आला.....


" Just a ten minutes sir..... almost done....."... तिथली स्टाफ मेंबर

आर्या तिथेच सोफ्यावर मॅगझिन चाळत बसला....

थोड्या वेळात दुर्गा बाहेर आली ..... आर्या तर तिला बघून अवाक् झाला ..... ओळखू सुद्धा  येणार नाही अशी दिसत होती ती .... पूर्णच कायापालट झाला होता तिचा..... 

मुलायम चमकदार कर्ल केलेले  मोकळे सोडलेले केस ... चेहरा एकदम स्वच्छ तजेलदार , कोरीव आयब्रोस ..... सिंपल मेकप ......कपाळावर छोटशी टिकली .... आताच नवीन शॉपिंग केलेला स्ट्रेट कट बेबी पिंक चुडीदार, शिफॉन ची प्लेन ओढणी ..... त्यात तिचा कमनीय बांधा उठून दिसत होता.... थोडक्यात सुंदर , लोभस पण चेहरीवारचा तिचा रांगडीपणा कायम होता...... कोणीही वळून तिला बघावं अशीच ती दिसत होती .... आर्या आपल्या जागेवरून उठत उभा होत  तिला भान हरपून बघत होता .... त्याला तसे बघून दुर्गा खुदकन गालात हसली... 

" चालायचं ?"......दुर्गा 

" अं..... हो ......"...तिच्या आवाजाने तो भानावर आला....त्याने त्याच्या पॉकेट मधले कार्ड स्वॅप करायला तिथल्या कॅशियरला दिले.... पण नजर मात्र दुर्गावरच होती..... 

बिल पे करुन दोघंही बाहेर आले....आणि बोलत बोलत कार जवळ जात होते . .. येणारे जाणारे सुद्धा तिला वळून बघत होते ... अजब कॉम्बिनेशन होती ती..... बांधा कमनीय पण धडधाकट .... चेहरा सावळा कोरीव पण अजब स्मार्टनेस होते .... कोणालाही दोन मिनिटात खाली लोळवेल असे भाव आणि स्त्राँग अशी देहबोली.... 

" सगळे असे का बघताय?जसे कधी कोणती मुलगी बघितली नाही ...'" ...... दुर्गा 

" नाहीच बघितली ......तुझ्यासारखी..... ".... आर्या 

" म्हणजे ...,? मला काय शिंग फुटलीत काय ? ".... दुर्गा 

" हो तसेच समज...... किती सुंदर दिसत आहे....".... आर्या बोलतच होता की त्याचे ते शब्द ऐकून ती गालात हसली.... ती ब्लश करत आहे असे त्याला वाटत होते ....... आताच तिला आपल्या मिठीत घ्यावे असे त्याला वाटून गेले ..... ती बहुधा लाजयाची नाही... त्याला तिला बघून हसू आले.... त्याने आपले बोलणे काँटिन्यू केले .... " इतकी सुंदर दिसत आहे ..... पण अगदी मारकी म्हैस सारखी बघतेय......".... आर्या 

" काय ...?"......आता तिचे खरंच मारक्या म्हाशीसारखे भाव झाले होते.....तिने एक घुसा त्याच्या पाठीत मारला ... 

" बापरे......लगेच अवतारात यायची गरज होती काय....??.... "..... आर्या 

" तुमचा शब्द कसा काय खाली पडू देऊ शकते......"....दुर्गा त्याची मस्करी करत होती .. 

असेच दोघांचे बोलणे सुरू होते.....की तेवढयात एकदम दुर्गाने आर्याचा हात पकडत  त्याला खाली ओढले .... आणि एक मोठ्या सुई सारखे काहीतरी आर्या उभा होत्या त्याच्या मागच्या भिंतीवर जाऊन आदळली..... दुर्गाने क्षणाचाही विलंब न करता..... लांब उडी टाकत रस्ता क्रॉस केला.....गाड्यांचे हॉर्न वाजत होते...पण तिला कशाचीच परवा नव्हती ..... ती सुसाट वेगाने पळत होती ...एक माणसाचं पाठलाग ती करत होती....तो पुढे आणि ही त्याच्या मागे..... आणि पळतच तिने त्या  माणसाला त्याच्या कॉलरला पकडत , त्याला दोन घुसे मारत खाली पाडले.... तिची ही मारामारी बघून तिथला दोन  हवालदार तिथे धावत आले , ट्रॅफिक पोलिस सुद्धा आले... आणि आजूबाजूची बाई माणसं सुद्धा जमालित.... 

 

दुर्गा जेव्हा आर्यासोबत बोलत होती तेव्हा तिचे लक्ष रस्त्याच्या पलीकडच्या साइडला गेले.... एक माणूस तिला संशयास्पद वाटत होता....तो झाडा आड उभा होता ..... आणि तिचा संशय खरा ठरला होता.... त्याच्या हातात एक गण होती...त्यातून त्याने ती बारीकश्या सुई सारखा तिर सोडला होता.... एकदम आर्याच्या मानेचा निशाणा त्याने साधला होता...पण दूर्गाने प्रसंगावधान राखत तो तिर हुकावला होता...

आर्याला हे सगळं कळायला वेळ लागला नाही ....  त्याने लगेच एक कॉल केला... 

" तो पोलिसांच्या हाती लागायला नको.... आपल्याला हवा आहे....".... आर्या फोनवर बोलून ठेऊन दिला आणि दुर्गा जवळ गेला... 

तो माणूस काहीच न केल्यासारखा वागत होता..." मला सोडा , मी काही नाही केले" ...म्हणत विणवत होता .... दुर्गा मात्र त्याला मारत होती... प्रकरण वाढू नये म्हणून आर्या मध्ये पडला ...

" आर्या सोडा मला.... मी सोडायची नाही याला..... याने तुम्हाला मा......."....दुर्गा बोलतच होती की त्याने तिला पकडत दूर केले.... 

" दुर्गा .... पोलिस आले आहेत.... बघतील ते ..."... आर्या 

" नाही... मी सोडणार नाही .....'.....दुर्गा आर्याच्या पकडीमधून सुटायचा प्रयत्न करत होती ... आर्यावर त्याने जीवघेणा हमला केला होता.... तिला ते अजिबात सहन झाले नव्हते.... तिने त्याला येवढे मारले होते की आता जर परत थोडे मारले तर तो बेशुद्ध व्हायचा नाहीतर मरायचा तरी होता ..

" हे काय सुरू....?"....हवालदार

" साहेब त्याने छेड काढली होती......" ... आर्या 

" त्याने ते.....".... दूर्गा बोलत होती की आर्याने परत तिला चूप बसवले....

" हो का..... या अश्या लोकांना अद्दल घडवतो.... आणि तुमच्यासारख्या मुलींची आता गरजच आहे..... हे लोकं जमणार...फक्त बघत बसणार.... व्हिडिओ ही काढणार....पण मदतीला येणार नाही.... काळजी करू नका सर... बघतो याला"....हवालदार , तिथल्या लोकांनी शरमेने मान खाली घातली .. 

" नक्की सर....पोलिस खात्यावर विश्वास आहे आमचा.....". ..म्हणत आर्याने  तिथे जमलेल्या भिडमध्ये कोणतरी डोळ्यांनी काही इशारा केला आणि दुर्गाचा हात पकडत तिला आपल्या कार जवळ घेऊन आला.... दुर्गाचा चेहरा मात्र रागाने लाल झाला होता .. ..

" तुम्ही मला अडवले का?? आणि तुम्ही खोटं का बोलले.....?.. मी आज त्याला मारणार होते.....त्याने तुम्हाला...."....

" मारायचा प्रयत्न केला होता ... मला माहिती आहे ते ....."..... आर्या 

" तरी तुम्ही त्याला सोडले......?".... दुर्गा 

" पोलिस बघतील त्याला....रीतसर कंप्लेंट करेल आहे मी..... आणि तू काय करत होती त्याला मारत होती .... तू विसरलीस काय....तुला पोलीस व्हायचं आहे..... तू त्याला मारले असते तर तुझ्यावर केस झाली असती..... मग तुझं भविष्य अंधारात होते ..... थोडं डोकं ठेऊन वागत जा.....  ".....आर्याच्या आवाजात जबर होती . 

आर्याने दुर्गाला गाडीत बसवले...... आणि गाडी स्टार्ट केली .. 

" त्याने तुमच्यावर हमला केला ... पण का.....?".... दूर्गा 

" दुर्गा शांत हो......"....तो ड्राईव्ह करत बोलत होता... 

" तुम्ही कोण आहात? काय काम करता? "...... दुर्गा ..... आता तिच्या डोक्यात बरेच प्रश्न निर्माण झाले होते....

********

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️