Aug 16, 2022
प्रेम

दुर्गा ... भाग 14

Read Later
दुर्गा ... भाग 14

भाग 14

दुर्गाचे कॉलेज चांगले सुरू होते.....पण अधूनमधून तिच्या राहणीमानावरून....किंवा बोलण्यावरून बाकी मुलं मुली कधी तिची टिंगल टवाळकी करत असे...तिची भाषा चांगली असली तरी तिच्या बोलण्यात एक गावाकडचा ठसका जाणवायचा...आवाज पण कडक असायचा....कधी कधी तो गमतीचा विषय सुद्धा ठरायचा .... मनात आले तर ती त्या सगळ्यांना एका दमात शांत करू शकत होती.... पण आपण सुद्धा यांच्यासारखे बनून दाखवू , काहीतरी बनुनच यांना उत्तर देऊ असे तिने ठाणले होते....

आर्याने आता पूर्णपणे दुर्गावर फोकस करायचे ठरवले होते....त्याचं काम आटोपून जेवढा पण वेळ मिळायचा त्यातला जास्तीत जास्त  वेळ तो दुर्गा सोबत घालवत होता...तिला हरेक गोष्टींमध्ये ट्रेन करायचा पवित्राच घेतला होता.

****

" आर्या या इतक्या मोठ्या दुकानात ...." ... दुर्गा

" बुटिक ...."...आर्या

" हा तेच, या येवढ्या मोठ्या बुटिक  मध्ये खरंच यायची गरज होती काय ???'"....दुर्गा

" Yess baby ...." आर्या

" तिकडे छान दुकानं होती, आपण तिकडे गेलो असतो ....हे फारच मोठं आहे ..." ...दुर्गा

" इथे सगळे ब्रँडेड मिळते ... हेच बेस्ट आहे ... मी मॉमसोबत  इथेच येतो नेहमी ." ...आर्या

दुर्गाला  चमकता सितारा बनवण्याचा  जणू त्याने पवित्राच उचलला होता...त्याची मॉम दुर्गाबद्दल जे बोलली होती ते त्याचा मनाला खूप लागलं होते, परत दुसऱ्या कोणाला हा चांस द्यायचा नाही विचार करत तो दुर्गाला त्याच्यापरी सगळं शिकवत होता. आणि जर बदल चांगला होत असेल तर दुर्गालासुद्धा त्यावर काही आक्षेप नव्हता. तर ते आले होते एक मॉल मध्ये... दुर्गाची कपड्यांची स्टाईल, बाकी इतर गोष्टींची शॉपिंग करायला.  मुंबई मध्ये आल्यापासून तिने घराजवळची छोटी दुकानं सोडली तर कुठेच गेली नव्हती..त्यामुळे इतके मोठे दुकान बघून दुर्गाला तिथे जायला थोडी भीती वाटत होती.

" दुर्गा..... Please be comfortable..."..... आर्या ने दुर्गाचा हात हातात पकडला नी दुकानाच्या पायऱ्या चढू लागला....दुर्गा भांबावलेल्या नजरेने इकडेतिकडे बघत होती.... येणारे जाणारे त्या दोघांकडे बघत होते .. दोघंही शॉपच्या आतमध्ये जाणार की तेवढयात आर्याला एक फोन आला....

" एक इंपॉर्टन्ट फोन कॉल आहे....तू हो पुढे, काही आवडते आहे काय बघ , मी आलोच ....."...म्हणत आर्या फोनवर बोलायला एका साईड ला निघून आला....दुर्गा शोपच्या आतमध्ये गेली.....इकडेतिकडे बघता बघता तिला शूज सेक्शन दिसले....तिथे खूप वेगवेगळ्या डिझाईन्सच्या चपला ठेवल्या होत्या....दुर्गा तिथे जात एक एक चप्पल बघत होती.....चपलांचा मोठमोठ्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या हिल्स बघून तिला खुप्पच गंमत वाटत होती....

" खूप स्टँडर्ड घसरले या शोरुम चे....कसे कसे लोकं यायला लागले इथे "..... एक बाई

" हो ना, मॅनाजमेंट पूर्णच घसरले आहे इथले......"...दुसरी बाई

" हो आपल्या यायचं म्हणजे आता दहा वेळा विचार करावा लागेल...."....पहिली बाई

दुर्गा एकदम साध्या रोजच्या  कपड्यांमध्ये , ....पायात साधीशी स्लीपर......साध्या तिच्या गावाकडच्या अवतारात असते तशीच आली होती......त्यामुळे दुर्गाला तिथे बघून तिथले काही लोकं तिच्याकडे बघून वाकडं तोंड करत बडबड करत होत्या...

पहिली बाई एका चपलेला हात लावणार तेवढयात दुर्गानेपण त्याच चपलेला हात लावला..

" Yuck.............hey सेल्समन......"...ती बाई ओरडली

" काय प्रोब्लेम झाला काय??? तुम्हाला हवे असेल तुम्ही घ्या....मी तर फक्त बघत होती...."....दुर्गा चपल तिच्या समोर धरत बोलली

" Hey you....stay away from me..... आणि त्या चपलेला दूर कर माझ्यापासून ... तुझ्या हाताचा मळ लागला असेल त्याला......you down market....."... ती बाई

" स्वच्छ आहेत माझे हात.....तुम्ही बघू शकता....."....दुर्गा

" Look at yourself..... तुझा रंग बघ ,किती मळकी आहेस तू.....किती जर्मस आहेत तुझ्या अंगावर.... चल तिकडे हो....".... ती बाई ... तिच्या बोलण्याने दुर्गाला वाईट वाटले....हे सगळं बघून एक सेल्सबोय तिथे आला...
 

" Mam any problem?? may I help you ....."... सेल्सबॉय

" ही अशी लोकं तुम्ही लोकं येऊ कशी देता....call the manager....."... ती बाई ओरडली..तसे तिथे बरेच लोकं जमा व्हायला लागले........बाकी पण काही बायका मुली श्रीमंतीचा आव आणत दुर्गाला आणि manager ला काही काही बोलत होत्या.....आणि तिथे आता बराच गोंधळ वाढला होता.....

"ये मुली तू इथे कशी काय आली.... चल हो बाहेर इथून...." .....manager

" पण मी काही चुकीचे नाही वागले आहे.......".... दूर्गा

" आता तू आम्हाला शिकवणार काय चूक आणि काय बरोबर......ये बघारे अजून हिच्यासोबत हीचे काही साथी असतील....या मुलींना चांगलं ओळखतो....चोरीचा उद्देशाने घुसले असतील.....".... manager

" ओ मिस्टर.....तुम्ही काहीही बोलाल आणि मी ऐकून घेणार काय??? तुम्हाला सांगितले ना मी काही केले नाही आहे"...... दुर्गा

"तुझे साथी कुठे आहेत , कोण सोबत आली आहे तू??? बऱ्या बोलणे सांग....नाहीतर पोलिस कडे देऊ....".....manager

Manager सोबत आता बाकीचे पण दुर्गाला खूप बोलायला लागले होते....तेवढयात आर्या फोन कॉल आटोपून आतमध्ये आला होता....आणि  दुर्गाला शोधत होता ..

"Sorry Madam.... तुम्हाला त्रास झाला....पुढे असे होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही....."......manager त्या बाईला दिलगिरी व्यक्त करत बोलत होता...

" सिक्युरिटी....... या मुलीला बाहेर काढा" ....... manager ओरडला... तशी एक मुलगी येऊन दुर्गाला बाहेर काढायला ओढी लागली..

" Stop it....... what's going on here....??"...... आर्या जो दुर्गाला शोधत होता त्याला हे सगळं बघून भयंकर राग आला होता.....

आर्याचा तो कडक आवाज ऐकून सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले....

" Wow....look at him......."... एक मुलगी घोळक्यातली

" बापरे काय भारी दिसतोय तो...... किती हँडसम, किती रीच.....".... दुसरी

" येह लाईफ मे आगया तो लाईफ तो फुल सेट होजयेगी"...तिसरी

सगळ्या मुली बायका वळून वळून आर्यकडे बघत होत्या...

" Ohh वीर सर तुम्ही....प्लीज इकडे या......असाच छोटासा मॅटर झाला होता....झाला सॉलव्ह ...."....manager

" I said  Leave her......." ... आर्याच्या आवाजात जरब होती....त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले होते....त्याला बघून दुर्गाला ओढत घेऊन जाणाऱ्या मुली घाबरल्या आणि दुर्गा पासून दूर झाल्या....

" वीर सर तुम्ही या भानगडीत नका पडू....अहो अशा मुलींना आम्ही चांगलच ओळखून आहोत .... आम्ही बघतोय काय करायचे ते ..... रिटा सरांना तिकडे कॅबिन मध्ये घेऊन जा....आणि कॉफी वैगरे......"....manager

" Shut your mouth.......you idiot ..".... आर्या ,

" तू ठीक आहेस???"... आर्या दुर्गा जवळ जात तिला विचारत होता....., दुर्गाने मान हलवत होकार दिला...

" तुमचं अख्खं दुकान विकत घेऊ शकतो..... कळले ना ....."..... आर्या चिडला होता...

" कसे कसे लोकं तुम्ही कामावर ठेवले आहेत??? They even don't know how to behave with the people ......."...... आर्या फोनवर बोलत होता....

"Sorry sir.....we will take care of it.... ".... फोन वर पलीकडून

" And give training to your staff and teach them good ethics, mannners....they even don't know how to talk with people with respect ....."... आर्या

" Sure sir....."....पलीकडून

" Much better......"..... आर्या

हे सगळं ऐकून manager ला चांगलाच घाम सुटला होता....

" आर्या.... प्लीज शांत व्हा....येवढे असे काही झालेले नाही......".... दुर्गा

" यांची हिंमतच कशी झाली.......मी आता यांना सोडणार नाही..."....आर्या रागात बोलत होता....

" तुम्ही कोणालाही त्यांच्या कपड्यांवरून, रंगावरून, दिसण्यावरून जज कसे काय करू शकता??? You cheap mentality......." ... आर्या

" Sir...... मॅडम तुमच्या सोबत आहेत???आम्ही माफी मागतो पण प्लीज कंप्लेंट करू नका..."....manager

" Madam कोणाही सोबत असतील....पण  तुम्ही एका मुलीचा,  बाईचा रिस्पेक्ट करणे शिकलात नाही वाटते.....तुम्ही भारतीय म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहात.....and you all...  ...as you yourself treated as a educated, high society  person  ....but this is very shameful that you even do not know how to repect the woman...person ...very shame...... I am feeling bad that we are coming from such a society ,where people having very much poor thoughts.....you poor people"..... आर्या चांगलाच चिडला होता ..... त्याचा आवाजात इतकी जरब होती की कोणालाच त्याच्या पुढे बोलायची हिम्मत होत नव्हती.
 

" मॅडम आम्ही तुमची माफी मागतो.... आम्हाला माफ करा..... सरांनी कंप्लेंट केली तर आमचा जॉब जाईल...."...manager विनवणीच्या सुरात बोलत होता ..

" आर्या प्लीज चिडू नका....... सोडा  त्यांना ....आपण जे काम करायला आलो आहे ते करूया??....." ....दुर्गा

दुर्गाच्या बोलण्याने आर्या चूप बसला....

वातावरण चांगलच तापलं होते.... वातावरण हलके फुलके करायला तिथे सॉफ्ट मुजिक सुरू झाले.....ज्यामुळे आता बऱ्यापैकी शांत आणि फ्रेश वाटत होते...

Manager ने इशारा केला तसे एक मुलगी त्याच्यासमोर पाणीचा ट्रे  घेऊन आली....त्याने साफ इंकार केला..
 

" रिटा.... मॅम ना काय हवे आहे हे तू personally बघ......"...manager

" No.... तुम्ही बघायचं......".... आर्या

" Ohh.... Yess , sure sir......"....manager

" Mam, please... इकडे या ...इथे बसा......" ..

दुर्गा तिकडे जाऊन बसली..... आर्या त्याच जागी आपल्या खिशात हात घालून उभा दुर्गा ला बघत होता...ती कशी काय तेवढी शांत राहू शकते याचाच तो विचार करत होता...

....आता दुर्गाला एकदम क्लास वन ट्रीटमेंट मिळत होती..... सगळा स्टाफ तिच्या अवतीभोवती फिरत होता......Manager ने स्वतः शू शोवकेस मधून काही चपला काढल्या...... आणि दुर्गाला दाखवू लागला .... दुर्गा अधून मधून आर्याकडे बघत होती.....दुर्गाला  जे आवडत होते ते ती बाजूला ठेवत होती....ते सगळं बघून आता दुर्गा सुद्धा शांतपणे ते सगळं एन्जॉय करत होती....तिचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आता त्याचा राग सुद्धा खूप कमी झाला होता....तो तिच्याकडेच बघत होता......मुजिक चेंज झाले आणि वातावरण एकदम रोमँटिक झाले ...

तोळा तोळा...........
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो….

दुर्गाच्या अवतीभोवती आता सगळं स्टाफ होता.... तिला वेगवेगळे पॅटर्नचे ड्रेस आणून दाखवत होते, सोबत काही कॅटलॉग, काही मॉडेल्सचे फोटो सुद्धा दाखवत होते ....... छोटे छोटे कपडे, त्या मॉडेल्स  बघून तिच्या चेहऱ्यावर अजब अजब एक्स्प्रेशन येत होते......ते बघून तर आता आर्याला हसायला सुद्धा येत होते......तो तिला बघून गालातल्या गालात हसत सुद्धा होता.....आणि तिथे उपस्थित असलेले महिला मंडळ त्याच्या कडे बघत होत्या...

" काय सुपर मुलगा आहे..... घरातल्या मेडला पण घरातल्या सारखाच ट्रीट करतो आहे....."....एक मुलगी

" सिरीयसली very big heart person..... जर हिला असा ट्रीट करतोय तर त्याच्या लेडी लव्ह ला कसा ट्रीट करत असेल......".....दुसरी

" हो ना .... किती लकी असेल ती मुलगी......"...तिसरी

" I guess नसेल कोणी.... नाहीतर तो या मुलीसोबत इथे आला नसता.....  मी तर बघितल्या बघितल्या त्याचा प्रेमात पडलीय....."....पहिली

"Chance घेण्यात काही हरकत नाही..... आणि तुला तर कोणी नाही म्हणूनच शकत नाही.... किती मुलं तुझ्या मागे फिरत असतात....."...तिसरी

" You are right..... ओळख करायला काय हरकत आहे.... चला hi hello करूनच येते"....पहिली आणि ती आर्या उभा होता तिथे आली...

" Hello मिस्टर.... I am puja......"... तिने हात पुढे केला....पण आर्य मात्र फक्त दुर्गाला बघत होता...

" मॅडम...कोणती चप्पल आवडली तुम्हाला??? ट्राय करून बघायची काय??"..... manager

दुर्गाने एका चपलेकडे बोट दाखवला....manager ने ती चप्पल हातात घेतली आणि दुर्गाला घालून देण्याकरिता तिच्या पायाला हात लावणार की तेवढयात परत आर्या ओरडला..

"Don't dare to touch her.....she is very precious...."..... आर्या तिथे दुर्गाच्या पुढे जाऊन उभा राहिला...आणि एक हात manager पुढे केला....manager प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होता...

" शूज......"... आर्याने त्याचा हातातल्या चपलेकडे इशारा केला.......तसा घाबरतच manager ने एक चप्पल आर्याच्या हातात दिली....आर्या दुर्गाच्या पुढे एका टोंगळ्यावर येऊन बसला ....नी आपला एक हात पुढे करत तिला तिचा पाय दे म्हणून इशारा केला.....त्याला तसे करतांना बघून दुर्गा एकदम सरप्राइज झाली.....ती आजूबाजूला बघत होती तर सगळे त्या दोघांनाच बघत होते....ते बघून दुर्गाला थोडे अवघडल्यासारखे सुद्धा झाले....तिने परत आर्यकडे बघितले तर आर्याने तिला परत डोळ्यांनी इशारा केला.....तिने घाबरतच आपला एक पाय पुढे केला.....ते बघून आर्या छानसा हसला....त्याच्या डोळ्यांतले प्रेम आणि त्याच्या ओठांवरील हसू बघून ती पण गालात गोड हसली.....तो तिच्या पायात चप्पल घालत होता...आणि ती मात्र त्याला बघण्यात गुंतली होती...

का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
तुझ्या नशील्या नजरेत मी ही गुरफटते
शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते
हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे
बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो…

त्याने तिच्या पायात चप्पल नीट घातली....आणि परत तिच्याकडे बघून डोळ्यांच्याच इशाऱ्याने कसे आहे म्हणून विचारले...... तिने पण हाताने  छान आहे असे खुणावले....तसे त्याच्या चेहऱ्यावरची स्मायल ब्रॉड झाली......आणि तो थोडा ब्लश करतोय असे सुद्धा वाटत होतं.....

का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
तुझाच होतो जगणे ही माझे मी विसरतो
करु नये ते सारे काही तुझ्या साठी करतो
ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो..

तोळा तोळा...........
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो….

त्याला तिच्या पायात चप्पल घालतांना बघून सगळेच अवाक होत त्यांच्याकडे बघत होते.....तो चप्पल घालून देत उभा झाला तेव्हा सगळे आनंदाने टाळ्या वाजवायला लागले.......ते सगळं बघून दुर्गाला लाजल्यासारखे झाले.....तिने आपल्या हातांमध्ये आपला चेहरा लपऊन घेतला.....

या सगळ्यामुळे तिथले वातावरण आता बऱ्यापैकी हलके फुलके झाले होते..... आणि दुर्गा किती स्पेशल आज हे मात्र सगळ्यांनाच कळले होते........

झालेल्या गोष्टीमुळे त्याचे अजिबात तिथून शॉपिंग करण्याचे मन नव्हते....पण त्याने घालून दिली म्हणून दुर्गासाठी ती चप्पल स्पेशल होती....तिच्या हट्टामुळे त्याने तिथून फक्त त्यांनी ती चप्पल खरेदी केली होती..........

" आपल्याकडे दारावर आलेल्या व्यक्तीला, पाहुण्याला देवाचा दर्जा दिला जातो.....तुम्ही तुमच्या या हाई क्लास विचारसरणीत हे विसरलात वाटते ' अतिथी देवो भव ' .....ही आपली संस्कृती आहे...कोणीही दारात आले तरी त्याचे हसून स्वागत केले जाते....मानपान देत, खाऊ घालून त्याला रीतसर मानाने पाठवले जाते....आणि मग हे तर दुकान आहे...इथे तर तुम्हाला खूप जपून वागायला हवे.... इथे कोणाचा अपमान करणे म्हणजे येणाऱ्या लक्ष्मीचा अपमान करणे होय....आणि हे तुम्हा सगळ्यांनाच खूप महागात पडू शकत.... तुमचं अख्खं आयुष्य यावर चालते आहे हे तुम्ही विसरता कामा नये.....आपली संस्कृती आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवते...आपल्याला जीवनाच्या उच्च शिखरावर पोहचावते....त्याचा अपमान करणे कधीच आपल्या हिताचे नसेल आहे...."..... दुर्गा खूप विनम्रपणे हात जोडत बोलली.......

तिचा इथे सगळ्यांसमोर इतका अपमान झाला असून सुद्धा दुर्गाला इतके नम्रपणे बोलतांना बघून आर्या तिचे हे नवीन रूप बघत होता...नेहमी चुकीचे काही झाले की अंगावर धाऊन जाणारी दुर्गा आज चक्क शांतपणे हसत बोलत होत होती......

" दुर्गा की रूप आहेत तुझी......परत एकदा नव्याने तुझ्या प्रेमात पडलो आहे........"...आर्या दुर्गाला बोलतांना बघून मनातच बोलत होता..

" सॉरी मॅडम......."...

" परत असे होता कामा नये......".आर्या....... वारनिंग देऊन ते तिथून निघून आले.....

" Who is he???..."....... एक आवाज आला

" आर्याविर सरपोतदार...... सरपोतदार इंडस्ट्रीजचा एकुलता एक वारसदार......."....manager

" That's why....very much attitude....."..... ती मुलगी जी आर्यासोबत ओळख करायला गेली होती

" No..... He is very much down to earth personality ..... चुकीचं खपाऊन घेत नाहीत ते......आणि नक्कीच mam स्पेशल असणार म्हणूनच sir स्वतः पुढे आलेत त्यांना चप्पल घालायला ...नाहीतर सर कुठल्याच मुलीला आपल्या जवळ सुद्धा भटकू देत नाही.... ..."...manager

"का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो…....."....

गुण गुणातच आर्या गाडी ड्राईव्ह करत होता.....दुर्गा कुतूहलाने त्याच्या त्या रुपाकडे बघत होती...

*****
क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️